डिजिट इन्शुरन्स करा

भारतात पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज कसा करावा?

(स्रोत: isu.pub)

पासपोर्ट हे एक न बदलता येणारे दस्ताऐवज आहे, जे तुम्हाला परदेशात प्रवास करताना सोबत बाळगावे लागते. साधारणपणे, या दस्ताऐवजाची 10 वर्षांची विशिष्ट वैधता(validity) असते, त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. 

भारतीय पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी तुमच्या माहितीसाठी लागणाऱ्या गोष्टी संबंधित लेख खालील प्रमाणे. पासपोर्ट पुन्हा जारी करणे आणि रिन्यू करणे यातील फरक ओळखण्यात देखील हा लेख आपल्याला मदत करेल.

पासपोर्ट पुन्हा जारी करणे म्हणजे काय?

जर काही कारणांसाठी पासपोर्ट धारकाला नवीन पासपोर्ट पुस्तिकेची गरज असेल, तर त्यासाठी पासपोर्ट पुन्हा जारी करण्याची प्रक्रिया पार करावी लागते. लक्षात ठेवा की, पासपोर्ट पुन्हा जारी करणे आणि पासपोर्ट रिन्यू करणे ही एकच गोष्ट नाही. दोघांमधील फरक खाली नमूद केला आहे. शिवाय, विविध परिस्थितीत पासपोर्ट पुन्हा जारी करणे आवश्यक असू शकते, ज्याचे आम्ही नंतर लेखात विस्ताराने वर्णन केले आहे.

सगळ्यात आधी पासपोर्ट पुन्हा जारी करणे, आणि रिन्यू करणे यातील फरक समजून घेऊ.

पासपोर्ट पुन्हा जारी करणे कधी आवश्यक आहे?

आता तुम्हाला या दोन अटींमध्ये फरक असल्याचे लक्षात आले असेल, तेव्हा तुम्ही तुमचे चालू दस्ताऐवज पुन्हा जारी करण्याचा विचार केला पाहिजे, अशा उदाहरणांवर एक नजर टाका –

  • तुमच्या पासपोर्टची वैधता पुढील 3 वर्षांत संपणार आहे, किंवा आधीच संपली आहे.

  • तुमच्या सध्याच्या पासपोर्टचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे, किंवा ते खराब झाले आहे.

  • तुमच्या सध्याच्या पासपोर्टची सर्व पाने संपली आहेत.

  • तुम्हाला जन्मतारीख, नाव, निवासी पत्ता आणि इतर काही तपशीलांमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

  • जर तुम्ही तुमचा पासपोर्ट चुकीचा ठेवला असेल, किंवा तो चोरीला गेला असेल तर पुन्हा जारी करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला पुन्हा जारी केलेल्या अर्जासोबत FIRची प्रत सबमिट करणे आवश्यक आहे.

  • तुमचे सध्याचे पासपोर्ट किमान 3 वर्षांपूर्वी कालबाह्य झाले असल्यास, तुम्ही पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज केला पाहिजे.

तुम्हाला वर नमूद केलेल्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यास, पासपोर्ट पुन्हा जारी करण्याची प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही तुमचे पासपोर्ट ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने पुन्हा जारी करून घेऊ शकता.  अर्ज करण्याच्या या दोन्ही पद्धतींमधील स्टेप्स देण्यात येत आहे. 

 

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

ऑनलाइन पासपोर्ट पुन्हा जारी करण्यामध्ये पुढील स्टेप चा समावेश आहे - 

  • स्टेप 1:  पासपोर्ट सेवा पोर्टल  ला आताच भेट द्या, आणि स्वतःचे अकाउंट उघडण्यासाठी नाव नोंदवा

  • स्टेप 2: एकदा नोंदणी केल्यानंतर, साइन इन करा आणि 'नवीन पासपोर्टसाठी अर्ज करा/पासपोर्ट पुन्हा जारी करा'.

  •  स्टेप 3: पुढे, सर्व वैयक्तिक तपशीलांसह (detail) एक ऑनलाइन फॉर्म भरा आणि 'सबमिट' वर क्लिक करा.

  •  स्टेप 4: आताच सगळी अर्जाची फी भरण्यासाठी 'पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट' वर क्लिक करा. लक्षात ठेवा की, अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यापूर्वी तुम्ही फक्त ऑनलाइन पेमेंट करू शकता.

यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट पुन्हा जारी करण्याच्या सर्व कागदपत्रांसह पासपोर्ट सेवा केंद्रावर जा.

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

तुम्हाला या ऑफलाइन प्रक्रियेचा लाभ घ्यायचा असला तर, तुम्हाला  पासपोर्ट सेवा वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. 

पुढील स्टेप खाली नमूद केल्या आहेत - 

  • स्टेप 1: ई-फॉर्म डाउनलोड करण्यासाठी 'फॉर्म आणि अॅफिडेविट्स' विभागात नेव्हिगेट करा आणि "पासपोर्ट पुन्हा जारी करा".

  • स्टेप 2: तसेच या पोर्टलवरून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) डाउनलोड करा. ई-फॉर्मसह या पीसीसी ची प्रिंटआउट घ्या.

  • स्टेप 3: फॉर्म भरा, पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संलग्न करा आणि तुमच्या जवळच्या पासपोर्ट कार्यालयात सबमिट करा.

ऑनलाईन पेमेंट करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा, आणि आपले पासपोर्ट पुन्हा जारी करून घ्या.

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पुन्हा जारी करण्याच्या फॉर्मसह, प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्ही पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी खालील कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे - 

  • वयाचा पुरावा

  • निवासी पत्त्याचा पुरावा

  • ओळखीचा पुरावा

  • अर्जदाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो

  • तुमच्या सध्याच्या पासपोर्ट बुकलेटच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांच्या अटेस्टेड फोटोकॉपीज

  • सध्या वापरात असलेले ओरिजिनल बुकलेट

  • अपॉइंटमेंट अर्जाची पावती किंवा ऑनलाइन अर्जाचे अंतिम पान. हे पान अर्ज फी भरणे आणि अपॉईंटमेन्ट शेड्युल्ड यांचा पुरावा मानला जातो.

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी पोलीस पडताळणी आवश्यक आहे का?

तुम्हाला पासपोर्ट पुन्हा जारी केल्यानंतर पोलीस पडताळणी साठी जावे लागू शकते. यासाठीही, काही निकषांकडे पाहण्याची गरज आहे.

जसे की, नाव किंवा निवासी पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील बदलण्यासाठी किंवा पुन्हा जारी करण्यासाठी तुम्ही अर्ज करत असल्यास, पासपोर्ट कार्यालयाला पडताळणी आवश्यक आहे. सादर केलेले सर्व नवीन तपशील अचूक आहेत, याची पडताळणी करण्यासाठी हे केले जाते.

तसेच, तुमचा पासपोर्ट एक्सपायर झाल्यानंतर किंवा बुकलेट संपल्यानंतर पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी पोलीस पडताळणी अगोदर केली जाऊ शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये, अधिकारी पुन्हा जारी केलेले डॉक्युमेंट प्राप्त झाल्यानंतर पोलीस पडताळणी, तपासणीचे आदेश देऊ शकतात.

तुम्हाला भरावी लागणारी ‘पासपोर्ट रिइश्यू’ फी किती आहे?

 

खालील तक्त्यामध्ये तुम्हाला भारतातील पासपोर्ट रिइश्यू  फी बद्दल कल्पना दिली आहे.

श्रेणी नॉर्मल फी तात्काळ फी
36 पेजसह पासपोर्ट पुन्हा जारी केला ₹1500 ₹2000
60 पेजसह पासपोर्ट पुन्हा जारी केला ₹2000 ₹2000
36 पेजसह अल्पवयीन मुलांसाठी पुन्हा जारी केलेला पासपोर्ट ₹1000 ₹2000
जुना पासपोर्ट खराब झाल्यास, चुकीच्या ठिकाणी किंवा चोरीला गेल्यास 36 पेजसह पुन्हा जारी केलेला पासपोर्ट ₹3000 ₹2000
जुना पासपोर्ट खराब झाल्यास, चुकीच्या ठिकाणी किंवा चोरीला गेल्यास 60 पेजसह पुन्हा जारी केलेला पासपोर्ट ₹3500 ₹2000

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी किती दिवस लागतात?

सर्वसाधारणपणे, संपूर्ण प्रक्रियेस 15 दिवस लागू शकतात. परंतु, तत्काळ मोडद्वारे अर्ज केलात, तर ही प्रक्रिया 7-10 दिवसांत पूर्ण करू शकता. पासपोर्ट पुन्हा जारी करण्याची अचूक वेळ अनेक घटकांवर बदलू शकते, जसे की पोलीसपूर्व पडताळणी (pre-police verification) किंवा पोलीस पडताळणीनंतरची (आवश्यकतेनुसार).

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी स्टेटस कसा तपासायचा?

तुम्ही खालीलपैकी एक पद्धत वापरून तुमच्या पुन्हा जारी केलेल्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकता -

पासपोर्ट सेवा वेबसाइटद्वारे

  • स्टेप 1: पासपोर्ट सेवा वेबसाइट ला भेट द्या.

  • स्टेप 2: 'ट्रॅक अॅप्लिकेशन स्टेटस' बारवर क्लिक करा.

  • स्टेप 3: पुढील पेज वरील, अॅप्लिकेशनचा प्रकार निवडा, जन्मतारीख आणि फाइल नंबर टाका.

  • स्टेप 4: तुमच्या अर्जावर किती काळ प्रक्रिया झाली आहे, हे पाहण्यासाठी 'ट्रॅक स्टेटस' वर क्लिक करा.

MPassport सेवा अॅप्लिकेशन द्वारे

आताच रजिस्टर करा mपासपोर्ट सेवा अॅप्लिकेशन तुमच्या Android किंवा iOS फोनवर डाउनलोड केल्यानंतर. तुम्हाला ऍक्सेस मिळण्यासाठी तुमची जन्मतारीख आणि अर्ज फाइल नंबर टाकणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, ऑफलाइन पुन्हा जारी करण्याच्या स्थितीबद्दल माहिती प्राप्त करणे देखील शक्य आहे. असे करण्याचे काही मार्ग येथे आहेत - 

  • एसएमएस ट्रॅकिंग – तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून 9704100100 वर एसएमएस पाठवा. एसएमएस मध्ये ‘स्टेटस फाइल नंबर’ टाइप करा.

  • नॅशनल कॉल सेंटर –18002581800 वर सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान ऑटोमेटेड इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स स्टेटस साठी कॉल करा.

पासपोर्ट रिन्यु करणे आणि पुन्हा जारी करणे, यात फरक काय आहे?

पासपोर्ट पुन्हा जारी करणे आणि रिन्यु करणे, याबद्दल भारतीयांमध्ये बराच गोंधळ आहे.  बर्‍याचदा, या दोन्ही टर्म परस्पर बदलून वापरल्या जातात. या दोन्ही प्रक्रियांमधील बदल

खालीलप्रमाणे आहेत- 

पासपोर्ट पुन्हा जारी करणे पासपोर्टचे नूतनीकरण
साधारणपणे भारतीय पासपोर्ट एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा जारी करणे आवश्यक आहे. पहिल्यांदा जारी झाल्यानंतर 10 वर्षांनी पासपोर्ट एक्सपायर होतो. अल्पकालीन पासपोर्ट धारकांसाठी रिन्यूअल आवश्यक आहे. साधारणपणे, या विशेष पासपोर्टची वैधता 5 वर्षे असते, त्यानंतर 10 वर्षांपर्यंत मुदतवाढीसाठी अर्ज करता येतो.
पासपोर्ट धारकांना पुन्हा जारी केल्यानंतर नवीन बुकलेट मिळते. रिन्यूअल मुळे नागरिकांकडे सध्या चालू असलेल्या बुकलेट मध्ये बदल होत नाही.

तुम्हाला तुमचा पासपोर्ट पुन्हा कसा जारी करायचा आहे, हे माहित असून सुद्धा अर्ज भरायला उशीर करताय?  प्रक्रियेची योग्य माहिती घेऊन, पासपोर्ट पुन्हा जारी केल्याने तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही!

सतत विचारले जाणारे प्रश्न

पासपोर्ट नंबर पुन्हा जारी केल्यानंतर बदलतो का?

पासपोर्ट पुन्हा जारी केल्याने तुमचा पूर्वीचा पासपोर्ट नंबर बदलत नाही. फक्त वैधता(validity) वाढवली जाते.

पुन्हा जारी केल्यानंतर तुमच्या जुन्या पासपोर्ट बुकलेटचे काय होते?

तुमच्याकडे जुनं बुकलेट असल्यास, तुम्हाला ते पुन्हा जारी करताना सबमिट करावे लागेल. जर तुमच जुनं बुकलेट हरवलं असेल, तर तुमचं नवीन बुकलेट जारी केल्यानंतर ते रद्द किंवा अवैध मानलं जात.

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज फी किती आहे?

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्जाची फी 36 पेजसाठी 1500 रुपये आणि 60 पेजसाठी 2000 रुपये आहे