डिजिट इन्शुरन्स करा

भारतात विद्यार्थी पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा?

(स्त्रोत: path2usa)

तुम्ही परदेशात शिकण्याचा प्लॅन करताय का?

तुमची तयारी असल्यास, तुम्हाला आर्थिक प्लॅनिंग बरोबरच तुम्हाला प्रवासात लागणाऱ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थी पासपोर्ट आणि व्हिसा समाविष्ट आहे.

तुमच्याकडे ही कागदपत्रे नसल्यास, इतर तपशिलांसह विद्यार्थी पासपोर्ट अर्ज, कागदपत्रे आणि पात्रता याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त आहे.

भारतात विद्यार्थी पासपोर्ट मिळविण्यासाठीच्या स्टेप

  • स्टेप 1: अधिकृत पासपोर्ट सेवा वेबसाइटला भेट द्या आणि अर्ज करा.
  • स्टेप 2: जवळच्या पासपोर्ट कार्यालयात भेटीची वेळ निश्चित करा, आणि आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था करा.

  • स्टेप 3: अलॉट केलेल्या तारखेला पासपोर्ट ऑथॉरिटीसाठी भेट द्या, आणि पडताळणी प्रक्रियेदरम्यान अटेस्टेड कागदपत्रे प्रदान करा.

  • स्टेप 4: पावती कलेक्ट करा, आणि अपडेटसाठी अर्जाचा स्टेटस तपासा.

विद्यार्थी पासपोर्टसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

त्याच्या उद्देशानुसार, विद्यार्थी सामान्य किंवा तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. 

त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये हे समाविष्ट आहे -

1. ऍड्रेस प्रूफ (सध्याचा पत्ताचा पुरावा)

  • आधार कार्ड

  • अलिकडील टेलिफोन बिल 

  • अल्पवयीन मुलांच्या बाबतीत, पालकांच्या पासपोर्टची प्रत (पहिले आणि शेवटचे पेज)

  • प्रतिष्ठित नियोक्त्याने इश्यू केलेले प्रमाणपत्र

  • मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड)

  • आयकर मूल्यांकन ऑर्डर (इनकम टॅक्स असेसमेंट ऑर्डर)

  • अलिकडील युटिलिटी बिल, जसे की वीज किंवा पाणी

  • सक्रिय बँक अकाउंटच्या पासबुकची फोटोकॉपी 

  • भाडे करार (रेंटल अग्रीमेंट)

2. जन्मतारखेचा पुरावा

  • जन्म प्रमाणपत्र (बर्थ सर्टिफिकेट)

  • विद्यार्थ्यांच्या पासपोर्टसाठी माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. मान्यताप्राप्त मंडळ किंवा शैक्षणिक संस्थेने हे प्रमाणपत्र इश्यू केले पाहिजे.

  • अर्जदाराच्या ओळखपत्राची प्रत जिथे शिक्षण घेत आहे, अशा शैक्षणिक संस्थेने इश्यू केलेली असावी. 

  • विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने इश्यू केलेले बोनाफाईड प्रमाणपत्र.

मूळ कागदपत्रे उपलब्ध नसल्यास, तुम्ही योग्य कारणांसह प्रमाणपत्र किंवा पत्र सबमिट करू शकता. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट अर्जाविरुद्ध संस्थेच्या प्रमुखाने अटेस्टेड केलेल्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी सबमिट केल्या जाऊ शकतात.

विद्यार्थी पासपोर्टसाठी आवश्यक फी काय आहे?

हा पासपोर्ट मिळवण्यासाठी व्यक्तींना ₹1500 भरावे लागतील. पासपोर्ट सेवा वेबसाइट वर त्यांना अधिकृतपणे ऑनलाइन पेमेंट करता येईल

पेमेंट केल्याने विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी जवळच्या पासपोर्ट कार्यालयात अपॉइंटमेंट बुक करण्यात मदत होईल.

येथे काही पेमेंट मोड उपलब्ध आहेत -

  • डेबिट कार्ड

  • इंटरनेट बँकिंग

  • क्रेडीट कार्ड

  • एसबीआय चलन

याव्यतिरिक्त, कोणीही ऑनलाइन चलन तयार करून आणि जवळच्या एसबीआय शाखेला भेट देऊन पेमेंट करू शकतो.

 

विद्यार्थी पासपोर्टसाठी कोण अर्ज करू शकतो?

भारतात विद्यार्थी पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे -

  • 18 वर्षावरील विद्यार्थी प्रौढ मानले जातील. त्यांना आवश्यक कागदपत्रे स्वत: प्रमाणित(सेल्फ अटेस्टेड) करणे आवश्यक आहे.

  • अल्पवयीन अर्जदाराच्या बाबतीत पालक कागदपत्रे प्रमाणित करू शकतात.

  • अल्पवयीन मुले 18 वर्षांपेक्षा कमी वयापर्यंत Non-ECR मिळविण्यास पात्र आहेत.

  • विद्यार्थी त्यांच्या पालकांचा घराचा पत्ता पुरावा म्हणून सबमिट करू शकतात.

लक्षात घ्या की, अल्पवयीन अर्जदारासाठी, पालकांची संमती अनिवार्य आहे.

पात्र अर्जदारांनी पडताळणीसाठी अधिकृत कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे. आम्ही विद्यार्थ्याच्या पासपोर्टसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी केली आहे.

विद्यार्थी पासपोर्ट मिळविण्यासाठी लागणारा वेळ

तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, पासपोर्ट इश्यू करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस 25 ते 30 दिवस. वेळ लागू शकतो. त्यामुळे अर्ज लवकर करणे आवश्यक आहे.

हा पासपोर्ट इश्यू केल्या नंतर दहा वर्षांपर्यंत वैध आहे. तसेही, सध्याच्या पासपोर्टची मुदत संपण्याच्या एक वर्ष आधी तुम्ही पासपोर्ट रिन्यू करू शकत नाही.

जर तुम्ही परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी अर्ज केला असेल, तर विद्यार्थी पासपोर्ट आवश्यकता जाणून घेणे आवश्यक आहे. हे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात मदत करेल.

शिवाय, तुम्हाला लवकरात लवकर पासपोर्ट मिळू शकेल.

भारतातील विद्यार्थ्यांच्या पासपोर्टबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

विद्यार्थी पासपोर्ट प्रमाणित करण्यासाठी मला माझे 12वी चे मार्कशीट सबमिट करावे लागेल का?

हो, तुम्हाला महाविद्यालय विद्यार्थी पासपोर्ट प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबरोबर इयत्ता 12वी चे मार्कशीट सबमिट करणे गरजेचे आहे.

विद्यार्थी पासपोर्ट किती वेगाने मिळू शकतो?

सामान्यतः विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट प्रक्रियेसाठी 25 ते 30 दिवस लागतात. मात्र, अंतिम निर्णय हा पासपोर्ट अधिकाऱ्यावर अवलंबून असेल.

अल्पवयीन अर्जदाराची कागदपत्रे कोण प्रमाणित करू शकतात?

अल्पवयीन अर्जदारांसाठी, पालक अर्जदारांची कागदपत्रे प्रमाणित करू शकतात.