डिजिट इन्शुरन्स करा

पासपोर्टमध्ये नाव आणि पत्ता कसा बदलायचा?

(स्रोत: thequint)

पासपोर्टमध्ये तुमचे नाव आणि पत्त्यासह अनेक महत्त्वाचे तपशील असतात. म्हणून, जर तुम्ही अलीकडेच स्थलांतर केले असेल, परंतु तुमचा पासपोर्ट जुना पत्ता दर्शवत असेल, तर तुम्ही तो अपडेट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, पासपोर्टमध्ये तुमचे नाव चुकीचे असल्यास, ते लवकरात लवकर अपडेट करणे आवश्यक आहे.

या लेखात पासपोर्टमध्ये तुमचे नाव बदलण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. याव्यतिरिक्त, पासपोर्टमध्ये पत्ता कसा बदलायचा? हे ही जाणून घेऊया.

चला सुरु करूया!

पासपोर्टवरील नाव कसे बदलावे?

पासपोर्टमध्ये चुकीचे नाव किंवा आडनाव असेल, तर नाव बदलून नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन पासपोर्ट पुन्हा जारी करण्याचा अर्ज भरण्यासाठी व सबमिट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि ‘आता नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत आयडीने लॉग इन करा आणि ‘अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट/पासपोर्ट पुन्हा जारी करा’ पर्याय निवडा.
  • संबंधित तपशीलांसह अर्ज भरा.
  • पेमेंट करण्यासाठी आणि अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करा. शिवाय, तुमच्या जवळच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) किंवा पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) येथे अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट रक्कम भरावी लागेल.
  • आता,  चलन मिळविण्यासाठी ‘अर्जाची पावती प्रिंट करा’ निवडा, ज्यामध्ये तुमचा अर्ज संदर्भ क्रमांक किंवा एआरएन आहे. अर्ज भरून झाल्यावर तुम्हाला मिळालेल्या तारखेला व्हेरिफिकेशनसाठी मूळ कागदपत्रांसह जवळच्या पासपोर्ट कार्यालयाला भेट द्या.

याला पर्याय म्हणून, तुम्ही एक ई-फॉर्म डाउनलोड करून तो भरू शकता. त्यानंतर, 'Validate' वर क्लिक करा आणि फाइल सेव्ह करा. त्यानंतर, फक्त वर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ही XML फाइल अपलोड करा.

पासपोर्टमध्ये नाव बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पासपोर्टमध्ये नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे

  • लग्नाचा दाखला (मूळ आणि फोटोकॉपी)

  • तुमच्या जोडीदाराच्या पासपोर्टची स्वयं-प्रमाणित फोटोकॉपी

  • वर्तमान पत्त्याचा पुरावा

  • जुना पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या दोन पृष्ठांच्या  स्वयं-प्रमाणित फोटोकॉपी, त्यात ECR/नॉन-ECR पृष्ठ देखील समाविष्ट केले पाहिजे.

  • जुन्या पासपोर्टमध्ये वैधता एक्सटेन्शन पेज आणि निरीक्षण पेज असायला हवे (लागू होत असल्यास)

टीप: घटस्फोटित व्यक्तीने त्याच्या/तिच्या पासपोर्टमधील आडनाव बदलण्यासाठी घटस्फोटाच्या आदेशाची न्यायालय-प्रमाणित प्रत किंवा घटस्फोट प्रमाणपत्राची प्रत (स्वयं-प्रमाणित) सादर करणे आवश्यक आहे.

आता तुम्हाला पासपोर्टमध्ये नाव बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स व कागदपत्रे माहित आहेत, आता आपण पासपोर्टमधील पत्ता बदलण्याच्या प्रक्रियेकडे जाऊया.

पासपोर्टवर पत्ता कसा बदलायचा?

ऑनलाइन पत्ता बदलण्याच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे-

  • पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.  येथे, नोंदणीकृत वापरकर्ते त्यांच्या आयडी आणि पासवर्डसह त्यांच्या अकाउंटमध्ये लॉग इन करू शकतात, तर नवीन वापरकर्त्यांनी नवीन अकाउंट तयार करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही लॉग इन केल्यानंतर, जवळचे पासपोर्ट कार्यालय निवडा.  या टप्प्यावर, पोर्टलवर तुम्हाला काही तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे, जसे की तुमचे नाव आणि जन्मतारीख.
  • त्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर अॅक्टिव्हेशन लिंक प्राप्त होईल. या लिंकवर क्लिक करा, त्यानंतर ‘अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट/पासपोर्ट पुन्हा जारी करा’ निवडा.

आधीच्या टप्यावर आपण पाहिले की, एखाद्या व्यक्तीने जवळच्या पासपोर्ट कार्यालयात भेटीची वेळ निश्चित करावी. अद्ययावत पत्त्याच्या तपशीलांसह पीडीएफ अर्ज भरणे आणि सबमिट करावा. लक्षात ठेवा की, हा फॉर्म ऑफलाइन देखील डाउनलोड करून भरला जाऊ शकतो. एकदा अर्ज भरून झाल्यानंतर, डाउनलोड केलेल्या पेजवर अर्ज अपलोड करता येऊ शकतो.

पासपोर्टमध्ये पत्ता बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पासपोर्टमधील पत्ता बदलण्यासाठी कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे-

  • मूळ पासपोर्ट

  • तुमच्या ऑनलाइन अर्जाची प्रत

  • चलन किंवा पेमेंट पावतीची प्रत

  • सध्याच्या पत्त्याचा पुरावा, जसे की आधार कार्ड, वीज बिल, पाणी बिल, मतदार ओळखपत्र इ.

  • पासपोर्ट जारी करणार्‍या प्राधिकरणाने केलेल्या निरीक्षणाच्या पेजची प्रत (स्वयं-प्रमाणित)

  • जोडीदाराचा पासपोर्ट (अर्जदाराचा सध्याचा पत्ता जोडीदाराच्या पासपोर्टमधील पत्त्यासारखाच असावा)

वर नमूद केल्याप्रमाणे, नाव किंवा पत्ता बदल करण्यासाठी लागणाऱ्या फी विषयी आपण जाणून घेऊया.

पासपोर्टवर नाव आणि पत्ता बदलण्यासाठी किती खर्च येतो?

नाव आणि पत्त्यासह वैयक्तिक तपशीला मध्ये बदल करायचा असल्यास, विद्यमान पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करावा लागेल.

10 वर्षांच्या वैधतेसह पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी (व्हिसा पेज संपल्यामुळे अतिरिक्त पुस्तिकेसह) अर्ज फी  (60 पेजेससाठी) 2000 रूपये आणि (36 पेजसाठी) 1500 रुपये आहे. तत्काळ सेवांच्या बाबतीत, एखाद्या व्यक्तीला 2000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतात.

शिवाय, अल्पवयीन अर्जदारांसाठी, 5 वर्षांच्या वैधतेचा पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज फी म्हणून ३६ पेजसाठी 1000 रुपये आणि अतिरिक्त तत्काळ फी म्हणून 2000 रुपये आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पत्ता बदलण्याचा अर्ज सादर करताना अर्जदाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे का?

नाही, पत्ता बदलण्यासाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन होते.

लग्नानंतर महिलांना पासपोर्टमध्ये नाव बदलणे बंधनकारक आहे का?

नाही, महिलांना लग्नानंतर पासपोर्टमध्ये नाव बदलणे गरजेचे किंवा अनिवार्य नाही. असे बदल करणे ही अर्जदाराची निवड आहे.