इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
Premium Starting ₹225 only*

भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-फ्री देश

देशाच्या बाहेर फिरायला जायचे म्हंटले की, सर्वात प्रथम 'व्हिसा'साठी अर्ज करण्याचा विचार मनात येतो. तुम्ही ज्या देशाला भेट देऊ इच्छिता, त्या देशाचा व्हिसा मिळावा यासाठी क्लिष्ट अर्ज प्रक्रियेला सामोरे जावे लागेल का? वेळ वाया जाईल का? असे प्रश्न तुह्माला पडले असतील. एखाद्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करतानाच क्लिष्ट पद्धतीमुळे तुमचे तासंतास वाया जातात. 

पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक देशांमध्ये राहण्यासाठी भारतीयांना व्हिसा आवश्यक नसतो. तर काही देशामध्ये भारतीयांसाठी 'व्हिसा-ऑन-अरायव्हल' ची सुविधा असते. 

हो! अगदी बरोबर!

'हेनले आणि पार्टनर्स 'च्या पासपोर्ट निर्देशांकानुसार, मार्च 2023 पर्यंत, भारतीय पासपोर्ट धारक अनेक देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हलचा लाभ घेऊ शकतात. भारतीय नागरिक 'ई-व्हिसा/एंट्री परमिट' द्वारे खालील यादीत नाव असलेल्या देशांमध्ये प्रवास करू शकतात. सद्य स्थितीत, देशाच्या बाहेर प्रवास करण्याचं स्वातंत्र्य देण्याच्या बाबतीत 'भारतीय पासपोर्ट' 84 व्या क्रमांकावर आहे.

पण पासपोर्ट असणारे भारतीय नागरिक कोणत्या देशात व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात? हे पाहण्यासाठी खालील यादी तपासा!

2023 मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-फ्री केलेल्या देशांची यादी

भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त केलेल्या देशांची यादी पुढील प्रमाणे:

1. अल्बेनिया 15. मायक्रोनेशिया
2. बार्बाडोस 16. मोन्सेरात
3. भूतान 17. नेपाळ
4. ब्रिटिश व्हर्जिन इसलँड 18. नियू
5. कुक इसलँड 19. ओमान
6. डोमिनिका 20. कतार
7. एल साल्वाडोर 21. सेनेगल
8. फिजी 22. सेंट किट्स आणि नेव्हिस
9. ग्रेनेडा 23. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
10. हैती 24. श्रीलंका
11. जमैका 25. त्रिनिदाद आणि टोबॅगो
12. कझाकस्तान 26. ट्युनिशिया
13. मकाओ (SAR चीन) 27. थायलंड
14. मॉरिशस 28. वानू

2023 मध्ये भारतीय नागरिकांना ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल/ई-व्हिसा’ मिळू शकेल, अशा देशांची यादी

सहसा, इमिग्रेशन अधिकारी नागरिकाला  'व्हिसा-ऑन-अरायव्हल' देण्याआधी अर्जदाराचे पासपोर्ट, बायोमेट्रिक्स तपासतात, त्याच बरोबर निर्धारित पेमेंट गोळा करतात, आणि त्यानंतर 'व्हिसा परमिट' इश्यू करतात. 'ऑन-अरायव्हल व्हिसा' देशातील प्रवेशाच्या प्रमुख ठिकाणी 'इश्यू' केला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा की, तुम्ही तेथे पोहोचल्यावर व्हिसा 'इश्यू' होत असलेल्या ठिकाणी जाणे आणि तुमचा व्हिसा इश्यू करून घेणे गरजेचे आहे.

'इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन' (ETA) ही सुविधा भारतीयांसाठी 2014 मध्ये, 2015 मधील पात्र देशांच्या सुधारित यादीसह कार्यान्वित झाली. खाली दिलेल्या यादीमध्ये, भारतीय नागरिकांना 2023 मध्ये 'व्हिसा-ऑन-अरायव्हल' आणि 'ई-व्हिसा' प्रदान करणारे देश नमूद केले आहेत :

29. बोलिव्हिया 45. मॉरिटानिया
30. बोत्सवाना 46. मोझांबिक
31. बुरुंडी 47. म्यानमार
32. कंबोडिया 48. पलाऊ बेटे
33. केप वर्दे बेटे 49. रवांडा
34. कोमोरो बेटे 50. सामोआ
35. इथिओपिया 51. सेशेल्स
36. गॅबॉन 52. सिएरा लिओन
37. गिनी-बिसाऊ 53. सोमालिया
38. इंडोनेशिया 54. सेंट लुसिया
39. इराण 55. टांझानिया
40. जॉर्डन 56. तिमोर-लेस्टे
41. लाओस 57. टोगो
42. मादागास्कर 58. तुवालू
43. मालदीव 59. युगांडा
44. मार्शल बेटे 60. झिम्बाब्वे

भारतीय पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना 'ई-व्हिसा सुविधा' देणाऱ्या देशांची यादी

61. अंगोला 74. मलेशिया
62. अँटिग्वा आणि बारबुडा 75. मोल्दोव्हा
63. ऑस्ट्रेलिया 76. मोरोक्को
64. अझरबैजान 77. रशिया
65. बहारीन 78. साओ टोमे आणि प्रिंसिपे
66. बेनिन 79. सिंगापूर
67. कोलंबिया 80. सुरीनाम
68. जिबूती 81. तैवान
69. जॉर्जिया 82. ताजिकिस्तान
70. केनिया 83. तुर्की
71. कुवेत 84. उझबेकिस्तान
72. किर्गिझस्तान 85. व्हिएतनाम
73. लेसोथो 86. झांबिया

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या 'व्हिसा' चा लाभ घ्यायला आवडेल?

'व्हिसा' म्हणजे नेमकं काय?

एखाद्या नागरिकाला परदेशात जायचे असेल, तर त्या नागरिकाला संबंधित देशाला भेट देण्यासाठी सरकारद्वारे परवानगी देणारी कागदपत्रे म्हणजे 'व्हिसा' होय. जसे तुम्ही कोणत्या देशातून आले आहात, याची ओळख पासपोर्ट असते, तसेच 'व्हिसा' हे तुम्हाला परदेशात किती वेळ राहण्यास परवानगी आहे, हे दर्शवते. 

आता विविध देशांनी त्यांच्या 'व्हिसा' प्रक्रियेबाबत विविध प्रकारचे नियम मांडले आहेत. ते पुढीलप्रमाणे

‘व्हिसा’चे प्रकार नेमका अर्थ काय?
फ्रि-व्हिसा व्हिसा-मुक्त प्रवास हा एक फायदा आहे, जिथे तुम्ही व्हिसा न काढता एखाद्या देशाला भेट देऊ शकता. यासाठी दोन देशांमध्ये त्या पद्धतीचा करार झालेला असावा लागतो किंवा तुम्ही ज्या देशाला भेट देताय, त्या देशाने परदेशी नागरिकांसाठी देशाच्या सीमा मुक्त ठेवलेल्या असतील, तरच तुम्हाला हा लाभ घेता येतो.
व्हिसा-ऑन-अरायव्हल या प्रकारचा व्हिसा 'ऑन-अरायव्हल व्हिसा' म्हणूनही ओळखला जातो, हा व्हिसा प्रवेश द्वारावर पर्यटक म्हणून आलेल्या नागरिकाला दिला जातो .व्हिसा मंजूर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सरकारी अधिकार्‍यांद्वारे प्रवेश द्वारावर होते.
ई- व्हिसा ई-व्हिसा हे, देशाच्या इमिग्रेशन ऑफिशिअल चे ऑनलाईन अधिकृत डॉक्युमेंट्स आहेत, जे व्हिजिटर्स म्हणून प्रवेश करण्यास परवानगी देतात. देशाच्या दूतावासाने मंजुरी दिलेल्या कागदी व्यवहारांना हा चांगला पर्याय आहे.
एन्ट्री परमिट देश त्यांच्या पर्यटकांना व्हिसाच्या ऐवजी एन्ट्री परमिट देतात. हे एन्ट्री परमिट अशी कागदपत्रे आहेत, जी परदेशी लोकांना विशिष्ट कालावधीसाठी कायदेशीररित्या देशात प्रवेश करण्याची आणि राहण्याची परवानगी देते.

प्रवास विमा घेणे अनिवार्य आहे का?

होय ! जगभरातील या 34 देशांमध्ये पर्यटकांना पर्यटनासाठी एन्ट्री परमिट अनिवार्य आहे. मुख्य कारण म्हणजे परदेशात आरोग्यसेवांवर बराच खर्च होतो. त्याचबरोबर, तुमच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अनपेक्षित परिस्थितींपासून स्वतःचे आर्थिक संरक्षण होणार, याची तुम्हाला खात्री होणे महत्वाचे आहे, नाही का?

ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीचे अनेक फायदे आहेत , ज्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे :

  • तुमच्या प्रवासादरम्यान मेडिकल इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या गोष्टी यात कव्हर होतील. तुम्हाला अपघाती किंवा आजाराशी संबंधित आपत्कालीन वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते, अशा प्रकरणांमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी तुमची हॉस्पिटलची बिले आणि उपचाराचा खर्च कव्हर करेल.
  • ट्रिप रद्द करणे किंवा फ्लाइट वेळेवर न येणे किंवा संपूर्ण ट्रिपच रद्द होणे, अशा संबंधित सगळ्या गोष्टी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट आहेत.
  • विलंब/बॅगेजचे नुकसान - तुम्ही इतक्या हौशीने फिरायला जाता आणि प्रवासाच्या सुरुवातीलाच एअरपोर्टवर बॅगेजसाठी खूप वेळ थांबावं लागतं किंवा त्याहून वाईट म्हणजे तुमचे सामान खराब होऊन तुम्हाला मिळते. या परिस्थितीत, तुमची प्रवास विमा पॉलिसी तुमच्या सामानाच्या विलंब किंवा तोट्यासाठी आर्थिक भरपाई देऊ शकते.
  • पाकीट हरवण्यापासून संरक्षण - तुमचे पाकीट हरवणे किंवा चोरी होणे, अशी कोणतीही दुर्घटना घडल्यास अशा परिस्थितीत गोंधळून जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये किंवा तुमची कुठेही अडचण होऊ नये, यासाठी तुमची प्रवास विमा पॉलिसी त्वरित आर्थिक रोख मदत स्वरूपात देते.
  • अचानक पुढे ढकलण्यात आलेल्या ट्रिप साठी कव्हरेज - संप, दंगली, नैसर्गिक आपत्ती आणि इतर धोकादायक घटनांमुळे, तुमची ट्रिप रद्द होऊ शकते. या परिस्थिती बाबत काही अंदाज बांधणे कठीण असते, ज्यामुळे तुम्ही तुमचा मुक्काम रद्द करू शकता किंवा पुढे ढकलू  शकता. खर्चाची काळजी करू नका. कारण तुमचा प्रवास विमा रद्द केलेल्या किंवा वाढलेल्या ट्रिपला कव्हर करतो.
  • बाऊन्स बुकिंग - तुम्ही खूप आधीच हॉटेल किंवा कार्यक्रमाची जागा बुक केलेली असेल, आणि तिथे पोहोचल्यावर कळलं की हॉटेल ओव्हरबुक असण्याने तुमचं बुकिंग बाऊन्स झाले आहे. तर, अशा निराशाजनक परिस्थितीत सुद्धा , बाऊन्स बुकिंग कव्हरसह प्रवास विमा तुमचा दिवस वाया जाऊ देणार नाही!

त्यामुळे, तुम्हाला तुमचा प्रवास अधिक सुरक्षित करायचा असेल, आणि पैशाची सुद्धा बचत करायची असेल, तर अगदी सुरुवातीपासूनच प्रवास विमा योजना खरेदी करणे उत्तम ठरेल! बाजारात अनेक योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमचे पेमेंट करण्यापूर्वी, तुम्ही परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी प्रवास विमा योजनांची तुलना केली पाहिजे.

 

टीप: प्रत्येक देशासाठी व्हिसाची आवश्यकता बदलते. कृपया कोणतीही प्रवास बुकिंग करण्यापूर्वी तुम्ही विशिष्ट देशाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व पासपोर्ट आणि व्हिसा संबंधित नियम तपासल्याची खात्री करा.

भारतीयांसाठी व्हिसा-फ्री देशांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सर्व भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश अट समान आहे का?

नाही, भारतीय नागरिकाच्या पासपोर्टच्या प्रकारानुसार व्हिसा-मुक्त प्रवेश बदलू शकतो. उदाहरणार्थ, डिप्लोमॅटिक आणि अधिकृत पासपोर्ट धारकांना वेगवेगळ्या प्रवेश आवश्यकता असू शकतात.

व्हिसा-फ्री देशांसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

व्हिसा शिवाय प्रवास करताना, तुम्ही वैध पासपोर्ट बाळगणे आवश्यक आहे - साधारणपणे तुमच्या प्रवासाच्या तारखेनंतर सहा महिने, तुम्ही भेट देत असलेल्या देशाने अनिवार्य केलेला प्रवास विमा आवश्यक आहे. तुम्हाला पुढील प्रवासाचा पुरावा (प्रवास कार्यक्रम, फ्लाइट तिकीट इ.), लसीकरण प्रमाणपत्रे इ. सादर करणे आवश्यक असू शकते. तुम्ही देशात प्रवेश करण्यासाठी किमान पात्रता निकष उत्तीर्ण असल्याची खात्री करा.

भारतीयांसाठी व्हिसा मोफत प्रवेशाची हमी आहे का?

भारतीय नागरिक परदेशात व्हिसा-मुक्त भेट देऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की, देशात प्रवेशाची हमी आहे. तुम्ही किमान प्रवेश आवश्यकता पूर्ण करत नसल्यास किंवा इमिग्रेशन अधिकाऱ्याला कोणत्याही कारणास्तव तुमच्यावर संशय असल्यास, तुमचा देशात प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

भारतीय व्यक्ती व्हिसाशिवाय व्हिसा-फ्री देशांमध्ये अनिश्चित काळासाठी राहू शकतात का?

नाही, व्हिसा-फ्री देशांमध्ये भारतीय व्यक्ती व्हिसा शिवाय मर्यादित दिवसच वास्तव्य करू शकतात. हा कालावधी प्रत्येक देशासाठी बदलत असल्याने, प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक देशाची प्रवेश नियमावली तपासणे महत्त्वाचे आहे.

भारतीय व्यक्ती व्हिसा -मुक्त देशांमध्ये व्हिसा शिवाय काम किंवा अभ्यास करू शकतात?

नाही, व्हिसा-मुक्त प्रवेश सहसा केवळ पर्यटन किंवा अल्पकालीन भेटींसाठी असतो. जर भारतीयांना या देशांमध्ये काम किंवा अभ्यास करायचा असेल तर त्यांना योग्य व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.