हेल्थ इन्शुरन्स एजंट व्हा

आपण एकत्र अप्रतिम काम करुया

हेल्थ इन्शुरन्स एजंट ही अशी व्यक्ती आहे जी हेल्थशी संबंधित कोणतीही इन्शुरन्स उत्पादने विकण्यासाठी विमा कंपनीबरोबर काम करते. जर आपण एजंट बनू इच्छित असाल, तर तुमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पॉलिसी निवडण्यास मदत कराल.

डिजिटसह, आपण कस्टमाईझ्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन विकू शकता जे एका माणसासाठी आणि कुटुंबासाठीही दर्जेदार आरोग्य सेवा देण्यास उपयुक्त आहेत.

 

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?

हेल्थ इन्शुरन्स  हा एक प्रकारचा इन्शुरन्स आहे जो लोकांना कोणत्याही आरोग्य किंवा वैद्यकीय स्थितीचा सामना करताना आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देतो. यात विमाधारक व्यक्ती आजारी किंवा जखमी असताना वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी पैसे दिले जातात.

भारतातील हेल्थ इन्शुरन्स ही एक वाढती बाजारपेठ आहे. कारण १.३ अब्जपेक्षा जास्त संभाव्य लाभार्थी आहेत. मात्र त्यापैकी केवळ २०% सध्या कव्हर्ड आहेत.

*डिस्क्लेमर - एजंट्ससाठी कोणतीही विशिष्ट श्रेणी नाही. जर आपण  जनरल इन्शुरन्स एजंट होण्यासाठी नोंदणी केली, तर आपण जनरल इन्शुरन्स उत्पादने विकू शकता.

भारतातील हेल्थ इन्शुरन्स उद्योगाबद्दल रोचक तथ्ये

1

हेल्थ इन्शुरन्स उद्योग हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे, २०१८ मध्ये  यात २४ % वाढ झाली आहे (1)

2

भारताच्या हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचे आर्थिक वर्ष २०२० मधील (डिसेंबर २०१९ पर्यंत) प्रीमियम इन्कम(उत्पन्न) ४०.१७  लाख कोटी रुपये इतके होते. (2)

3

भारतीय लोकसंख्येपैकी २०% पेक्षा कमी लोकं सध्या हेल्थ इन्शुरन्सद्वारे कव्हर्ड आहेत, त्यामुळे या क्षेत्रात वाढीला बराच वाव आहे.(3)

डिजिटसह हेल्थ इन्शुरन्स एजंट/पीओएसपी का बनावे ?

तुम्ही हेल्थ इन्शुरन्स एजंट का व्हावे आणि डिजिटची निवड का करावी ? याबद्दल अधिक जाणून घ्या.

थेट डिजिटसह काम करा

आमचा पीओएसपी भागीदार म्हणून आपण आमच्याबरोबर थेट काम कराल. त्यात इतर कोणीही मध्यस्थ सामील नाही. डिजिट ही आज भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इन्शुरन्स कंपनी आहे. आम्ही आशिया खंडातील जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ द इयर २०१९ पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण कंपनी आहोत .

इन्शुरन्स सोपा झाला

सर्वांना इन्शुरन्स सोपा करण्यावर आमचा भर आहे. त्यामुळेच आमची सर्व कागदपत्रे इतकी सोपी आहेत की १५ वर्षांच्या मुलालासुद्धा ती समजतील.

मजबूत बॅकएंड सपोर्ट

आमचा मुख्य स्तंभ तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक समर्पित सपोर्ट टीम आणि एक प्रगत वेब आणि मोबाइल ॲप ऑफर करतो जे आपल्याला 24x7 पॉलिसी विकण्यास मदत करते!

फेसबुकवर ४.८ ची रेटींग

आम्ही आमच्या ग्राहकांना समाधानी ठेवतो आणि आमच्याकडे ४.८/५ फेसबुक रेटिंग आहे, जे कोणत्याही इन्शुरन्स कंपनीसाठी सर्वाधिक आहे.

डॉक्टरांनी शिफारस केलेली पॉलिसी

आमचे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स एम्स (AIIMS) चे माजी संचालक डॉ. एम.सी.मिश्रा यांच्या मदतीने डिझाइन करण्यात आले आहेत.

उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ

आमच्याकडे खासगी कारसाठी उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ आहे आणि आम्ही आरोग्यासाठी करण्यात आलेल्या सर्व क्लेम्सपैकी ९३% क्लेम्स निकाली काढले आहेत.

कॅशलेस क्लेम्स

आमच्याकडे ५९००+ रुग्णालयांचे मोठे जाळे आहे. जिथे आमचे ग्राहक कॅशलेस क्लेम्सच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ असा की क्लेम केल्यानंतर ते चिंता न करता उपचार चालू ठेवू शकतात!

पेपरलेस प्रक्रिया

पॉलिसी देण्यापासून ते क्लेम नोंदविण्यापर्यंत आमच्या प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहेत. आपल्याला कोणतीही कागदपत्रे भरण्याची गरज नाही. आपल्याला फक्त स्मार्टफोन/संगणक आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. तर, आता आपण घरून किंवा इतर कुठल्याही ठिकाणावरून काम करू शकता!

त्वरित कमिशन सेटलमेंट

काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत! आमच्याकडे सर्व कमिशन प्रक्रिया लवकर निकाली काढल्या जातात. पॉलिसी दिल्यानंतर १५  दिवसांनी तुमच्या खात्यात तुमचे कमिशन जमा केले जाईल.

हेल्थ इन्शुरन्स एजंट/पीओएसपी कसे बनायचे?

इन्शुरन्स एजंट होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपले पीओएसपी प्रमाणपत्र पूर्ण करणे. पीओएसपी (पॉइंट ऑफ सेल्स पर्सन) हे नाव इन्शुरन्स एजंटला दिले जाते. असा माणूस विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने विकू शकतो.

पीओएसपी होण्यासाठी, आपल्याला फक्त आयआरडीएआय(IRDAI) साठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता असणे आणि आम्ही प्रदान केलेले प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. डिजिट तुमच्या प्रशिक्षण प्रक्रियेची काळजी घेईल. काळजी करू नका!

हेल्थ इन्शुरन्स एजंट होण्यासाठी कशाची गरज असते ? पात्रतेचे निकष काय आहेत?

आपल्याला हेल्थ इन्शुरन्स एजंट बनण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे:

  • आपले वय १८ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे.
  • आपण किमान इयत्ता १० वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे
  • आपल्याकडे वैध आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर आपल्याला आयआरडीएआयने सूचित केलेले १५ तासांचे सक्तीचे प्रशिक्षण पूर्ण करण्यास सांगितले जाईल.

तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते शिकण्यास मदत करण्याचे आम्ही वचन देतो!

हेल्थ इन्शुरन्स एजंट कोण बनू शकतो ?

इन्शुरन्स एजंट होण्याची एकमेव आवश्यकता म्हणजे उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि त्याने इयत्ता १० वी पूर्ण केलेली असावी.

तर, मुळात जो कोणी हे निकष पूर्ण करतो तो इन्शुरन्स एजंट बनू शकतो. यात महाविद्यालयीन विद्यार्थी, घरी असणारी व्यक्ती, सेवानिवृत्त व्यक्ती आणि व्यावसायिक/महिला यांचा समावेश आहे

डिजिटसह हेल्थ इन्शुरन्स एजंट/पीओएसपी कसे बनायचे?

स्टेप १

वर दिलेला आमचा पीओएसपी फॉर्म भरून साइन अप करा, सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

स्टेप २

आमच्याबरोबर तुमचे १५ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करा.

स्टेप ३

विहित परीक्षा पूर्ण करा.

स्टेप ४

आम्ही दिलेल्या करारावर स्वाक्षरी करा आणि सगळे झाले असे समजा! आपण प्रमाणित पीओएसपी व्हाल

आपण किती कमवू शकता?

 

हेल्थ इन्शुरन्स एजंट म्हणून आपले उत्पन्न आपण विकलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून आहे. हेल्थ इन्शुरन्स एजंटला उच्च उत्पन्न मिळविण्याची मोठी संधी आहे. कारण वैद्यकीय उपचारांचा खर्च हळूहळू वाढत आहे.

याचा अर्थ असा की लोकांना आता वैद्यकीय उपचार घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील आणि म्हणूनच, त्यांना अशा उच्च खर्चापासून स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करायला आवडेल.

इन्शुरन्स एजंट म्हणून आपण किती कमाई करू शकता याची कल्पना येण्यासाठी खाली कमिशनच्या स्ट्रक्चरवर एक नजर टाका:

मासिक निव्वळ प्रीमियम प्रीमियमच्या % प्रमाणे कमिशन आणि *रिवॉर्ड आरोग्य संजीवनी
<२५हजार १ वर्ष - २५% |२ वर्ष -२३% | ३ वर्ष - २२% १५%
>=२५ हजार आणि <५० हजार १ वर्ष - २८% | २ वर्ष - २६% | ३ वर्ष -२५% १५%
>५० हजार आणि <१ लाख १ वर्ष - ३०% | २ वर्ष - २८% | ३ वर्ष - २६% १५%
>=१लाख १ वर्ष - ३५% |२ वर्ष - ३०% | ३ वर्ष - २८% १५%

अटी:

  • पेमेंट महिन्यातून दोनदा होईल
  • महिना निश्चित करण्यासाठी, पॉलिसी दिलेल्या तारखेचा विचार केला जाईल
  • प्रत्येक स्लॅबसाठी पैसे देणे स्वतंत्रपणे विचारात घेतले जाईल.
  • * नियम व अटी लागू, नियमनात विहित केल्याप्रमाणे कमाल मर्यादेच्या अधीन
  • निव्वळ प्रीमियम म्हणजे जी.एस.टी वगळून प्रीमियम

मी हेल्थ इन्शुरन्स एजंट का बनू?

तुम्हीच स्वतःचे बॉस व्हा

पीओएसपी होण्याचा एक प्राथमिक फायदा म्हणजे आपल्या सोयीनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य. आपण आता स्वत:चे बॉस होऊ शकता!

वेळेची अडचण नाही!

आपल्याला पूर्णवेळ काम करायला आवडेल की अर्धवेळ आणि त्यानुसार स्वत:चे कामाचे तास तयार करायचे आहेत हे तुम्ही ठरवू शकता.

घरून काम करा

डिजिट इन्शुरन्समध्ये आम्ही प्रामुख्याने इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन विकतो. याचा अर्थ, पीओएसपी म्हणून आपण घरून काम करू शकता आणि आमच्या ऑनलाइन प्रक्रियांचा वापर पॉलिसी विकण्यासाठी आणि सुरु करण्यासाठी करू शकता.

फक्त १५ तासांचे प्रशिक्षण

पीओएसपी म्हणून प्रमाणित करण्यासाठी, आयआरडीएआयने सांगितलेले १५ तासांचे सक्तीचे प्रशिक्षण पूर्ण करणे हा एक मुख्य निकष आहे; प्रामाणिकपणे सांगायचे तर हे काही फार नाही! आमच्या बरोबर येण्यासाठी तुम्हाला फक्त १५ तासांची गुंतवणूक लागणार आहे!

उच्च कमाईची क्षमता

तुमची कमाई काम केलेल्या तासांच्या गणनेवर अवलंबून नाही तर आपण काढलेल्या पॉलिसीच्या संख्येवर अवलंबून आहे. त्याची अधिक चांगली समज होण्यासाठी.

शून्य गुंतवणूक

स्मार्टफोन, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि आवश्यक १५ तासांचे प्रशिक्षण याशिवाय आपल्याला पीओएसपी बनण्यासाठी अजून कसलीही  गरज नाही. त्यामुळे तुमच्याकडून जवळजवळ कोणत्याही आर्थिक गुंतवणूकीची आवश्यकता नाही, पण कमाईची क्षमता जास्त आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी घरातून पीओएस पर्सन म्हणून काम करू शकतो का?

डिजिट इन्शुरन्समध्ये आम्ही प्रामुख्याने इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन विकतो. याचा अर्थ, पीओएसपी म्हणून आपण घरून काम करू शकता आणि आमच्या ऑनलाइन प्रक्रियांचा वापर पॉलिसी विकण्यासाठी आणि पॉलिसी काढण्यासाठी करू शकता. स्मार्टफोन, एक चांगले इंटरनेट कनेक्शन आणि आवश्यक १५ तासांचे प्रशिक्षण याशिवाय आपल्याला पीओएसपी बनण्यासाठी कशाचीही गरज नाही.

आपण हेल्थ इन्शुरन्स एजंट म्हणून किती कमाई करू शकता?

 हेल्थ इन्शुरन्स एजंट म्हणून आपले उत्पन्न आपण किती पॉलिसी विकता यावर अवलंबून आहे. हेल्थ इन्शुरन्स एजंटला जास्त उत्पन्न मिळविण्याची मोठी संधी आहे. कारण वैद्यकीय उपचारांची किंमत हळूहळू वाढत आहे आणि अधिकाधिक लोकांना स्वत: चे आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करायच्या आहे

मला कोणत्या कागदपत्रांची गरज आहे ?

नोंदणीच्या वेळी आपल्याला सादर करावी लागणारी कागदपत्रे, इयत्ता १० वी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतल्याचे  प्रमाणपत्र, आपल्या पॅन कार्डची प्रत, आधार कार्ड (पुढची आणि मागची बाजू), कॅन्सल्ड चेक (त्यावर आपले नाव असलेले) आणि छायाचित्र यांचा समावेश आहे.

पॅन कार्डधारक आणि बँक खातेधारक सारखेच असले पाहिजेत का?

होय, भरलेले सर्व कमिशन टीडीएसच्या अधीन आहेत. आपल्या पॅन कार्डच्या आधारे टीडीएस आयकर अधिकाऱ्यांना क्रेडिट केले जाते.

मी केव्हा हेल्थ इन्शुरन्स विकायला सुरुवात करू शकतो?

तुम्ही आमच्याबरोबर नोंदणी करताच पीओएसपी परीक्षेसाठी प्रशिक्षण सुरू करू शकता.

परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यावर झाल्यावर ई सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर आपण पीओएसपी एजंट म्हणून इन्शुरन्स विक्री सुरू करू शकता.

पी.ओ.एस पर्सन म्हणून प्रमाणित होण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे का?

होय, आपल्याला पीओएसपी होण्याचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. त्यात इन्शुरन्सच्या मूलभूत गोष्टी, पॉलिसी प्रकार, पॉलिसी काढण्याची प्रक्रिया आणि क्लेम, नियम आणि अटी इत्यादी विषयांचा समावेश असेल.

जर मी डिजिटसोबत भागीदारी केली तर मला कोणत्या सपोर्ट सर्व्हिसेस मिळतील?

डिजिटच्या सर्व भागीदारांना एक रिलेशनशिप मॅनेजर नेमण्यात आला आहे जो डिजिट प्लॅटफॉर्मवर विकल्या गेलेल्या पॉलिसीझवर एजंट्सना असलेल्या कोणत्याही शंकांसाठी मार्गदर्शन करेल आणि सर्व प्रश्नांना उत्तरे देईल. एजंट कोणत्याही मदतीसाठी आम्हाला partner@godigit.com ईमेल करून ग्राहक सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकतात.

पीओएसपी प्रमाणपत्र पूर्ण केल्यानंतर मी माझे ज्ञान कसे वाढवू शकते?

प्रमाणपत्रानंतर आमच्या पीओएसपीसाठी आम्ही आणखी एक विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो. तो प्रशिक्षण कार्यक्रम आपले विमा ज्ञान वाढविण्यात आणि आपली विक्री आणि सर्व्हिसिंग कौशल्य सुधारण्यास मदत करणारा असतो. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खालील गोष्टींबाबत माहिती देण्यात येईल:

  • गुंतागुंतीची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रगत इन्शुरन्स ज्ञान
  • नवीनतम इन्शुरन्स उत्पादने आणि त्यांना कसे पिच करावे याबद्दल लक्ष ठेवणे
  • विविध विक्री तंत्रे शिकण्याचे मजेदार आणि मनोरंजक मार्ग जे आपल्या विक्रीचे प्रमाण वाढविण्यास मदत करतात.

परवानाधारक हेल्थ इन्शुरन्स एजंट काय करतो?

हेल्थ इन्शुरन्स एजंट त्यांच्या ग्राहकांना आरोग्याशी संबंधित उत्पादने आणि इन्शुरन्स विकतात. ते सामान्यत: ग्राहक शोधतात. त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करणारे हेल्थ इन्शुरन्सचे पर्याय सादर करतात.

For list of Corporate & Individual Agents,  click here.