ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स

ओन डॅमेज इन्शुरन्स बद्दल सविस्तर माहिती

नावाप्रमाणेच, ओन डॅमेज इन्शुरन्स ही एक कस्टमाइझ मोटर इन्शुरन्स पॉलिसी आहे जी तुम्हाला आणि तुमच्या स्वतःच्या मालकीच्या वाहनाला होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.  

एक मजेशीर पण अनेकदा प्रत्यक्ष अनुभवलेले उदाहरण द्यायचे झाले तर; समजा तुमची गाडी नेहमीच्या जागी उभी आहे आणि अचानक शेजारच्या झाडावरची एखादी  फांदी खाली गाडीवरच पडते किंवा झाडावरून नारळ गाडीच्या बॉनेटवर कोसळतो किंवा, गल्ली क्रिकेटमधील बॉल गाडीच्या खिडकीवर येऊन आदळतो अशा प्रसंगी केवळ गाडीवरच नाही तर मनावरसुद्धा मोठा आघात होतो, खरंय ना? हाच तुमचा त्रास वाचवण्यासाठी ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स हा देवदूतासारखं काम करतो.

 

याबद्दल अधिक जाणून घ्या:

OD कार इन्शुरन्स (ओन डॅमेज Car Insurance)

OD  बाइक इन्शुरन्स (ओन डॅमेज Bike Insurance)

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स खरेदी करण्यास कोण पात्र आहे?

सप्टेंबर 2019 पासून लागू, विमा कंपन्या आता फक्त थर्ड-पार्टी कार किंवा बाइक इन्शुरन्स असलेल्या कार आणि टू व्हीलर्ससाठी स्टँडअलोन ओन डॅमेज इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकतात. 

 

उदाहरणार्थ; बर्‍याच कार किंवा बाइक मालकांनी त्यांचे वाहन खरेदी करताना दीर्घकालीन थर्ड पार्टी  पॉलिसी खरेदी केल्या आहेत (विशेषत: मार्च 2019 मध्ये खरेदी केलेली वाहने) हे वाहनधारक आता आपल्या वाहनांना होणारे नुकसान भरून काढण्यासाठी स्वतंत्र ओन डॅमेज इन्शुरन्सची देखील निवड करू शकतात.


टीप: जेव्हा तुम्ही ओन डॅमेज इन्शुरन्स खरेदी करता, तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे पुष्टी करता की तुमच्याकडे आधीपासून वैध थर्ड पार्टी पॉलिसी आहे (भारतीय मोटर कायद्यानुसार आवश्यक) ही पॉलिसी डिजिट इन्शुरन्स किंवा वेगळ्या इन्शुरन्स कंपनीचीसुद्धा असू शकते.

स्वतंत्र ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स कोणाला मिळावा?

जर तुम्ही अलीकडेच डिजिटमधून फक्त थर्ड पार्टी  इन्शुरन्स विकत घेतला असेल तर तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या वाहनाचे नुकसान आणि तोट्यापासून संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र ओन डॅमेज कव्हर देखील मिळवू शकता.

तुम्ही नुकतेच वाहन खरेदी केले असल्यास परिणामी दुसर्‍या इन्शुरन्स कंपनीकडून थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतला असेल, तर तुम्ही डिजिटमधून तुमचे स्वतंत्र ओन डॅमेज कव्हर खरेदी करु शकता. यामध्ये अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी इत्यादींपासून तुमच्या वाहनाच्या संरक्षणाचा समावेश असेल. तसेच तुम्ही तुमच्या कव्हरेजच्या व्याप्तीसाठी अ‍ॅड-ऑन कव्हर्सची निवड देखील करू शकता.

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट आहे?

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट नाही?

तुमच्या वाहनाच्या संरक्षणासाठी ओन डॅमेज इन्शुरन्स उत्तम असले तरी यात काही अपवाद आहेत-

थर्ड पार्टी लायबिलिटीज

स्वतःच्या वाहनांचे नुकसान होण्यापासून संरक्षण देणारी ओन डॅमेज ही एक स्वतंत्र पॉलिसी आहे. त्यामुळे, तुमच्या थर्ड पार्टी लायबिलिटीजचा यामध्ये समावेश केला जाणार नाही. तुमचा थर्ड पार्टी  वाहन इन्शुरन्स त्याची काळजी घेईल.

मद्यपान करून वाहन चालवणे

हे कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्यास कोणत्याही नुकसानाची भरपाई केली जाणार नाही.

विना लायसन्स वाहन चालवणे

प्रमाणित नियमानुसार, जर ती व्यक्ती बेकायदेशीरपणे वाहन चालवत असेल तर कोणताही इन्शुरन्स क्लेम कंपनी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे, जर तुम्ही वैध चालक लायसन्स घेऊन गाडी चालवत असाल तरच दावे केले जाऊ शकतात.

अ‍ॅड-ऑन फायदे

हे अगदी स्पष्ट आहे, नाही का? तुम्ही विशिष्ट अ‍ॅड-ऑन खरेदी केले नसल्यास, तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकणार नाही. उदाहरणार्थ, टायर संरक्षण कव्हर न निवडता- तुमचा टायर फक्त अपघातादरम्यान संरक्षित केला जाईल आणि त्यापलीकडे नाही.

परिणामी नुकसान

परिणामी नुकसान म्हणजे अपघातानंतर होणारे नुकसान. दुर्दैवाने, अपघातादरम्यान नुकसान झाल्याशिवाय ते कव्हर केले जाणार नाहीत.

निष्काळजीपणा

सोप्या भाषेत, याचा अर्थ असा आहे की तुम्ही वाहन चालवताना निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास आपला नुकसान भरपाईचा क्लेम भरून दिला जाणार नाही. उदाहरणार्थ; जर तुमच्या शहरात आधीच पूर आला असेल आणि तरीही तुम्ही तुमची कार किंवा बाइक पुरात बाहेर काढली असेल.

विना परवानाधारक वाहन चालवणे

कायद्यानुसार, जर तुमच्याकडे फक्त लर्निंग लायसन्स असेल, तर तुमच्यासोबत कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स असणारे कोणीतरी असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास, तुमचा नुकसान भरपाई क्लेम स्वीकारला जाणार नाही.

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्ससह खालील अ‍ॅड-ऑन उपलब्ध आहेत:

  • झिरो डेप्रीसिएशन  कव्हर
  • इंजिन आणि गिअरबॉक्स संरक्षण कव्हर
  • ब्रेकडाउन सहाय्य
  • कन्झ्युमेबल कव्हर
  • रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर 
  • टायर संरक्षण कव्हर (केवळ कारसाठी)
  • पॅसेंजर कव्हर (केवळ कारसाठी)

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय?

ओन डॅमेज  प्रीमियम म्हणजे तुम्ही तुमच्या ओन डॅमेज इन्शुरन्ससाठी दिलेली किंमत. त्याची प्रीमियम किंमत सामान्यतः तुमच्या मालकीच्या वाहनाच्या प्रकारानुसार निर्धारित केली जाते; ते किती जुने आहे आणि तुम्ही ते कोणत्या शहरात वापरता या घटकांचा यात विचार केला जातो. 

 

मात्र , तुमची प्रीमियम किंमत कितीही असली तरीही, प्रत्येक ओन डॅमेज इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला खालील गोष्टींपासून संरक्षण देते:

 

  • बाह्य साधनांमुळे अपघाती नुकसान.
  • घरफोडी, चोरी आणि हाऊसब्रेकिंग.
  • आग, बाह्य स्फोट, स्फोट, वीज कोसळणे आणि सेल्फ-इग्निशन.
  • नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, वादळ, चक्रीवादळ, गारपीट इ.
  • भूकंप, भूस्खलन आणि खडक कोसळणे.
  • रेल्वे, रस्ता, हवाई किंवा आंतरराष्ट्रीय जलमार्गाने वाहनांचे ट्रान्झिट.
  • दहशतवादी हल्ले, दंगली व संप किंवा आंदोलनात नुकसान

ओन डॅमेज (OD) प्रीमियम कसे कॅलक्युलेट केले जाते?

कार किंवा बाइकची ओन डॅमेज प्रीमियम पुढील बाबींवर आधारित आहे:

  • वाहनाची रचना, प्रकार आणि वर्षे.
  • वाहनाचे घोषित मूल्य.
  • इंजिनची क्युबिक क्षमता.
  • भौगोलिक क्षेत्र

ओन डॅमेज (OD)  प्रीमियमची मोजणी समजून घेण्यासाठी खालील आकडेमोड पहा: 

ओन डॅमेज (OD) प्रीमियम -आयडीव्ही (IDV) X [प्रीमियम दर (इन्शुरन्सकर्त्याने ठरवलेले)] + [अ‍ॅड-ऑन (उदा. बोनस कव्हरेज)] – [सवलत आणि फायदे (कोणताही क्लेम बोनस, चोरीची सूट, इ.)]

आयडीव्ही (IDV)- वाहनाची शोरूम किंमत + अ‍ॅक्सेसरीजची किंमत (असल्यास) - (IRDAI) नुसार कापलेली किमंत 

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स प्रीमियम कमी कसा करता येईल?

  • व्हॉलेंटरी डिडक्शन) (ऐच्छिक वजावट) वाढवा - ओन डॅमेज इन्शुरन्समध्ये, 'व्हॉलेंटरी डिडक्शन' म्हणून ओळखले जाणारे काहीतरी आहे, जे तुम्ही क्लेमच्या दरम्यान भरण्यासाठी निवडलेल्या रकमेचा संदर्भ देते. त्यामुळे, तुमच्या व्यवहार्यतेवर आधारित तुम्ही तुमच्या ऐच्छिक वजावटीची टक्केवारी वाढवू शकता, ज्यामुळे तुमचा ओन डॅमेज प्रीमियम थेट कमी होईल.
  • योग्य आयडीव्ही (IDV) घोषित करा - डिजिटसह, तुम्हाला तुमचा आयडीव्ही स्वतः कस्टमाइज करण्याचा पर्याय दिला जातो. त्यामुळे, तुमचा आयडीव्ही नेहमी बरोबर असल्याची खात्री करा कारण याचा तुमच्या ओन डॅमेज प्रीमियम आणि तुमच्या दाव्याच्या रक्कमेवर परिणाम होईल.
  • एनसीबी (NCB) हस्तांतरण करायाल विसरू नका- जर तुमची आधीची ओन डॅमेज  किंवा सर्वसमावेशक मोटर इन्शुरन्स पॉलिसी असेल, तर तुमची जमा झालेली सूट मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे एनसीबी  तुमच्या सध्याच्या पॉलिसीमध्ये हस्तांतरित केल्याची खात्री करा.

थर्ड पार्टी प्रीमियम आणि ओन डॅमेज (OD) प्रीमियम मधील फरक

 

भारतीय मोटार वाहन कायदा, 1988 नुसार आपल्याकडे दोन प्रकारची धोरणे असू शकतात. एक स्वत:चे नुकसान आणि दायित्व कव्हर असलेली सर्वसमावेशक पॉलिसी असू शकते आणि दुसरी स्वतंत्र थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी असू शकते. गेल्या काही वर्षांत, (उत्तरदायित्व) लायबिलिटी दावे वाढले आहेत परिणामी थर्ड पार्टी प्रीमियममध्ये सुद्धा वाढ झाली आहे.

थर्ड पार्टी प्रीमियम ओन डॅमेज प्रीमियम
आकडेमोडीचे घटक वाहनाच्या घन क्षमतेवर अवलंबून इन्शुरन्स नियामकाद्वारे निश्चित केले जाते. ओन डॅमेज प्रीमियमची गणना IDV, खरेदीचे वर्ष, स्थान आणि वाहनाचा प्रकार यावर आधारित केली जाते.
स्थिरता नियामक IRDAI द्वारे थर्ड पार्टी प्रीमियम वाढविला आणि कमी केला जाऊ शकतो. वाहनाचे मूल्य वर्षानुवर्षे कमी होत असल्याने ओन डॅमेज हप्ता कमी होईल.
मोटर प्रीमियमचा भाग मोटर पॉलिसीमध्ये निश्चित केल्याप्रमाणे नेहमीच एक हिस्सा असेल, मग तो सर्वसमावेशक किंवा स्वतंत्र असो. मोटार पॉलिसी प्रीमियममध्ये त्याचा हिस्सा असू शकतो किंवा नाही.
आपली चेतनाच आपल्याला नेहमी सावधगिरीचे उपाय करण्यास सतर्क करते. रस्त्यावर वाहन चालवताना सर्व काही आपल्या नियंत्रणात असतेच असे नाही. म्हणूनच, महत्त्वाच्या संकटाच्या वेळी आर्थिक भार टाळण्यासाठी आधीच सुजाणपणे सर्वसमावेशक मोटर संरक्षण धोरण निवडणे कधीही फायद्याचे ठरेल.

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्स किंवा सर्वसमावेशक इन्शुरन्स यातील मी कशाची निवड करावी?

हा प्रश्न तुमच्या वाहन आणि बजेटनुसार तुम्हाला हवे असलेले कव्हरेज आणि संरक्षण यावर अवलंबून आहे! सर्वसमावेशक इन्शुरन्ससाठी जाणे ही तुमची सर्वोत्तम निवड असेल कारण यात अनिवार्य, थर्ड पार्टीचे नुकसान आणि ओन डॅमेज या दोन्हींचा समावेश आहे.

 

मात्र, तुमच्याकडे आधीपासून वैध थर्ड पार्टी इन्शुरन्स असल्यास, तुम्ही तुमच्या संबंधित वाहनासाठी संपूर्ण कव्हरेज मिळवण्यासाठी फक्त ओन डॅमेज इन्शुरन्स घेऊ शकता.


दाव्याच्या वेळी ऑफर केलेल्या कव्हरेजची एकूण रक्कम, पॉलिसीमध्ये निर्दिष्ट केलेल्या अटींवर आणि स्पष्टपणे तुमच्या इन्शुरन्स योजनेवर नमूद असलेल्यावर अवलंबून असेल. दरवर्षी कव्हरेजची व्याप्ती आणि ओन डॅमेज प्रीमियम वाहनाच्या कमी होत जाणाऱ्या मूल्यानुसार बदलते.

भारतातील ओन डॅमेज इन्शुरन्स संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इन्शुरन्समध्ये ओन डॅमेज (OD) चा अर्थ काय आहे?

इन्शुरन्समध्ये ओन डॅमेज म्हणजे 'ओन डॅमेज', हा इन्शुरन्स तुमच्या स्वत:च्या वाहनाचे नुकसान भरून काढण्यासाठी कामी येतो. 

इन्शुरन्स खरेदी करण्यास कोण पात्र आहे?

ज्यांच्याकडे आधीपासून वैध थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स आहे त्यांना स्वत:च्या नुकसानी आणि तोट्यासाठी एक स्वतंत्र इन्शुरन्स खरेदी करायचा असल्यास ओन डॅमेज चा पर्याय उपलब्ध असतो.

मोटार इन्शुरन्स पॉलिसींचे विविध प्रकार कोणते उपलब्ध आहेत?

तुम्ही खरेदी करू शकता अशा तीन प्रकारच्या मोटार इन्शुरन्स योजना आहेत; थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स पॉलिसी, सर्वसमावेशक किंवा स्टॅंडर्ड मोटर इन्शुरन्स पॉलिसी आणि ओन डॅमेज मोटार इन्शुरन्स पॉलिसी.

ओन डॅमेज इन्शुरन्स कायद्याने अनिवार्य आहे का?

नाही, तुमच्या कार किंवा बाइकसाठी ओन डॅमेज  इन्शुरन्स अनिवार्य नाही परंतु तुमच्या स्वतःच्या वाहनाच्या संरक्षणासाठी याची शिफारस केली जाते. मोटार वाहन कायद्यानुसार, सर्व वाहनांसाठी मूळ थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही एका पॉलिसीमध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी आणि ओन डॅमेज  फायदे समाविष्ट असणारा सर्वसमावेशक इन्शुरन्स निवडू शकता.

ओन डॅमेज इन्शुरन्स केव्हा लागू झाला?

मार्च 2019 मध्ये (कायद्यानुसार) दीर्घकालीन थर्ड पार्टी पॉलिसी खरेदी केलेल्या कार आणि बाइक मालकांना विशेषत: मदत करण्यासाठी IRDAI द्वारे सप्टेंबर 2019 मध्ये स्वतंत्र ओन डॅमेजइन्शुरन्स सुरू करण्यात आला होता जेणेकरून त्यांना स्वतःचे नुकसान भरून काढण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. याशिवाय, हे कव्हर ज्यांच्याकडे फक्त सक्रिय थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स पॉलिसी आहे अशा वाहनधारकांसाठी उपलब्ध आहे.

माझी थर्ड पार्टी पॉलिसी जूनमध्ये समाप्त होत असल्यास मी अजूनही ओन डॅमेज पॉलिसी खरेदी करू शकतो का?

होय, जोपर्यंत तुमची थर्ड पार्टी पॉलिसी पुढील चार महिन्यांत कालबाह्य होत नाही तोपर्यंत तुम्ही ओन डॅमेज पॉलिसी ची निवड करू शकता.