Third-party premium has changed from 1st June. Renew now
फायर आणि थेफ्ट कव्हरेजसह थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स
दुर्दैवाने, आजकाल आपल्या वाहनांना आगीपासून धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त झाली आहे. अपघाताचा परिणाम असो, यांत्रिक बिघाडामुळे असो, गॅरेजला लागलेली आग असो किंवा तोडफोड असो, आगीमुळे खूप डॅमेज होऊ शकते.
पण प्रश्न असा आहे की, अशा परिस्थितीत आपला थर्ड पार्टी कार इन्शुरन्स आपल्याला मदत करेल का? याचे उत्तर असे आहे की काही प्रकारच्या कार इन्शुरन्स पॉलिसी आगीच्या डॅमेजपासून संरक्षण देतात तर काही तसे करत नाहीत. चला एक नजर टाकूया.
फायर कव्हरेजसह थर्ड पार्टी इन्शुरन्स
नियमित थर्ड-पार्टी पॉलिसी आपल्या स्वत: च्या कारच्या डॅमेजला कव्हर करत नाही, जसे की आगीमुळे होणारे डॅमेज (जर आपले वाहन कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे डॅमेज करत असेल तरच ते आपल्याला नुकसानीपासून वाचवते), डिजिट एक पॅकेज पॉलिसी देखील प्रदान करते जी केवळ आपल्या कारला आगीपासून होणाऱ्या डॅमेजच्या बाबतीत अतिरिक्त कव्हरेज प्रदान करते.
अशा प्रकारे, ही पॅकेज पॉलिसी आपल्याला आपल्या स्वत: च्या कारसाठी फायर कव्हरच्या अतिरिक्त फायद्यासह थर्ड पार्टी पॉलिसी देईल.
कार इन्शुरन्समध्ये थर्ड पार्टी कव्हर म्हणजे काय?
कार इन्शुरन्समधील थर्ड पार्टी कव्हरेज (ज्याला लायबिलिटी कव्हरेज देखील म्हणतात) कोणत्याही शारीरिक दुखापतीमुळे किंवा थर्ड-पार्टीच्या (म्हणजे इतर कोणीही) मृत्यूमुळे किंवा त्यांच्या वाहन किंवा मालमत्तेच्या कोणत्याही डॅमेजपासून आपले संरक्षण करण्यासाठी आहे. हे कायद्याने मॅनडेटरी असल्याने ट्रॅफिक दंडापासून आपले संरक्षण होते.
कार इन्शुरन्समध्ये फायर डॅमेज म्हणजे काय?
कार इन्शुरन्समध्ये, "फायर डॅमेज" सामान्यत: अपघाती लागलेल्या आगीमुळे आपल्या वाहनाचे कोणतेही नुकसान किंवा डॅमेज दर्शविते. यात बाह्य डॅमेज (जसे की कारच्या बॉडीला) आणि अंतर्गत नुकसान (उदाहरणार्थ, वायरिंग किंवा इलेक्ट्रिकल फिटिंगचे कोणतेही डॅमेज) समाविष्ट आहे.
फायर पॉलिसीसह थर्ड-पार्टी इन्शुरन्स काय कव्हर करतो?
नावाप्रमाणेच, थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स केवळ थर्ड-पार्टीला झालेल्या नुकसान आणि डॅमेजपासून आपले संरक्षण करेल, तर फायर कव्हर आपल्या कारला लागलेल्या आगीमुळे झालेले डॅमेजपासून आपले संरक्षण करेल.
1. थर्ड-पार्टी लायबिलिटीझसाठी कव्हर
थर्ड-पार्टी कार इन्शुरन्सचा मुख्य हेतू आपल्याला थर्ड-पार्टी लायबिलिटीझपासून वाचविणे आहे जसे की:
- थर्ड पार्टीचे वैयक्तिक डॅमेज - जर आपल्या कारमुळे कोणतीही शारीरिक इजा झाली असेल आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे थर्ड पार्टी व्यक्तीचा मृत्यू झाला असेल. यामुळे होणारा सर्व एक्सपेनसेस आणि नुकसान यात समाविष्ट आहे.
- थर्ड पार्टी मालमत्ता/वाहनाचे डॅमेज - जर आपली कारमुळे चुकून दुसऱ्याच्या वाहनाचे, घराचे किंवा मालमत्तेचे डॅमेज झाले असेल तर त्यासाठी 7.5 लाखांपर्यंत कव्हरेज मिळते.
- मालक / ड्रायव्हरचे वैयक्तिक डॅमेज - ज्यांच्याकडे पर्सनल अॅक्सीडेन्ट कव्हर नाही त्यांच्यासाठी, हे आपल्याला अपघातामुळे शारीरिकरित्या जखमी झाल्यास उद्भवू शकणाऱ्या नुकसानापासून वाचवेल.
2. आगीमुळे झालेल्या डॅमेजसाठी कव्हरेज
अपघाती आगीमुळे आपल्या कारचे झालेले डॅमेज आणि नुकसान कव्हर केले जाते, यासह:
- अपघात व टक्कर - मोटर अपघात किंवा टक्कर दरम्यान आग लागल्यास.
- नैसर्गिक आपत्ती - जिथे आग ही भूकंप, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा परिणाम असते.
- घराला लागलेली आग - जर आपल्याला वाहनाला लागलेली आग ही घराला लागलेली आग किंवा गॅरेजला लागलेल्या आगीचा परिणाम असेल तर.
- गुन्हेगारी कृत्ये - तोडफोड किंवा जाळपोळ यासारख्या गुन्हेगारी कृत्याने कार पेटवून दिल्याच्या प्रकरणांमध्ये.
- दंगल - जेव्हा दंगलीदरम्यान आपल्या गाडीला आग लावली गेली असल्यास
फायर पॉलिसीसह थर्ड पार्टीमध्ये काय कवर्ड नाही?
अशा काही परिस्थिती आहेत ज्या या प्रकारच्या कार इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केल्या जाणार नाहीत:
- आगीच्या डॅमेजव्यतिरिक्त आपल्या कारचे स्वत: चे डॅमेज कव्हर केले जाणार नाही
- वाहनातील प्रवाशांना शारीरिक इजा
- घटनेच्या वेळी आपण वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवत असाल तर
- जर तुम्ही दारू किंवा ड्रग्जच्या नशेत गाडी चालवत असाल तर
- जेव्हा पॉलिसीच्या भौगोलिक क्षेत्राबाहेर डॅमेज किंवा घटना घडतात
- ज्या प्रकरणांमध्ये अपघात किंवा आग आपल्याच निष्काळजीपणामुळे किंवा हेतुपुरस्सर लागली असेल
- शॉर्टसर्किट, ओव्हरहीटिंग, ऑइल लिकेज इत्यादी यांत्रिक बिघाडामुळे लागणाऱ्या आगीमुळे होणारे डॅमेजेस.
ही पॉलिसी कोणी निवडावी?
अशी लोकं ज्यांना असे वाटते की त्यांच्या कारला इतर डॅमेजेसपासून(जसे की चोरी किंवा इतर नैसर्गिक आपत्ती) कमी धोका आहे, आणि जे लोकं आपली कार खूप कमी वापरतात त्यांना या प्रकारची कार इन्शुरन्स पॉलिसी, जी फायर कव्हरसह थर्ड-पार्टीला कव्हर करते त्यांच्यासाठी ही निवड सर्वोत्तम आहे. याव्यतिरिक्त, ज्यांना कमी प्रीमियम हवा आहे परंतु केवळ थर्ड-पार्टी पॉलिसीपेक्षा अधिक कव्हरेज हवे आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली कल्पना आहे.
मोटर व्हेइकल अॅक्टनुसार किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे मॅनडेटरी असल्याने ही पॉलिसी घेतल्यास काही अनपेक्षित नुकसानीपासून आपले संरक्षण करताना कायदेशीररीत्या वाहन चालवता येईल.
तथापि, ज्यांना ओन डॅमेज फायदे कव्हर करणे अधिक पसंद आहे त्यांनी ओन डॅमेज पॉलिसी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी मिळविण्याचा विचार केला पाहिजे, या दोन्हीमध्ये आगीमुळे होणारे कोणतेही डॅमेज (तसेच अपघात आणि टक्कर, नैसर्गिक आपत्ती आणि चोरी सारख्या गोष्टीदेखील) कवर्ड आहे.
आशा आहे की, आता आपल्याला या पॅकेज पॉलिसीबद्दल आणि त्यात काय कव्हर आहे याबद्दल चांगली कल्पना असेल. यात कोणत्याही थर्ड पार्टी वाहनाचे, व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे डॅमेज तसेच केवळ आग लागल्यास स्वतःच्या कारचे डॅमेज कव्हर केले जात असल्याने जे लोक आपले वाहन वारंवार चालवत नाहीत त्यांच्यासाठी हा एक चांगला किफायतशीर पर्याय आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
या थर्ड पार्टी पॉलिसीमध्ये आगीमुळे होणारे कुठले डॅमेजेस कव्हर केले जातात?
ही मूलत: एक पॅकेज पॉलिसी आहे, जी आपल्याला केवळ आग लागल्यास आपल्या स्वत: च्या वाहनासाठी फायर कव्हरचा अतिरिक्त फायद्यासह थर्ड-पार्टी पॉलिसी देईल. या आगीमुळे झालेल्या डॅमेजमध्ये अपघात, घरांना आग, नैसर्गिक आपत्ती, तोडफोड, जाळपोळ किंवा दंगलीमुळे होणारे बाह्य नुकसान (जसे की कारची बॉडी) आणि अंतर्गत डॅमेज (उदाहरणार्थ, वायरिंग किंवा इलेक्ट्रिक फिटिंगचे कोणतेही डॅमेज) यांचा समावेश आहे.
फायर कव्हर पॉलिसीसह असलेले हे थर्ड पार्टी पॅकेज कोणी घ्यावे?
ज्यांच्या वाहनांना खूप कमी जोखीम आहे किंवा ज्यांना कमी प्रीमियम हवा आहे परंतु केवळ थर्ड-पार्टी पॉलिसीपेक्षा अधिक कव्हरेज हवे आहे अशा लोकांसाठी ही शिफारस केली जाते; अधिक ओन डॅमेज फायद्यांसाठी, आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घ्यावी.
फायर कव्हर असलेली थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्शुरन्सपेक्षा डीफ्रंट कशी आहे?
कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आपल्याला थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि आपल्या स्वत: च्या वाहनाच्या डॅमेजपासून वाचवते. यात आग, अपघात आणि टक्कर, नैसर्गिक आपत्ती, चोरी इत्यादींमुळे झालेले स्वतःचे डॅमेज कव्हर होते. तथापि, फायर कव्हर असलेल्या थर्ड-पार्टी पॉलिसी, थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि केवळ आगीच्या बाबतीत स्वत: चे डॅमेज कव्हर करते.