अशी लोकं ज्यांना असे वाटते की त्यांच्या कारला इतर डॅमेजेसपासून(जसे की चोरी किंवा इतर नैसर्गिक आपत्ती) कमी धोका आहे, आणि जे लोकं आपली कार खूप कमी वापरतात त्यांना या प्रकारची कार इन्शुरन्स पॉलिसी, जी फायर कव्हरसह थर्ड-पार्टीला कव्हर करते त्यांच्यासाठी ही निवड सर्वोत्तम आहे. याव्यतिरिक्त, ज्यांना कमी प्रीमियम हवा आहे परंतु केवळ थर्ड-पार्टी पॉलिसीपेक्षा अधिक कव्हरेज हवे आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली कल्पना आहे.
मोटर व्हेइकल अॅक्टनुसार किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे मॅनडेटरी असल्याने ही पॉलिसी घेतल्यास काही अनपेक्षित नुकसानीपासून आपले संरक्षण करताना कायदेशीररीत्या वाहन चालवता येईल.
तथापि, ज्यांना ओन डॅमेज फायदे कव्हर करणे अधिक पसंद आहे त्यांनी ओन डॅमेज पॉलिसी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी मिळविण्याचा विचार केला पाहिजे, या दोन्हीमध्ये आगीमुळे होणारे कोणतेही डॅमेज (तसेच अपघात आणि टक्कर, नैसर्गिक आपत्ती आणि चोरी सारख्या गोष्टीदेखील) कवर्ड आहे.
आशा आहे की, आता आपल्याला या पॅकेज पॉलिसीबद्दल आणि त्यात काय कव्हर आहे याबद्दल चांगली कल्पना असेल. यात कोणत्याही थर्ड पार्टी वाहनाचे, व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे डॅमेज तसेच केवळ आग लागल्यास स्वतःच्या कारचे डॅमेज कव्हर केले जात असल्याने जे लोक आपले वाहन वारंवार चालवत नाहीत त्यांच्यासाठी हा एक चांगला किफायतशीर पर्याय आहे.