एकदा तुम्ही तुमचा क्लेम दाखल केल्यानंतर तुम्हाला त्याचा इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस चेक करावा लागेल. आपल्या रिफंड ट्रान्सफरची प्रगती जाणून घेण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आता, ही प्रोसेस पुढे नेण्याचे 2 मार्ग आहेत. आपण एनएसडीएल पोर्टल आणि इन्कम टॅक्स ई-फाइलिंग वेबसाइटद्वारे रिटर्न स्टेटस तपासू शकता.
प्रत्येक प्रोसेसेस कशी करावी याबद्दल स्टेप -बाय -स्टेप मार्गदर्शक येथे आहे.
1. एनएसडीएल(NSDL) वेबसाइटच्या माध्यमातून
एनएसडीएल मध्ये आपली इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेटस तपासण्यासाठी दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.
स्टेप 1: रिफंड ट्रॅकिंगसाठी टीआयएन एनएसडीएल वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: पॅन एंटर करण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि "प्रोसिड" वर क्लिक करा.
स्टेप 3: पुढे, आपल्याला एनएसडीएल वरील आपल्या इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेट्सवर अवलंबून संदेश दर्शविणाऱ्या पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
2. इन्कम टॅक्स ई-फाइलिंग वेबसाइटच्या माध्यमातून
वैकल्पिकरित्या, आपण इन्कम टॅक्स ई-फाइलिंग वेबसाइटवर आपली आयटीआर स्थिती तपासण्यासाठी खालील स्टेप्सचा वापर करू शकता.
स्टेप 1: इन्कम टॅक्सच्या अधिकृत ई-फायलिंग वेबसाइटवर जा.
स्टेप 2: वरच्या उजव्या कोपऱ्यावर, आपल्या खात्यात साइन इन करण्यासाठी "लॉगिन हिअर " वर क्लिक करा.
स्टेप 3: पुढच्या पेजवर तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि दिलेला सिक्युरिटी कोड टाका. "लॉगिन" वर क्लिक करा.
स्टेप 4: पुढे, "विव्ह रिटर्न्स/फॉर्म्स" निवडा.
स्टेप 5: आपले पॅन एंटर करा, ड्रॉप-डाउन मेनूमधून "सिलेक्ट अॅन ऑप्शन" आणि योग्य मूल्यांकन वर्षासह "इन्कम टॅक्स रिटर्न्स" निवडा. सध्या तुम्ही 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस तपासणार आहात. "सबमिट" बटनवर क्लिक करा.
स्टेप 6: तुम्हाला तुमच्या आयटीआर फाइलिंगचे सर्व डिटेल्स दर्शविणाऱ्या नवीन वेबपेजवर रिडायरेक्ट केले जाईल. यामध्ये फॉर्मचा प्रकार, फाइलिंग प्रकार, पोच पावती क्रमांक आणि आयटीआर फाइलिंगपासून आयटीआर प्रोसेस पूर्ण होईपर्यंत प्रत्येक कामाच्या तारखांचा समावेश आहे. इन्कम टॅक्स पोर्टलवर रिफंड स्टेटस, पेमेंट मोड आणि रिफंड फेल्युअरचे कारण ही तुम्ही पाहू शकाल.
आता, एनएसडीएल इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस मेसेजेसचे विविध प्रकार असू शकतात. आता, एनएसडीएल इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस मेसेजेसचे विविध प्रकार असू शकतात. प्रत्येक स्टेटमेंटचा नेमके मीनिंग माहित नसल्यास बऱ्याच व्यक्तींना त्यांच्या रिफंडची प्रगती समजणे खूप गोंधळात टाकणारे असू शकते.