कार इन्शुरन्स ऑनलाइन
Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

कार इन्शुरन्समध्ये टोटल लॉस म्हणजे काय?

नवीन कार खरेदी करणे रोमांचक आहे, परंतु कार इन्शुरन्स पॉलिसी घेणे कठीण वाटू शकते, विशेषत: जर आपण इन्शुरन्सच्या काही शब्दकोश आणि टेक्निकल अटींशी परिचित नसाल; अशी महत्वाची संज्ञा म्हणजे कार इन्शुरन्स मधील टोटल लॉस, जी डॅमेजसाठी क्लेम फाइल करताना वापरात येते. चला तर मग जाणून घेऊया कार इन्शुरन्समधील टोटल लॉस म्हणजे काय.

कार इन्शुरन्समध्ये टोटल लॉसचे मीनिंग काय आहे?

कार इन्शुरन्समध्ये टोटल लॉस तेव्हा होतो जेव्हा कार इतकी खराब होते की ती पुन्हा कार्यक्षम स्थितीत दुरुस्त करण्याचा खर्च त्याच्या वास्तविक मार्केट मूल्यापेक्षा / एकूण इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूपेक्षा (आयडीव्ही) जास्त असतो.

भारतातील नियामक निकषांनुसार, टोटल लॉसचे वाहन असे आहे जिथे त्याची दुरुस्ती कॉस्ट त्याच्या इन्शुरन्स डीक्लेअर्ड व्हॅल्यूच्या (आयडीव्ही) 75% पेक्षा जास्त आहे.

खालील दोन कारणांमुळे कार इन्शुरन्स टोटल लॉसची परिस्थिती उद्भवू शकते:

  1. कारचा अपघात झाला आणि दुरुस्तीपलीकडे खराब झाली म्हणजे कार आता वापरता येणार नाही. 
  2. जर कार चोरीला गेली असेल आणि संबंधित अधिकाऱ्यांना ती मिळत नसेल तर.

टीप : मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 च्या सेक्शन 55 नुसार, मालकाने वाहनाचा वापर करता येणार नाही एवढ्या प्रमाणात नुकसान झाल्यास त्याचे टोटल लॉस जाहीर करणे आणि त्याची रजिस्ट्रेशन रद्द करणे आवश्यक आहे. अपघाताच्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत मालकाने रजिस्टर्ड प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) याची माहिती देणे आवश्यक आहे.

कार इन्शुरन्समधील टोटल लॉसचे कॅलक्युलेशन कसे करावे?

टोटल लॉसच्या केस मध्ये, पॉलिसीहोल्डरला आवश्यक डीडक्टीबल अमाऊंट डीडक्ट केल्यानंतर कारचे इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) मिळते. आयडीव्ही कॅलक्युलेट करण्यासाठी भारतीय मोटर टॅरिफ अॅक्टने निर्धारित केलेले स्टँडर्ड डेप्रीसीएशन रेट खालीलप्रमाणे आहेत.

वाहनाचे वय कॅलक्युलेशनसाठी डेप्रीसीएशन रेट
नवीन वाहन 5%
6 महिन्यांपेक्षा कमी 5%
6 महिने ते 1 वर्ष 15%
1 वर्ष ते 2 वर्षे 20%
2 वर्ष ते 3 वर्षे 30%
3 वर्ष ते 4 वर्षे 40%
4 वर्ष ते 5 वर्षे 50%
5 वर्षांपेक्षा जास्त कारचे मूल्यांकन झाल्यानंतरच कार मालक आणि इन्शुरर यांच्यात परस्पर निर्णय घेतला जातो.

कार इन्शुरन्समधील टोटल लॉससाठी क्लेम प्रोसेस काय आहे?

टोटल लॉस कार इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी, आपल्या इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा. ते आपल्याला संपूर्ण प्रक्रियेत स्टेप्स प्रमाणे मार्गदर्शन करतील. आपल्याला फक्त हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की आपल्याकडे सर्व आवश्यक दस्तऐवज उपलब्ध आहेत.

टोटल लॉसच्या स्थितीत आपल्या कारसाठी जास्त क्लेमची अमाऊंट कशी सुनिश्चित करावी?

जर आपली कार टोटल लॉस झाली असेल आणि आपण केवळ डेप्रीसीएशन मूल्य नव्हे तर एकूण रिप्लेसमेंट कॉस्ट कव्हर करू इच्छित असाल तर रिटर्न-टू-इनव्हॉइस अॅड-ऑन इन्शुरन्स कव्हर आधीच खरेदी करा.

हे अॅड-ऑन कव्हर आपल्याला रोड टॅक्स, इन्शुरन्स पॉलिसी कॉस्ट आणि आपण भरलेल्या रजिस्ट्रेशन शुल्कासह आपल्या कारचे अचूक इंव्हॉईस मूल्य प्राप्त करण्यास मदत करेल. अशा प्रकारे, आपल्या कारच्या शेवटच्या इंव्हॉईस मूल्याच्या आधारे आपल्याला कंपेंसेशन दिले जाईल.

तथापि, लक्षात ठेवा की आपण आपल्या कारच्या अपघातानंतर किंवा चोरीनंतर नव्हे तर पॉलिसी रिनिवलच्या वेळी खरेदी केल्यास आपण रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हरचा फायदा घेण्यास पात्र असाल.

जेव्हा कार इन्शुरन्समध्ये आपली कार टोटल लॉस मध्ये असल्याचे घोषित केले जाते, तेव्हा ते कोणत्याही पॉलिसीहोल्डरसाठी दुखदायक असते. त्याबद्दल जाणून घेतल्यास आपण आणि आपले वाहन सहजपणे या गर्तेतून बाहेर काढता येईल. आपण रिटर्न-टू-इनव्हॉइस अॅड-ऑन कव्हर ची निवड केल्याची खात्री करा, कारण अपघातात होणे किंवा कार चोरीला जाणे हे कोणाबाबतही होऊ शकते!

कार इन्शुरन्समधील टोटल लॉसबद्दलचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न

कार इन्शुरन्समधील टोटल लॉस कॅलक्युलेट कसे करावे?

टोटल लॉस इन्शुरन्स मूल्य निश्चित करण्यापूर्वी इन्शुरन्स कंपन्या खालील घटकांचा विचार करतात:

  • गाडीची दुरुस्ती करता येईल की नाही हे ठरविण्यासाठी ते मेकानिकल आणि फीजिकल डॅमेजची तपासणी करतात.
  • त्यानंतर त्या भागातील कारच्या डेप्रीसीएशनच्या मागणीच्या आधारे वाहनाच्या 'अॅक्चुअल कॅश व्हॅल्यू'चे मूल्यमापन केले जाते.

कारच्या इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूवर (आयडीव्ही) कोणते घटक परिणाम करतात?

महत्वाच्या घटकांमध्ये हे समाविष्ट आहे: 

  • गाडीचे वय
  • सध्याचे मायलेज
  • मेक, मॉडेल आणि व्हेरिएंट प्रकार
  • फीजिकल आणि मेकानिकल स्थिती
  • कारच्या रजिस्ट्रेशनची तारीख
  • इंजिनची क्युबिक क्षमता
  • कारची एक्स शोरूम प्राइज 
  • कारचा प्रकार - खाजगी, व्यावसायिक किंवा कंपनीच्या मालकी असलेली

जर माझी कार चोरीला गेली असेल आणि सापडत नसेल तर मी इन्शुरन्स रिएमबर्समेंट कशी सुनिश्चित करू शकतो?

जर आपली कार चोरीला गेली असेल आणि सापडत नसेल तर इन्शुररने ती टोटल्ड केली असेल तर आपण रिटर्न टू इनव्हॉइस अॅड-ऑन कव्हर खरेदी करू शकता.

जेव्हा मी इन्शुरन्स क्लेममधील टोटल लॉससाठी फाइल करतो तेव्हा काय होते?

टोटल लॉसच्या केस मध्ये, आपली इन्शुरन्स कंपनी केवळ आयडीव्ही देण्यास जबाबदार आहे. तथापि, जर आपण आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रिटर्न टू इनव्हॉइस अॅड-ऑन कव्हर खरेदी केले असेल तर कार इन्शुरन्स कंपनी कार इंव्हॉईसची संपूर्ण अमाऊंट देण्यास लायेबल आहे.