डेंटल कव्हरसहित हेल्थ इन्शुरन्स

Zero Paperwork. Quick Process.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, डेंटल हेल्थ इन्शुरन्स हा एक असा हेल्थ इन्शुरन्स आहे जो तुम्हाला दातांवरील आवश्यक उपचारांवरील खर्चासाठीदेखील कव्हर देतो. साधारणपणे बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज दातांचे उपचार आणि काळजी यासाठी इन्शुरन्स देत नाहीत. पण डिजिट मात्र ओपीडी लाभांतर्गत त्यासाठी कव्हर देते. हे आमच्या डिजिट हेल्थ केअर प्लस प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.

तुम्हाला डेंटल इन्शुरन्सची गरज का आहे?

1

नवनवीन शोध , महागाई, महागडे सेटअप आणि साहित्य, लॅब वर्क यामुळे दातांचे उपचार हे सहसा बरेच महाग असतात. (1)

2

भारतातील ओपीडीचा खर्च एकूण आरोग्य सेवांवरील  खर्चाच्या ६२% इतका आहे! (2)

3

वर्ल्ड डेंटल फेडरेशनचेच्या मते, जगभरात तोंडाच्या आरोग्यासंबंधीच्या आजारांनी ३.९ दशलक्षाहून अधिक लोक त्रस्त आहेत.  (3)

दातांच्या उपचारासाठी कव्हर देणाऱ्या डिजिट हेल्थ इन्शुरन्समध्ये विशेष काय आहे ?

सोपी ऑनलाइन प्रक्रिया : डेंटल ट्रीटमेंटसह हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यापासून ते क्लेम करण्यापर्यंत सर्व काही अगदी सोपे, डिजिटल, जलद आणि बिनत्रासाचे आहे! तुम्ही क्लेम कराल तेव्हाही हार्ड कॉपीजची आवश्यकता लागत नाही!

महामारी को भी कवर करता है: अगर साल 2020 ने हमें कुछ भी सिखाया है, तो वह यह कि सब कुछ अनिश्चित है। चाहे वह कोविड-19 हो या कोई और वायरस, हर तरह की महामारी इसमें कवर होती है!

वय - आधारित कोपेमेंट नाही :  डेंटल ट्रीटमेंटचा समावेश असलेल्या ओपीडी  कव्हरसहितच्या आमच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी  वय-आधारित कोपेमेंट नाही; म्हणजे क्लेमच्या वेळी, तुम्हाला तुमच्या  खिशातून काहीही द्यावे लागत ​​नाही!

संचयी बोनस : तुम्ही वर्षभरात एकही क्लेम केला नाही तरी काही फरक पडत नाही - तुम्हाला त्याचाही फायदा मिळू शकतो! प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी तुम्ही वार्षिक संचयी बोनस मिळवू शकता!

मोफत वार्षिक हेल्थ चेक अप्स :  अनेक आरोग्यविषयक समस्या नियमित तपासणीने टाळल्या जाऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का ?  दातही त्याला अपवाद नाहीत. या हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला रिन्यूअलच्या वेळी मोफत वार्षिक आरोग्य तपासणीचा लाभ मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकूण आरोग्याविषयी नेहमी सजग राहता!

तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या : कॅशलेस क्लेमसाठी भारतातील आमच्या नेटवर्कमधील 10500+ हॉस्पिटलमधून तुम्हाला हवे ते निवडा किंवा (रिएम्बर्समेंट) परतावा घ्या.

डिजिटच्या ओ.पी.डी कव्हर हेल्थ इन्शुरन्समध्ये डेंटल ट्रीटमेंटशिवाय कशाचा समावेश आहे ?

स्मार्ट + ओ.पी.डी

डेंटल ट्रीटमेंट्स

दातांच्या वेदनेतून त्वरित आराम देण्यासाठी आउटपेशंट डेन्टल ट्रीटमेंट; दंतचिकित्सकांकडून घेतलेले, परंतु आम्ही केवळ क्ष-किरण, एक्सट्रॅकशन्स, अमालगम किंवा कॉम्पोजिट फिलिंग्स, रूट कॅनाल उपचार आणि त्यासाठी विहित औषधे आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी दाताचे अलाइनमेंट यासाठी पैसे देऊ.

ओ.पी.डी कव्हरेजेस

व्यावसायिक शुल्क

कोणत्याही आजारासाठी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक सल्लामसलत आणि वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे तपासणीसाठी शुल्क.

डायग्नोस्टिक शुल्क

एक्स-रे, पॅथॉलॉजी, मेंदू आणि बॉडी स्कॅन (एम.आर.आय, सी.टी स्कॅन) इत्यादी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आउटपेशंट डायग्नोस्टिक प्रक्रिया... डायग्नोस्टिक सेंटरमधून उपचारांसाठी निदान करण्यासाठी वापरले जाते.

सर्जिकल ट्रीटमेंट्स

किरकोळ सर्जिकल प्रक्रिया जसे की पी.ओ.पी, स्यूटरिंग, अपघातांसाठी ड्रेसिंग्ज आणि प्राण्यांच्या चाव्याशी संबंधित आउटपेशंट प्रक्रिया इ. ज्या मेडिकल प्रॅक्टिशनरद्वारे केल्या जातात.

औषध बील्स

आपल्या वैद्यकीय व्यावसायिकाने लिहून दिल्यानुसार औषधोपचार ड्रग्स आणि औषधे.

श्रवणयंत्रे

गंभीर नऐकू येण्याच्या परिस्थितीसाठी आवश्यक असलेल्या श्रवणयंत्रांचा समावेश आहे.

अन्य कव्हरेजेस

कोरोना व्हायरससह सर्व हॉस्पिटलायझेशन

यात आजारपण, अपघात किंवा अगदी गंभीर आजारामुळे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचा समावेश आहे. हे एकाधिक हॉस्पिटलायझेशन कव्हर करण्यासाठी वापरले जाऊ शकते, जोपर्यंत एकूण खर्च आपल्या सम इन्शुअर्डवर अवलंबून आहे.

डेकेअर प्रक्रिया

हेल्थ इन्शुरन्स सामान्यत: केवळ 24 तासांपेक्षा जास्त रुग्णालयात दाखल करण्यासाठी वैद्यकीय खर्चाचा समावेश करतात. यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी वेळ लागणाऱ्या पण रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे.

वय आधारित कोपेमेंट नाही

एक कोपेमेंट म्हणजे हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेम्सदरम्यान, आपल्या खिशातून आपल्याला किती पैसे द्यावे लागतील. आमच्या प्लॅन्समध्ये, वयावर आधारित कोपेमेंटचा समावेश नाही!

खोलीच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही

वेगवेगळ्या श्रेणीतील खोल्यांचे भाडे वेगवेगळे आहे. जसे हॉटेलच्या खोल्यांचे दर असतात. डिजिटसह, काही योजना तुम्हाला तुमच्या विम्याच्या रकमेपेक्षा कमी असेल तोपर्यंत रूम भाड्याची मर्यादा नसल्याचा फायदा देतात.

आय.सी.यू खोली भाडे मर्यादा नाही

आय.सी.यू (अतिदक्षता विभाग) हे गंभीर रुग्णांसाठी असतात. आय.सी.यू मध्ये काळजीचे कारण जास्त असते, म्हणूनच भाडेही जास्त असते. जोपर्यंत ते आपल्या विम्याच्या रकमेपेक्षा कमी आहे तोपर्यंत डिजिट भाड्याची कोणतीही मर्यादा ठेवत नाही.

क्युम्युलेटीव्ह बोनस

प्रत्येक क्लेम मुक्त वर्षासाठी बक्षीस मिळवा. जर आपण वर्षभरात कोणताही क्लेम केला नाही तर काही प्लॅन्स आपल्याला पुढच्या वर्षी डिस्काउंट बक्षीस देतात. या अतिरिक्त सवलतीला क्युम्युलेटीव्ह बोनस म्हणतात

प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी 10% क्युम्युलेटीव्ह बोनस (50%पर्यंत)

रोड ॲम्ब्युलन्स खर्च-- रोड ॲम्ब्युलन्सचा खर्च

रोड ॲम्ब्युलन्स खर्च-- रोड ॲम्ब्युलन्सचा खर्च

कॉम्प्लिमेंट्री आरोग्य तपासणी

आपल्याला आपल्या संपूर्ण आरोग्याबद्दल आणि कल्याणाबद्दल माहिती आहे याची खात्री करण्यासाठी वार्षिक आरोग्य तपासणी महत्त्वपूर्ण आहे. हा एक नूतनीकरणाचा लाभ आहे जो आपल्याला आपल्या आवडीच्या कोणत्याही रुग्णालयात कोणत्याही वार्षिक वैद्यकीय चाचण्या आणि तपासणीसाठी आपल्या खर्चाची भरपाई करण्यास अनुमती देतो.

हॉस्पिटलायझेशननंतरचे लमसम

हा एक फायदा आहे जो आपण डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलायझेशननंतरचा आपला सर्व वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी वापरू शकत. बिलांची गरज नाही. रीएम्बर्समेंटच्या प्रक्रियेद्वारे आपण एकतर हा लाभ वापरणे किंवा स्टँडर्ड पोस्ट-हॉस्पिटलायझेशन बेनिफिट वापरणे निवडू शकता.

मानसिक आजाराचे कव्हर

एखाद्या आघातामुळे मानसिक उपचारासाठी हॉस्पिटलायझेशन करावे लागत असेल, तर त्याचा या लाभात समावेश केला जाईल. तथापि, ओ.पी.डी सल्लामसलत या अंतर्गत समाविष्ट केली जात नाही.

बॅरिएट्रिक सर्जरी

हे कव्हरेज त्यांना उपयोगी आहे जे लठ्ठपणामुळे अवयवांच्या समस्येचा सामना करीत आहेत (बी.एम.आय > 35). तथापि, जर लठ्ठपणा खाण्याचे विकार, हार्मोन्स किंवा इतर कोणत्याही उपचार करण्यायोग्य परिस्थितीमुळे असेल तर हा शस्त्रक्रियेचा खर्च कव्हर केला जाणार नाही.

तुम्ही घेऊ शकता अशी इतर कव्हर्स

नवजात बाळाच्या कव्हरसह मॅटर्निटी लाभ

आपण पुढील दोन वर्षांत किंवा त्याहून अधिक वर्षांत मूल होण्याची योजना आखत असल्यास, आपण याची निवड करू शकता. यात बाल-प्रसूती (वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक समाप्तीसह), वंध्यत्व खर्च आणि नवजात बाळासाठी त्याच्या पहिल्या 90 दिवसांपर्यंत कव्हरेज समाविष्ट आहे.

झोन अपग्रेड

प्रत्येक शहर एकतर झोन ए, बी किंवा सी मध्ये येते. झोन ए मध्ये दिल्ली आणि मुंबई आहे. 'बी' झोनमध्ये बेंगळुरू, हैदराबाद, कोलकत्ता अशी शहरे आहेत. वैद्यकीय खर्चानुसार झोनची विभागणी केली जाते. झोन ए शहरांमध्ये सर्वाधिक वैद्यकीय खर्च आहे, त्यामुळे या शहरांमध्ये हेल्थ इन्शुरन्सअंतर्गत उपचार घेण्याचा प्रीमियम थोडा जास्त आहे. आपण जिथे राहता त्यापेक्षा मोठ्या शहरात आपल्याला उपचार घ्यायचे असतील, तर त्यासाठीची आपली योजना आपण अपग्रेड करू शकता.

Get Quote

यात कोणत्या गोष्टी कव्हर होत नाहीत ?

डेंटल ट्रीटमेंटसाठीच्या या इन्शुरन्समध्ये कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, कवळ्या, डेंटल प्रोस्थेसिस, डेंटल इम्प्लांट्स, ऑर्थोडॉन्टिक्स, ऑर्थोग्नेथिक शस्त्रक्रिया, जॉ अलाईनमेंट किंवा टेम्पोरोमॅन्डिब्युलर (जबडा) साठीचे उपचार, वरच्या आणि खालच्या जबड्याच्या हाडांच्या शस्त्रक्रिया आणि तीव्र आघातजन्य इजा झाल्याने किंवा कर्करोगामुळे कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया नसल्या तर टेम्पोरोमॅंडिब्युलर (जबडा) संबंधित शस्त्रक्रिया यांवरील खर्चाचा समावेश नाही.

याशिवाय ओपीडी कव्हरमध्ये चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स आणि फिजिओथेरपी, कॉस्मेटिक प्रक्रिया, वॉकर, बीपी मॉनिटर्स, ग्लुकोमीटर, थर्मामीटर यांसारखी रुग्णसहाय्यक उपकरणे, आहारतज्ज्ञांची फी, जीवनसत्त्वे आणि सप्लिमेंट्स यांसारखा खर्च वगळण्यात आला आहे.

क्लेम कसा दाखल करायचा?

रिएम्बर्समेंट क्लेम्स  -आम्हाला रुग्णालयात दाखल झाल्याच्या दोन दिवसांच्या आत 1800-258-4242 वर कळवा किंवा आम्हाला healthclaims@godigit.com वर ईमेल करा आणि आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू जिथे तुम्ही तुमची रुग्णालयाची बिले आणि सर्व रिएम्बर्समेंट प्रक्रिया करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करू शकता.

कॅशलेस क्लेम्स - नेटवर्क हॉस्पिटल निवडा. तुम्हाला नेटवर्क रुग्णालयांची संपूर्ण यादी येथे मिळेल. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागवा. सर्व काही व्यवस्थित असल्यास, तुमच्या क्लेमवर तेथे आणि तेथे प्रक्रिया केली जाईल.

 

जर तुम्ही कोरोनाव्हायरससाठी क्लेम केला असेल, तर आयसीएमआरच्या अधिकृत केंद्राकडून – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्याकडून तुमचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची खात्री करा

दातांच्या उपचारांसाठी कव्हर देणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व

दातांवरील तुमच्या खर्चाची चिंता दूर करते

मुख्यतः या क्षेत्रात सतत होत असणाऱ्या नवनवीन शोधांमुळे, महागडा सेटअप आणि लॅबॉरेटरी वर्कचे प्रमाण यामुळे दातांचे उपचार महाग असू शकतात. डेंटल कव्हरेजसह हेल्थ इन्शुरन्स घेतल्याने तुमचा दातांवरील उपचाराचा खर्च कमी होईल याची निश्चिती होते आणि तुम्ही तुमच्या तोंडाच्या आरोग्याची काळजी घेऊनदेखील अधिक बचत करता!

तुम्हाला तुमच्या दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी मदत मिळते आणि ते खूप महत्त्वाचे आहे !

लोक अनेकदा दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे नंतर तोंडाच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. खरं तर, आरोग्य तज्ञ वर्षातून किमान एकदा दंतचिकित्सकाला भेट देण्याची शिफारस करतात. मात्र असे आढळून आले आहे की भारतात ६७% लोक डेंटिस्टकडे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही अशा टप्प्याला परिस्थिती पोहोचल्याशिवाय हे करत नाहीत. डेंटल हेल्थ इन्शुरन्समुळे याची निश्चिती होते की तुम्ही तुमच्या दातांच्या समस्यांकडे शेवटच्या क्षणापर्यंत दुर्लक्ष करणार नाही आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीची चिंता न करता योग्य वेळी आवश्यक उपचार मिळवाल!

जास्त कव्हरेजचे फायदे

बहुतेक स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज दातांचे उपचार कव्हर करत नाहीत. पण दातांचे उपचार समाविष्ट असलेल्या या ओपीडी कव्हरसह असलेल्या या हेल्थ इन्शुरन्सचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला कव्हरेजचे जास्त फायदे मिळतात. तुम्हाला स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्सचे सर्व फायदे तर मिळतातच शिवाय ओपीडी आणि दातांच्या उपचाराचा खर्चही कव्हर होतो!

डेंटल हेल्थ इन्शुरन्सशिवाय अन्य लाभ

वर नमूद केल्याप्रमाणे इथे दातांच्या उपचारांचा इन्शुरन्स तुम्हाला फक्त आवश्यक डेंटल ट्रीटमेंटसाठी कव्हरेजचा लाभ देत नाही तर, डेकेअर प्रक्रियेसाठी कव्हरेज, कोव्हिड-१९ सह इतर सर्व आजारांसाठी हॉस्पिटलायझेशन, मोफत हेल्थ चेक अप्स आणि रूम रेंटवर कमाल भाड्याची मर्यादा नसणे असे इतर फायदेदेखील मिळतात.

सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीजप्रमाणे टॅक्समधून सवलती मिळवा!

कोणत्याही हेल्थ इन्शुरन्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या आरोग्याशी संबंधित आर्थिक लाभ मिळण्याव्यतिरिक्त तुम्हाला इतर आर्थिक लाभदेखील मिळतात. तुम्ही भरलेल्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर आधारित वार्षिक रु. २५,००० पर्यंत कर वाचवू शकता!

दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि निगा ठेवण्यासाठी काय कराल?

तुम्ही हे लहानपणापासून ऐकत आला असाल, पण गंमत अशी आहे की तेच अजूनही अगदी खरे आहे! तरीही लोकांना आजही त्याची आठवण करून देण्याची गरज आहे! तोंडाच्या चांगल्या स्वच्छतेची गुरुकिल्ली म्हणजे दिवसातून दोनदा दात घासणे आणि दातांमध्ये प्लॅक होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार फ्लॉस करणे.

आरोग्य तज्ञांच्या नेहमीच्या शिफारशींपैकी एक ही आहे की जरी तुम्हाला दातांच्या समस्या नाहीत असे वाटत असले तरीही तुम्ही तुमच्या दंतचिकित्सकाला वर्षातून दोनदा नाही तर किमान एकदा तरी भेट द्यावी. बर्‍याच वेळा आत काय चालले आहे हे तुम्हाला कळत नाही आणि मग खूप उशीर झालेला असतो! हे तर तुम्हाला माहितीच आहे की दातदुखीची वेदना ही सर्वात वाईट वेदनांपैकी एक आहे. नियमित दात तपासून घेतल्याने तुमचे मौखिक आरोग्य नियंत्रणात राहते!

भरपूर पाणी प्या. हा जुना मंत्र फक्त एकूण शारीरिक आरोग्यासाठी नाही तर दातांच्या आरोग्यासाठीही लागू पडतो!

तुम्हाला मधुमेह(डायबिटीस) असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या एकूण शारीरिक आणि मौखिक आरोग्यासाठीही हे आवश्यक आहे. त्यामुळे हिरड्यांचे रोग होण्यास प्रतिबंध होईल आणि जर तुम्हाला हिरड्यांचे रोग होण्याची सवय असेल तर त्यावर ताबडतोब उपचार करा!

तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान टाळा. ते फक्त तुमच्या फुफ्फुसांसाठी वाईट आहेत असे नाही तर मौखिक आरोग्यासाठीही घातक आहेत!

 

दातांचे उपचार कव्हर करणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डेंटल हेल्थ इन्शुरन्स रूट कॅनाल ट्रीटमेंटसाठी कव्हर देतात का?

होय, तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केली असेल तर रूट कॅनाल ट्रीटमेंटसुद्धा डेंटल ट्रीटमेंटच्या या हेल्थ इन्शुरन्समध्ये समाविष्ट केली जाते.  

डेंटल हेल्थ इन्शुरन्स कव्हरमध्ये दात काढण्याचा समावेश होतो का?

होय, बहुतेकवेळा अतिशय वेदना आणि अस्वस्थपणामुळे दात काढणे आवश्यक असते. त्यामुळे डेंटल हेल्थ इन्शुरन्समध्ये त्याचा समावेश होतो.

डेंटल हेल्थ इन्शुरन्स कव्हरमध्ये डेंटल इम्प्लान्ट्सचा समावेश होतो का?

नाही, या डेंटल हेल्थ इन्शुरन्समध्ये डेंटल इम्प्लान्ट्सचा समावेश होत नाही.

डेंटल हेल्थ इन्शुरन्स ब्रेसेसचा खर्च कव्हर करते का?

हो, हा डेंटल हेल्थ इन्शुरन्स दातांच्या अलाईनमेंटचा खर्च कव्हर करतो, पण फक्त पौगंडावस्थेतील मुलांसाठी

ओपीडी म्हणजे नक्की काय ?

ज्या औषधोपचार आणि इतर प्रोसीजर्ससाठी तुम्हाला दवाखान्यात दाखल होण्याची गरज नसते त्यांना ओपीडी  अर्थात (आऊट पेशंट डिपार्टमेंट) म्हटले जाते. तुमची डॉक्टरबरोबरची सर्व कन्सल्टेशन्स आणि डायग्नॉसिस यांचा यात अंतर्भाव होतो 😊 ओपीडी लाभांबद्दल अधिक माहिती तुम्हाला इथे मिळेल.