सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स

Zero Paperwork. Quick Process.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनला तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स चाच एक वाढीव भाग म्हणू शकता. तुमच्या कॉर्पोरेट इन्शुरन्सची कमाल क्लेम मर्यादा (त्या वर्षाची) तुम्ही आधीच वापरली असेल आणि वाढत्या किमती लक्षात घेत तुमच्या हेल्थ इन्शुररकडून पुरेसे सुरक्षा कवच मिळावे असे तुम्हाला वाटत असेल; आणि त्यासाठी तुमच्या खिशातून थोडा खर्च करायला तुमची हरकत नसेल तेव्हा तो घेता येतो.   

सुपर टॉप-अप प्लॅनची खासियत ही आहे की या पॉलिसीद्वारे एका वर्षातील एकूण आरोग्यविषयक खर्च डिडक्टिबल रकमेपेक्षा जास्त झाल्यास असे सर्व क्लेम कव्हर केले जातात. त्याउलट साध्या टॉप-अप पॉलिसीत जर एकच क्लेम डिडक्टिबलपेक्षा जास्त झाला तरच कव्हर करतात!

उदाहरणासह सुपर टॉप-अप समजून घ्या

सुपर टॉप-अप इन्शुरन्स (डिजिट हेल्थ केअर प्लस) इतर टॉप-अप प्लॅन
निवडलेले डिडक्टिबल्स 2 लाख 2 लाख
निवडलेली सम इन्शुअर्ड 10 लाख 10 लाख
वर्षातला पहिला क्लेम 4 लाख 4 लाख
तुम्हाला द्यावे लागतील 2 लाख 2 लाख
तुमचा टॉप-अप इन्शुअरर देईल 2 लाख 2 लाख
वर्षातील दुसरा क्लेम 6 लाख 6 लाख
तुम्हाला द्यावे लागतील काहीही नाही! 😊 2 लाख (डिडक्टिबल निवडल्यास)
तुमचा टॉप-अप इन्शुअरर देईल 6 लाख 4 लाख
वर्षातील तिसरा क्लेम 1 लाख 1 लाख
तुम्हाला द्यावे लागतील काहीही नाही! 😊 1 लाख
तुमचा टॉप-अप इन्शुअरर देईल 1 लाख काहीही नाही ☹️

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचे फायदे कोणकोणते आहेत?

कोव्हिड -19 महामारीचा अंतर्भाव -  कोव्हिड-19 मुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप अनिश्चितता आली आहे हे तर आपण सर्व जाणतोच. महामारी असूनसुद्धा यात इतर आजारांशिवाय कोव्हिड-19 चादेखील समावेश होतो.

तुम्हाला डिडक्टिबलची रक्कम एकदाच द्यावी लागेल - सुपर टॉप-अप इन्शुरन्स घेतल्यावर तुम्हाला तुमची डिडक्टिबलची रक्कम एकदाच भरावी लागेल. त्यानंतर मग तुम्ही वर्षातून कितीही वेळा क्लेम करू शकाल. हीच तर आहे डिजिटची खासियत!😊

तुमची सुपर टॉप-अप पॉलिसी आरोग्याच्या गरजांप्रमाणे कस्टमाइझ करा - तुम्ही 1,2,3 आणि 5 लाख इतके डिडक्टिबल घेऊन त्याबदल्यात 10 ते 20 लाख दरम्यान सम इन्श्युअर्ड मिळवू शकता.

खोलीच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही - प्रत्येकाची निवड वेगळी असते हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळेच तर आम्ही खोलीच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा ठेवलेली नाही! रुग्णालयामध्ये तुमच्या सोयीप्रमाणे खोली निवडा. 😊

कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या - भारतभरातल्या 6400+ रुग्णालयांपैकी कोणतेही निवडा. कॅशलेस क्लेम्सचा पर्याय निवडा किंवा रिएम्बर्समेंट मिळवा.

सुलभ ऑनलाइन प्रक्रिया - सुपर टॉप-अप इन्शुरन्स घेण्यापासून ते क्लेम करण्यापर्यंत सारे काही आहे कागदपत्र विरहित, सोपे, जलद आणि बिनत्रासाचे! क्लेम करण्यासाठीसुद्धा कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत!

तुम्ही सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स का घ्यायला हवा?

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स कोणी घ्यावा?

सुपर टॉप-अप इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?

फायदे

सुपर टॉप- अप

डीडक्टीबलची रक्कम ओलांडली की ते एका पॉलिसी वर्षात एकत्रित वैद्यकीय खर्चासाठी केलेल्या क्लेमचे पैसे देते, याच्या विरुद्ध नियमित टॉप-अप इन्शुरन्स आहे ज्यामध्ये थ्रेशोल्ड मर्यादेपेक्षा फक्त एकच जास्तीचा क्लेम कव्हर होतो.

तुमची डिडक्टिबल रक्कम एकदाच भरा –डिजिटची खासियत

सर्व हॉस्पिटलायझेशन

यात आजारपण, अपघात किंवा अगदी गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्याच्या खर्चाचा समावेश आहे.जेव्हा आपली डीडक्टीबल मर्यादा ओलांडली गेली आहे तेव्हा जोपर्यंत एकूण खर्च आपल्या विम्याच्या रकमेपर्यंत आहे तोपर्यंत कितीही वेळा हे हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हर करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

डे केअर प्रक्रिया

हेल्थ इन्शुरन्स केवळ 24 तासांपेक्षा जास्त रुग्णालयात दाखल होणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा समावेश करतो. डे केअर प्रक्रिया म्हणजे रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय उपचारांचा यात संदर्भ आहे, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपचारांना 24 तासांपेक्षा कमी वेळ लागतो.

प्री-एक्झिस्टिंग/विशिष्ट आजाराचा प्रतीक्षा कालावधी

जोपर्यंत आपण प्री-एक्झिस्टिंग (आधीपासून असलेल्या) किंवा विशिष्ट आजारासाठी क्लेम करू शकत नाही तोपर्यंतचा प्रतीक्षा करायला लागणारा हा वेळ आहे.

4 वर्षे /2 वर्षे

रूम रेंट कॅपिंग

हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या श्रेणींच्या खोल्यांचे भाडे वेगवेगळे असते. हॉटेलच्या खोल्यांचे दर वेगवेगळे असतात. तसेच हे आहे. डिजिटसह, काही योजना आपल्याला खोली भाड्याची मर्यादा नसल्याचा फायदा देतात, जोपर्यंत ते आपल्या इन्शुरन्सच्या रकमेपेक्षा कमी आहे.

खोलीच्या कमाल भाड्यावर कोणतीही मर्यादा नाही – डिजिटची खासियत

आय.सी.यू(ICU) रूमचे भाडे

आय.सी.यू (अतिदक्षता विभाग) हे गंभीर आजारी रुग्णांसाठी असतात. आय.सी.यू मध्ये जास्त काळजी घेतली जाते, त्यामुळेच भाडेही जास्त असते. जोपर्यंत ते आपल्या विम्याच्या रकमेपेक्षा कमी आहेत तोपर्यंत डिजिट भाड्याची कोणतीही मर्यादा ठेवत नाही.

कोणतीही मर्यादा नाही

रोड ॲम्ब्युलन्स चार्जेस

रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) सेवा ही सर्वात आवश्यक वैद्यकीय सेवांपैकी एक आहे कारण ती केवळ आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास मदत करत नाही तर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधादेखील पुरवते. त्याची किंमत या सुपर टॉप-अप पॉलिसीअंतर्गत कव्हर केली जाते.

कॉम्प्लिमेंटरी वार्षिक आरोग्य तपासणी

आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल संपूर्ण माहिती आहे याची खात्री करण्यासाठी वार्षिक आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. हे एक रिन्यूअल बेनिफिट आहे जे आपल्याला आपल्या आवडीच्या कोणत्याही रुग्णालयात कोणत्याही वार्षिक वैद्यकीय चाचण्या आणि तपासणी करण्यासाठी आपल्या खर्चाची भरपाई करण्यास मदत करते.

प्री/पोस्ट हॉस्पिटलायझेशन

हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचे सर्व खर्च जसे की निदान, चाचण्या आणि रिकव्हरी कव्हर करते.

हॉस्पिटलायझेशननंतरची लमसम- डिजिटल स्पेशल

हा एक फायदा आहे जो आपण रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा आपला सर्व वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी वापरू शकता, डिस्चार्जच्या वेळी. बिलांची गरज नाही. रिएम्बर्समेंटच्या प्रक्रियेद्वारे आपण एकतर हा लाभ वापरणे निवडू शकता किंवा हॉस्पिटलायझेशननंतरचा स्टँडर्ड लाभ वापरू शकता.

मानसिक आजाराचे कव्हर

एखाद्या आघातामुळे मनोरुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत असेल, तर त्याचा या लाभात समावेश केला जाईल. तथापि, ओ.पी.डी(OPD) सल्लामसलत या अंतर्गत कव्हर केली जात नाही.

बॅरिॲट्रिक सर्जरी

हे कव्हरेज लठ्ठपणामुळे अवयवांच्या समस्येचा सामना करीत असलेल्या लोकांसाठी आहे (बी.एम.आय > 35). तथापि, जर लठ्ठपणा हा खाण्याचे विकार, हार्मोन्स किंवा इतर कोणत्याही उपचार करण्यायोग्य परिस्थितीमुळे आला असेल तर त्या शस्त्रक्रियेचा खर्च कव्हर केला जाणार नाही.

Get Quote

यात काय कव्हर केले जात नाही ?

तुमचे डिडक्टिबल संपुष्टात येईपर्यंत तुम्ही क्लेम करू शकत नाही

तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे उपलब्ध क्लेमची रक्कम पूर्णपणे संपुष्टात आल्यावर किंवा डिडक्टिबलइतकी रक्कम तुम्ही स्वतः भरल्यानंतरच टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सद्वारे क्लेम करू शकता. पण त्याच वेळी जमेची बाजू ही आहे की डिडक्टिबलची रक्कम तुम्हाला एकदाच भरावी लागते.

आधीपासून असलेले आजार

जे आजार आधीपासूनच असतील त्यांच्या बाबतीत प्रतीक्षेचा कालावधी संपेपर्यंत अशा आजारासाठी किंवा रोगासाठी क्लेम करता येत नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दवाखान्यात दाखल होणे

तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही कारणासाठी रुग्णालयात दाखल झालात तर त्यासाठी कव्हर मिळत नाही.

प्रसूती-पूर्व आणि प्रसूती-नंतरचे खर्च

प्रसूतीपूर्व आणि त्यानंतरचे वैद्यकीय खर्च रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास त्याचा अपवाद वगळता.

क्लेम कसा दाखल करावा ?

रिएम्बर्समेंट क्लेम्स – रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत आम्हाला 1800-258-4242 वर फोन करून किंवा healthclaims@godigit.com वर ईमेल करून आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू ज्यावर तुम्ही तुमची रुग्णालयाची बिले आणि परताव्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलोड करू शकता.

कॅशलेस क्लेम (Cashless Claims) – नेटवर्कमधला रुग्णालय निवडा. नेटवर्क रुग्णालयांची पूर्ण यादी तुम्हाला इथे मिळेल. रुग्णालयाच्या कार्यालयात तुमचे ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिकवेस्ट फॉर्म मागा. सर्व काही ठीक असेल तर तिथल्या तिथे तुमच्या क्लेमची प्रक्रिया केली जाईल.

जर तुम्ही कोरोना व्हायरससाठी क्लेम करत असाल तर तुमचा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आयसीएमआर – नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे यांची मान्यता असलेल्या केंद्राचा असल्याची खात्री करून घ्या.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य फायदे

डिडक्टिबल एकदाच भरावे लागते!
कोपेमेंट कोणतेही वय-आधारित कोपेमेंट नाही
कॅशलेस रुग्णालये भारतभर 16400+ हून अधिक कॅशलेस रुग्णालये
खोलीच्या भाड्यावर कमाल मर्यादा खोलीच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्हाला आवडेल ती खोली निवडा.
क्लेम प्रक्रिया डिजिटल स्नेही. कोणत्याही कागदपत्रांची जरूर नाही!
कोव्हिड-19 साठी उपचार कव्हर केले जातात

भारतात सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचे काम कसे चालते ?

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स खर्च विभागून घेण्याच्या तत्त्वावर चालतो. म्हणजे त्याचा पूर्ण खर्च तुमचा सुपर टॉप-अप इन्शुअरर उचलत नाही. तुमचे डिडक्टिबल किती आहे त्यावर अवलंबून त्याचा काही भाग कव्हर केला जातो. जर तुमच्या टॉप-अप प्लॅनचे डिडक्टिबल 3 लाख असेल तर तुमचा सुपर टॉप-अप प्लॅन 2 लाखांपेक्षा जास्तीचे क्लेम कव्हर करेल.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स आणि रेग्युलर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये काय फरक आहे ?

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स आणि रेग्युलर हेल्थ इन्शुरन्समध्ये मुख्य फरक हा आहे की तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुमच्या हॉस्पिटलायझेशनचा पूर्ण किंवा 70% खर्च (तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कोणती आहे यावर अवलंबून) कव्हर करतो.   

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स मात्र तुमचा खर्च एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच तो कव्हर करतो.

उदाहरणार्थ: जर तुमची सुपर टॉप-अप इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला 5 लाखांनंतर कव्हर करत असेल तर...जर तुमचे एकूण बिल 8 लाख झाले तर 5 लाख तुमच्या स्टँडर्ड इन्शुरन्स पॉलिसीद्वारे किंवा तुमच्या खिशातून दिल्यानंतर फक्त वरचे 3 लाख कव्हर केले जातील.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन जास्त स्वस्त का असतो ?

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन जास्त स्वस्त असण्याचे मुख्य कारण हे आहे की पूर्ण खर्च सुपर टॉप-अप इन्शुअररला भरावा लागत नाही. शिवाय जर डिडक्टिबलच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाला तरच तो भरावा लागतो.

टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स आणि सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्समध्ये काय फरक आहे ?

तुम्ही बहुतेक टॉप-अप आणि सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स या दोन्हींबद्दल वाचले असेल आणि त्यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल तुमच्या मनात गोंधळ असेल.

साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स जेव्हा एकच क्लेम डिडक्टिबल मर्यादेच्या पुढे जातो त्यावेळी खर्चासाठी कव्हर देतो.

सुपर टॉप-अप इन्शुरन्स मात्र वर्षभरात एकापेक्षा अधिक क्लेम मिळून त्यांची रक्कम डिडक्टिबल मर्यादेच्या पुढे जात असेल तरीसुद्धा त्यासाठी कव्हर देतो.

उदाहरणार्थ: जर तुम्ही 5 लाख डिडक्टिबल रकमेचा प्लॅन घेतला असेल आणि तुमचे 4 लाखांचे दोन क्लेम असतील तर तुमचा टॉप-अप इन्शुरन्स हे क्लेम कव्हर करणार नाही कारण एकही क्लेम 5 लाखांपेक्षा जास्त नाही.

पण सुपर-टॉप अप प्लॅन मात्र कव्हर देईल कारण वर्षभरातली एकूण क्लेमची रक्कम 8 लाख आहे, त्याच्याद्वारे उरलेले 3 लाख कव्हर केले जातील.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात डिडक्टिबल म्हणजे काय ?

डिडक्टिबल रक्कम म्हणजे ती रक्कम जी तुम्ही किंवा तुमच्या इन्शुररने भरल्यानंतरच सुपर टॉप-अप इन्शुरन्स तुमचा खर्च भरू शकतो.

उदाहरणार्थ तुम्ही 2 लाखांच्या डिडक्टिबलचा टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप प्लॅन घेतला आहे आणि तुमची सम इन्शुअर्ड 20 लाख रुपये आहे.

क्लेम काळादरम्यान जर तुमचा एकूण क्लेम 3 लाखांचा असेल तर तुमचा सुपर टॉप-अप इन्शुरन्स वरच्या 1 लाखासाठी क्लेम देईल. पहिले 2 लाख तुम्हाला (स्वतःच्या खिशातून किंवा तुमच्या ग्रुप मेडिकल प्लॅन/प्रायमरी हेल्थ प्लॅनमधून) द्यावे लागतील.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स आयुषदेखील कव्हर करते का ?

होय, डिजिटचा सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स आयुष उपचारदेखील कव्हर करते.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी कोण पात्र असते?

18 ते 65 वर्षे वयामधील कोणीही सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकते.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचा माझ्या पालकांना काय फायदा होईल ?

वय वाढत जात तसे आरोग्यासंबंधीचे खर्चही वाढत जातात. त्यामुळे तुमचा आरोग्यावरील एकूण खर्च वाढत जातो. परिणामी एका वर्षातील एकूण आरोग्यविषयक खर्च तुमच्या कॉर्पोरेट प्लॅन किंवा बेसिक हेल्थ इन्शुरन्सच्या कव्हरपेक्षा जास्त असू शकतो.

मी कोणता प्लॅन घ्यायला हवा – टॉप-अप की सुपर टॉप-अप प्लॅन?

बहुतेक लोकं आर्थिक आणीबाणीपासून बचाव करण्यासाठी टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतात. तुमचा खर्च ठरलेल्या डिडक्टिबलपेक्षा पुढे गेल्यास टॉप-अप आणि सुपर टॉप-अप हे दोन्ही प्लॅन तुमचा खर्च कमी करायला मदत करतात. सुपर टॉप अप प्लॅन वर्षभरातील एकूण खर्च डिडक्टिबलपेक्षा जास्त झाल्यास आणि टॉप-अप प्लॅन एकाच क्लेमसाठी लागू असतात.

आर्थिकदृष्ट्या सुपर टॉप-अप प्लॅन तुम्हाला जास्त बचत करायला मदत करतात आणि अधिक उपयोगीही असतात!

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स माझ्या सम इन्शुअर्डला कशी बळकटी देतो?

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सची मूळ कल्पनाच अशी आहे की एखाद्या वर्षादरम्यान तुमचा आरोग्यवरील खर्च तुमच्या डिडक्टिबल रकमेपेक्षा जास्त झाला तर सुपर टॉप-अप प्लॅन तुम्हाला अधिक कव्हर देऊ शकतो. याचा अर्थ असा की जर तुमचा 3 लाख रुपये सम इन्श्युअर्ड असलेला कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असेल आणि 10 लाखांचा सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुमची एकूण सम इन्शुअर्ड 13 लाख रुपये होईल. सुपर टॉप-अपमुळे तुम्हाला हा फायदा मिळेल.

माझा सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कशावर अवलंबून असेल ?

तुमच्या सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम तुमचे वय, राहण्याची जागा आणि तुमच्या सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्ससाठी तुम्ही ठरवलेली डिडक्टिबल आणि सम इन्शुअर्डची रक्कम यांवर अवलंबून असते.