सीएनजी (CNG) कार इन्शुरन्स

सीएनजी (CNG) वाहनांसाठी मोटर इन्शुरन्स घ्या

Third-party premium has changed from 1st June. Renew now

सीएनजी (CNG) वाहनांसाठी कार इन्शुरन्स

तुमच्याकडे एखादे सीएनजी वाहन आधीपासूनच असेल किंवा तुम्ही पेट्रोलऐवजी सीएनजी वापरण्याच्या     विचारात असाल आणि तुम्ही असं गृहित धरलं असेल की तुमचा नेहमीचा कार इन्शुरन्स त्यासाठी पुरेसा आहे तर मग हे तुम्ही वाचायला हवं...दुर्दैवानं तुम्हाला वाटतं तसं नाहीये.

कोणत्याही सीएनजी वाहनासाठी तुम्ही मोटर इन्शुरन्स अपग्रेड करता तेव्हा त्यासाठी लांबलचक नियमावली असते. त्याचं कारण असं की सीएनजी किटचा तुमच्या गाडीवर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. अगदी गाडीच्या कामगिरीपासून ते इन्शुरन्सच्या हप्त्यापर्यन्त आणि पर्यावरणावरही.

सीएनजी (CNG) वाहनाचे फायदे कोणते आहेत?

अलिकडे सीएनजी वाहनांचा बोलबाला आहे. तुम्ही अधिक शाश्वत आणि किफायतशीर वाहनाच्या शोधात असाल तर तो खूपच चांगला पर्याय आहे.

सीएनजी (म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) तुम्हाला नेहमीच्या इंधनाच्या एक तृतीयांश किंमतीत तेवढेच मायलेज देते. नेहमीच्या पेट्रोल आणि डिझेलला त्यामुळे हा जास्त स्वस्त पर्याय आहे.

शिवाय त्याच्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही अतिशय कमी आहे. त्यामुळे उपलब्ध इंधनांपैकी ते सर्वात पर्यावरणस्नेही आहे.

कारला सीएनजी (CNG) किट कसे बसवावे?

या प्रश्नाला काय अर्थ आहे असं वाटू शकेल पण कोणत्याही वाहनाला सीएनजी किट बसवण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत..

नंतर लावलेले बाह्य सीएनजी (CNG) किट

तुमच्या पेट्रोल कारचं सीएनजी कारमध्ये रूपांतर करणं शक्य असतं. त्यासाठी तुमच्या जुन्या गाडीमध्ये सीएनजी किट बसवावं लागतं. चांगल्या दर्जाच्या सीएनजी किटची किंमत साधारण 50,000 रुपयांपर्यंत असते. ते गाडीच्या डिकीमध्ये बसवलं जातं.

परंतु त्याचमुळे ते सहजपणे खराब होऊ शकतं. म्हणून त्या किटचा तुमच्या इन्शुअररकडून वेगळा इन्शुरन्स घ्यावा लागतो.

अंतर्गत सीएनजी (CNG) किट

हे किट तुमच्या गाडीमध्ये उत्पादकानेच लावलेले असते. त्यामुळे तुम्ही इन्शुरन्स घेता तेव्हाच त्यात सीएनजीचा पर्याय आधीच समाविष्ट केलेला असतो.

सीएनजी (CNG) किटचा तुमच्या कार इन्शुरन्सच्या प्रीमियमवर (हप्त्यावर) कसा परिणाम होईल?

कार इन्शुरन्सचा हप्ता गाडीच्या इंधनाचा प्रकार, इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) इत्यादी  अनेक घटकांवर अवलंबून असतो. तुमच्या गाडीला सीएनजी किट लावल्याचा या दोन्ही गोष्टींवर परिणाम होतो.

सीनजी गाड्यांमध्ये सर्वसाधारणपणे हप्ता 60 रुपयांनी वाढतो आणि थर्ड-पार्टी-ओन्ली पॉलिसींसाठी काही अतिरिक्त कर वाढतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह पोलिसीच्या बाबतीत हे गाडी सीएनजी किटबरोबरच घेतली होती की ते नंतर लावले यावर अवलंबून असते.

बाह्य सीएनजी (CNG) किटसाठी

तुम्ही तुमच्या गाडीला नवे सीएनजी किट बसवत असाल तर तुमच्या इन्शुअररला त्याबद्दल न विसरता कळवा. म्हणजे तुमची पॉलिसी आवश्यकतेप्रमाणे अपग्रेड केली जाईल.

बहुदा सीएनजी गाड्यांची देखभाल जास्त खर्चिक असते आणि किट बसवण्याची किंमतही बरीच असते (चांगल्या दर्जाच्या सीएनजी किटची किंमत साधारण 50,000 रुपयांच्या आसपास असते). म्हणजेच तुमचा हप्ता किटच्या किमतीच्या ४-५ % इतका वाढू शकतो.

सीएनजी (CNG) किटसहित येणाऱ्या गाड्यांसाठी

सीएनजी किटसहित येणारी गाडी इतर कोणत्याही गाडीप्रमाणेच इन्शुअर केली जाते. तुम्ही सहजपणे तुमच्या आरसी बुकवर सीएनजी सील अपडेट करून घेऊ शकता आणि इन्शुरन्स घेताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना इंधन प्रकाराचा उल्लेख करू शकता.

मात्र हे लक्षात घ्या की तुमचा हप्ता पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या तश्याच गाडीपेक्षा जास्त असेल.

सीएनजी (CNG) कार इन्शुरन्स प्रीमियम कॅलक्युलेटर

वाहन किती सीसी (CC) चे आहे थर्ड पार्टी प्रीमियम (जीएसटी (GST) वगळता )
1000 सीसी पर्यंत ₹2,094
1000 सीसी ते 1500 सीसी ₹3,416

तुमच्या सीएनजी गाडीसाठी डिजिटचाच कार इन्शुरन्स का?

सीएनजी (CNG) वाहनंबद्दल हे लक्षात ठेवा

वाढत्या इंधनांच्या किंमतीमुळे बरेच वेळा गाडीला सीएनजी किट लावून घेणे किंवा सीएनजी गाडी घेण्याचा मार्ग अवलांबला जातो.

पण जेव्हा तुम्ही तुमची गाडी सीएनजी करून घेता तेव्हा इन्शुरन्स घेण्याशिवाय इतरही काही खबरदारी बाळगणे आवश्यक आहे:

इंधनाची उपलब्धता

गाडी सीएनजी करून घेण्यापूर्वी तुमच्या भागात सीएनजी इंधन उपलब्ध आहे का आणि तुमच्या सर्वात जवळचे सीएनजी स्टेशन किती लांब आहे हे नीट माहिती करून घ्या. इंधन भरण्यासाठीच तुम्हाला अव्वाच्या सव्वा इंधन जाळावे लागणार नाही याची खात्री करून घ्या!

किंमत आणि कामगिरी

सीएनजी गाड्या इंधनाची बचत तर करतात पण तुमच्या गाडीच्या कामगिरीवर पेट्रोल इंजिनच्या तुलनेत त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

सीएनजीवर गाडी चालवल्याने इंधनाच्या बचतीचा फायदा तुम्हाला होतो खरा पण गाडीच्या कामगिरीवर होणारा परिणाम हा त्याचा एक तोटा आहे.

पेट्रोल इंजिनच्या तुलनेत थ्रॉटलचा प्रतिसाद थोडा मंद होतो. सीएनजीवर चालणाऱ्या गाडीत तुम्हाला तो जोश मिळणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला गाडी जास्त वेळा सर्व्हिस करावी लागेल.

याचे कारण असे आहे की इंधन व्हॉल्व्हसाठी वंगणाचे काम करते तर सीएनजीच्या बाबतीत तसे होत नाही. त्यामुळे तो लवकर झिजण्याची शक्यता असते.

बाह्य आणि अंतर्गत सीएनजी किट

तुमच्या गाडीला सीएनजी किट लावायचे असेल तर त्याचे दोन मार्ग आहेत – तुमच्या जुन्या गाडीत ते बसवा किंवा नवी सीएनजी असलेली गाडी घ्या. यातले जास्त चांगले काय? तुमच्या सध्याच्या गाडीत सीएनजी किट लावणे जास्त स्वस्त असू शकेल पण त्यासाठी कंपॅटिबिलिटी आहे की नाही ते पहावे लागेल. करखान्यातूनच फिटिंग होऊन अलेले सीएनजी किट केव्हाही चांगले कारण त्यावर वॉरंटीही मिळेल, शिवाय सर्व्हिसिंगचा पर्याय मिळेल, त्यामुळे तुमचा जास्तीचा खर्च वाचेल.

मेंटेनन्सचा खर्च

सीएनजी वाहनांना पेट्रोल वाहनांच्या तुलनेत खूप जास्त देखभाल करावी लागते. इंधन-गळती, वायर्सचे इन्सुलेशन खराब होणे असे काही झालेले नाही ना हे वारंवार तपासात राहावे लागते.

मग तुम्ही सीएनजी गाडी का घ्यावी ?

नेहमीच्या डिझेल/पेट्रोल गाडीच्या तुलनेत तुम्हाला सीएनजी गाडीसाठी जास्त हप्ता भरावा लागेल. पण ते उगीच नाही याची खात्री बाळगा.

मुळात सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलला एक स्वस्त आणि पर्यावरणस्नेही पर्याय आहे. कमी उत्सर्जनामुळे तुमच्या गाडीचे आयुष्यही वाढते.

तर मग पर्यावरण आणि तुमचा खिसा या दोन्हींसाठी इतके अनुकूल असलेले सीएनजी किट तुमच्या गाडीत बसवायला उशीर कशाला करताय ?