हेवी व्हेईकल इन्शुरन्स

अवजड वाहनांसाठी व्यावसायिक वाहन विमा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

अवजड वाहनांसाठीचा (हेवी व्हेईकल) इन्शुरन्स म्हणजे एक प्रकारची कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी आहे. बुलडोझर्स, क्रेन्स, लॉरीज, ट्रॅक्टर्स इत्यादी अवजड वाहनांसाठीची ही खास पॉलिसी आहे. साधा थर्ड पार्टी इन्शुरन्स या अशा वाहनांमुळे थर्ड पार्टीचे झालेले नुकसान कव्हर करतो तर कॉम्प्रिहेन्सिव्ह हेवी व्हेईकल इन्शुरन्स हा त्या वाहनाला झालेले नुकसान कव्हर करतोच त्याशिवाय जास्तीत जास्त संरक्षणासाठी अतिरिक्त कव्हर्सदेखील देतो.

  

अवजड वाहनांचे प्रकार

भारतात अवजड वाहनांचे अनेक प्रकार आहेत. त्यातल्या काही सर्रास आढळणाऱ्या वाहनांची नावे खाली दिली आहेत. कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्सद्वारे या सर्वांसाठी कव्हर मिळू शकते. उदाहरणार्थ :

·         बुलडोझर्स – हे बांधकामासाठी माती, वाळू वगैरे उचलण्यासाठी वापरले जाणारे अवजड वाहन (हेवी व्हेईकल) आहे. हेवी व्हेईकल इन्शुरन्सद्वारे त्यांच्यासाठी कव्हर मिळू शकते.

·         क्रेन्स – क्रेन्ससुद्धा बांधकामासाठी नेहमी वापरल्या जातात आणि कमर्शियल हेवी व्हेईकल इन्शुरन्सद्वारे त्यांच्यासाठीही संरक्षण दिले जाते.

·         बॅकहो डिगर – बॅकहो डिगर्स भारतामध्ये खास करून बांधकामासाठी अतिशय सर्रास वापरला जाणारा हेवी व्हेईकल्सचा प्रकार आहे.  

·         ट्रेलर्स – भारतामध्ये अनेक उद्योगांमध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रेलर्स नेहमीच वापरले जातात. तेदेखील हेवी ड्यूटी कमर्शिअल इन्शुरन्सद्वारे कव्हर करता येतात.

·         लॉरीज – आपल्या देशात टिपर ट्रक्स आणि लॉरीज बरेच वेळा मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक करण्यासाठी वापरले जातात.

डिजिटचाच कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स का निवडावा ?

वी व्हेईकल इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होतात ?

यात कशाचा समावेश नसतो ?

तुमच्या हेवी व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होत नाहीत ही माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे कधी क्लेम करायची वेळ आली तर तुम्हाला धक्का बसण्याची वेळ येणार नाही. अशी काही उदाहरणे इथे दिली आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसी असल्यास स्वतःच्या वाहनाला झालेले नुकसान त्यात कव्हर होत नाही.

नशेत किंवा लायसन्सशिवाय गाडी चालवणे

जर इन्शुरन्स असलेल्या ऑटो रिक्षाचा मालक-चालक नशेत असला किंवा वैध लायसन्सशिवाय गाडी चालवताना आढळला तर

निष्काळजीपणा कारणीभूत

मालक-चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान (उदा. पूर आलेला असतानाही रिक्षा चालवणे)

परिणामी नुकसान

कोणताही अपघात/नैसर्गिक आपत्ती इ.चा थेट परिणाम न होता झालेले नुकसान

डिजिटच्या हेवी व्हेईकल इन्शुरन्सची ठळक वैशिष्ट्ये(Key Features of Heavy Vehicle Insurance by Digit)

ठळक वैशिष्ट्ये डिजिटचा फायदा
क्लेम प्रक्रिया कागदपत्रे विरहित क्लेम्स
ग्राहक सपोर्ट 24x7 सपोर्ट
अतिरिक्त कव्हरेज पीए कव्हर्स, वैधानिक जबाबदारी कव्हर, विशेष एक्सक्लयूजन्स, अनिवार्य वजावटी इ.
थर्ड पार्टीचे नुकसान वैयक्तिक नुकसानाची अमर्यादित जबाबदारी, मालमत्ता किंवा वाहनाला नुकसान झाल्यास ७.५ लाखांपर्यंत भरपाई

हेवी व्हेईकल्स इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

तुमच्या अवजड वाहनाचा (हेवी-ड्यूटी व्हेहिकलचा) प्रकार आणि तुम्हाला किती वाहने इन्शुअर करायची आहेत त्यावर अवलंबून आम्ही तुम्हाला दोन प्राथमिक प्लॅन्सचा पर्याय देतो.

लायबिलिटी ओन्ली स्टँडर्ड पॅकेज

तुमच्या अवजड वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेला झालेले नुकसान.

×

कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेला तुमच्या इन्शुअर्ड हेवी व्हेहिकलने टो करून नेत असलेल्या वाहनामुळे झालेले नुकसान.

×

तुमच्या अवजड वाहनाला नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघात यामुळे झालेले नुकसान.

×

अवजड वाहनाच्या मालक-चालकाला इजा किंवा त्याचा मृत्यू

×
Get Quote Get Quote

क्लेम कसा कराल?

आम्हाला १८००-२५८-५९५६ वर फोन करा किंवा hello@godigit.com वर ईमेल पाठवा.

आमची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताची जागा, अपघाताची तारीख आणि वेळ आणि इन्शुरन्स घेतलेल्याचा/फोन करणाऱ्याचा संपर्क क्रमांक हा तपशील तयार ठेवा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात ? तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहत असाल तर हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात आला पाहिजे. तुम्ही अगदी योग्य तेच करता आहात! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

मी अवजड वाहन इन्शुरन्स का खरेदी करावा?

  • अवजड वाहने कोणत्याही व्यवसायासाठी ऑपरेशनल गुंतवणूकीचा एक मोठा भाग असतात. त्यांच्या साठी व्यवसायाने इन्शुरन्सने त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे, त्यामुळे ज्यावेळी गरज पडेल तेव्हा नुकसान भरपाई करण्यास मदत होईल.
  • मोटार वाहन कायद्यानुसार सर्व वाहनांना कमर्शिअल वाहनांसह किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. तसे केले नाही तर, आपल्याला भारी दंड होऊ शकतो आणि इतर परिणामास जबाबदार धरले जाऊ शकते.
  • आपल्या अवजड-वाहनाचा इन्शुरन्स काढल्याने केवळ आपला व्यवसाय नुकसानीपासून सुरक्षित राहील याची खात्री होईल, तर नैसर्गिक आपत्ती, आग, अपघात आणि टक्कर यासारख्या अनपेक्षित परिस्थितीत आपले वाहन अधिक चांगल्या प्रकारे राखण्यास देखील मदत होईल.

भारतात ऑनलाइन कमर्शिअल हेवी व्हेईकल इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हेवी व्हेईकल इन्शुरन्समध्ये चालकासाठीही कव्हर असते का ?

होय, हेवी-ड्यूटी व्हेईकल्सच्या या कमर्शिअल इन्शुरन्समध्ये मालक-चालकाचे कव्हर देखील अंतर्भूत आहे.

 

हेवी-ड्यूटी व्हेईकलचा इन्शुरन्स घेणे अनिवार्य आहे का?

होय, मोटर व्हेहिकल ॲक्टनुसार तुमचे वाहन भारतातील रस्त्यांवर वैधरित्या चालवायचे असेल तर किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. मात्र हेवी-ड्यूटी व्हेईकल्सना असलेले धोके लक्षात घेता कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सद्वारे मिळणारे जास्तीत जास्त कव्हरेज आणि त्याशिवाय योग्य ते ॲड-ऑन कव्हर्स घेणे केव्हाही चांगले.     

हेवी-ड्यूटी व्हेईकल कमर्शिअल इन्शुरन्स घेण्यासाठी किती खर्च येईल?

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अवजड वाहनाचा इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि ते मुळात कोणत्या शहरात वापरले जाते त्यावर हे अवलंबून आहे. तुमच्या कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्सचा संभावित प्रीमियम तुम्ही इथे पाहू शकता.

 

एका कमर्शिअल इन्शुरन्स पॉलिसीद्वारे मला किती वाहनांसाठी कव्हर मिळवता येईल?

प्रत्येक वाहनाला त्याची स्वतःची खास अशी इन्शुरन्स पॉलिसी असावी लागते. एकाच पॉलिसीद्वारे अनेक वाहनांसाठी कव्हर मिळू शकत नाही.