3 वर्षांसाठीचा लाँग टर्म टू-व्हिलर इन्शुरन्स

बाईक इन्शुरन्सच्या किमतीविषयीची माहिती ऑनलाइन मिळवा.

Third-party premium has changed from 1st June. Renew now

लाँग टर्म टू-व्हिलर इन्शुरन्सबद्दल संपूर्ण माहिती

मच्याकडे दुचाकी (टू-व्हिलर) असल्यास, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की मोटार वाहन कायदा, 1988 नुसार, तुमच्या वाहनाला थर्ड पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्सचे कव्हर असणे अनिवार्य आहे.

 

भारतात, रस्त्यावरील एकूण दुचाकींपैकी सुमारे 75% वाहनांना कोणतेही वैध इन्शुरन्स कव्हर नाही. धक्का बसला, बरोबर ना ? बरं, शोरूममधून वाहन बाहेर काढताना बहुतेक रायडर्स त्यांच्या बाईकचा इन्शुरन्स काढण्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता, ही आकडेवारी आश्चर्यकारक नाही. 

 

तथापि, पॉलिसींचे रिन्यूअल न करण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, देशभरातील इन्शुरन्स कंपन्यांनी मल्टी इयर किंवा लाँग टर्म टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी सुरू केल्या आहेत. सुरुवातीला, या मल्टी इयर इन्शुरन्स पॉलिसीज 3 वर्षांच्या कालावधीसाठी सुरू केल्या गेल्या. आता,त्यांची मुदत  5 वर्षांपर्यंतदेखील वाढवली ​​जाऊ शकते.

3 वर्षांसाठी बाईक इन्शुरन्स खरेदी केल्‍याचे फायदे आणि हा इन्शुरन्स काढण्याचा तुम्‍हाला सल्‍ला का दिला जातो, याविषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे.

3 वर्षांसाठी टू-व्हिलर इन्शुरन्स म्हणजे काय?

टू-व्हिलरचा 3 वर्षांचा इन्शुरन्स वाहन-मालकांना त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे दरवर्षी रिन्यूअल करण्याच्या गरजेपासून मुक्त करतो.इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (आयआरडीए) ने स्टँडअलोन थर्ड-पार्टी लायॅबिलिटी कव्हर आणि टू-व्हिलर वाहनांसाठी ओन डॅमेज (स्वत:च्या नुकसानाच्या) कव्हरसह एकत्रित केलेल्या मल्टी- इयर इन्शुरन्स पॉलिसींच्या या सुविधेचा विस्तार केला आहे.

 

यामध्ये काय समाविष्ट आहे?

कव्हर प्रकार सविस्तर माहिती
थर्ड पार्टी लायॅबिलिटी कव्हर या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुमच्या टू-व्हिलरमुळे तिसऱ्या व्यक्तीला झालेली शारीरिक इजा किंवा मृत्यू तसेच तुमच्या टू-व्हिलरमुळे तृतीय-पक्षाच्या वाहनाला झालेल्या नुकसानीमुळे उद्भवणाऱ्या लायॅबलिटीजचा समावेश होतो.
ओन डॅमेज कव्हर ही इन्शुरन्स पॉलिसी नैसर्गिक अथवा मानवनिर्मित गोष्टींमुळे तुमच्या गाडीचे झालेले कोणतेही नुकसान किंवा हानी यामुळे उद्भवणाऱ्या लायॅबलिटीला कव्हर करते.

तुम्ही टू व्हीलरसाठी 3 वर्षांची इन्शुरन्स पॉलिसी एक डमी पॉलिसी म्हणून घेऊ शकता, ज्यामध्ये 3 वर्षांचे थर्ड-पार्टी लायॅबलिटी कव्हर + 1 वर्षाचे ओन डॅमेज कव्हर समाविष्ट आहे.

 

तीन वर्षांचे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हर हे फक्त 1 सप्टेंबर 2018 नंतर खरेदी केलेल्या टू-व्हिलरसाठीच मिळू शकते.


काॅम्प्रिहेन्सिव्ह टू व्हीलर इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या.

3 वर्षांच्या टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसीसाठी तुमचा प्रीमियम किती असेल?

3 वर्षांच्या टू-व्हिलर इन्शुरन्स कव्हरचे प्रीमियम हे वार्षिक थर्ड पार्टी प्रीमियम पेमेंटच्या तिप्पट मोजले जाते. हे पेमेंट तुम्हाला एका आठवड्यात करावे लागेल. तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे:

  • संपूर्ण 3-वर्षांच्या पॉलिसी कालावधीत या प्रीमियम रकमेवर वाटाघाटी किंवा सुधारणा करता येणार नाही.
  • जर तुमच्याकडे स्टँडअलोन 3-वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल, तर तो पॉलिसीच्या कालावधीत रद्द केला जाऊ शकत नाही (वाहनाचे एकूण नुकसान झाल्यास). वाहनाच्या एकूण नुकसानीच्या बाबतीत, कालबाह्य झालेल्या वर्षांसाठी भरलेला प्रीमियम परत केला जाईल.

ही प्रीमियम पेमेंट सिस्टीम विशेषतः पॉलिसीधारकांसाठी फायदेशीर आहे कारण ती त्यांना इन्शुरन्स कंपनीद्वारे लादलेल्या वार्षिक प्रीमियम दरवाढीपासून वाचवते.  इतकेच नव्हे तर ती इन्शुरन्स कंपन्यांसाठीदेखील फायदेशीर आहे. कारण ती त्यांना एकाच वेळी 3 वर्षांसाठी प्रीमियम गोळा करण्याची परवानगी देते, ज्यामुळे त्यांना प्रशासकीय शुल्कात बचत करता येते.

याशिवाय, वाहनधारकांसाठी 3 वर्षांसाठी टू-व्हिलर इन्शुरन्स फायदेशीर का आहे याची अनेक कारणे आहेत.

ही बघा !

लाँग टर्म टू-व्हिलर इन्शुरन्ससाठी प्रीमियम गणना

कालावधी प्रीमियम रक्कम (OD+TP) GST वगळून
3 वर्षे ₹2,497
2 वर्षे ₹1,680
1 वर्षे ₹854

टू व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर तपासा आणि तुमच्या वाहनाच्या प्रीमियमची गणना करा.

3 वर्षांसाठी लाँग टर्म टू-व्हिलर इन्शुरन्स घेण्याचे फायदे

टू-व्हीलर इन्शुरन्स 3 वर्षांसाठी सर्वसाधारण इन्शुरन्सपेक्षा अनेक फायदे देतो. तुमची निवड सोपी करण्यासाठी खालील फायदे तपासून पहा:

1. रिन्यूअल वेळेत न झाल्यास होणारे परिणाम टाळणे

तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचे लॅप्स आणि तिचे रिन्यूअल यामधील कालावधीत अनेक जोखमी उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, वाहतुकीचे उल्लंघन केल्यामुळे मोठा दंड तसेच या कालावधीत झालेल्या कोणत्याही अपघातामुळे मोठे नुकसान होऊ शकते.3 वर्षांसाठी बाईक इन्शुरन्ससह, तुम्ही पॉलिसीच्या मुदतीच्या किमान 3 वर्षांसाठी ही जोखीम बर्‍याच प्रमाणात कमी करू शकता.

2. सुविधा

बहुतेक प्रकरणांमध्ये, दुचाकी मालक त्यांच्या 1 वर्षाच्या पॉलिसीची मुदत संपल्यानंतर त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे रिन्यूअल करण्यास विसरतात. 3-वर्षांच्या पॉलिसीसह तुम्हाला सतत पॉलिसी संपण्याची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळेच या योजना अधिक सोयीस्कर आहेत कारण ते दरवर्षी तुमच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीचे रिन्यूअल करण्याची आवश्यकता रोखतात.

3. दीर्घकाळात कमी खर्चिक

3 वर्षांच्या इन्शुरन्स पॉलिसीसह, तुम्हाला एकाच वेळी 3 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. परंतु या एकरकमी खर्चाच्या बदल्यात, दीर्घकाळात तुम्ही तुमच्या प्रीमियम पेमेंटवर बरीच बचत कराल.याचे कारण म्हणजे इन्शुरन्स कंपन्या दरवर्षी त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसींच्या प्रीमियम दरांमध्ये सुधारणा करतात आणि वाढ करतात. महागाईमुळे, प्रीमियम दरांमध्ये ही वाढ 10-15% पर्यंत जाऊ शकते. तुमच्याकडे 3 वर्षांची पॉलिसी असल्यास, पॉलिसीची मुदत संपेपर्यंत तुम्ही जास्त प्रीमियम भरण्यापासून स्वतःला वाचवू शकता. अशा प्रकारे, तुमची पॉलिसी दीर्घकाळात खूपच स्वस्त होते.

4. जास्त आयडीव्ही (IDV) चा लाभ घ्या

इन्शुरन्स डिक्लेअर्ड व्हॅल्यू किंवा आयडीव्ही म्हणजे वाहनाच्या एकूण नुकसानाविरूद्ध इन्शुरन्स कंपनीने आश्वासित केलेली एकूण इन्शुरन्स रक्कम आहे.  दिलेला आयडीव्ही =  उत्पादकाची नोंदणीकृत किंमत - वाहनाचे डिप्रिसिएशन.  तुम्ही तुमच्या टू-व्हिलरचे डिप्रिसिएशन लक्षात घेऊन तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचे रिन्यूअल करता तेव्हा मूल्य सुधारित केले जाते.आता, जेव्हा तुम्ही 3 वर्षांची इन्शुरन्स पॉलिसी घेता, तेव्हा तुमचा आयडीव्ही त्या तीन वर्षांच्या मुदतीसाठी कायम राहतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वाहनाच्या एकूण तोट्यावर जास्त इन्शुरन्स रक्कम मिळू शकते

5. जास्त नो क्लेम बोनस (NCB)

नो क्लेम बोनस ही सवलत आहे जी तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर मिळवू शकता जर तुम्ही मागील वर्षी कोणतेही क्लेम केले नाहीत. तीन वर्षांच्या टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसह, तुम्ही एक-वर्षाच्या पॉलिसींवर तुमच्या नो क्लेम बोनसचा फायदा घेऊ शकता.उदाहरणार्थ, तुम्ही 3 वर्षांची पॉलिसी घेताना तुमच्या आधीच्या पॉलिसीमधून 20% एनसीबी असल्यास, तुम्ही सर्व 3 वर्षांसाठी भरलेल्या प्रीमियमवर हा 20% एनसीबी लागू होईल.पुढे, काही विमा प्रदाते त्यांच्या दीर्घकालीन पॉलिसींच्या शेवटी एक वर्षाच्या पॉलिसींच्या तुलनेत जास्त एनसीबी ऑफर करतात ज्यामुळे पॉलिसीधारकांना या संदर्भात प्रोत्साहन मिळते.

6. आकर्षक सवलत

जास्त टू-व्हिलर मालकांना लाँग टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास प्रोत्साहित करण्याचा एक प्रयत्न म्हणून इन्शुरन्स कंपन्या त्यावर आकर्षक सवलत देतात. या सवलतींमुळे वाहन मालकांसाठी इन्शुरन्स कव्हर मिळणे फायदेशीर ठरू शकते.

7. इन्शुरन्स रिन्यूअलसाठी ब्रेक-इन पॉलिसी

काहीवेळा तुमच्या इन्शुरन्स रिन्यूअलमधील अंतर इन्शुरन्स तुमची पॉलिसी रिन्यूअल करण्यास सहमती देण्यापूर्वी तुमच्या टू-व्हिलरची तपासणी करण्याची हमी देऊ शकते. हे ब्रेक-इन पॉलिसी म्हणून ओळखले जाते आणि नंतर जास्त प्रीमियम पेमेंट होऊ शकते.जेव्हा तुम्ही 3 वर्षांची दीर्घकालीन विमा पॉलिसी घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये ब्रेक-इन टाळू शकता आणि नंतर तुमच्या प्रीमियममध्ये कोणतीही अतिरिक्त भर न घालता पुढे ती चालू ठेवू शकता.

 

अशा  अनेक फायद्यांसह, या मल्टी -इयर टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसीज अधिक चांगला पर्याय आहे जेव्हा तुमच्या टू-व्हिलरचा समावेश असलेल्या अनपेक्षित आर्थिक जोखमीपासून स्वतःचे रक्षण करण्याचा विचार येतो.

 

लाँग टर्म इन्शुरन्स कव्हरच्या अंमलबजावणीच्या संदर्भात भारतातील बहुतेक आघाडीच्या इन्शुरन्स कंपन्यांनी आयआरडीएच्या या निर्णयाचे स्वागत केले असल्याने, तुम्ही त्यातील अनेक पर्याय निवडण्याचा लाभ घेऊ शकता.

त्यामुळे वाट पाहत बसू नका!  3 वर्षांच्या पॉलिसी अंतर्गत आजच तुमच्या टू-व्हिलरचा इन्शुरन्स उतरवा!

3 वर्षांसाठीच्या टू व्हीलर इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

लाँग टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा 3 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी लाभ घेता येईल का?

होय, आयआरडीएने इन्शुरन्स कंपन्यांना 5 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी या पॉलिसी ऑफर करण्याची परवानगी दिली आहे.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्ससाठी तीन वर्षांचे इन्शुरन्स कव्हर मिळू शकते का?

होय, 1 सप्टेंबर 2018 नंतर खरेदी केलेल्या नवीन टू-व्हिलरसाठी काॅम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स उपलब्ध आहे.

ओन डॅमेज कव्हरसाठी तीन वर्षांच्या प्लॅनचा स्वतंत्रपणे लाभ घेता येईल का?

नाही, ते  ओन डॅमेज (स्वतःच्या नुकसानीच्या) कव्हरसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध नाही.