कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हर्सेस (विरुद्ध) थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सच्या किमतीविषयीची माहिती जाणून घ्या

Third-party premium has changed from 1st June. Renew now

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्समध्ये काय फरक आहे ?

थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्समधील मुलभूत फरक म्हणजे कव्हरेज फायद्यांचा. थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स मध्ये फक्त थर्ड पार्टीशी संबंधित लायॅबलिटीचा समावेश आहे, तर आपल्या दुचाकीच्या स्वत:च्या नुकसानीसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स  कव्हर देखील आहे आणि आपल्याला केवळ मूलभूत फायद्यांपलीकडे, अनेक ॲड-ऑन आणि कव्हरसह आपले कव्हरेज वाढविण्याचा पर्यायदेखील देते.

शहरांमध्ये आणि आसपासच्या शहरांमध्ये टू-व्हीलर चालवण्याशी संबंधित जोखमींची व्याप्ती पाहता आपल्या टू-व्हीलर्स वाहनासाठी सर्वोत्तम प्रकारचा बाईक इन्शुरन्स निवडणे महत्वाचे आहे. शिवाय, नवीन वाहतूक कायदे आणि वैध बाईक इन्शुरन्स नसणाऱ्यांना भरमसाठ दंड पण आपल्याला खरोखर एक नसणे परवडत नाही!

योग्य बाईक इन्शुरन्स खरेदी करण्याचा आपला निर्णय आपल्यासाठी सोपा करण्यासाठी, आम्ही थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स या दोघांचे फायदे आणि मर्यादा खाली दिल्या आहेत. जेणेकरून आपण आपल्या निवडींचे मूल्यांकन करू शकता आणि त्यानुसार माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता.

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्समधील फरक

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स
हे काय आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये थर्ड -पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स आणि ओन डॅमेज कव्हर दोन्ही एकत्र केले आहे जेणेकरून तुम्हाला सर्व अडचणींविरूद्ध संपूर्ण कव्हरेज मिळेल! थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स ही एक अनिवार्य पॉलिसी आहे जी थर्ड-पार्टीमुळे झालेल्या नुकसानीची काळजी घेते, मोटार वाहन कायदा, 1988 नुसार भारतात कायद्याने अनिवार्य आहे.
कव्हरेज तपशील ही पॉलिसी विस्तृत कव्हरेज प्रदान करते. तुमची बाईक चोरी, नुकसान आणि हानीविरूद्ध कव्हर केली जाईल. हे तुमची बाईक तसेच दुसऱ्या व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीच्या वेळी आर्थिक मदत करते. ही पॉलिसी मर्यादित कव्हरेज प्रदान करते. थर्ड-पार्टी लायॅबिलिटी बाईक इन्शुरन्स केवळ थर्ड-पार्टीसाठी नुकसान/हानीपासून तुमचे संरक्षण करेल.
ॲड-ऑन्स या पॉलिसीसह, आपण इतरांसह शून्य- डिप्रिसिएशन कव्हर, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर, रोडसाइड असिस्टन्स आणि कंझ्यूमेबल कव्हर अशा फायदेशीर ॲड-ऑनची निवड करू शकता. ही पॉलिसी केवळ वैयक्तिक अपघात कव्हर प्रदान करते.
आपण काय खरेदी करावी ? ॲड-ऑनसह तुमच्या बाईकसाठी संपूर्ण कव्हरेजची आवश्यकता असल्यास याची शिफारस केली जाते. आपण क्वचितच आपली बाईक चालवत असल्यास किंवा ती आधीच खूप जुनी असेल तर शिफारस केली जाते.
प्रीमियम किंमत कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स पॉलिसीचा हप्ता थर्ड-पार्टी इन्शुरन्सपेक्षा जास्त रकमेचा आहे. थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स पॉलिसी जास्त महाग नाही.

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?

थर्ड-पार्टी कव्हर आणि स्वत:चे डॅमेज कव्हर या दोन्हींचे कॉम्बिनेशन असलेला कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स तुमच्या बाईकला नैसर्गिक आपत्ती, अपघात, टक्कर इत्यादी अनपेक्षित परिस्थितीमुळे थर्ड-पार्टी संबंधित लायॅबिलिटीपासून ते स्वत:च्या दुचाकीच्या नुकसानीपर्यंत सर्व गोष्टींसाठी कव्हर करून विस्तृत कव्हरेज देते.

शिवाय, तुम्ही तुमच्या बाईकला चांगले कव्हरेज देण्यासाठी विविध ॲड-ऑनचे एक किंवा कॉम्बिनेशनदेखील निवडू शकता. उदाहरणार्थ; आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स खरेदी करताना आपण आमच्या रोडसाइड असिस्टन्स कव्हरची निवड करू शकता आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ब्रेकडाउनशी संबंधित मदत मिळवू शकता.

 

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचे फायदे

तुमच्या बाईकच्या नुकसान कव्हर करते

लोकांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स घेण्याचे #1 कारण म्हणजे हे सत्य आहे की ते स्वत:च्या दुचाकीचे नुकसान आणि हानी कव्हर करते आणि अशा प्रकारे दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुमचा त्रास आणि काही पैसे वाचवते !

थर्ड-पार्टी लायॅबिलिटीपासून आपले संरक्षण करते

थर्ड-पार्टी कव्हरप्रमाणेच कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सदेखील तुमच्या बाईकला थर्ड -पार्टीसंबंधित लायॅबिलिटी आणि नुकसानीपासून वाचवते. उदाहरणार्थ; जर तुमची बाईक दुसऱ्याच्या कारवर आदळली, तर तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स तुमच्या मदतीला येईल !

तुमचे आयडीव्ही कस्टमाइझ करण्याचा पर्याय !

जेव्हा तुम्ही डिजिटसह कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स खरेदी करण्याचा पर्याय निवडता, तेव्हा आम्ही तुम्हाला तुमच्या बाईकचा आयडीव्ही म्हणजे तुमच्या बाईकचे सध्याचे बाजारमूल्य कस्टमाइझ करण्याचा पर्याय देतो. कारण आम्हाला खरोखर विश्वास आहे की तुम्हाला तुमची बाईक सर्वात चांगली माहित आहे !

नैसर्गिक आपत्तीदरम्यान संरक्षण

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स केवळ अपघात आणि धडकेदरम्यान होणाऱ्या नुकसानापासून तुमच्या बाईकचे संरक्षण करत नाही, तर पूर, चक्रीवादळ आणि तत्सम नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीपासून तुमच्या दुचाकीचे संरक्षण करतो.

बाईक चोरीची भरपाई

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, दुर्दैवी प्रकरणात म्हणजे तुमची दुचाकी चोरीला गेली तर तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स तुमचे झालेले नुकसान भरून काढेल. शिवाय, जर तुम्ही रिटर्न टू इनव्हॉइस कव्हरचा पर्याय निवडला असेल, तर त्यासाठी रस्ते करासह शेवटच्या इनव्हॉइस मूल्यानुसार तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल.

कॉस्ट इफेक्टीव्ह पर्याय

वरवर पाहता, कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स अधिक महाग आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्सच्या तुलनेत हे प्रत्यक्षात खूप कॉस्ट इफेक्टीव्ह असल्याचे दिसून येते. शिवाय, माणूस म्हणून आपण दुसऱ्याच्या बाईकपेक्षा स्वत:च्या बाईकच्या नुकसानीची जास्त काळजी करतो,नाही का ?

वैयक्तिक नुकसानीसाठीही कव्हर!

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स या दोन्हींमध्ये वैयक्तिक अपघात कव्हरचा समावेश वैयक्तिक नुकसानीसाठीही केला जाऊ शकतो ! तुमच्याकडे बाईक असल्याने, तुमच्याकडे बाईक इन्शुरन्स प्लॅन असणे अत्यंत महत्वाचे (आणि कायद्याने देखील अनिवार्य आहे).

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सच्या मर्यादा

  • तुमच्या बाईकची नैसर्गिकरित्या झालेली झीज कव्हर करत नाही
  • हे तुमच्या बाईकला कालानुरुप होणाऱ्या डिप्रिसिएशनपासून वाचवू शकत नाही
  • सहसा, जोपर्यंत आपण विशिष्ट ॲड-ऑन घेत नाही, तोपर्यंत तुमच्या बाईकचे फायबर आणि रबर भाग स्टँडर्ड बाईक इन्शुरन्समध्ये पूर्णपणे कव्हर केले जात नाहीत
  • एक स्टँडर्ड नियम म्हणून कोणताही बाईक इन्शुरन्स आण्विक हल्ला किंवा युद्धामुळे होणारे नुकसान किंवा हानी भरून काढू शकणार नाही.

एक्सक्लुजन्स (वगळण्यात आलेल्या गोष्टी)

  • मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे- हे कायद्याच्या विरोधात असल्याने, कोणत्याही क्लेमच्या वेळी तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवल्याचे आढळल्यास ते कव्हर केले जाणार नाही.
  • टू-व्हीलर लायसन्सशिवाय वाहन चालवणे- तुम्ही लायसन्सशिवाय गाडी चालवू नये! पण जर असे आढळले की क्लेम करतेवेळी तुम्ही लायसन्सशिवाय गाडी चालवत होतात - तर संबंधित बाईक इन्शुरन्स क्लेम कव्हर केला जाणार नाही!
  • वैध लायसन्सधारकाशिवाय वाहन चालवणे- कायद्यानुसार,तुम्ही लर्निंग लायसन्स घेऊन गाडी चालवत असाल आणि फ्रंट पॅसेंजर सीटवर वैध लायसन्सधारक नसेल तर आम्ही तुमचा क्लेम कव्हर करू शकत नाही.
  • कॉन्सिक्वेन्शिअल डॅमेजेस- कॉन्सिक्वेन्शिअल डॅमेजेस म्हणजे अपघातानंतर होणारे कोणतेही नुकसान आणि हानी आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही एक विशिष्ट ॲड-ऑन विकत घेत नाही तोपर्यंत तुमच्या बाईक इन्शुरन्सच्या क्लेममध्ये अशा नुकसानीचा समावेश होणार नाही !.
  • निष्काळजीपणा दाखवणे– सोप्या शब्दात सांगायचे तर, भलत्या सलत्या गोष्टी करू नका! याचा अर्थ असा की, जर तुम्ही स्वत:च्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीचा किंवा हानीचा क्लेम केला, तर तो कव्हर केला जाणार नाही!
  • ॲड-ऑन्स विकत घेतले नाहीत - जर तुम्ही विशिष्ट ॲड-ऑन विकत घेतले नसतील, तर तुम्ही त्याच्या फायद्यासाठी क्लेम करू शकत नाही ! त्यामुळे नेहमीच वाईट परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच उपयुक्त ॲड-ऑन निवडा ! तुम्हाला त्याची कधी गरज लागेल हे तुम्हाला माहिती नसते.

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स म्हणजे काय ?

नावाप्रमाणेच, थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा एक प्रकार आहे जो केवळ थर्ड-पार्टी लायॅबिलिटीशी संबंधित हानी आणि नुकसानीसाठी कव्हर करण्याची किमान, अनिवार्य आवश्यकता कव्हर करतो.

उदाहरणार्थ; जर तुमच्या बाईकचा दुसऱ्या बाईकबरोबर अपघात झाला, तर तुमचा थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स थर्ड-पार्टीला झालेल्या नुकसानीचा समावेश करेल. तथापि, हे तुमच्या स्वत:च्या बाईकला झालेल्या नुकसान आणि हानीसाठी कव्हर करू शकणार नाही.

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्सचे फायदे

थर्ड-पार्टी लायॅबिलिटीझ कव्हर करतो

या बाईक इन्शुरन्सचा मुख्य उद्देश कोणत्याही थर्ड-पार्टीशी संबंधित नुकसान आणि हानीपासून तुमचे संरक्षण करणे हा आहे आणि तो फक्त त्याची तरतूद करतो.

कायद्याप्रमाणे आपल्याला कव्हर करतो

मोटार वाहन कायद्यानुसार, रस्त्यावर कायदेशीररित्या प्रवास करण्यास सक्षम होण्यासाठी तुम्हाला किमान थर्ड-पार्टी पॉलिसीची आवश्यकता असेल. अशी पॉलिसी नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो !

तुमचे दंडापासून रक्षण करतो

खरे सांगायचे तर, थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्ससारखा इन्शुरन्स खरेदी करण्याचा किमान खर्च तुम्हाला होणाऱ्या ट्रॅफिक पेनल्टीपेक्षा कमी आहे! वर म्हटल्याप्रमाणे, किमान थर्ड- पार्टी बाईक इन्शुरन्स असणे तुमचे दंडापासून रक्षण करेल.

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्सच्या मर्यादा

  • हे तुमच्या बाईकचे नुकसान किंवा हानीसाठी कव्हर करत नाही; मग ते अपघात, टक्कर, आग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवले असले तरीही.
  • तुम्ही तुमची बाईक इन्शुरन्स पॉलिसी ॲड-ऑन किंवा कव्हरसह कस्टमाइझ करू शकत नाही.
  • थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्सच्या बाबतीत तुम्ही तुमचे आयडीव्ही कस्टमाइझ करू शकत नाही
  • यात तुमच्या बाईकची चोरी झाल्यास भरपाई मिळत नाही.

एक्सक्लुजन्स (वगळण्यात आलेल्या गोष्टी

  • बाईकचे नुकसान:- वर म्हटल्याप्रमाणे, थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स फक्त थर्ड-पार्टी नुकसान आणि हानी कव्हर करतो आणि तुमच्या बाईकचे नुकसान आणि हानी कव्हर करणार नाही.
  • दारू पिऊन चालवणे: कायद्याप्रमाणे, तुम्ही मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे आढळल्यास कोणतीही इन्शुरन्स कंपनी तुमचा बाईक इन्शुरन्स क्लेम स्वीकारू शकणार नाही.
  • वैध लायसन्सशिवाय गाडी चालवणे: - कायदाही हेच सांगतो,  जर आपण वैध लायसन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुमचा क्लेम स्वीकारला जाणार नाही.

तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्समध्ये अपग्रेड का करावे ?

  • तुमच्या लाडक्या बाईकचे संरक्षण करण्यासाठी : जर तुम्हाला तुमच्या बाईकच्या स्थितीची खरोखर काळजी असेल, तर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स घ्याल ! एखादी दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणतीही दुर्दैवी घटना घडली की जिथे तुम्ही चुकून तुमच्या बाईकचे नुकसान झाले असेल, तर तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स तुमच्यासाठी कव्हर करेल.
  • एका बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये स्वत:चे नुकसान आणि थर्ड-पार्टी लायॅबिलिटी दोन्ही कव्हर करणे: कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही आणि तुमच्या दुचाकीसाठी एकाच प्लॅनमध्ये स्वत:चे नुकसान आणि थर्ड-पार्टी लायॅबिलिटी दोन्हींसाठी कव्हर दिले जाईल.
  • अतिरिक्त कव्हर्सचा फायदा घेण्यासाठी: हे केवळ कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आहे.तसेच ओन डॅमेज बाईक इन्शुरन्समध्ये तुम्ही तुमच्या पॉलिसीला तुमच्या आवडीनुसार कस्टमाइझ करण्यासाठी वेगवेगळ्या ॲड-ऑनची निवड करू शकता, फक्त तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रकारच्या कव्हरेजसाठी.

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी तुम्ही विचारात घ्यावे असे काही घटक

  • खरेदीची प्रक्रिया आणि क्लेमिंग: लोकांना इन्शुरन्सपासून रोखणारी एक गोष्ट म्हणजे प्रक्रिया. त्यामुळे तुम्ही शोधत असलेल्या सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी हा एक असला पाहिजे. डिजिटच्या बाबतीत, तुमच्या सर्व प्रक्रिया जलद आहेत आणि सर्व काही क्लिक्सवर, ऑनलाइन आहेत.
  • सेवा लाभ: एका बाईक इन्शुरन्स कंपनीला दुसऱ्यापासून वेगळे बनवते ते म्हणजे त्यांनी ऑफर केलेल्या अद्वितीय सेवा लाभ. सेवा लाभ शोधा आणि तुम्हाला अधिक काय फायदेशीर आहे ते पाहा.
  • क्लेम सेटलमेंट वेग आणि प्रमाण: इन्शुरन्स कंपनीचे क्लेम सेटलमेंटचे प्रमाण तुम्हाला ते क्लेम्स किती यशस्वीपणे पूर्ण करतात याची कल्पना देईल. डिजिटमध्ये, आमचा क्लेम सेटलमेंट सध्या टू-व्हीलर्ससाठी 92% आहे.
  • योग्य आयडीव्ही– आयडीव्ही म्हणजे इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू, जर तुमची बाईक पूर्णपणे खराब झाली असेल किंवा चोरीला गेली असेल तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम देईल. आम्हाला माहित आहे की कमी प्रीमियम आकर्षक वाटतो परंतु यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आर्थिक फायदा होणार नाही. तुम्हाला ऑफर केले जाणारे आयडीव्ही नेहमी तपासा. केवळ प्रीमियमच नव्हे तर आम्ही असे सुचवतो की आपण जास्त आयडीव्ही निवडा. तुम्हाला माहित आहे का ? आपण दुचाकी पूर्णपणे गमावल्याच्या बाबतीत, जास्त आयडीव्हीमुळे जास्त रिएम्बर्समेंट मिळते. आम्ही तुम्हाला तुमच्या निवडीनुसार तुमचा आयडीव्ही कस्टमाइझ करू देतो. कारण आम्हाला वाटते की तुम्ही कोणतीही तडजोड न करता योग्य निर्णय घ्यायला हवा.
  • 24x7 सपोर्ट: तुम्हाला कधी मदतीची गरज भासेल हे तुम्हाला माहिती नसते, त्यामुळे नेहमीच याची खात्री बाळगा की तुमची बाईक इन्शुरन्स कंपनी तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे.