कॅशलेस कार इन्शुरन्स

डिजिट कार इन्शुरन्स 6000+ कॅशलेस गॅरेजेससह येतो

Third-party premium has changed from 1st June. Renew now

कॅशलेस कार इन्शुरन्स म्हणजे काय?

कॅशलेस कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे सर्व फायदे मिळवू देते, जसे की अपघातानंतर तुमच्या स्वतःच्या खिशातून काहीही न देता तुमची कार दुरुस्त करून घेणे.या दुरुस्तीची सगळी बिले थेट आम्हाला (विमा कंपनीला!) पाठवली जातील आणि आम्ही गॅरेजसह बिल सेटल करू. त्यामुळे, तुम्ही आमच्या कॅशलेस नेटवर्कच्या कोणत्याही गॅरेजेसमध्ये सहज तुमच्या खिशातून काहीही खर्च न करता (तुमच्या डिडक्टिबल्स आणि डिप्रिसिएशनशिवाय) तुमच्या कारची दुरुस्ती करून घेऊ शकता.

नेहमीच्या रिएम्बर्समेंट क्लेमच्या तुलनेत, कॅशलेस क्लेम हा अतिशय जलद, सोपा आणि त्रासमुक्त असतो. डिजिटमध्ये आम्ही ६ महिन्यांच्या वॉरंटीसह डोअरस्टेप पिकअप ड्रॉप देखील देतो!

मात्र लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या कार इन्शुरन्समध्ये समाविष्ट असलेल्या फायद्यांवर लागू होते. त्यामुळे, जर नुकसान तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीद्वारे कव्हर केले जात नसेल, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतील. उदाहरणार्थ, तुमच्या इंजिनला होणारे नुकसान अनेक मूलभूत पॉलिसींमध्ये समाविष्ट केलेले नाही.

याव्यतिरिक्त, तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार तुम्हाला बिलाचा एक छोटासा भाग वजावट(डिडक्टिबल्स) आणि घसारा (डिप्रिसिएशन) या स्वरूपात भरावा लागेल.

कॅशलेस कार इन्शुरन्स पॉलिसी कशी कार्य करते?

कॅशलेस कार इन्शुरन्सचे काम हे देशभरातील गॅरेजशी थेट टाय-अप असलेल्या इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून होते. अशी अधिकृत गॅरेजेस - ज्यांना नेटवर्क गॅरेज म्हणतात -जर तुम्हाला अपघातामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी क्लेम करण्याची आवश्यकता असेल तर तेव्हा ही गॅरेजेस कॅशलेस कार दुरुस्तीची सेवा प्रदान करतात.

  • अपघात नुकसानीच्या दुर्दैवी प्रकरणात तुम्हाला फक्त तुमच्या जवळचे गॅरेज शोधणे आवश्यक आहे. डिजिटमध्ये हे देखील डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉपने कव्हर केलेले आहे.
  • तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवल्यानंतर, तुमची कार दुरुस्त करण्यासाठी आणि तुमच्या कॅशलेस क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्ही ते नेटवर्कमधील गॅरेजवर सोडू शकता.
  • दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, बिल थेट इन्शुरन्स कंपनीला पाठवले जाते.
  • बिल इन्शुरन्स कंपनीद्वारे भरले जाईल, मात्र तुम्हाला कोणत्याही वजावटीची(डिडक्टिबल) किंमत आणि बदलण्याची आवश्यकता असलेल्या कोणत्याही भागांची घसारा किंमत (डिप्रिसिएशन कॉस्ट) सहन करावी लागेल.
  • तथापि, जर तुम्ही  झिरो डिप्रिसिएशन ॲड-ऑन कव्हर निवडले तर तुम्ही घसारा शुल्क (डिप्रिसिएशन चार्जेस) भरणे टाळू शकता.

कॅशलेस/नेटवर्क गॅरेज म्हणजे काय?

कॅशलेस कार इन्शुरन्स फक्त तेव्हाच कार्य करतो जेव्हा कार इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्कचा एक भाग असलेल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली जाते. नेटवर्क गॅरेज हे एक गॅरेज आहे ज्याचा इन्शुरन्स कंपनीशी त्यांच्या कोणत्याही पॉलिसीधारकांना कॅशलेस कार दुरुस्ती सेवा प्रदान करण्याचा करार आहे.कॅशलेस गॅरेज सुविधेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, तुम्हाला फक्त एका नामांकित इन्शुरन्स कंपनीकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इ्न्शुरन्स पॉलिसी घेणे आवश्यक आहे.

डिजिटवर, आम्ही हे डोअरस्टेप पिकअप-ड्रॉप आणि दुरुस्तीसाठी ६ महिन्यांच्या वॉरंटीसह देऊ करतो.

इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी, तुमच्या जवळ गॅरेज आहेत की नाही हे तपासण्यासाठी इन्शुरन्स कंपनीने प्रदान केलेल्या नेटवर्क गॅरेजच्या यादीसाठी पॉलिसी तपासा. मग निवांत बसा आणि बाकीचं सगळं आम्ही हाताळू.

जवळपास कॅशलेस गॅरेज नसल्यास काय?

जवळपास कोणतेही कॅशलेस गॅरेज नसले तरीही, उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या दुर्गम भागात प्रवास करत असाल, तर डिजिट दुरुस्तीचे ८० % आगाऊ पैसे थेट गॅरेजमध्ये देईल. जेणेकरून दुरुस्तीचे काम वेळेवर सुरू होईल.

एकदा काम पूर्ण झाल्यावर, आमच्या नावावर बिल तयार होईपर्यंत, आम्ही कोणत्याही घसारा (डिप्रिसिएशन) आणि वजावटीशिवाय (डिडक्टिबल्स) उर्वरित रक्कम गॅरेजला देऊ.

डिजिटची कॅशलेस गॅरेजेस

6000+ नेटवर्क गॅरेजेसची सूची >

तुम्ही डिजिटचा कॅशलेस कार इन्शुरन्स का घ्यावा?

डिजिटसह कॅशलेस कार इन्शुरन्स क्लेम कसा करावा?

कॅशलेस कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी क्लेम करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त इन्शुरन्स कंपनीशी संबंधित सेवा आणि दुरुस्ती केंद्रांची यादी आधीपासून माहिती असणे आवश्यक आहे.

स्टेप १ - फक्त आम्हाला १८००-२५८-५९५६ वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत!

स्टेप २ - तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळेल. मार्गदर्शित स्टेप बाय स्टेप प्रक्रिया वापरून तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या नुकसानग्रस्त वाहनाचा फोटो अपलोड करा.

स्टेप ३ - आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेससाठी निवडू इच्छित असलेला दुरुस्तीचा पर्याय निवडा.

तुम्ही तुमच्या आवडीच्या आमच्या नेटवर्कमधील कोणत्याही गॅरेजला भेट देऊ शकता आणि तुमच्या कॅशलेस कार इन्शुरन्स पॉलिसीची माहिती देऊ शकता.नेटवर्क गॅरेज तिथून पुढे घेऊन जाईल. तुमच्या कारच्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यापासून, ती दुरुस्त करण्याची किंमत आणि इन्शुरन्स कंपनीला बिल पाठवण्यापासून, अर्थातच तुमच्या कस्टमाइझ कार इन्शुरन्स पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार सर्व काही जलद गतीने पार पडेल याची आम्ही खात्री देतो.

कॅशलेस कारच्या क्लेममध्ये ग्राहकाकडून कोणते खर्च केले आहेत?

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कॅशलेस क्लेम्स प्रत्यक्षात १००% कॅशलेस नसतात. तुम्हाला क्लेमच्या रकमेचा एक छोटासा भाग वजावट (डिडक्टिबल्स) आणि घसारा (डिप्रिसिएशन) या स्वरूपात भरावा लागेल जो विमाकर्त्याद्वारे कव्हर केला जाणार नाही.

घसारा

घसारा म्हणजे कालांतराने कारची किंवा कारच्या काही भागांची झीज झाल्यामुळे जेव्हा तुमच्या कारचे मूल्य कमी होते. खरंतर ज्या क्षणी एखादी नवीन कार शोरूममधून बाहेर काढली जाते, त्या क्षणी तिचे मूल्य ५% ने कमी झाल्याचे मानले जाते!

जेव्हा तुम्ही क्लेम दाखल करता, तेव्हा इन्शुरन्स कंपनी पेमेंट करण्यापूर्वी हा घसारा खर्च (डिप्रिसिएशन व्हॅल्यू) वजा करतो.

कार इन्शुरन्समध्ये,  घसाऱ्याचे दोन प्रकार आहेत - कारचा घसारा आणि कारचे विविध भाग आणि कारच्या सामानाचा घसारा. मोजण्यासाठी आयआरडीएआयने घसारा कसा मोजावा यासाठी काही नियम तयार केले आहेत.  

जेव्हा वाहनाचे किरकोळ नुकसान होते, तेव्हा क्लेमच्या वेळी कारच्या भागावरील घसारा विचारात घेतला जाईल. कारच्या पार्टचे घसाऱ्याचे प्रमाण खालीलप्रमाणे वेगवेगळ्या दराने ठरवले जाते:

  • जास्त झीज झालेले भाग - रबरचे भाग, प्लास्टिकचे घटक, बॅटरी, ट्यूब आणि टायर इ. - ५०%
  • फायबर ग्लासचे भाग - ३०%
  • धातूचे भाग - वाहनाच्या वयानुसार ०% ते ५०%

जेव्हा कारचोरी सारख्या संपूर्ण नुकसानीच्या क्लेमची घटना घडते तेव्हा वाहनाचा घसारा लागू होते. हे तुमच्या वाहनाच्या वयावर आधारित आहे.

वजावट

डिडक्टिबल हा इन्शुरन्स उतरवलेल्या खर्चाचा भाग आहे जो इन्शुरन्स कंपनीने उर्वरित रक्कम देण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून भरावा लागतो. कार इन्शुरन्समध्ये, वजावट सामान्यतः प्रति दावा आधारावर लागू केल्या जातात. त्यामुळे, जर तुम्ही ₹ १५,००० किमतीच्या नुकसानीसाठी क्लेम दाखल केला आणि वजावट ₹ १००० असेल तर - विमा कंपनी तुमच्या कारच्या दुरुस्तीसाठी ₹१४,००० पैसे देईल.

वजावटीचे दोन प्रकार आहेत - डिडक्टिबल्स आणि व्हॉलंटरी.

तुम्ही तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत असताना तुम्ही किती पैसे द्यायला तयार आहात हे तुम्हाला ठरवावे लागेल आणि हे नंतर प्रत्येक क्लेमवर लागू केले जाईल.तुमची इन्शुरन्स कंपनी केवळ क्लेमच्या रकमेचा काही भाग भरेल जो एकूण ऐच्छिक आणि अनिवार्य वजावटीपेक्षा जास्त असेल.

अनिवार्य वजावट (कम्पल्सरी डिडक्टिबल) - या प्रकारच्या वजावटीत, पॉलिसीधारकाला मोटर इन्शुरन्स क्लेमचा काही भाग भरण्याशिवाय पर्याय नसतो.

आयआरडीएआय नियमांनुसार, कार इन्शुरन्समध्ये या अनिवार्य वजावटीचे निश्चित मूल्य कार इंजिनच्या क्यूबिक क्षमतेवर आधारित आहे. सध्या, ते खालीलप्रमाणे सेट केले आहे.

  • १५०० सीसी पर्यंत - रु. १०००
  • १५०० सीसी पेक्षा जास्त - रु.२०००

ऐच्छिक वजावट (व्हॉलंटरी डिडक्टिबल) - ऐच्छिक वजावट ही एक रक्कम आहे जी सामान्यतः इन्शुरन्स कंपनीद्वारे भरली जाऊ शकते, परंतु तुम्ही ती तुमच्या खिशातून भरण्याची निवड केली आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या विमा संरक्षणामध्ये ही ऐच्छिक वजावटीचा पर्याय निवडता, तेव्हा ते तुमच्या कारचा इन्शुरन्स प्रीमियम कमी करते कारण विमाकर्त्याच्या बाजूने धोका कमी होतो.

परंतु, याचा अर्थ असा आहे की तुमच्या कारचे कोणतेही नुकसान झाल्यास तुम्हाला स्वतःला जास्त पैसे द्यावे लागतील (ज्याचा तुमच्या इतर खर्चावर परिणाम होऊ शकतो) त्यामुळे याचा विचार करण्याचे लक्षात ठेवा.

कॅशलेस क्लेम रिएम्बर्समेंटपेक्षा चांगला आहे का?

आता तुम्हाला कॅशलेस क्लेम म्हणजे काय हे माहीत आहे, तुम्ही कदाचित विचार करत असाल की यापेक्षा चांगले काय आहे - रिएम्बर्समेंट क्लेम किंवा कॅशलेस क्लेम ?बरं, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला रिएम्बर्समेंट क्लेम काय आहे हे माहित असणे महत्त्वाचे आहे.नावाप्रमाणेच,रिएम्बर्समेंट क्लेम म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः दुरुस्तीच्या खर्चासाठी पैसे भरता आणि नंतर तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून खर्च केलेले पैसे परत मिळवण्यासाठी सहाय्यक कागदपत्रांसह बिल वापरता.

दोघांमधील मुख्य फरक असा आहे की, या रिएम्बर्समेंटच्या बाबतीत - तुम्हाला प्रथम तुमच्या स्वतःच्या खिशातून संपूर्ण रक्कम काढावी लागेल आणि नंतर सबमिट केलेली बिले आणि देयके पडताळण्याच्या जोडलेल्या टप्प्यातून जावे लागेल.तर कॅशलेस क्लेममध्ये, तुम्हाला फक्त क्लेमची काही रक्कम स्वतः भरावी लागेल (वजावट आणि घसारा असेल तर) आणि विमा कंपनी सर्व आवश्यक पेमेंट थेट करेल.

कॅशलेस कार इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे काय आहेत?

  • कोणतीही औपचारिकता नाही  - कॅशलेस पॉलिसीमध्ये जवळपास कोणतीही औपचारिकता नाही आणि कागदपत्रांची कटकट नसते. क्लेमची प्रक्रियादेखील अगदी सोपी आहे, कारण रोख रक्कमेची देवाणघेवाण होत नाही (तुमच्या घसारा आणि वजावटीच्या शिवाय)
  • जलद दावे  - कॅशलेस क्लेमसह कार इन्शुरन्स असल्‍याचा अर्थ असा आहे की तुमच्‍या क्लेमवर अधिक जलद प्रक्रिया केली जाईल. तुम्हाला फक्त तुमच्या पॉलिसीचे तपशील द्यावे लागतील आणि नंतर लगेच तुमची कार दुरुस्त करा.
  • कोणताही त्रास नाही  - कॅशलेस कार इन्शुरन्समध्ये, जवळजवळ सर्व व्यवहार सेवा प्रदाता आणि  इन्शुरन्स कंपनी यांच्यात होतात. त्यामुळे तुम्हाला खरोखर जास्त त्रास देण्याची गरज नाही, सर्वकाही काळजी घेतली जाईल.
  • वापरण्यास सोपा  - डिजिटसह, तुमचा कॅशलेस कार इन्शुरन्स तुम्हाला डोअरस्टेप पिकअप, रिपेअर आणि ड्रॉपचे फायदे देखील देईल, दुरुस्तीसाठी ६ महिन्यांच्या वॉरंटीसह!
  • रोख रकमेची गरज नाही - अपघातात तुमच्या कारचे नुकसान होत असल्यास, दुरुस्तीसाठी थोडा खर्च होऊ शकतो. कॅशलेस गॅरेजेससह, तुम्हाला या दुरुस्तीसाठी तुमच्या आपत्कालीन बचतीला हात लावावा लागणार नाही. फक्त जवळच्या नेटवर्क गॅरेजकडे जा आणि तुम्ही तुमची कार जास्त त्रास न घेता दुरुस्त करू शकता!
  • सर्वोत्तम सेवा  - इन्शुरन्स कंपन्या आता सहसा काही सर्वोत्तम सेवा केंद्रांना त्यांच्या टाय-अपची यादी यासाठी देतात जेणेकरून तुम्हाला खात्री असेल की नेटवर्क गॅरेजेसची यादी तुम्हाला अडचणीच्या वेळी चांगली सेवा देईल.
  • संपूर्ण पारदर्शकता – कॅशलेस कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये देण्यात आलेले क्लेम्स आणि मागितलेले क्लेम्स यांच्या बाबतीत संपूर्ण पारदर्शकता असते. कारण सर्व काही डिजिटल पद्धतीने केले जाते त्यामुळे फसवणूक होणार नाही याची खात्री बाळगा.