कार इन्शुरन्सचे ऑनलाइन रिन्यूअल

तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी २ मिनिटांत रिन्यू करा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

ऑनलाइन कार इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करण्याबद्दलची सगळी माहिती

दरवर्षी तुमचा कार इन्शुरन्स रिन्यू करायची वेळ येते तेव्हा तोच इन्शुरन्स परत घ्यावा की नवा घ्यावा याविषयी तुम्ही संभ्रमात असता. हे ठरवणं खरंच कठीण आहे, पण ही निवड प्रक्रिया आम्ही तुमच्यासाठी अगदी सोपी करुन टाकतो.

चला तर आधी कार इन्शुरन्स रिन्यूअल म्हणजे काय ते समजून घेऊ.

कार इन्शुरन्स रिन्यूअल म्हणजे काय?

कार इन्शुरन्स रिन्यूअल म्हणजे ज्या कालावधीत इन्शुरन्स कंपनीचा रेट न बदलता तुमची इन्शुरन्स पॉलिसी चालू किंवा अंमलात असते तो काळ. पण एकदा का पॉलिसीचा पहिला कालावधी संपला की तुम्ही काही बदल केला नाही तर तुमचा इन्शुरन्स रेट प्रत्येक पॉलिसी रिन्यूअलच्या वेळी समानच राहिला पाहिजे. आता इथेच तुम्हाला विचार करायला थोडासा वाव आहे. काही वेळा जेव्हा तुम्हाला माहिती असतं की रिन्यूअलच्या वेळी इन्शुरन्स कंपनी तुमच्या पॉलिसीच्या रेटमध्ये तडजोड करणार नाहीये तेव्हा तुम्ही नवे पर्याय शोधणं चालू करू शकता.

तुम्हाला कोणते पर्याय उपलब्ध असतात – त्याच इन्शुरन्स कंपनीकडे जाणं किंवा दुसऱ्या कंपनीकडे जाणं?

तुम्ही या दोन्हीतलं तुम्हाला हवं ते करू शकता. तुमच्या सध्याच्या इन्शुअररची क्लेम प्रक्रिया, पारदर्शकता, ग्राहक सेवा या बाबतीत तुमचा अनुभव समाधानकारक असेल तर तीच पॉलिसी चालू ठेवा, नाहीतर बदला. यातलं काय करायचं हे पूर्णपणे तुमचा पूर्वानुभव आणि तुमची इन्शुरन्सची गरज काय आहे त्यावर अवलंबून आहे.

कार इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करण्याआधी हे लक्षात घ्या

कार इन्शुरन्स रिन्यू करताना अनेक गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांचा नीट विचार केलात तर दरवर्षीच्या रिन्यूअलनंतर तुम्हाला योग्य तेवढे कव्हर मिळेल. त्यातल्या काही गोष्टी इथे खाली दिल्या आहेत:

  • पॉलिसीचा प्रकार – पॉलिसीचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या. योग्य तो निर्णय घेण्यासाठी आपल्यासमोर कोणते पर्याय आहेत ते आपल्याला माहिती असणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे फक्त थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स असेल तर रिन्यूअलच्या वेळी तुमच्या बदलत्या इन्शुरन्सच्या गरजांप्रमाणे तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅन घेऊ शकता.
  • तुमच्या इन्शुरन्स कंपनीचा आढावा घ्या – तुमच्या इन्शुअररबद्दल अधिक माहिती मिळवा. पुढे काही पश्चात्ताप होऊ नये यासाठी आत्ताच सर्व काही नीट तपासून घ्या.
  • ॲड-ऑन्स – तुमच्या पॉलिसीबरोबर योग्य ते ॲड ऑन्स निवडलेत तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ -  झिरो डिप्रिसिएशन कव्हर, एनसीबी (NCB) कव्हर, इन्व्हॉईस प्रोटेक्शन कव्हर आणि इंजिन प्रोटेक्ट कव्हर. कार इन्शुरन्स  ॲड-ऑन्सबद्दल नीट माहिती करून घ्या आणि योग्य निवड करा.  
  • क्लेम प्रक्रिया – हे फारच महत्त्वाचं आहे. ही प्रक्रिया खूप जलद आणि कोणत्याही कटकटीशिवाय व्हायला हवी. इन्शुरन्स कंपनीच्या क्लेम हिस्ट्री बद्दल शक्य असेल तितकी सर्व प्रकारची चौकशी करा.
  • ऑनलाइन रेट्सची तुलना करा  - ऑनलाइन  रेट्सची तुलना करा. तुम्ही तुमची पॉलिसी ऑनलाइन रिन्यूदेखील करू शकता. त्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन पॉलिसी घेण्याच्या/ रिन्यू करण्याचा फायदा असा की त्यात कागदपत्रांची कोणतीही देवाणघेवाण करावी लागत नाही. ऑनलाइन तुमचे तपशील भरा  की काम झालं.
  • राइट आयडीव्ही – पॉलिसी निवडण्यासाठी किंवा रिन्यू करण्यासाठी  राइट आयडीव्ही  चा विचार करणे महत्त्वाचे आहे. आयडीव्ही जितकी जास्त तितकीच भविष्यातल्या एखाद्या दुर्घटनेच्या वेळी तुम्हाला मिळणारी भरपाईदेखील जास्त.
  • तुमचा कार इन्शुरन्स लॅप्स होणार नाही याची दक्षता घ्या – गलेलठ्ठ दंड भरणं टाळण्यासाठी  नेहमी तुमचा कार इन्शुरन्स वेळेपूर्वीच रिन्यू करा. शिवाय इन्शुरन्स नसताना तुमची कार बाहेर काढणे ही फारच जोखमीची गोष्ट आहे. हे टाळण्यासाठी वेळेआधीच तुमची पॉलिसी रिन्यू करून घ्या.
  • नो क्लेम बोनस – जर तुम्ही वर्षभरात एकदाही क्लेम केला नसेल तर तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून नो क्लेम बोनस डिस्काउंट मिळतो. तुम्ही द्यायच्या प्रीमियमच्या एकूण रकमेतून ही डिस्काउंटची रक्कम वजा केली जाते. विशेष गोष्ट ही आहे की जर तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलायचे ठरवले तर ही रक्कम नव्या इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर केली जाते.
  • गॅरेजेसचे नेटवर्क – इन्शुरन्स कंपनीचे  गॅरेज नेटवर्क कसे आहे ते नीट तपासा. कारण कधी कोणत्याही वेळी रस्त्यावर असताना काही अनपेक्षित घडले तर तुम्हाला संरक्षणाची गरज भासेल..
  • ग्राहकांना सपोर्ट – 24×7 ग्राहकांसाठी सपोर्ट उपलब्ध असणे फार महत्त्वाचे आहे, इन्शुरन्स कंपनीकडे तो उपलब्ध आहे का याची खात्री करा.

ऑनलाइन कार इन्शुरन्स रिन्यू करण्याची मुख्य कारणे

  • कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत – ऑनलाइन प्रक्रिया खूपच सोपी आहे. तुमचे मुख्य तपशील भरा की काम झालं. त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही.  
  • सोपे आणि जलद – इंटरनेट खरोखर एक वरदानच आहे! नुसत्या काही क्लिक्सने तुम्ही आरामात तुमची पॉलिसी रिन्यू करू शकता.
  • आरामात बसून रेट्स आणि ॲड- ऑन कव्हर्सची तुलना करा – ऑनलाइन तुलना करणं अगदी सोपं आणि बिनत्रासाचं आहे. घरबसल्या अनेक इन्शुरन्स  कंपन्यांचे रेट्स आणि ॲड-ऑन्स यांची तुलना तुम्ही तुमच्या सोयीने रिकाम्या वेळी करू शकता आणि मग निर्णय घेऊ शकता.
  • वेळेची बचत – तुम्ही तुमची पॉलिसी तुमच्या सोयीने, घरबसल्या, तुम्हाला हव्या त्या वेळी ऑनलाइन रिन्यू करू शकता. त्यासाठी खूप कमी वेळ लागतो हे तर उघडच आहे.

कार इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन कशी रिन्यू करावी?

४ साध्यासोप्या (स्टेप्स)टप्प्यांमध्ये कार इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करा

पहिला टप्पा – तुमच्या वाहनाची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, रजिस्ट्रेशनची तारीख आणि तुम्ही कोणत्या शहरात गाडी चालवता हे तपशील भरा. ‘गेट कोट’ वर क्लिक करा आणि तुम्हाला हवा तो प्लॅन निवडा.

दुसरा टप्पा – थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली किंवा स्टँडर्ड पॅकेज (कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स) यातून निवड करा.

तिसरा टप्पा – आम्हाला तुमची आधीची इन्शुरन्स पॉलिसी संपण्याची तारीख, मागच्या वर्षी केलेले क्लेम, मिळालेला नो क्लेम बोनस इत्यादी माहिती द्या.

चौथी पायरी – तुम्हाला तुमच्या प्रीमियमच्या रकमेची माहिती मिळेल. जर तुम्ही स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल तर अतिरिक्त ॲड-ऑन्स आणि आयडीव्ही निवडून आणि तुमची कार सीएनजी असल्यास ते नमूद करून तुम्ही तुमची पॉलिसी अधिक कस्टमाइझ करू शकता. पुढच्या पानावर तुम्हाला तुमचा फायनल प्रीमियम दिसेल.

ऑनलाइन कार इन्शुरन्स रिन्यूअलसाठी काय माहिती लागते ?

  • पूर्ण नाव
  • पत्ता
  • कारची उत्पादक कंपनी  आणि मॉडेल यांचा तपशील
  • कारचा रजिस्ट्रेशन क्रमांक
  • आधीचा पॉलिसी क्रमांक
  • घ्यायचे असतील ते ॲड-ऑन्स
  • रकमेचे तपशील

तुम्ही डिजिटचा कार इन्शुरन्स का घ्यावा?