पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स

पॅसेंजर कॅरींग व्हेईकल्ससाठी कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स ही एक प्रकारची कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी आहे, जी प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक वाहनांच्या संरक्षणासाठी डिझाइन केला  गेली आहे.

पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स इतर अनपेक्षित घटनांसह अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यास उद्भवू शकणाऱ्या नुकसान आणि हानीपासून वाहनाचे संरक्षण करते.

पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसीच्या सर्वात सामान्य प्रकारांमध्ये बस इन्शुरन्स, व्हॅन इन्शुरन्स, टॅक्सी/कॅब इन्शुरन्स  आणि ऑटो रिक्षा इन्शुरन्स, इत्यादीचा समावेश आहे.

कव्हर्ड केलेले पॅसेंजर कॅरींग व्हेईकल्सचे विविध प्रकार:

  • बसेस: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासी नेण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या स्कूल बस, खासगी टूर बस आणि इतर बसेस पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी मध्ये कव्हर्ड आहेत.
  • ऑटो रिक्षा : व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या, लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ऑटो रिक्षा या पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड केल्या जाऊ शकतात.
  • टॅक्सी, कॅब आणि कमर्शिअल कार्स: तुमच्या दैनंदिन उबर, ओला आणि व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या इतर खासगी कारसारख्या कॅब आणि व्यावसायिक कार पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सच्या खाली कव्हर केल्या जाऊ शकतात.
  • व्हॅन्स: व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्कूल व्हॅन आणि खासगी टूरसाठीच्या मिनीबससारख्या व्हॅनही या पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड आहेत.

मी पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स का विकत घ्यावा ?

  • अनपेक्षित हानीपासून संरक्षण: नैसर्गिक आपत्ती, अपघात, टक्कर किंवा आगीमुळे झालेले नुकसान असो; पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स या अनिश्चित नुकसानाची भरपाई करण्यास मदत करतो आणि त्याद्वारे तुमच्या व्यवसायाला त्यापासून जबाबदार राहण्यापासून वाचवतो.
  • कायद्याचे पालन केले जाते:  मोटार व्हेईकल कायद्यानुसार ,व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसह सर्व वाहनांना कोणत्याही थर्ड-पार्टीला होणारे नुकसान आणि हानी; जसे की व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनापासून संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी किमान मूलभूत, थर्ड-पार्टी मोटार इन्शुरन्ससह इन्शुरन्स काढणे अनिवार्य आहे.
  • मालक-चालकासाठी कव्हर: पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सद्वारे तुमच्या व्यावसायिक वाहनाला इन्शुरन्स कव्हर केल्याने केवळ वाहनाचे संरक्षण करत नाही तर मालक-चालकासाठी कव्हरदेखील मिळते.
  • प्रवासी संरक्षण: प्रवासी वाहन खरेदी करताना, कोणीही त्यांच्या प्रवाशांसाठी कव्हर करण्याचा पर्याय निवडू शकतो; अशा प्रकारे, एक विश्वासार्ह व्यवसाय म्हणून यात केवळ स्वतःचीच नव्हे तर त्यात गुंतलेल्या सर्व भागधारकांचीही काळजी घेतली जाते.

डिजिटचाच पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स का निवडावा ?

पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?

काय कव्हर केले जात नाही?

तुमच्या प्रवासी वाहतूक वाहन विम्यामध्ये (पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स) कशाचा समावेश नसतो हे माहिती असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे कधी तुम्हाला क्लेम करण्याची वेळ आलीच तर तुमच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी यायला नको. अशा काही परिस्थिती इथे दिल्या आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

तुम्ही फक्त थर्ड पार्टी पॅसेंजर व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर तुमच्या  स्वतःच्या नुकसानाचा त्यात अंतर्भाव होत नाही.

दारूच्या नशेमध्ये किंवा वैध परवान्याशिवाय चालवणे

 क्लेम करतेवेळी कधीही मालक-चालक वैध ड्रायव्हिंग परवान्याशिवाय किंवा दारूच्या नशेत असल्याचे आढळले तर क्लेम मंजूर होणार नाही.

निष्काळजीपणा दाखवणे

वाहनाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवल्याने झालेले कोणतेही नुकसान कव्हर केले जाणार नाही. उदाहरणार्थ गावात पूर आलेला असताना वाहन न चालवण्याचा सल्ला झुगारून एखाद्याने वाहन चालवले तर.

परिणामी नुकसान

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यांमुळे न झालेले नुकसान भरून दिले जात नाही.

डिजिटच्या पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सची ठळक वैशिष्ट्ये

ठळक वैशिष्ट्य डिजिटचा फायदा
क्लेम प्रक्रिया पेपरलेस क्लेम
ग्राहक सपोर्ट 24x7 सपोर्ट
अतिरिक्त कव्हरेज पीए (PA) कव्हर, लिगल लायबलिटी कव्हर, विशेष एक्सक्ल्यूजन्स आणि कम्पल्सरी डीडक्टीबल्स इत्यादी
Damages to Third-Party Unlimited Liability for Personal Damages, Up to 7.5 Lakhs for Property/Vehicle Damages
थर्ड पार्टीचे नुकसान वैयक्तिक नुकसानासाठी अमर्यादित तर मालमत्ता/वाहनाच्या नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत जबाबदारी

पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सचे प्रकार

तुमच्या पॅसेंजर कॅरींग व्हेईकलच्या प्रकारावर, म्हणजे बस, रिक्षा, व्हॅन इत्यादीवर अवलंबून तुम्ही आमच्या दोन प्राथमिक प्लॅन्समधून निवड करु शकता.

लायॅबिलिटी ओन्ली र्ड पॅकेज

तुमच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे थर्ड पार्टीतील व्यक्ती किंवा मालमत्तेला झालेले नुकसान.

×

च्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे थर्ड पार्टीच्या वाहनाला झालेले नुकसान.

×

मच्या स्वत:च्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचे नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघात यामुळे झालेले नुकसान किंवा हानी

×

वासी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाला दुखापत/मृत्यू

-चालकाचे तत्पूर्वीचे वैयक्तिक अपघाताचे कव्हर नसल्यास

×
Get Quote Get Quote

क्लेम कसा दाखल कराल ?

आम्हाला 1800-258-5956  वर फोन करा किंवा hello@godigit.com ईमेल करा

तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताची जागा, अपघाताची तारीख आणि वेळ, विमा संरक्षित व्यक्ती/फोन करणारी व्यक्ती यांचा संपर्क क्रमांक इत्यादी तपशील तयार ठेवा. म्हणजे आमची प्रक्रिया सोपी होईल.

डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात? तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू इच्छित असाल तर सर्वप्रथम हा प्रश्न तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही ते करत आहात ही चांगली गोष्ट आहे! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

भारतात ऑनलाइन पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॅकेज पॉलिसीमध्ये काय फरक आहे?

थर्ड-पार्टी पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स केवळ तुमच्या वाहनाद्वारे थर्ड-पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनाला होणाऱ्या नुकसान आणि हानीपासून तुमचे संरक्षण करते.

दुसरीकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॅकेज पॉलिसी तुमच्या स्वत:च्या वाहनाचे आणि मालक-चालकाचे नुकसान आणि हानी कव्हर करते.

पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आयडीव्ही (IDV) काय आहे?

आयडीव्ही म्हणजे इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू; हे दुसरे तिसरे काही नसून तुमच्या पॅसेंजर कॅरिंग व्हेईकलचे बाजारमूल्य आहे. हे शेवटी तुमचा व्यावसायिक व्हेईकल इन्शुरन्स प्रीमियम ठरविण्यात आणि क्लेम दरम्यान पैसे मिळण्यास मदत करते.

पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स हे केवळ प्रवाश्यांसाठीच कव्हर देतो की व्हेईकलसाठी पण कव्हर मिळते ?

होय, जर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॅकेज पॉलिसी खरेदी केली, तर तुम्ही तुमच्या प्रवाश्यांच्या संरक्षणासाठी पॅसेंजर कव्हरदेखील निवडू शकता.

पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्याचे काय फायदे आहेत?

ऑनलाइन पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत; जसे की, यामुळे तुमचा वेळ वाचतो (तुम्हाला एजंटकडे जाण्याची गरज नाही), कोणतेही पेपरवर्क नाही आणि पॉलिसी व क्लेम करण्याची प्रक्रिया सोपी आणि कमी वेळखाऊ आहे!