बाइक इन्शुरन्स नूतनीकरण ऑनलाइन

बाइक इन्शुरन्स नूतनीकरण ऑनलाइन करण्यासंदर्भात सविस्तर माहिती

Third-party premium has changed from 1st June. Renew now

दुचाकी इन्शुरन्स नूतनीकरण ऑनलाइन करण्याबाबत सर्व तपशील

वाहतुकीच्या अनेक पद्धती आहेत, परंतु तरीही दुचाकी म्हणजेच बाइक हा सर्वात सोयीचा पर्याय मानला जातो, विशेषतः रहदारीमध्ये कारच्या तुलनेत बाइक्स आकाराने कमी असल्याने सोयीच्या पडतात. मात्र बाइक चालवण्याआधी, प्रत्येक दुचाकीस्वाराला वाहतुकीच्या सर्व नियमांची जाणीव असणे आवश्यक आहे. वेग मर्यादा तपासणे, हेल्मेट घालणे या सामान्य नियमांसह प्रत्येकाने वाहनासाठी आवश्यक टू व्हीलर इन्शुरन्स सुद्धा काढणे तितकेच गरजेचे आहे.

आपण आपला बाइक इन्शुरन्स नवीन खरेदी करा किंवा जुन्याचे लवकरच नूतनीकरण करून घ्या पण थर्ड पार्टीचा दुचाकीचा इन्शुरन्स असणे कायद्याने अनिवार्य आहे.

बाइक इन्शुरन्स नूतनीकरण ऑनलाइन करणे फायद्याचे का आहे?

बाइक इन्शुरन्स पॉलिसी नुकसान, चोरी, दंगली, संप, दहशतवाद आणि इतर नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देते. तुमच्या बाइकचे इन्शुरन्स कव्हर पॉलिसीच्या समाप्तीच्या तारखेच्या पुढे चालू ठेवणे म्हणजे बाइक इन्शुरन्स नूतनीकरण करणे.

बाइक इन्शुरन्स नूतनीकरण करताना आपण सामान्य अटी आणि शर्तींवर आधारित किंवा काही अ‍ॅड-ऑन्ससह पॉलिसीसह अधिक व्याप्ती असणारा प्लॅन निवडू शकता.

मुख्य म्हणजे कोणत्याही ब्रेकशिवाय बाइकसाठी पॉलिसीचे नूतनीकरण केल्याने पॉलिसीधारकाला काही बोनसही मिळतो. मात्र यासाठी आपण मागील इन्शुरन्सच्या लागू कालावधीत कोणतेही क्लेम्स नोंदवलेले नसावेत.

बाइक इन्शुरन्स नूतनीकरणासाठी उपलब्ध पर्याय

बाइक इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता:

 

# पूर्व इन्शुरन्स कंपनीसोबत रहा: तुम्ही तुमच्या बाइकच्या सध्याच्या पॉलिसीवर खूश असाल, तर तुम्ही त्याच इन्शुरन्स कंपनीची निवड करावी. लक्षात ठेवा, नो-क्लेम बोनस गमावू नये म्हणून नूतनीकरण वेळेत करणे नेहमी फायद्याचे आहे.

त्यामुळे चालू पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करत प्रीमियम भरण्याचा सल्ला दिला जातो.

# इन्शुरन्स कंपनी बदला: खराब सेवांमुळे तुम्ही सध्याच्या इन्शुरन्स कंपनीवर नाखूष असल्यास, तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू शकता. बाइकचा इन्शुरन्स काढण्यापूर्वी नवीन इन्शुरन्स कंपनी तुमच्या बाइकची तपासणी करू शकते.

ही सर्व माहिती ऑनलाइन देऊन आपण पॉलिसी सुरु करण्यासाठी प्रीमियम भरायचा आहे. पूर्वीच्या पॉलिसीची वैधता संपण्यापूर्वीच आपणही संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.

बाइक इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करण्यापूर्वी हा विचार नक्की करा

कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण  दोनदा विचार करायला हवा. आणि बाइक इन्शुरन्स ही तर एक प्रकारची गुंतवणूक आहे.

पॉलिसीचे नूतनीकरण करण्यापूर्वी खालील काही मुद्द्यांवर एकदा नक्की नजर टाका:

# लागू पॉलिसी अंतर्गत कव्हरची व्याप्ती: आपण सध्या वापरत असलेला इन्शुरन्स कव्हर तुम्हाला शक्य तितके व्यापक कव्हर प्रदान करते का याचा विचार करा आणि तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

# कोणती इन्शुरन्स कंपनी सर्वोत्कृष्ट आहे:  जर का आपण आपली इन्शुरन्स कंपनी बदलू इच्छित असाल तर आधीच्या पॉलिसीची वैधता संपण्याआधी  बाजारात  कोणत्या इन्शुरन्स कंपनी आहेत याचा थोडा अभ्यास करा. हे करताना खरेदी व क्लेमच्या वेळी दोन्ही सेवांच्या गुणवत्ता तपासून घ्या. लक्षात ठेवा ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या  इन्शुरन्सची वैधता संपण्याआधी पार पाडणे आवश्यक आहे.

# कोणते इन्शुरन्स कव्हर सर्वोत्कृष्ट आहे: सर्वसमावेशक किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी या दोन प्रकारच्या मोटर पॉलिसींपैकी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कोणता तुमचा उद्देश पूर्ण करेल. त्यानंतर, प्रीमियम दर, वजावट आणि इतर समान घटकांची तुलना करा. तसेच, कोणती इन्शुरन्स कंपनी किफायतशीरपणे अ‍ॅड-ऑन कव्हरेज ऑफर करते ते पहा.

# अ‍ॅड-ऑन कव्हरची आवश्यकता: तुम्हाला काही अ‍ॅड-ऑन कव्हरसह आपल्या पॉलिसीची व्याप्ती वाढवायची असल्यास वैयक्तिक अपघात कव्हर, इंजिन कव्ह, इंधन गॅस किट आणि इतर घटक समाविष्ट करण्याचा विचार करू शकता.

नवीन इन्शुरन्स कंपनी निवडायची असल्यास काय तपासून पहाल?

सध्या बाजारात अनेक इन्शुरन्स कंपन्या आहेत परंतु फक्त निवडकच कंपनी या आपल्याला आवश्यक सर्व गरजा पूर्ण करू शकतील, त्यामुळे तुमची गरज व कंपनीची कार्यपद्धती खालील घटकांनुसार तपासून पहा: 

# तुमची सोय जाणून घ्या: इन्शुरन्स कंपनी बदलण्याचा निर्णय घेणे सोपे आहे परंतु यात योग्य प्लॅन निवड न केल्यास कमी फायद्यात आपला जास्त खर्च  होऊ शकतो, त्यामुळे प्लॅन्स नीट तपासून घ्या.

# क्लेमचे रिव्ह्यूज वाचा: सर्व इन्शुरन्स कंपन्यांच्या फीडबॅकबद्दल जाणून घ्या. आपल्याला इन्शुरन्स कंपनीबद्दल विश्लेषणात्मक माहिती देण्यासाठी समर्पित अशा कंपनीसुद्धा आहेत त्यांच्याकडूनही आपण सविस्तर माहिती घेऊ शकता. 

# इन्शुरन्स कंपनीची आर्थिक ताकद तपासा: तुम्ही इन्शुरन्स कंपनीची आर्थिक ताकद तपासताना त्यांच्या वेबसाइट आणि ऑनलाईन रिव्ह्यूज विचारात घ्या.

# प्रोडक्ट्स तुलना करा: इन्शुरन्स कंपन्यांचे फायदे व परताव्याचे टक्के तपासा आणि त्यांची तुलना करा. जर ते तुम्हाला संतुष्ट करत असेल तरच तुम्ही आपली सध्याची कंपनी बदलण्याचा विचार करा.

बाइक इन्शुरन्स नूतनीकरण ऑनलाइन करण्याची मुख्य कारणे

इतर उद्योगांप्रमाणे, सध्या इन्शुरन्स खरेदी सुद्धा ऑनलाइन करणे हा पर्याय अधिक  सोयीचा मानला जातो.  याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे:

# वेळ वाचवा: इन्शुरन्स कंपन्यांची वैशिष्ट्य व  मिळणारे फायदे ऑनलाइन शोधून त्यांची तुलना करणे सहज होते. हे फार सोयीचे असून खूप वेळ वाचतो.

# प्रीमियम कमी आहेत: ऑनलाइन इन्शुरन्स पॉलिसी निवडणे कमी खर्चाचे असते. मुळात मध्यस्थांचे खर्च वाचत असल्याने प्रीमियमच्या किमतीत बरीच सूट मिळते.

# जलद आणि सोपे: ऑनलाइन पॉलिसी खरेदी करणे जलद आणि सोपे आहे. हे तुम्हाला काही वेळातच धोरणांमधील तुलना देते.

# रिव्ह्यूज: तुम्हाला इन्शुरन्स कंपनी किंवा त्यांच्या प्रोडक्ट्सबद्दल झटपट माहिती आणि रिव्ह्यूज मिळतात. ते पाहून समान पॉलिसी वापरणाऱ्या युजर्सचे अनुभव आणि सल्लेदेखील जाणून घेऊ शकता.

# त्रास-मुक्त सेवा: ऑनलाइन मोडअंतर्गत कुठलेही एजंट किंवा मध्यस्थ नसल्याने आपण इन्शुरन्स कंपन्यांशी थेट संपर्कात  राहू शकता. ऑनलाइन पॉलिसी खरेदी करताना आपल्याला शून्य त्रास आणि पूर्ण पारदर्शकता मिळते.

बाइक इन्शुरन्सचे ऑनलाइन नूतनीकरण कसे करावे?

स्टेप 1 - बाइक इन्शुरन्स पेजवर जा, तुमच्या वाहनाचा मेक, मॉडेल, व्हेरिएंट, नोंदणी तारीख भरा. 'गेट कोट' दाबा आणि तुमच्या पसंतीची योजना निवडा.

स्टेप 2 - थर्ड-पार्टी बाइक इन्शुरन्स किंवा सर्वसमावेशक बाइक इन्शुरन्स यापैकी निवड करा.

स्टेप 3 - तुमच्या मागील इन्शुरन्स पॉलिसीबद्दल तपशील द्या- वैधता संपल्याची तारीख, गेल्या वर्षी केलेला क्लेम , नो क्लेम बोनसची माहिती.

स्टेप 4 - तुम्हाला तुमच्या प्रीमियमसाठी रक्कम सांगितली जाईल. जर तुम्ही स्टॅंडर्ड योजना निवडली असेल तर तुम्ही अ‍ॅड-ऑन निवडून, IDV सेट करून ते पुढे कस्टमाइझ करू शकता. तुम्हाला पुढील पेजवर अंतिम प्रीमियम दिसेल.

बाइक इन्शुरन्स नूतनीकरणासाठी डिजिट प्लॅटफॉर्म का निवडावा?