स्कोडा कोडियाक इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

स्कोडा कोडियाक इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्या किंवा रिन्यू करा

चेक ऑटोमेकर स्कोडा ऑटो यांनी 2016 मध्ये एक सेवन सीटर मध्यम आकाराची क्रॉसओव्हर एसयूव्ही बनवली जिचे नाव आहे स्कोडा कोडियाक. भारतामध्ये जानेवारी 2022 मध्ये हिचे फेसलिफ्ट व्हर्जन पहिल्यांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. ही कार तीन ट्रीम ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे.

जर तुमचा ही गाडी घेण्याचा विचार असेल तर, तर त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व रिस्क्स आणि डॅमेजेस देखील माहित असायला हवेत. असंख्य सेफ्टी फीचर्स असून सुद्धा, काही अनपेक्षित प्रसंगांमुळे तुमच्या गाडीचे नुकसान होऊ शकते आणि तुम्हाला त्याची भलीमोठी किंमत मोजावी लागू शकते. हेच लक्षात घेऊ, तुम्हाला स्कोडा कोडियाक इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची गरज भासू शकते.

भारतामाध्यी अनेक इन्शुरर्स आहेत जे असंख्य आकर्षक फीचर्स सह इन्शुरन्स प्लॅन्स ऑफर करतात. तशीच एक इन्शुरन्स कंपनी आहे डिजिट. चला तर डिजिटकडून इन्शुरन्स घेताना मिळणारे काही फायदे जाणून घेऊ.

स्कोडा कोडियाक कार इन्शुरन्स मध्ये काय काय कव्हर होते

तुम्ही डिजिटचेच स्कोडा कोडियाक इन्शुरन्स का घ्यावे?

स्कोडा कोडियाक साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वतःच्या कारचे नुकसान/हानी

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे नुकसान/हानी

×

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे नुकसान/हानी

×

थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघात कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तीचे जखमी होणे/मृत्यू

×

तुमच्या कारची चोरी

×

तुमचा IDV कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ्ड अ‍ॅड -ऑन्ससह अतिरिक्त

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

कार इन्शुरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम किती वेगाने निकाली काढले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे ! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा.

डिजीटचेच स्कोडा कोडियाक कार इन्शुरन्स निवडण्याची कोणकोणती कारणे आहेत?

1. वेगवेगळे इन्शुरन्स प्लॅन्स

  • थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी

धडक बसल्यास किंवा अपघात झाल्यास थर्ड पार्टीचे काही नुकसान झाल्यास इन्शुरन्स प्लॅन कव्हरेज ऑफर करतो. स्कोडा कोडियाकसाठीच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत, थर्ड पार्टी एक्सिडेंट्समुळे किंवा कायदेशीर कार्यवाहीमुळे उद्भवलेली लायबिलिटी कव्हर केली जाते. तसेच, मोटर वेहिकल एक्ट 1988 अंतर्गत भरघोस ट्रॅफिक फाईन्स टाळण्यासाठी कोणतीही पॉलिसी असणे बंधनकारक आहे.

  • कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी

थर्ड पार्टी इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत स्वतःच्या कारचे अपघात, चोरी, आग, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे झालेले नुकसान कव्हर केले जात नाही. तरी, डिजीटच्या परिपूर्ण अशा कॉम्प्रीहेन्सिव्ह कोडियाक इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत स्वतःच्या कारचे झालेले नुकसान रिपेअर करण्यासाठी आलेला खर्च कव्हर केला जातो.

2. कॅशलेस गॅरेजेसचे विस्तृत नेटवर्क

भारतभर अनेक डिजीट नेटवर्क गॅरेजेस आहेत जिथून तुम्ही तुमच्या स्कोडा कारसाठी प्रोफेशनल रिपेअर सर्व्हिसेस घेऊ शकता. त्यातील कोणत्याही गॅरेजमध्ये तुम्ही कॅशलेस सुविधेचा पर्याय देखील निवडू शकता.

3. कॅशलेस क्लेम्स

डिजीटच्या स्कोडा कोडियाकच्या कार इन्शुरन्स साठीचे क्लेम फाईल करताना, तुम्ही रिपेअर्सचा कॅशलेस मोड निवडू शकता. या मोड अंतर्गत, तुम्हाला डिजीट-ऑथोराईज्ड रिपेअर सेंटर मध्ये तुमच्या स्कोडा कोडियाकच्या नुकसानाचे रिपेअरिंग करण्यासाठी कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत.

4. अनेक एड-ऑन पॉलिसीज

एक कॉम्प्रीहेन्सिव्ह स्कोडा कोडियाक इन्शुरन्स पॉलिसी मध्ये कदाचित ओव्हरऑल कव्हरेज नाही मिळू शकत. तरी, अतिरिक्त खर्चांसाठी डिजीट तुम्हाला काही ठराविक एड-ऑन कव्हर्स ऑफर देतात. खाली काही एड-ऑन पॉलिसी दिलेल्या आहेत ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता:

  • इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन

  • झिरो डेप्रीसिएशन कव्हर

  • कन्ज्यूमेबल कव्हर

  • रोडसाईड असिस्टंस

  • रिटर्न टू इन्व्हॉइस 

त्यामुळे, तुम्ही तुमची स्कोडा कोडियाक इन्शुरन्सची रक्कम किंचित वाढवून अतिरिक्त कव्हरेजसाठी वरील कोणत्याही पॉलिसीजची निवड करू शकता.

5. सोपी ऑनलाइन पद्धत

डिजीटच्या स्मार्टफोनसाठी पूरक असलेल्या प्रक्रियेमुळे तुम्ही स्कोडा कोडियाक इन्शुरन्स ऑनलाइन हा पर्याय देखील निवडू शकता. तसेच, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे तुम्हाला कोणतेही कागदपत्र हार्ड कॉपी स्वरूपात जमा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सहज सर्व कागदपत्र ऑनलाइन अपलोड करून तुमचा मौल्यवान वेळ वाचवू शकता.

6. क्लेमची सोपी प्रक्रिया

डिजीटच्या स्मार्टफोनसाठी पूरक असलेल्या प्रक्रियेतील सेल्फ-इन्स्पेक्शन फीचरमुळे याची क्लेम प्रक्रिया देखील अतिशय सुटसुटीत आणि पटकन पूर्ण होणारी आहे. या फिचर मुळे तुम्ही अगदी सहज तुमच्या स्मार्टफोनद्वारे क्लेम्स रेज करू शकता आणि अगदी कमी वेळात स्कोडा कारचे झालेले नुकसान रिपेअर करून घेऊ शकता. तसेच, तुमची तुमच्या आवडीचा रिपेअर मोड निवडू शकता आणि क्लेमची रक्कम अगदी चुटकीसरशी मिळवू शकता.

7. आयडीव्ही कस्टमायझेशन

तुमची स्कोडा कोडियाक इन्शुरन्सची रक्कम कारच्या इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) वरती अवलंबून असते. इन्शुरर ही व्हॅल्यू मॅन्यूफॅक्चरर्सच्या सेलिंग प्राईज मधून कारचे डेप्रीसिएशन वजा करून मिळवतात. यासाठी डिजीट तुम्हाला आयडीव्ही कस्टमाइज करून तुमचे फायदे वाढवण्याची सोय देखील देते.

8. 24x7 कस्टमर सर्व्हिस

जर तुम्हाला तुमच्या स्कोडा कोडियाक इन्शुरन्सच्या किमतीबद्दल काही शंका असतील, तर तुम्ही डिजीटच्या रिस्पॉन्सिव्ह कस्टमर सर्व्हिसला संपर्क करू शकता आणि त्यावरचा उपाय अगदी त्वरित मिळवू शकता. ते तुमच्या सेवेसाठी 24x7 उपलब्ध असतील आणि स्कोडा कोडियाक इन्शुरन्स पॉलिसी रिन्युअल संबंधी असलेल्या अडचणी दूर करतील.

तसेच, तुम्ही तुमच्या पॉलिसी टर्म दरम्यान कमीतकमी क्लेम रेज करून स्कोडा कोडियाक इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम वरती सर्वाधिक डिस्काउन्ट्स आणि बोनसेस देखील मिळवू शकता. त्यामुळे, डिजीट कडून इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यामुळे, तुम्ही तुमची आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटी कमी करू शकता. 

स्कोडा कोडियाकसाठी कर इन्शुरन्स घेणे का महत्त्वाचे आहे?

जेव्हां तुमच्याकडे इतकी महाग आणि मौल्यवान कार असते तेव्हा कार इन्शुरन्स घेणे नेहमीच श्रेयस्कर ठरेल. चला तर बघूया की कशा प्रकारे स्कोडा कोडियाक कार इन्शुरन्स तुमच्या कष्टाची कमाई वाचवू शकतो.

थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर होते: कायद्याप्रमाणे स्कोडा कोडियाक इन्शुरन्सचा हा सर्वात बेसिक प्लॅन आहे. यामुळे दुसऱ्या कोणाला झालेली इजा आणि त्यांच्या प्रॉपर्टीला झालेले नुकसान कव्हर होते आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रकार थर्ड पार्टीच्या मागणीनुसार कारच्या रिप्लेसमेंट किंवा रिपेअर्सचा खर्च देखील कव्हर करतो.

कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी: कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी थर्ड पार्टी आणि तुमच्या स्वतःच्या कारचे दोन्हींचे नुकसान कव्हर करते. एवढी मोठी कार शहरात चालवणे जोखमीचे असू शकते, कधीही कारलाचरे पडू शकतात किंवा पोचे येऊ शकतात. ही पॉलिसी अपघात, दंगल किंवा नैसर्गिक आपत्ति यामुळे झालेल्या कोणत्याही अनपेक्षित नुकसानापासून तुमच्या कारचे रक्षण करेल. 

कायदेशीर कम्प्लेंट: तुमच्याकडे स्कोडा कोडियाक कार इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. इन्शुरन्स नसताना कार चालवणे बेकायदेशीर आहे. साध्य, इन्शुरन्स नसताना कार चालवल्या बद्दल Rs. 2000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो आणि तुमचा लायसन्स देखिल रद्द केला जाऊ शकतो.

एड-ऑन्स सह मिळवा अतिरिक्त संरक्षण: तुम्ही गिअरबॉक्स प्रोटेक्शन, ब्रेक-डाऊन असिस्टंस, रिटर्न टू इन्व्हॉइस या वेगवेगळ्या एड-ऑन्सपैकी एक निवडून तुमच्या मौल्यवान कारचे कव्हरेज वाढवून घेऊ शकता.

स्कोडा कोडियाक बद्दल आणखीन जाणून घ्यायचे आहे?

“कोडियाक”!!! तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहिती आहे? तर, बीस्ट सारख्या एसयूव्ही ला एक साजेसे नाव देण्यासाठी चेक 

मॅन्यूफॅक्चरने क्षितिजापालीकडच्या म्हणजेच अलास्कामधील एका बेटाचा “कोडियाक”चा विचार केला. आणि हे बेट कोडियाक अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे, जे जगातील सर्वात मोठे अस्वल समजले जाते. स्कोडा फॅक्ट्रीतील इंजिनिअर्सने या मॉडेलचे बिग बेअर असेच नाव ठेवले होते कारण हे त्याच्या बरोबरच्या सर्व मॉडेल्स पेक्षा सर्वात मोठे मॉडेल आहे. आणि या कारची काही वैशिष्ट्ये देखील एका अस्वलासारखीच आहेत, जसे की संरक्षणात्मक स्वभाव, कुटुंबाची मजबूत जाणीव आणि सर्वोत्तम आउटडोअर एक्सपर्टीज. त्यामुळेच या मॉडेलचे हे नाव पडले.

ही कार 34-36.79 च्या रेंज मध्ये स्काउट, स्टाईल, लॉरीन क्लेमेंट या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक ट्रिमला 1968सीसीचे डीझेल इंजिन आहे. पेट्रोल व्हर्जन साधारणपणे 2020 मध्ये लॉंच होण्याची शक्यात आहे.

तुम्ही स्कोडा कोडियाक का विकत घ्यावी?

स्टाईल: कारच्या समोरच्या बाजूला टिपिकल स्कोडाची बटरफ्लाय ग्रील आहे जी आतापर्यंतची सर्वात ठळक स्वरूपात आहे. यामुळेच कार आकर्षक दिसते का? होय, ते शार्प कट्स, क्रीज आणि शॅडोलाईन्सच कारला आकर्षक बनवतात. आणि एलईडी हेडलँपच्या आयलॅशेस विशेष आकर्षण आहेत. निश्चितच! ही एक हँडसम कार आहे.

युनिक इंटिरियर: 8 इंचाचा टचस्क्रीन जो सॅटेलाईट मॅप सपोर्ट असलेल्या एन्ड्रॉइड ऑटो आणि एपल कार प्ले सह उपाल्ब्ध आहे. बेज कलरची ट्रिममुळे इंटिरियरला प्रशस्त आणि स्पष्ट लूक आला आहे. 10 एम्बीएंट लाईट सिस्टम ज्यामुळे तुमचा मूड कायमच आनंदी राहील. 12 स्पीकर असलेल्या कॅन्टन ऑडियो सिस्टममुळे भारदस्त वाटते. पुढे बसणाऱ्या प्रवाशांना मोटराईज्ड मेमरी सीट्स दिल्या आहेत. 

आरामदायक राईड: एवढी मोठी कार हाताळणे स्कोडा एखाद्या ड्राईव्हर साठी अगदी सोपे करते. सगळीकडे पार्किंग सेन्सर्स आहेत, आणि एक रिअरव्ह्यू कॅमेरा देखील आहे. हँड्सफ्री पार्किंग असिस्ट आणि ड्राउजिनेस सेन्सर एका ड्राईव्हरसाठी सोयीचे ठरतात. मोठी असली तरी कोडियाक ड्राईव्हरच्या सीट वर बसून चालवताना अवाढव्य नाही वाटत. 

सुरक्षा: ही कार बाहेरून टणक आणि आतून देखील तितकीच सुरक्षित आहे. सेफ्टी फीचर्स म्हणून या कारमध्ये 9 एअरबॅग्स, ईबीडी सह एबीएस. ईएससी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कन्ट्रोल), टीएससी (ट्रॅक्शन कन्ट्रोल सिस्टम), एमकेबी (मल्टी कोलूजन ब्रेकिंग ज्यामुळे कारला धडक बसल्यावर कोणतेही नुकसान न होऊ देता कारला स्टॅबिलाईज करण्यास मदत करते.)

क्लेव्हर टचेस: सेंटर कन्सोलमध्ये असलेल्या आर्मरस्टच्या खाली दिलेले रीमूव्हेबल कप स्टोरेज जें फिरवले की तुमच्या मोबाईलसाठी जागा तयार होते, दारामध्ये एक कचरापेटी, हेडरेस्टच्या बाजूने असलेले फोल्ड्स जे तुमच्या डोक्याला आणि मानेला आधार देतात आणि ज्यामुळे छोटीशी विश्रांती घेताना तुमची मान स्थिर राहील, मॅग्नेटिकली चिकटणारा टॉर्च जो काढून कुठेही ठेवता येईल आणि जो तुम्हाला कोणत्याही विपरीत काळात जसे अंधारात हायवे वर टायर पंक्चर झाल्यावर वगरे मदतगार ठरेल. होय, हे सर्व फीचर्स आहेत जें तुम्हाला इतर कोणत्याही कारमध्ये नाही मिळणार.

स्कोडा कोडियाक व्हेरिअंट्सची प्राईज लिस्ट

स्कोडा कोडियाक व्हेरिअंट किंमत (अंदाजे)

कोडियाक स्टाईल 2.0 टीडीआय 4x4 एटी

₹39.22 लाख
कोडियाक स्काउट ₹40.35 लाख
कोडियाक एलएंडके 2.0 टीडीआय 4x4 एटी ₹43.62 लाख

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स घेतल्यावर टायरला झालेले नुकसान देखील कव्हर होते का?

साधारणपणे, स्टँडर्ड इन्शुरन्स प्लॅन्स कारच्या टायरला झालेल्या नुकसानाचे कव्हरेज देत नाहीत. तरी, तुम्ही तुमच्या बेस प्लॅन मध्ये जास्तीचे चार्जेस भरून एड-ऑन कव्हर घेऊन तुमच्या कारच्या टायरसाठी प्रोटेक्शन घेऊ शकता.

मला माझ्या कोडियाक इन्शुरन्स प्लॅन मध्ये पर्सनल एक्सिडेंट कव्हरेज मिळते का?

होय, आयआरडीएच्या नियमांप्रमाणे पर्सनल एक्सिडेंट कव्हर बंधनकारक आहे. या कव्हर अंतर्गत, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अपघातामध्ये जर कोणत्याही सदस्याला अपंगत्व आले किंवा जीवितहानी झाली तर भरपाई मिळू शकते.