टू-व्हीलर इन्शुरन्ससंदर्भात ॲड-ऑन कव्हर्स

ॲड-ऑन्ससहित बाईक इन्शुरन्सची किंमत माहिती करून घ्या

Third-party premium has changed from 1st June. Renew now

टू-व्हीलर इन्शुरन्ससंदर्भात ॲड-ऑन कव्हर म्हणजे काय?

आपल्या लाडक्या टू-व्हिलरसाठी आपल्यापैकी बहुतेकजण कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स घेऊन खूश होतात. कारण आपल्याला वाटतं की आपल्या सुरक्षेच्या सगळ्या गरजा त्यानं पूर्ण होतात. पण खरंच तसं आहे का?    

चला, उदाहरणासह समजून घेऊया. तुम्ही तुमचा आवडत्या पिझ्झा ऑर्डर केला. तो चवीला चांगलाच असतो. पण त्यावर तुमच्या आवडीची काही जास्तीची टॉपिंग्ज असली तर तो जास्त चविष्ट लागेल ना? थोडे जास्त ऑलिव्ह्ज किंवा खारवलेल्या मिरच्या, टॅबॅस्को सॉसचे काही थेंब. सुटलं ना तोंडाला पाणी ?😊

तुमच्या टू-व्हीलर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सचंही तसंच आहे. इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला ॲड-ऑन्सची एक श्रेणी देतात. त्यातून निवडून तुम्ही तुमचे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हर जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह करू शकता!  

इथे आम्ही माहिती देत आहोत 5 आघाडीच्या ॲड-ऑन कव्हर्सची जी तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसोबत तुम्ही नक्की घ्यावीत असं आम्ही सुचवू. मात्र हेही जरूर लक्षात घ्या की या सर्व ॲड-ऑन्ससाठी तुमच्या मूळ इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमपेक्षा अगदी मोजकाच जास्त प्रीमियम भरावा लागतो. आणि त्यामुळे तुमच्या खिशाला काही मोठा भार होणार नसला तरीही तुम्ही दिलेल्या प्रत्येक पैशाचा तुम्हाला  उत्तम मोबदला मिळणार आहे हेही लक्षात ठेवा.     

हे बघा: ॲड-ऑन्ससहित इन्शुरन्स प्रीमियम मोजण्यासाठी टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅलक्युलेटर वापरा.

डिजिटद्वारे दिले जाणारे टू-व्हीलर इन्शुरन्स ॲड-ऑन्स

झिरो डिप्रिसिएशन कव्हर

बहुतांश वेळा अपघात झाल्यास डिप्रिसिएशन आणि नवीन स्पेअर पार्ट्सची किंमत बाईकच्या मालकाला सोसावी लागते. पण ही रक्कम इन्शुरन्स कंपनीने भरावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी झिरो डिप्रिसिएशन ॲड-ऑन घेणे आवश्यक आहे. तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स प्लॅनबरोबरच तुम्हाला या कव्हरचे अतिरिक्त लाभ मिळतील.

रोडसाइड असिस्टन्स

तुमची टू-व्हिलर रस्त्यावर चालवत असताना तुम्हाला मदतीची आवश्यकता लागली तर त्यासाठी तुम्हाला हवा रोडसाइड असिस्टन्स. त्याच्या मदतीने तुम्ही असाल त्या जागी तुमची बाईक दुरुस्त करून घेण्यापासून ते तुमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी टॅक्सी आणि टोइंग असे लाभ तुम्हाला मिळू शकतात. शहराच्या मध्यापासून 500 किमीच्या त्रिज्येत असलेल्या प्रत्येकाला आम्ही रोडसाइड असिस्टन्स देतो.

कंझ्यूमेबल कव्हर

क्लेम करताना सहसा ऑइल, नट्स, बोल्ट्स इत्यादी कंझ्यूमेबल्सचा इन्शुरन्समध्ये समावेश नसतो. हे खर्च कितीही लहान असोत, या ॲड-ऑनद्वारे ते कव्हर केले जातात! अपघाताने झालेल्या नुकसानामुळे वापरण्यायोग्य न राहिलेल्या कंझ्यूमेबल्सचा खर्चही या ॲड-ऑनद्वारे कव्हर केला जातो.

इंजिन सुरक्षा कव्हर

कोणत्याही स्टँडर्ड टू-व्हीलर पॉलिसीमध्ये फक्त अपघात झाल्यास होणारे नुकसानच कव्हर केले जाते. पण बरेच वेळा अपघात झाल्यानंतर काही काळाने अपघाताच्या परिणामामुळे इंजिनचे नुकसान होऊ शकते. या ॲड-ऑनमुळे तुम्हाला अशा प्रकारे झालेल्या नुकसानासाठी सुरक्षा मिळते. उदाहरणार्थ, ल्युब्रिकेटिंग ऑइलच्या गळतीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीदरम्यान इंजिनमध्ये पाणी जाऊन त्यामुळे होणारे नुकसान

रिटर्न टू इनव्हॉईस कव्हर

कोणत्याही वाहनचालकासाठी सर्वात भयंकर दुःस्वप्न म्हणजे त्याची बाईक पार दुरुस्तीपलीकडे खराब होणे. एखाद्या दुर्घटनेत तिचा अगदी बट्टयाबोळ होणे! सुदैवाने अशा वाईट वेळीही तुम्हाला दिलासा मिळू शकतो. इन्शुरन्स कंपन्या इनव्हॉईसमध्ये उल्लेखलेली पूर्ण किंमत अदा करतात.

टायर संरक्षणाचे कव्हर

आपल्या टू-व्हीलरचे टायर खराब झाल्यास हे अॅड-ऑन कव्हर आपल्याला मदत करते. हे कव्हर खराब झालेल्या टायरच्या जागी नवीन समतुल्य टायर बसवण्यासाठी केलेल्या खर्चाची भरपाई करेल तसेच व्हील बॅलन्सिंगसाठी शुल्क आणि टायर बदलण्यासाठी कामगार खर्चाची भरपाई करेल.

डेली कन्व्हेयन्स बेनिफिट

या अॅड-ऑन कव्हरनुसार, डिजिट पॉलिसीधारकाला निश्चित भत्ता देईल किंवा दुरुस्ती केल्यावर वाहन उपलब्ध नसल्यामुळे ज्ञात टॅक्सी ऑपरेटर्सकडून कूपन देईल. इन्शुरन्स पॉलिसीच्या 'ओन डॅमेज' अंतर्गत टू-व्हीलर वाहनाच्या अपघाती नुकसानीचा क्लेम मान्य केला तरच हे लागू होते.

शेवटी निष्कर्ष असा की ॲड-ऑन कव्हर्स घेऊन तुम्ही तुमच्या बाईकवर निर्धास्त मनाने स्वार व्हा. कारण तुम्ही सुरक्षित आहात असे नाही तर तुमच्याकडे कवच-कुंडले आहेत 😊!