निसान कार इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

निसान कार इन्शुरन्स प्लॅन्स खरेदी किंवा रिनिव करा

निसान मोटर कॉर्पोरेशन ही डिसेंबर 1993 मध्ये स्थापन झालेली जपानी बहुराष्ट्रीय ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी आहे. 2013 मध्ये जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी वाहन निर्माता होण्याबरोबरच, एप्रिल 2018 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) सर्वात मोठी उत्पादक बनली. कंपनीने जगभरात 3,20,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.

निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादक कंपनीची भारतीय उपकंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. हॅचबॅक, एमयूव्ही, एसयूव्ही आणि सेडानच्या मालिकेमुळे भारतीय खरेदीदारांमध्ये ही पटकन आवडती कार उत्पादक कंपनी बनली.

शिवाय या कंपनीकडे निसान आणि डॅटसन या दोन ब्रँडचा पोर्टफोलिओ आहे. निसान किक्स, निसान मॅग्नाइट, डॅटसन गो, डॅटसन गो+ आणि डॅटसन रेडी-गो या मॉडेल्सचा समावेश आहे.

निसानच्या ताज्या अहवालानुसार, एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये संपूर्ण भारतात कंपनीने सुमारे 27,000 युनिट्सची विक्री केली. जर आपण निसान कारचे मालक असाल किंवा आगामी वर्षात ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला अपघातादरम्यान होणाऱ्या जोखीम आणि डॅमेजची जाणीव असणे आवश्यक आहे. असे डॅमेज दुरुस्त केल्यास आपल्यावर खूप जास्त खर्चाचा बोजा पडू शकतो.

तथापि, आपण नामांकित इन्शुरर कडून निसान कार इन्शुरन्स प्लॅन निवडू शकता आणि अशा कॉस्ट्ससाठी कव्हरेज मिळवू शकता. भारतातील इन्शुरन्स कंपन्या आपल्या निसान कारसाठी थर्ड पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी देतात.

मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार, थर्ड पार्टी लायबिलिटीसह ट्रॅफिक दंड टाळण्यासाठी निसान कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे मॅनडेटरी आहे. तथापि, स्वत: ची कार आणि थर्ड-पार्टी डॅमेज दोन्ही कव्हर करणारी एक सर्वार्थाने योग्य, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन निवडणे व्यावहारिक आहे.

या संदर्भात, आपण निसान कार इन्शुरन्स ऑनलाइन मिळविण्यासाठी डिजिटसारख्या इन्शुरर्सची निवड करू शकता. हा इन्शुरन्स प्रदाता सुलभ क्लेम्स प्रोसेस, नेटवर्क गॅरेजची रेंज, कॅशलेस दुरुस्ती आणि बरेच काही यासारखे अनेक फायदे मिळवून देतो. याव्यतिरिक्त, हे परवडणारी निसान कार इन्शुरन्स प्राइज ऑफर करते जे आर्थिक लायबिलिटी कमी करण्यास मदत करते.

अशाप्रकारे, निसानसाठी कार इन्शुरन्स मिळविण्यापूर्वी, आपण डिजिटचा विचार करू शकता आणि आपले फायदे वाढवू शकता.

निसान कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

काय कवर्ड नाही

आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कवर्ड नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम करताना आश्चर्य वाटणार नाही. अशाच काही परिस्थिती येथे आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसीहोल्डरसाठी स्वत: चे झालेले डॅमेज

थर्ड पार्टी किंवा लायबिलिटी ओनली कार पॉलिसीच्या बाबतीत, स्वत: च्या वाहनाचे डॅमेज कव्हर केले जाणार नाही.

मद्यप्राशन करून किंवा विना लायसन्स ड्रायव्हिंग

आपण मद्यप्राशन करून किंवा वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवत असाल तर.

वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय ड्रायव्हिंग करणे

आपल्याकडे लर्नर लायसन्स आहे आणि समोरच्या पॅसेंजर सीटवर वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय ड्राइव्ह करत आहात.

कॉन्सीक्वेनशियल डॅमेज

कोणतेही डॅमेज जे अपघाताचा थेट परिणाम नसते (उदा. अपघातानंतर, खराब झालेली कार चुकीच्या पद्धतीने चालविली गेली आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले जाणार नाही)

कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणा

कोणत्याही कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणाचा (उदा. पुरात कार चालवल्यामुळे होणारे डॅमेज, ज्याची निर्मात्याच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार शिफारस केली जात नाही) कव्हर केले जाणार नाही)

अॅड-ऑन विकत घेतले नाहीत

काही परिस्थिती अॅड-ऑनमध्ये कव्हर केल्या जातात. आपण ते अॅड-ऑन खरेदी केले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.

आपण डिजिटचा निसान कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

निसानसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

मी क्लेम कसा फाईल करू शकतो?

एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलात की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये मध्येपूर्ण होणारी पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

निसान बद्दल अधिक जाणून घ्या

निसान ही जपानमधील जगातील अव्वल ऑटोमेकर कंपनी आहे. सातत्याने नावीन्य, अत्याधुनिक डिझाईन आणि नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजीने या ब्रँडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात निसानने 2005 मध्ये निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत आपले कामकाज सुरू केले. या ब्रँडने आम्हाला मध्यम आकाराच्या लक्झरी कार निसान टियाना ते निसान 370झेड सारख्या आकर्षक स्पोर्ट्स कार दिल्या आहेत. याशिवाय निसान इंडियाने निसान सनी, निसान मायक्रा आणि निसान इवालिया सारख्या परवडणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत.

यातील एक उत्पादन युनिट चेन्नईमध्ये आहे, तर इतर ओरागादममध्ये चेन्नईच्या बाहेरील भागात आहेत. या इंडो-जपानी कंपनीने छोट्या पण आकर्षक हॅचबॅक निसान मायक्रापासून रूमी सेडान सनीपर्यंत मॉडेल्स सादर केल्या आहेत. 5.25 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या निसानकडून आपल्याला परवडणाऱ्या पण आरामदायक कार मिळू शकतात. निसानची सर्वात जास्त प्राइज असलेली जीटीआर कार 2.12 कोटी रुपयांची आहे.

या सर्व मॉडेल्सपैकी निसान मायक्राला 2010 मध्ये 'कार इंडिया स्मॉल कार ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला होता. तर निसान टेरानो ला कामगिरी, स्टाईल आणि आराम मध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. ही भारतातील सर्वात आकर्षक एसयूव्ही आहे.

मिड रेंज सेगमेंटमध्ये निसानच्या सर्व कार परवडणाऱ्या आहेत. पेट्रोल किंवा डिझेल व्हेरियंट आपण निवडू शकता. सेवेचा खर्चही बजेट मध्ये बसतो. तथापि, कार इन्शुरन्स असण्याचे स्वतःचे काही फायदे आहेत. कार इन्शुरन्स हा एक मॅनडेटरी दस्तऐवज आहे जो आपण सोबत ठेवला पाहिजे. तसे न केल्यास आपल्याला मोठा दंड भरावा लागू शकतो.

निसान कार खरेदी करण्याची कारणे?

निसान कार खरेदी करण्याची ही कारणे आहेत

  • परवडणारी: निसान कार अगदी परवडणारी आहे. आपल्याला एक बजेट-फ्रेंडली लक्झरी कार मिळते जी दिसायला आकर्षक देखील आहे.
  • सुरक्षा वैशिष्ट्ये: इंडो-जपानी कार निर्माता कंपनी सुरक्षेला प्राधान्य देते. डिझायनर आणि उत्पादकांच्या टीमने ट्रॅक्शन कंट्रोल, स्टेबिलिटी कंट्रोल, फ्रंट-साइड एअरबॅग आणि अगदी रिअर व्ह्यू कॅमेरे अशी सुरक्षा उपकरणे बसविली आहेत.
  • कमी मेंटेनेंस लागतो: निसानच्या गाड्या टिकाऊ असतात आणि त्यांना कमी मेंटेनेंसची आवश्यकता असते. आणि जर अशी केस उद्भवली तर आपण त्यांच्या सेवा स्टेशन्सच्या विस्तृत रेंजबद्दल समाधानी असाल.
  • इंधन-कार्यक्षम कार्स: निसान कार्स इंधन-कार्यक्षम आहेत. लांबचा प्रवास तुम्ही सहज करू शकाल.
  • टेक्नॉलॉजिकल अपग्रेड्स: निसान नेहमीच त्यांच्या टेक्नॉलॉजी अपग्रेड करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. सध्याची मॉडेल्स निसान इंटेलिजंट मोबिलिटीने सुसज्ज आहेत.

निसान कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

निसान कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्वाचे आहे कारण ते करेल:

  • स्वत: ला कायदेशीररित्या अनुपालीत करतो: कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला कायदेशीररित्या अनुपालीत करेल. मोटर व्हेइकल अॅक्टनुसार वाहन चालवताना हे एक मॅनडेटरी दस्तऐवज आहे. तसे न केल्यास रु.2000/- दंड भरावा लागेल. इतकंच नाही तर तुम्हाला 3 महिन्यांचा तुरुंगवास ही भोगावा लागू शकतो आणि तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतो.
  • स्वत:ला झालेल्या डॅमेजमुळे होणाऱ्या एक्सपेनसेसपासून आपल्याला वाचवते: अपघात, आग, चोरी किंवा पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपली निसान खराब झाली तर दुरुस्तीचा खर्च परवडणारा होऊ शकतो. असे नुकसान कार इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जाते. आपल्याला एकतर कॅशलेस सुविधा किंवा रीएमबर्समेंट पद्धती प्रमाणे पे केले जाते.
  • थर्ड-पार्टी कायदेशीर लायबिलिटीसाठी आपल्याला मदत करते: जेव्हा आपण थर्ड पार्टीला इजा करता किंवा त्यांच्या मालमत्तेचे डॅमेज करता तेव्हा आपण नुकसानीची भरपाई करण्यास जबाबदार आहात. आपली कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्यावतीने पे करेल.
  • अॅड-ऑन कव्हरसह इन्शुरन्सची व्याप्ती वाढवा: आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात वगळता इतर नुकसान कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स अंतर्गत देय नाही. परंतु कधीकधी टायर फुटणे, इंजिन सीझ होणे यासारख्या अपघातांमुळे आपल्या निसानचे डॅमेज होऊ शकते. यामुळे होणारे नुकसान कव्हर केले जात नाही आणि म्हणूनच आपल्याला अॅड-ऑन कव्हरची आवश्यकता असेल. आपण या अॅड-ऑन कव्हरसाठी अतिरिक्त प्रीमियम भरून कव्हरची व्याप्ती वाढवू शकता.

निसान कार इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक

प्रीमियम वेगवेगळ्या कारणांमुळे भिन्न असेल.

  • कारचा आयडीव्ही(IDV): आपल्या कारची इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) प्रीमियमवर परिणाम करेल. उच्च आयडीव्ही साठी, प्रीमियम जास्त असेल आणि कमी आयडीव्ही साठी, प्रीमियम कमी असेल.
  • अॅड-ऑन कव्हर्स: आपण खरेदी केलेले कोणतेही अॅड-ऑन कव्हर अतिरिक्त प्रीमियम पेमेंटसह येते. प्रत्येक अॅड-ऑन कव्हरचा वेगळा रेट असतो. अॅड-ऑनच्या संख्येसह प्रीमियम वाढेल.
  • नो क्लेम बोनस (एनसीबी): जर आपण संपूर्ण वर्षभर एकही क्लेम फाइल केला नाही तर पुढील रिनिवलच्या वेळी आपल्याला एनसीबी मिळेल. प्रत्येक वर्षासाठी ज्यासाठी आपण क्लेम फाइल केला नाही, त्याप्रमाणे बोनसची टक्केवारी देखील वाढेल.
  • भौगोलिक स्थान: महानगरांमध्ये कार इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त असतो. कारण असंख्य वाहने आणि जास्त ट्रॅफिकमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
  • अतिरिक्त सीएनजी(CNG) किट: जर आपण आपल्या कारमध्ये सीएनजी किट बसविण्याचा पर्याय निवडत असाल तर प्रीमियमवर परिणाम होईल, कारण सीएनजी किटला देखील अतिरिक्त संरक्षणाची आवश्यकता आहे. कारमध्ये सीएनजी किट जोडल्यास इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये थोडी अधिक अमाऊंट जोडली जाईल.
  • कारचे वय: कारच्या वयाचा परिणाम कार इन्शुरन्स प्रीमियमवर होतो. नवीन कारसाठी प्रीमियम जास्त असेल पण इन्शुरन्स कंपनी आपल्याला डिस्काऊंट देऊ शकते. आयडीव्ही व्हॅल्यू कमी असल्याने आणि अनेक अॅड-ऑन खरेदी करण्यास अपात्र असल्याने खूप जुन्या गाड्यांसाठी आकारण्यात येणारा प्रीमियम तुलनेने कमी असेल.
  • इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार: कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसीअंतर्गत प्रीमियम जास्त असतो. हे ओन डॅमेज आणि थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरच्या घटकामुळे आहे. परंतु स्टँडअलोन थर्ड पार्टीमध्ये प्रीमियम कमी आणि निश्चित असतो.
  • इंजिन क्षमता: कार इन्शुरन्स प्रीमियम काही प्रमाणात कारच्या इंजिन क्षमतेवर अवलंबून असतो. प्रीमियमचा थर्ड पार्टी घटक इंजिनच्या घनक्षमतेवर अवलंबून असतो. इंजिन सीसी जास्त, प्रीमियम जास्त असेल.
  • व्हॉलंटरी डीडक्टीबल: जेव्हा आपण क्लेमच्या अमाऊंटमध्ये वर्गणी देण्याचा निर्णय घेता, तेव्हा त्याला व्हॉलंटरी डीडक्टीबल निवडणे म्हणतात. जास्त व्हॉलंटरी डीडक्टीबल म्हणजे कमी प्रीमियम.

निसान कार इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

निर्विवादपणे उच्च-गुणवत्तेची सेवा: डिजिट इन्शुरन्सने आपल्यासाठी सर्व काही सुलभ केले आहे - पॉलिसी खरेदी करण्यापासून ते क्लेम करण्यापर्यंत, सर्व काही ऑनलाइन आहे. अपघातातून किंवा दुरुस्तीची गरज भागवण्यासाठी त्यांनी दुरुस्ती गॅरेजचे विस्तृत जाळे तयार केले आहे.

  • इन्शुरन्स पॉलिसीची निवड: डिजिट मध्ये दोन प्रकारच्या पॉलिसी दिल्या जातात. एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी जी आपल्याला आपल्या वाहनाच्या डॅमेजची भरपाई देते आणि थर्ड -पार्टी कायदेशीर लायबिलिटीची जबाबदारी घेते. दुसरा पर्याय म्हणजे स्टँडअलोन थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स. हे थर्ड पार्टीच्या झालेल्या शारीरिक हानी किंवा मालमत्तेच्या डॅमेजमुळे आपल्याला होणाऱ्या नुकसानीची भरपाई करेल.
  • कस्टमायझेबल आयडीव्ही(IDV): डिजिट इन्शुरन्स आपल्याला आपल्या कारसाठी आयडीव्ही निवडण्याची परवनगी देते. उच्च आयडीव्ही ची निवड केल्यास अधिक प्रीमियम लागू होईल आणि व्यापक संरक्षण मिळेल.
  • अॅड-ऑनसह वाढीव कव्हर मिळवून देते: डिजिट इन्शुरन्स झिरो डेप्रिसिएशन, रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर, कंझ्युमेबल कव्हर, ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हर, पॅसेंजर कव्हर, टायर प्रोटेक्ट कव्हर आणि इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर सारखे अॅड-ऑन कव्हर प्रदान करते. निसानसाठी, जेव्हा आपले इंजिन अपघातामध्ये किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत निकामी होते तेव्हा एक्सपेन्स टाळण्यासाठी आपण इंजिन आणि गिअरबॉक्स संरक्षण खरेदी करू शकता. क्लेम करताना सुट्या भागांना लागू होणारी डिडक्शन टाळण्यासाठी आपण झिरो डेप्रिसिएशन कव्हर देखील निवडू शकता.
  • उच्च क्लेम सेटलमेंट रेशिओ: क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत डिजिट इन्शुरन्सची सेवा उत्कृष्ट आहे. क्लेम सेटलमेंट रेशिओ जास्त आहे. क्लेम्सवर त्वरीत प्रक्रिया केली जाते जे स्मार्टफोन-सक्षम सेल्फ -इन्सपेक्शनवर आधारित आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

कॉम्प्रिहेन्सिव्ह निसान कार इन्शुरन्स पॉलिसी आगीमुळे झालेल्या डॅमेजपासून कव्हरेज प्रदान करेल का?

होय, जर आपल्या निसान कारला आग किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्तीमुळे डॅमेज झाले असेल तर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत दुरुस्तीची कॉस्ट्स कव्हर करू शकता.

मला माझ्या स्टँडर्ड निसान कार इन्शुरन्स अंतर्गत इंजिन दुरुस्ती कॉस्ट्ससाठी कव्हरेज मिळू शकते का?

नाही, स्टँडर्ड इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इंजिन दुरुस्ती कॉस्टचा समावेश नसतो. तथापि, अतिरिक्त शुल्क देऊन इंजिन संरक्षणासाठी आपल्याला अॅड-ऑन कव्हर मिळू शकते.

मी माझ्या विद्यमान थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स अंतर्गत माझ्या निसान कारचा आयडीव्ही (IDV ) कस्टमाइज करू शकेन का?

थर्ड पार्टी निसान कार इन्शुरन्सच्या पॉलिसीहोल्डर्सना केवळ थर्ड पार्टी डॅमेजसाठी कव्हरेजचे फायदे मिळू शकतात. या प्लॅन अंतर्गत त्यांना आयडीव्ही कस्टमायझेशन पर्यायाचा फायदा घेता येणार नाही.