स्कोडा कुशाक लक्झरी, फंक्शनळ फीचर्स आणि स्लीक डिझाईन या सगळ्याचे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. एसयूव्ही हा एक ग्लोबल स्टँडर्डचा ब्रँड आहे कायमच रॉयल डिझाईन्स सादर करतो. सध्या कुशाक 3 ट्रिम्स मध्ये उपलब्ध आहे - एक्टीव्ह, एम्बीशन आणि स्टाईल.
कुशाक 2 प्रकारच्या इंजिनसह उपलब्ध आहे - 1.0 लिटर टीएसआय आणि 1.5 लिटर टीएसआय. बेस मॉडेल एक्टीव्ह 1.0 लिटर टीएसआय मॅन्युअल कॉन्फीगरेशन सह उपलब्ध आहे. त्याचबरोबर अतिशय ऐसपैस असे स्टाईल मॉडेल 1.5 लिटर टीएसआय इंजिनमध्ये दोन्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक कॉन्फीगरेशन सह उपलब्ध आहे.
स्कोडाच्या सुविधा अतुल्य आहेत. ही कार वायरलेस फ्रंट चार्जिंग, स्कोडा प्ले एप सह 10 इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टम आणि बऱ्याच इतर सुविधांनी सुसज्ज आहे.
कुशाक मध्ये उत्तम प्रतीच्या मटेरीअल पासून बनवलेले प्लश अपहोलस्टेरी आणि लक्झूरियस फॅसिलिटी सह सुसज्ज असे स्पॅशियल कॅबिन देखील आहे. तसेच यामध्ये सर्वात आधुनिक असे व्हीलबेस सेग्मेंट्स देखील आहेत ज्यामुळे ही अधिक ऐसपैस बनते.
स्कोडा कुशाक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कन्ट्रोल (ईएससी), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), एन्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), मल्टी कोलीजन ब्रेकिंग, व्हीडीएस आणि एक्सडीएस+ (30 किमी प्रति तास), ब्रेक डिस्क वायपिंग (बीएसडब्ल्यू) आणि इतर अनेक उच्चतम अशा फीचर्समुळे सुरक्षेच्या दृष्टीने अगदी परिपूर्ण ठरते.
तरी अशी टणक आणि कणखर बॉडी असताना देखील कुशाकचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, कोणत्याही आर्थिक नुकसान, मग ते तुमच्या स्वतःच्या कारचे असो किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी असो, यापासून सुरक्षा मिळण्यासाठी स्कोडा कार इन्शुरन्स अगदी स्मार्ट पर्याय आहे.