फोर्ड अस्पायर इन्शुरन्स

फोर्ड ॲस्पायर कार इन्शुरन्सची किंमत त्वरित तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स प्राइज आणि त्वरित ऑनलाइन रिनिव करा

2018 मध्ये फोर्ड इंडियाने आपली चार मीटरपेक्षा कमी सेडान अस्पायर 2 पॉवरट्रेन आणि 5 रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच केली होती. त्यानंतर फोर्डने या यादीत आणखी काही आकर्षक रंगांचा समावेश केला.

1.2 लीटर पेट्रोल 95 बीएचपी पॉवर आणि 119 पीक टॉर्क निर्माण करू शकते. याउलट 1.5 लिटर अस्पायर व्हेरियंट 99 बीएचपी पॉवर आणि 215 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. दोन्ही व्हर्जनमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले होते.

कारच्या बाह्य भागात हॅलोजन लाइट, सी आकाराचे फॉग लॅम्प आणि 15 इंचाचे मल्टी स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले होते. कारमध्ये फोर्डपाससह 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमेटेड क्लायमेट कंट्रोल, पुश स्टार्ट बटन, ड्युअल टोन अपहोल्स्ट्री आदी सुविधा मिळतील.

मॉडेल्समध्ये 6 एअरबॅग, ईबीडी सह एबीएस, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सुरक्षेसाठी सीट बेल्ट रिमाइंडर देण्यात आले आहे.

तथापि, अशी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये अपघाती डॅमेजपासून संपूर्ण संरक्षणाची खात्री देऊ शकत नाही. म्हणूनच, फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स पॉलिसी मिळविणे दुरुस्ती / रीप्लेसमेंट एक्सपेनसेसपासून दूर राहण्यासाठी एक शहाणपणाची निवड आहे.

आता, ऑनलाइन इन्शुरन्स पर्यायांची तुलना करताना, आपण माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी काही घटक निश्चित केले पाहिजेत. आपण फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स प्राइजचा विचार केला पाहिजे, उपलब्ध अॅड-ऑन कव्हर शोधले पाहिजेत, इन्शुरन्स कंपनी आयडीव्ही दुरुस्तीस परवानगी देते की नाही याची पुष्टी केली पाहिजे आणि बरेच काही.

डिजिट इन्शुरन्स हे सर्व पुरवते.

फोर्ड अस्पायर इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी)
जून-2021 8,987
जून-2020 6,158
जून-2019 5,872

**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन फोर्ड अस्पायर 1.5 टीडीसीआय टायटॅनियम (एमटी) डिझेल 1498.0 साठी केली जाते. जीसटी समाविष्ट नाही.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - जून, एनसीबी - 0%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन मार्च-2022 मध्ये केली जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचे डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

आपण डिजिटचा फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

फोर्ड अस्पायरसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

फोर्ड अस्पायरच्या कार इन्शुरन्स बद्दल अधिक जाणून घ्या

भारतातील कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये असंख्य कार मॉडेल्सची गर्दी होत आहे कारण भारतीयांना या सेगमेंटची आवड आहे. मागणी प्रचंड आहे. त्यामुळे या मागणीत आपला फायदा करून घेण्यासाठी फोर्डने मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायरला टक्कर देण्यासाठी अत्यंत स्पर्धात्मक प्राइजमध्ये अस्पायर लाँच केली आहे. स्टँडर्डस ठरवण्यासाठी ही 5 सीटर कार मार्केटमध्ये दाखल झाली आहे. फोर्ड फिगोच्या चेसिसवर आधारित ही सेडान कार आहे.

ही कार फॅमिली कारच्या सर्व गुणांची पूर्तता करते आणि याची एक्स शोरूम प्राइज ₹.5.89 लाखांपासून सुरू होते. हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायात उपलब्ध आहे.

आपण फोर्ड अस्पायर का खरेदी करावे?

  • पटकन उठून दिसणारा बाह्यभाग: कारच्या नोज मध्ये डायमंड मेस्ड ग्रिल असते आणि फॉग लाइट्स मोठ्या क्रोम ब्रॅकेटने वेढलेले असतात. आजूबाजूच्या हेडलॅम्पला ब्लॅक-आऊट झाल्यासारखी ट्रीटमेंट मिळते. शार्प शोल्डरच्या रेषा मागील बाजूस सरळ जातात आणि मागील दिव्यांच्या दरम्यान क्रोम पट्टीला पूरक असतात. 15 इंचाच्या अलॉय व्हील्समुळे कारला चांगला ग्राऊंड क्लिअरन्स आणि राइड करताना चांगला आराम मिळतो.
  • इंटेरिअर आणि आधुनिक वैशिष्ट्ये: डॅशबोर्ड काही वरवरचे अपडेट्ससह फोर्डच्या फ्रीस्टाईल सारखाच आहे. भरपूर साठवणुकीची जागा आणि ग्लोव्ह बॉक्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट्स हे या कारला चांगल्याप्रकारे वापरण्यायोग्य बनवतात. स्वयंचलित हेडलॅम्प आणि रेन सेन्सिंग वायपर या स्टँडर्ड गोष्टी असतातच. हायर ट्रिम्समध्ये सुपर रेस्पॉन्सिव्ह 6.5 टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली असून यामध्ये लेटेस्ट सिंक 3 सिस्टीम सपोर्टेड रिअरव्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे. अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो स्टँडर्ड आहेत. स्वयंचलित हवामान नियंत्रणामुळे आरामात भर पडते.
  • पॉवरफुल इंजिन आणि इंधन कार्यक्षमता: या कारसाठी तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत, एक 1.2 लीटर 3 सिलिंडर ड्रॅगन सीरिज पेट्रोल इंजिन आहे ज्याचे डिसप्लेसमेंट 1194 सीसी आहे ज्याची इंधन कार्यक्षमता 20.4 किमी प्रति लीटर आहे. दुसरे अधिक शक्तिशाली ड्रॅगन 1.5 लीटर 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे जे 19.4 किमी प्रति लीटर इंधन कार्यक्षम आहे. डिझेल व्हेरियंटसाठी ही कार 1.5 लीटर इंजिन देते आणि 26.1 किमी प्रति लीटरची इंधन कार्यक्षमता देते.
  • गाडी चालवायला आनंद मिळतो: फोर्डच्या सर्व कारमध्ये फन टू ड्राईव्ह फॅक्टर असतो, ज्याचे प्रतिबिंब या कारमध्ये उमटते. राइड आणि हाताळायला अस्पायर खरोखरच उत्कृष्ट आहे. स्टीअरिंग योग्य वजनाचे आहे आणि कोपऱ्याभोवती छान सजवलेले देखील आहे.
  • उत्कृष्ट सस्पेंशन: या कारसह राइड शानदार आहे, आपण खड्डे आणि उबडखाबड रस्ता त्याच्या पॉवरमुळे आरामात पार करू शकता आणि सस्पेंशन हे सगळे धक्के मस्त शोषून घेते.

फोर्ड अस्पायरसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

ही रुबाबदार कार आपल्याला लगेच प्रेमात पाडेल. त्यामुळे त्याचा इन्शुरन्स उतरवणे आणि त्याची चांगली काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स आपल्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो याबद्दल चर्चा करूया.

  • कायदेशीररित्या ड्राइव्ह करा आणि मोठ्या दंडापासून स्वत: चे संरक्षण करा: फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स पॉलिसी भारतीय रस्त्यांवर कायदेशीररित्या ड्राइव्ह करायला पर्मिट करते. इन्शुरन्स पॉलिसी नसल्यास आपल्याला ₹2,000 दंड आकारला जाऊ शकतो आणि आपले लायसन्सही रद्द केले जाऊ शकते. तसेच गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार आपल्याला 3 महिन्यांसाठी तुरुंगात डांबले जाऊ शकते.

इन्शुरन्सशिवाय ड्राइव्ह केल्यास चालवल्यास होणाऱ्या दंडाबद्दल अधिक जाणून घ्या.

  • आपली थर्ड-पार्टी लायबिलिटी कव्हर करा: एखाद्या अपघातादरम्यान आपण एखाद्याला जखमी केल्यास किंवा त्यांच्या मालमत्तेचे डॅमेज केल्यास थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स आपल्याला कव्हर करतो. त्यांच्या क्लेमची अमाऊंट आपल्या इन्शुरर कडून पे केली जाते. पण या पॉलिसीमध्ये स्वत:च्या कारचे होणारे डॅमेज कव्हर केले जात नाही.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसह आपल्या कारचे संरक्षण करा: कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स दोन घटकांसह येतो. या पॉलिसीद्वारे आपण आपल्या स्वत: च्या कारचे आणि तसेच थर्ड-पार्टीचे डॅमेज वसूल करू शकता. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन हे रस्ते अपघातापेक्षा अजून बरेच काही कव्हर करतो. वादळ, भूकंप, पूर, चोरी, दंगल इत्यादींमुळे झालेल्या डॅमेजचा क्लेम आपण करू शकता.
  • अॅड-ऑनसह अधिक संरक्षण मिळवा: अॅड-ऑन कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह काही अतिरिक्त कॉस्टसह घ्यावे लागतात. विशिष्ट परिस्थितीत कव्हरची व्याप्ती वाढवण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे. जसे की झीरो डेप्रीसीएशन अॅड-ऑन, इन्शुरन्स कंपनी आपल्या क्लेमविरूद्ध विचाराधीन कोणत्याही कार घटकाचे डेप्रीसीएशन मूल्याचा विचार करत नाही. इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्शन, रिटर्न टू इनव्हॉइस असे इतर अॅड-ऑन आहेत.

कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर बद्दल अधिक जाणून घ्या.

फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिट का निवडावा?

डिजिट मध्ये परवडणाऱ्या कार इन्शुरन्स पॉलिसीसह अनेक आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

आपण त्यांच्यावर एक नजर टाकूया.

  • सोयीस्कर पॉलिसी प्लॅन्स - डिजिट विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल इन्शुरन्स पॉलिसी तयार करते.
  • थर्ड पार्टी संरक्षण - थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपल्या वाहनामुळे दुसऱ्या कार, व्यक्ती किंवा मालमत्तेचे होणारे डॅमेज कव्हर केले जाते. मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार भारतात चालणाऱ्या सर्व वाहनांना हे मॅनडेटरी आहे. ही पॉलिसी बेसिक असली तरी गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार तुम्हाला ₹2,000 किंवा ₹4,000 दंडापासून वाचवू शकते. कायद्याचे उल्लंघन केल्यास आपले ड्रायव्हिंग लायसन्स ही रद्द होऊ शकतो.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह संरक्षण - नावाप्रमाणेच हा सर्वात व्यापक इन्शुरन्स प्लॅन आहे. यात थर्ड पार्टी आणि ओन डॅमेज प्रोटेक्शन या दोन्हींचा समावेश आहे. म्हणून, थर्ड पार्टीला जर अपघात आपल्यामुळे झाला, आणि आपली अस्पायर डॅमेज झाली असेल तर काळजी करू नका. फोर्ड अस्पायरसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स नुकसान रीएमबर्स करेल. किंबहुना नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा इतर धोक्यांमुळे डॅमेज होत असेल, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये हे सर्व कव्हर होईल.

टीप: थर्ड-पार्टी पॉलिसी स्वत: ला झालेल्या डॅमेजसाठी पे करत नाही. त्यामुळे आर्थिक मदतीचा वापर करण्यासाठी आपण स्वतंत्रपणे त्याचा पर्याय निवडू शकता.

  • ऑनलाइन पॉलिसी खरेदी किंवा रिनिव करा - सिमलेस अनुभव सुनिश्चित करण्यासाठी डिजिट फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स ऑनलाइन प्रदान करते. प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. आता, फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स रिनिवलसाठी, आपल्याला फक्त आपल्या विद्यमान खात्यांमध्ये साइन इन करावे लागेल.
  • उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ - डिजिट ग्राहकांनी केलेल्या सर्वाधिक क्लेम्स सेटल करण्यासाठी ओळखला जातो. याव्यतिरिक्त, इन्शुरन्स कंपनी आपल्याला विनाअडथळा क्लेम्स फाइल करण्यात मदत करण्यासाठी सेल्फ-इन्सपेक्शन प्रक्रिया प्रदान करते. आपल्या रजिस्टर्ड नंबरवर सेल्फ-इन्सपेक्शन लिंक मिळविण्यासाठी फक्त 1800 258 5956 वर कॉल करा. त्यानंतर, लिंकवर प्रतिमा संलग्न करा आणि आपल्या सोयीनुसार रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी एक निवडा.
  • आयडीव्ही बदल - डिजिट आपल्या ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू कस्टमाइज करण्यास मदत करतो. म्हणून, जर आपण उच्च आयडीव्ही निवडला तर चोरी किंवा कधीही भरून न निघणारे डॅमेज झाल्यास आपल्याला जास्त कंपेनसेशन मिळेल.
  • अॅड-ऑनची विस्तृत रेंज - जर आपल्याकडे फोर्ड अस्पायरसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स असेल तर आपण अॅड-ऑन कव्हर समाविष्ट करून आपली पॉलिसीची रेंज वाढवू शकता. येथे पर्याय उपलब्ध आहेत.

टीप: फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज मध्ये थोडी अजून भर घालून आपण रिनिवलनंतर अॅड-ऑन कव्हर सुरू ठेवू शकता.

  • प्रीमियमवर डिसकाऊंट - क्लेम-फ्री वर्ष पूर्ण केल्यानंतर डिजिट आपल्याला नो क्लेम बोनस देईल. हा बोनस संरक्षणाशी तडजोड न करता प्रीमियमवर सवलत म्हणून काम करतो. या एनसीबी ची रेंज 20% ते 50% पर्यंत आहे आणि नॉन-क्लेम वर्षांच्या संख्येवर अवलंबून आहे.
  • झटपट ग्राहक केअर - आपल्या इन्शुरन्सशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे डिजिटवर केव्हाही मिळवा. डिजिटची ग्राहक केअर टीम 24 तास उपलब्ध आहे, त्वरित उपाय प्रदान करते.
  • गॅरेजचे विशाल नेटवर्क - देशाच्या कानाकोपऱ्यात 6000 डिजिट नेटवर्क कार गॅरेज उपलब्ध असल्याने अजिबात काळजी न करता सहलीला जा. कोणत्याही गॅरेजला भेट द्या आणि आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीविरूद्ध कॅशलेस दुरुस्तीचा पर्याय निवडा.

आपली कार देशात कुठेही खराब झाली तरी त्रास टाळण्यासाठी आपण आमच्या फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्सच्या विरोधात ऑन-साइट पिक-अप सुविधेचा पर्याय निवडू शकता. याव्यतिरिक्त, डिजिट आपल्या ग्राहकांना उच्च व्हॉलंटरी डीडक्टीबल पर्याय देऊन इन्शुरन्स प्रीमियम आणखी कमी करण्यास मदत करते.

तथापि, कमी प्रीमियम संपूर्ण आर्थिक संरक्षणाची हमी देत नाही. म्हणून, निवड करण्यापूर्वी, आपण या विषयावर स्पष्टता मिळविण्यासाठी इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधावा.

फोर्ड अस्पायर - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
एम्बिएंटे 1194 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 20.4 किमी/लीटर ₹ 5.88 लाख
ट्रेंड 1194 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 20.4 किमी/लीटर ₹ 6.53 लाख
एम्बिएंटे CNG1194 सीसी, मॅन्युअल, सीएनजी, 20.4 किमी / किलो ₹ 6.6 लाख
ट्रेंड प्लस 1194 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 20.4 किमी/लीटर ₹ 6.87 लाख
एंबिएंटे डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 26.1 किमी/लीटर ₹ 6.89 लाख
टायटेनियम 1194 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 19.4 किमी/लीटर ₹ 7.27 लाख
ट्रेंड डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 26.1 किमी/लीटर ₹ 7.27 लाख
टायटेनियम ब्लू 1194 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 20.4 किमी/लीटर ₹ 7.52 लाख
ट्रेंड प्लस CNG1194 सीसी, मॅन्युअल, सीएनजी, 20.4 किमी / किलो ₹ 7.59 लाख
ट्रेंड प्लस डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 26.1 किमी/लीटर ₹ 7.67 लाख
टायटेनियम प्लस 1194 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 19.4 किमी/लीटर ₹ 7.72 लाख
टायटेनियम डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 26.1 किमी/लीटर ₹ 8.07 लाख
टायटेनियम ब्लू डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 25.5 किमी/लीटर ₹ 8.32 लाख
टायटेनियम प्लस डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 26.1 किमी/लीटर ₹ 8.52 लाख
टायटेनियम ऑटोमॅटिक 1497 सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 16.3 किमी/लीटर ₹ 9.0 लाख

भारतातील फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डिजिट आणखी काही पॉलिसी पर्याय प्रदान करते का?

नाही, डिजिट केवळ थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करते.

जर मी थर्ड पार्टी फोर्ड अस्पायर कार इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर मी डोरस्टेप कार पिक-अप आणि ड्रॉप सुविधेची निवड करू शकतो का?

नाही, डोरस्टेप कार पिक-अप आणि ड्रॉप सुविधा केवळ कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीसाठी उपलब्ध आहे.