फक्त आठ वर्षांपूर्वी आलेल्या हिरो माइस्ट्रोने देशात आधीपासूनच असलेल्या स्कूटर्सला चांगलीच टक्कर दिली आहे. हिरो आणि होंडा या दोन वेगवेगळ्या कंपन्या झाल्यानंतर लगेचच लंडनमध्ये ओटू अरेनामध्ये हिरो माइस्ट्रोचे लाँच करण्यात आले.
- मुख्यतः मोटारसायकल्सवर भर असणाऱ्या हिरोची माइस्ट्रो ही दुसरी स्कूटरची श्रेणी होती. आकर्षक डिझाईन आणि वैशिष्ट्ये व परवडण्याजोगी किंमत यामुळे ती लोकप्रिय आहे.
- 110 सीसी इंजिन असलेली ही स्कूटर 65 किमी प्रतिलिटर इतके मायलेज देऊ शकते.
- 2016 मध्ये सीएनबीसी-टीव्ही 18च्या ओव्हरड्राइव्ह अवॉर्डसमध्ये माइस्ट्रो एजला स्कूटर ऑफ द इयर अवॉर्ड मिळाले. (1)
- समीक्षकांनी आरामदायक चालवण्याबरोबरच युएसबी (USB) 3.0 चार्जिंग पोर्टसारख्या अत्त्याधुनिक वैशिष्ट्यांसाठी तिचे खूपच कौतुक केले.
- सरकारी नियमांना अनुसरून हिरोने प्रदूषण कमी करणारी बीएस(BS)- VI सुसंगत माइस्ट्रो एज लाँच केली.
- 2017 मधील लोकप्रिय स्कूटर्समध्ये माइस्ट्रोला तिसरा क्रमांक मिळाला. त्याच वर्षी जुलैमध्ये हिरोने 40,000 पेक्षा जास्त माइस्ट्रोंची विक्री करून बाजारावर अधिराज्य स्थापन केले.(2)
अशा सर्व यश आणि कौतुकाची वाटेकरी असलेली माइस्ट्रो प्रवाडणारी किंमत आणि उत्तम कामगिरीचा सवाल येतो तेव्हाही एक सर्वोत्तम स्कूटर आहे.
पण भारतातल्या रस्त्यांवर चालणाऱ्या इतर कोणत्याही टू-व्हिलरप्रमाणेच माइस्ट्रोलासुद्धा अपघात, चोरी आणि इतर धोके संभवतात.
त्यामुळेच, तुम्ही हिरो माइस्ट्रो खरेदी करता तेव्हा तिला आपघातांपासून पुरेसे संरक्षण असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. असे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खरेदीच्या वेळीच माइस्ट्रो इन्शुरन्स घेणे.
पण पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्ही देशातील इन्शुरन्स कंपन्यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.
वाहन मालकांना विविध इन्शुरन्स पॉलिसींची श्रेणी देणारी डिजिट ही एक कंपनी आहे.