बजाज ग्रुप भारतातील टॉप 10 मध्ये असल्याने, त्याच्या शाखा अनेक उद्योग आणि क्षेत्रांमध्ये विस्तृत आहेत. यातील प्रमुख आस्थापने म्हणजेच बजाज ऑटो लिमिटेडने बाईक आणि स्कूटरसह टू-व्हिलर मॉडेल्सच्या निर्मितीद्वारे ग्रुपला त्याचे ब्रँड मूल्य आणि ओळख वाढविण्यात यशस्वीरित्या मदत केली आहे.
सुमारे साडेसहा दशकांपूर्वी स्थापन झालेली, बजाज ऑटो लिमिटेड आज जागतिक स्तरावरील सर्वोत्तम टू-व्हिलर आणि थ्री- व्हिलर वाहन उत्पादकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. अधिक मागणी असलेल्या बजाजच्या काही सुप्रसिद्ध टू-व्हिलर मॉडेल्सची नावे खालीलप्रमाणे:
- पल्सर 150
- डोमिनार 400
- पल्सर NS200
- ॲव्हेंजर क्रूझ 220
- सीटी 100
- पल्सर 220F
- प्लॅटिना 110
- चेतक
- डिस्कवर
बजाज बाईक मॉडेल्सने भारतातील टू-व्हिलरच्या बाजारपेठेत ट्रेंड बदलण्यास मदत केली आहे, परिणामी त्याच्या अनेक मॉडेल्सना तुफान मागणी आहे. तसेच, दुचाकींच्या संरक्षणाबाबत लोकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे बजाज बाईक इन्शुरन्स पॉलिसींची मागणीही वाढत आहे.
बजाज टू-व्हीलरला कोणती गोष्ट लोकप्रिय बनवते?
KB100 सारख्या बजाज बाईकच्या सुरुवातीच्या मॉडेल्सपासून ते ॲव्हेंजर क्रूझ 220 सारख्या हाय-एंड मॉडेल्सपर्यंत, बजाज ऑटोने भारतात आणि परदेशातील बाईकप्रेमींचे मोठे मार्केट आपलेसे करण्यात यश मिळवले आहे. भारतातील टू-व्हिलर वाहनांसाठी बजाज ऑटोला ब्रँड बनवणारी काही प्रमुख कारणे बघा-
विश्वासार्हतेची पूर्तता करणारे तंत्रज्ञान - नावीन्य ही बजाज ऑटोला अधिक लोकप्रियता देणारे आणखी एक महत्वाचे कारण आहे. आज, बजाज बाईकची अनेक मॉडेल्स जागतिक दर्जाच्या DTS-i इंजिन तंत्रज्ञानाद्वारे उच्च विश्वासार्हता आणि अतुलनीय सामर्थ्य दर्शवतात. शिवाय, रायडिंग आरामापासून पॉवर ब्रेकिंग सिस्टम आणि रात्रीची सुधारित दृश्यमानता, बजाज दुचाकी मॉडेल्स निर्दोष वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरतात.
या यादीमुळे, बजाज ऑटो हे भारतातील घरगुती नाव आणि जागतिक स्तरावर एक लोकप्रिय दुचाकी ब्रँड बनले आहे.
पण थांबा ! त्यांची लोकप्रियता सर्वमान्य असली तरी, बजाज टू-व्हिलर्सना अजूनही तोटा किंवा नुकसान होण्याचा धोका आहे, ज्यामुळे तुमचे गंभीर आर्थिक नुकसान होऊ शकते. बजाज बाईक मॉडेल्सचे मालक अशा प्रकारे
टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन्सची निवड करू शकता. जेणेकरून त्यांना येणाऱ्या जोखमींपासून संरक्षण मिळेल.
तसेच, हे सुरक्षा कवच सदैव सोबत असावे यासाठी सध्याची पॉलिसी कालबाह्य होण्यापूर्वी वेळेत बजाज बाईक इन्शुरन्स नूतनीकरण करण्याचासुद्धा सल्ला दिला जातो.