स्कूटर खरेदी करण्यापूर्वी त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल सर्व जाणून घेणे महत्त्वाचे असतेच मात्र, इतक्या कष्टाने विकत घेतलेल्या आपल्या गाडीच्या संरक्षणासाठी तुम्ही टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सुझुकी ॲक्सेस टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, इतर गोष्टींबरोबरच तुम्ही कोणकोणत्या फायद्यांचा लाभ घेऊ शकता ते आज आपण पाहणार आहोत...
तुमच्या दैनंदिन प्रवासासाठी, सुझुकी ॲक्सेस हे बजेटमध्ये बसणारे व सोबतच सर्व गरजा पूर्ण करणारे वाहन ठरू शकते. भारतातील टू-व्हिलर बाजारात सुझुकी ॲक्सेस हे सर्वात विश्वसनीय नावांपैकी एक आहे. सुमारे 13 वर्षांपूर्वी 2007 मध्ये लाँच झालेल्या सुझुकी ॲक्सेसने वेळेनुसार आपल्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत.
असे वाहन असणे तुमच्यासाठी अभिमानाची बाब असू शकते. अशा तुमच्या लाडक्या स्कुटरचा अपघात किंवा अन्य कोणतेही नुकसान झाल्यास भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या हे बरेच त्रासदायक ठरू शकते.
सुझुकी ॲक्सेस इन्शुरन्स पॉलिसी ही अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांमध्ये आपल्याला आवश्यक असलेले संरक्षण पुरवते. अशी योजना अपघात टाळू शकत नसली तरी, अपघातानंतर तुमची स्कूटर दुरुस्त करताना तुम्हाला येणाऱ्या आर्थिकबाबीत हातभार लावू शकते. शिवाय,1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार सर्व मोटार चालवलेल्या वाहनांसाठी इन्शुरन्स पॉलिसी अनिवार्य करण्यात आल्या होत्या.त्यामुळे अशा कव्हरचा लाभ घेतल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.
थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी मिळवण्यात अयशस्वी झाल्यास, तुमच्या टू-व्हिलरला पहिल्यांदा 2000रु आणि वारंवार गुन्ह्यासाठी 4000रु दंड आकारला जाऊ शकतो .
सुझुकी ॲक्सेसला भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्कूटरपैकी एक कशामुळे म्हणू शकतो ते आपण प्रथम पाहू या.