तुमच्या रोजच्या येण्याजाण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये बसणारी सर्वात चांगल्या स्कूटरच्या शोधात आहात? टीव्हीएस ज्युपिटरबद्दल विचार केलात का ? टीव्हीएस स्कूटर इतकी लोकप्रिय का आहे हे आणि टीव्हीएस ज्युपिटरसाठी विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यायला हवी त्या जाणून घ्या.
टीव्हीएस मोटर कंपनीच्या परवडणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे ज्युपिटर. 1978 मध्ये स्थापन झालेली टीव्हीएस ही भारतात कार्यरत असलेली तिसरी सर्वात मोठी मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. मे 2019 मध्ये कंपनीने 3 लाख युनिट्सपेक्षा जास्त विक्री केली. (१)
या ब्रँडमधील टीव्हीएस ज्युपिटर विशेष लोकप्रिय वाहन आहे. ती मर्यादित बजेमध्ये प्रभावी कामगिरी देते. ऑक्टोबर २०१९ मधल्या एका सर्वेक्षणानुसार, ज्युपिटर ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. केवळ त्या एकाच महिन्यात टीव्हीएसने भारतातील ग्राहकांना 74,500 हून अधिक टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर्स विकण्यात यश मिळवले. (२)
आता तुम्ही टीव्हीएस ज्युपिटर खरेदी करण्याचे ठरवले आहे तर अपघात, आग, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे आपल्या स्कूटरचे काही नुकसान झाले तर आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे आता यापुढची पायरी म्हणजे अश्या परिस्थितीत आर्थिक नुकसान टाळण्यासाठी टीव्हीएस ज्युपिटर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे.
शिवाय, मोटार वाहन अधिनियम, 1988 नुसार किमान थर्ड पार्टी टू व्हीलर इन्श्युरन्स घेणे केवळ फायद्याचे आहे असे नाही तर अनिवार्यदेखील आहे. जर तुम्ही तुमच्या वाहनाला योग्य कव्हरेज घेतले नाहीत तर तुम्हाला 2,000 ते 4,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे न चुकता तुम्ही इन्श्युरन्स घेण्याची खात्री करा.