एमजी हेक्टर कार 27 जुलै 2019 रोजी सर्वप्रथम भारतीय बजारात उतरली. मागील दोन फिस्कल इयर्स मध्ये, आर्थिक वर्ष 2020मध्ये एमजी मोटर्सने 21,954 युनिट्स आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये 35,597 युनिट्सची विक्री केली. ही लोकप्रियता लक्षात घेता, एमजी मोटर्स इंडियाने जानेवारी 7 2021 रोजी नवीन सेवन-सीटर हेक्टर प्लस लॉंच केली. संपूर्ण हेक्टर लाईन-अप मध्ये आता फाईव्ह, सिक्स आणि सेवन सीटर पर्याय उपलब्ध आहेत.
त्यामुळे तुम्ही जर ही ब्रँड न्यू मॉडेल, एका योग्य एमजी हेक्टर कार इन्शुरन्स पॉलिसी ऑप्शनचा शोध घ्यायला सुरुवात करा.
तसेच, मोटर वेहिकल एक्ट, 1988, नुसार भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्त्येक कारचा थर्ड पार्टी कव्हरेज असलेला इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. हे कव्हर तुमच्या कारमुळे झालेल्या थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी आर्थिक मदत करते.
तरी तुम्ही अपघाती नुकसान किंवा इतर दुर्घटनांच्या परिस्थितीत जास्तीत जास्त कव्हरेज मिळवण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरचा पर्याय निवडू शकता.
जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी, डिजीटसारखे प्रतिष्ठित इन्शुरन्स प्रोव्हायडर एमजी हेक्टर इन्शुरन्स पॉलिसीसोबत आकर्षक फीचर्स आणि बेनिफिट्स देतात.
पुढील सदरात, आपण एमजी हेक्टरच्या मॉडेलच्या फीचर्स, कार इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व आणि डिजीटने ऑफर केलेल्या स्कीम्स या बद्दल चर्चा करूयात.
एमजी हेक्टर बद्दल जाणून घ्या
एमजी हेक्टर 14 व्हेरियंट्स, डीझेल, पेट्रोल-मॅन्युअल, पेट्रोल-ऑटोमॅटिक्स आणि पेट्रोल हायब्रीड या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.