फ्रेंच बहुराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी रेनोने फेब्रुवारी 2021 मध्ये काइगर नावाची स्टनिंग डिझाइन केलेली एसयूव्ही लाँच केली आहे. काइगर पॉवर आणि सोयीसुविधांचा परिपूर्ण समतोल दाखवते. आपल्या पदार्पणापासून, या फ्रेंच ऑटोमोबाइल निर्मात्याने सुमारे 3226 काइगर मॉडेल्सची विक्री केली आहे. विक्रीच्या अशा आकड्यांमुळे काइगर आपल्या सेगमेंटमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे.
जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असली, तरी इतर कारप्रमाणेच काइगर अपघातांना बळी पडते. त्यामुळे आर्थिक ताण टाळण्यासाठी हे मॉडेल खरेदी करण्याचा प्लॅन आखत असलेल्या व्यक्तींनी रेनो काइगर कार इन्शुरन्स घेण्याचा विचार केला पाहिजे.
तसेच मोटार वेहिकल एक्ट 1988 मध्ये प्रत्येक भारतीय वाहनमालकासाठी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत थर्ड पार्टीचे नुकसान किंवा इजा होण्यापासून आर्थिक संरक्षणाची खात्री देता येते.
कार मालक चांगल्या आर्थिक कव्हरेजसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीचा विचार देखील करू शकतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये थर्ड-पार्टी आणि स्वत: चे नुकसान दोन्ही खर्च समाविष्ट आहेत.
भारतात अशा अनेक इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या रेनो काइगरसाठी परवडणाऱ्या प्रीमियमवर विनाअडथळा कार इन्शुरन्स देतात. डिजिट हा असाच एक इन्शुरन्स प्रोव्हायडर आहे.
पुढील भागात तुम्हाला काइगरची काही वैशिष्ट्ये, विविध व्हेरियंट्सच्या किंमती, भारतातील कार इन्शुरन्सचे महत्त्व आणि डिजिटचे फायदे यावर थोडक्यात चर्चा पाहायला मिळेल.