होंडा बाईक इन्शुरन्स

₹714 पासून सुरु होणारी होंडा बाईक इन्शुरन्स पॉलिसी घ्या

Third-party premium has changed from 1st June. Renew now

होंडा टू-व्हीलर्सबद्दल तुम्हाला किती माहिती आहे - भारतातील त्याचा इतिहास, त्याच्या लोकप्रियतेमागील कारण, होंडा बाईक इन्शुरन्स पॉलिसी आणि कोणती पॉलिसी तुम्हाला सूट होईल?

आपण काही तथ्यांनी सुरुवात करूया!

भारतातील टू-व्हीलर्स म्हणजे होंडा असे समीकरण आहे. नुकत्याच झालेल्या आर्थिक मंदीनंतरही ही कंपनी ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’(SIAM) (एसआयएएम) (1) ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार एप्रिल ते सप्टेंबर 19 या कालावधीत सलग सहा महिने भारतातील दुचाकी वाहनांची आघाडीची विक्री करणारी कंपनी बनली.

बीएचपी-इंडियाने 2019 ऑगस्टपर्यंत सर्व भारतीय टू-व्हीलर्स उत्पादकांच्या मार्केट शेअर्सचे विश्लेषण केले. त्या विश्लेषणानुसार, होंडाचा सध्या मार्केट शेअर 29% आहे.शेअर्सच्या बाबतीत कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. (2)

भारतीय ग्राहकांमध्ये होंडा टू-व्हीलरची लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.

मात्र होंडा टू-व्हीलर्सनी या उद्योगात प्रथमच ही वैशिष्ट्ये दिली असली, तरी भारतीय रस्त्यांवर असलेल्या विविध संकटांपासून त्यांना संरक्षण मिळणार नाही.

त्यामुळेच होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेणे आणि तुमच्या वाहनाचे नुकसान किंवा त्याद्वारे होणाऱ्या आर्थिक लायॅबिलिटीपासून स्वतःचे संरक्षण करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपल्या होंडा टू-व्हीलरलाही इतर वाहनांप्रमाणे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे तुमचा मोठा खर्च होऊ शकतो. अशा परिस्थितीत इन्शुरन्स पॉलिसी आपले संरक्षण करण्यास मदत करू शकते.

शिवाय, मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत थर्ड-पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी काढणे अनिवार्य आहे. जर तुम्ही इन्शुरन्स नसलेल्या होंडा बाईकवर स्वार झालात, तर वारंवार केलेल्या या गुन्ह्यासाठी तुम्हाला 2000 आणि 4000 रुपये दंड होऊ शकतो.

होंडा बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे

काय कव्हर्ड नाही

तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर्ड नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती इथे दिली आहे:

थर्ड पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

थर्ड पार्टी किंवा लायॅबिलिटी ओन्ली बाईक पॉलिसीच्या बाबतीत, स्वत:च्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

दारू पिऊन किंवा लायसन्सशिवाय गाडी चालवणे

तुम्ही मद्यधुंद अवस्थेत किंवा वैध दुचाकी लायसन्सशिवाय प्रवास करत असलेल्या परिस्थितीत आपला टू-व्हीलर इन्शुरन्स तुमच्यासाठी कव्हर करणार नाही.

वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय वाहन चालवणे

जर तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि तुमच्या टू-व्हीलरवर वैध लायसन्स असलेला माणूस मागच्या सीटवर बसला नसेल - तर त्या परिस्थितीत तुमचा क्लेम कव्हर केला जाणार नाही.

कॉन्सिक्वेन्शिअल डॅमेजेस

अपघाताचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान (उदा. अपघातानंतर, खराब झालेल्या टू-व्हीलरचा चुकीचा वापर केला जात असेल आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले जाणार नाही)

निष्काळजीपणा दाखवणे

तुमच्याकडून कोणतेही निष्काळजीपणा दर्शवणारे वर्तन  (उदा. पुरात टू-व्हीलर चालविल्यामुळे होणारे नुकसान, ज्याची उत्पादकाच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार शिफारस केली जात नाही, ते कव्हर केले जाणार नाही)

ॲड-ऑन्स विकत घेतले नाहीत

काही गोष्टी ॲड-ऑन्समध्ये कव्हर केल्या जात नाहीत. जर आपण ते ॲड-ऑन विकत घेतले नसतील, तर त्या अनुषंगाने परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.

तुम्ही डिजिटचा होंडा बाईक इन्शुरन्स का विकत घ्यावा?

तुमच्या गरजा पूर्ण करणारा होंडा बाईक इन्शुरन्स प्लॅन

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे टू-व्हीलरचे नुकसान/ हानी

×

आग लागल्यास टू-व्हीलर वाहनाचे नुकसान/ हानी

×

नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर टू-व्हीलरचे नुकसान/ हानी

×

थर्ड-पार्टीचे नुकसान

×

थर्ड-पार्टीचे नुकसान

×

वैयक्तिक अपघात कव्हर

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीच्या जखमा/मृत्यू

×

तुमची स्कूटर किंवा बाईक चोरी

×

तुमचे आयडीव्ही कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा करावा?

तुम्ही आमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा रिन्यूयल केल्यानंतर, आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम्सची प्रक्रिया असल्याने आपण तणावमुक्त राहता!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956. वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेकशनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनमधून तुमच्या वाहनाच्या नुकसानीविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनाद्वारे भरा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही निवडू इच्छित असलेला दुरुस्तीचा मार्ग निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा प्रश्न सगळ्यात आधी तुमच्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करताय ही चांगली गोष्ट आहे! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा (एचएमएसआय) संक्षिप्त इतिहास

एचएमएसआय (HMSI) ही होंडा मोटर कंपनी लिमिटेड जपानची थेट उपकंपनी आहे. सन 1999 मध्ये भारतात त्यांनी बस्तान बसवले आणि त्यांचे मुख्य उत्पादन केंद्र हरियाणातील गुडगाव जिल्ह्यातील माणेसर येथे होते. जपानी वारशाप्रमाणे कामगिरी आणि मायलेजच्या बाबतीत स्वत:चे वर्चस्व स्थापित करून होंडाने राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील तपुकरा येथे दुसरे उत्पादन युनिट स्थापन केले आहे.

होंडाने हिरो मोटोकॉर्पच्या सहकार्याने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता, तर 2014  मध्ये त्यांनी स्वत:ला पूर्णपणे स्वतंत्रपणे स्थापित केले. सध्या ते भारतातील सर्वात मोठे टू-व्हीलर उत्पादक होण्याच्या स्थितीत आहे.

होंडाने ऑफर केलेल्या काही मॉडेल्सचा उल्लेख खाली केला आहे.

  • होंडा ॲक्टिव्हा आय
  • होंडा ॲक्टिव्हा 5जी
  • होंडा एक्स-ब्लेड
  • होंडा हॉर्नेट 160 आर
  • होंडा सी.बी.आर 250 आर

होंडाने अलीकडेच काही उच्च दर्जाची मॉडेल्सही लाँच केली आहेत.

  • होंडा सी.बी.आर 300 आर
  • होंडा सी.बी.आर 650 आर
  • होंडा सी.बी 1000 आर
  • होंडा सी.बी.आर 1000 आर.आर
  • होंडा गोल्ड विंग

लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, या यादीत समाविष्ट असलेले शेवटचे मॉडेल - होंडा गोल्ड विंग, एक प्रकारची क्रूझर आहे. ही नवीन प्रकारचे रिव्हर्स गिअर तसेच वैकल्पिक एअर-बॅग प्रदान करते, जो त्यांच्या तांत्रिक बुद्धिमत्तेचा पुरावा आहे.

होंडाला लोकप्रिय बनवणारी गोष्ट कोणती ?

असे काही घटक आहेत जे होंडा टू-व्हीलरला सर्व प्रकारच्या लोकांमध्ये लोकप्रिय बनवतात. शिवाय, होंडाची आतापर्यंतची कामगिरी ही कंपनीद्वारे दरवर्षी सुरू होणाऱ्या श्रेष्ठ टू-व्हीलर्स वाहनांचा पुरावा आहे.

त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया :

  • गुजरातच्या विठ्ठलपुरा येथील उत्पादन प्रकल्प हा केवळ स्कूटर तयार करण्यासाठी समर्पित अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
  • होंडाचे तंत्रज्ञान अव्वल दर्जाचे आहे आणि जगातील मूठभर टू-व्हीलर उत्पादकांच्या पंगतीत कंपनी बसते. यामाहा आणि डुकाटी यांच्यानंतर येणाऱ्या सर्व विभागांमध्ये मोटोजीपीमधील तिसरा सर्वात यशस्वी उत्पादक असल्याचा त्यांना अभिमान आहे.
  • 2004 सालापर्यंत होंडाने त्यांच्या फ्युएल सेलवर चालणाऱ्या मोटारसायकलींसाठी एक प्रोटोटाइप विकसित केला होता.
  • 249 सी.सी सिंगल सिलिंडर इंजिनद्वारे संचालित सी.बी.आर 250 आर ही होंडाने लाँच केलेली सर्वात लहान रेसिंग श्रेणीची मोटारसायकल आहे.

सीमा रेषा विस्तारल्याने एखादी कंपनी लोकप्रिय बनू शकते, परंतु त्यानंतरच्या यशामुळेच कंपनीला पुढे जाण्यास मदत होते. होंडाचा निर्दोष ट्रॅक रेकॉर्ड, केवळ टू -व्हीलर उत्पादनच नव्हे तर त्यांच्या इतर उपक्रमांमध्येही ते जगातील सर्वात मान्यताप्राप्त उत्पादकांपैकी एक आहेत.

मात्र, होंडा टू-व्हीलर उत्पादन उद्योगातील नवे नवे उच्चांक गाठत असले, तरी त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मॉडेल्सना इतर दुचाकी वाहनांइतकेच रस्ते अपघातांचाही धोका आहे. अशा परिस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या स्वत:च्या वाहनाचे नुकसान भरून घेण्यासाठी किंवा अपघातात थर्ड-पार्टीच्या झालेल्या नुकसानीसाठी पैसे देऊन भरीव खर्च करावा लागेल.

अशा परिस्थितीत तुमची आर्थिक देणी कमी करण्यासाठी, होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेणे तुमच्यासाठी योग्य आहे

तुम्ही होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी का विकत घ्यावी ?

टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी ही काही कारणांमुळे गरजेची मानली जाते. तुम्ही होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी का घ्यावी याच्या काही कारणांची यादी खाली दिली आहे :

  • हे कायद्याने अनिवार्य आहे- 1988 च्या मोटार वाहन कायद्यांतर्गत, प्रत्येक मोटारसायकलला थर्ड पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी असणे अनिवार्य आहे. जर तुमची होंडा टू-व्हीलर किमान थर्ड-पार्टी लायॅबिलिटी पॉलिसी अंतर्गत कव्हर केली नाही, तर तुमच्याकडुन मोठा वाहतूक दंड आकारला जाईल. मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा 2019 अंतर्गत, टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी काढली नसल्यामुळे  वारंवार केलेल्या गुन्ह्यासाठी वाहतूक दंड 2000 रुपये आणि 4000 रुपये आहे.
  • थर्ड-पार्टीला झालेल्या नुकसानीसाठी क्लेम रिएम्बर्समेंट थर्ड-पार्टी लायॅबिलिटी थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड  आहेत. इन्शुरन्स पॉलिसीद्वारे देण्यात आलेल्या या लाभांतर्गत, तुमच्या होंडा टू-व्हीलरद्वारे थर्ड-पार्टी वाहने किंवा मालमत्तांचे नुकसान झाल्यामुळे झालेल्या नुकसानीपासून तुम्ही स्वत:चे आर्थिक संरक्षण करू शकाल. हा फायदा तिसऱ्या व्यक्तीच्या अपघातातील दुखापतीमुळे किंवा मृत्यूमुळे उद्भवू शकणाऱ्या लायॅबिलिटीचा समावेश करण्यासाठीही  उपयुक्त ठरतो. शिवाय, इन्शुरन्स कंपनी म्हणून आम्ही कालांतराने उद्भवू शकणारी कोणतीही कायदेशीर केसदेखील हाताळू.
  • वैयक्तिक अपघात ॲड-ऑन कव्हर- होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी (एकतर थर्ड-पार्टी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह) घेतल्यानंतर आणि त्यासह अनिवार्य वैयक्तिक अपघात ॲड-ऑन कव्हर खरेदी केल्यानंतर, तुम्हाला अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास भरपाई मिळण्यास पात्र असाल. शिवाय, अपघातामुळे तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्य आर्थिक संरक्षण मिळण्यास पात्र असतील.
  • तुमच्या स्वत:च्या होंडा टू-व्हीलरचे नुकसान कव्हर होते – अपघात केवळ थर्ड -पार्टीला हानी पोहोचवत नाहीत, तुमच्या होंडा टू-व्हीलरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसह तुम्ही अपघातादरम्यान तुमच्या स्वत:च्या वाहनाच्या नुकसानीसाठी आर्थिक कव्हर घेऊ शकता. ही पॉलिसी जर तुमची टू-व्हीलर चोरीला गेली किंवा आग, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे किंवा कोणत्याही मानवनिर्मित आपत्तीदरम्यान नुकसान झाले तर यासाठी कव्हरेज प्रदान करते.

तथापि, वरील फायदे आणि बरेच काही उपभोगण्यासाठी, देशातील नामांकित इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीचा लाभ घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. डिजिट इन्शुरन्स ही या बाबतीत परिपूर्ण निवड असू शकते !

का ते पाहा!

होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत डिजिट कोणत्या गोष्टी ऑफर करते ?

आपल्या देशात इन्शुरन्स देणाऱ्या अनेक कंपन्या असल्या, तरी डिजिटने दिलेले फायदे जास्त आणि वेगळे आहेत. डिजिटच्या होंडा इन्शुरन्स पॉलिसीद्वारे दिल्या जाणाऱ्या काही अधिक आकर्षक फायद्यांच्या खाली दिलेल्या यादीवर एक नजर टाका -

होंडा इन्शुरन्स पॉलिसीच्या निवडीसाठी अनेक पर्याय - होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबतीत डिजिटकडून निवडीसाठी बरेच पर्याय दिले जातात. उदाहरणार्थ -

  • a) थर्ड-पार्टी टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी- या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही तुमच्या टू-व्हीलरद्वारे थर्ड-पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनाच्या नुकसानीमुळे झालेल्या कोणत्याही आर्थिक लायॅबिलिटीचे कव्हरेज घेऊ शकाल.
  • b) कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - ही पॉलिसी सर्वांगीण संरक्षण प्रदान करते. थर्ड-पार्टी नुकसानीव्यतिरिक्त, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अपघात, चोरी इत्यादींमुळे तुमच्या स्वतःच्या वाहनाचे झालेले नुकसानदेखील कव्हर करेल.

शिवाय, जर तुम्ही सप्टेंबर 2018 नंतर तुम्ही होंडा टू व्हीलर खरेदी केली असेल, तर तुम्ही ओन डॅमेज बाईक इन्शुरन्स पॉलिसी देखील घेऊ शकाल ज्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीचे फायदे, थर्ड-पार्टी बेनिफिट्स मिळतील.

  • नेटवर्क गॅरेजेसची मोठी संख्या – डिजिटची देशभरात हजारो नेटवर्क गॅरेजेस पसरलेली आहेत. आता, हे काय आहे ? ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी संलग्न गॅरेजेस आहेत जिथे तुम्ही तुमच्या टू-व्हीलरसाठी कॅशलेस दुरुस्तीची सुविधा घेऊ शकता. अशा प्रकारे, तुमच्या होंडा बाईकसाठी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या बाबतीत डिजिट अंतर्गत मोठ्या संख्येने नेटवर्क गॅरेजेस नक्कीच फायदेशीर ठरतात.
  • हाय क्लेम सेटलमेंट प्रमाणासह (रेशिओसह) त्वरित क्लेम सेटलमेंट  - सामान्यत: क्लेम प्रक्रियेमध्ये कंपनीचा प्रतिनिधी संबंधित माणसाला भेटून नुकसानीची चौकशी करतात आणि नंतर क्लेमला मान्यता देतात.डिजिटने ही प्रक्रिया सोपी केली आहे आणि ती जलद केली आहे. तुम्ही स्वयं तपासणीसाठी फक्त तुमचा स्मार्टफोन वापरून ही प्रक्रिया करू शकता आणि तुमचा क्लेम ऑनलाइन दाखल करु शकता. शिवाय, डिजिटला हाय क्लेम सेटलमेंटच्या रेशिओचा अभिमान आहे. त्यामुळे तुमचा क्लेम नाकारण्याची शक्यता कमी होते.
  • तुमच्या होंडा टू-व्हीलर इन्शुरन्ससाठी जास्त इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) - इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू तुमच्या होंडा टू-व्हीलरचे एकूण नुकसान किंवा अपरिवर्तनीय नुकसान झाल्यास तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून मिळणाऱ्या रकमेचा संदर्भ देते. हे विक्रेत्याच्या किमतीतून तुमच्या होंडा बाईकचे डिप्रिसिएशन कापून घेतले जाते. तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे डिजिटसह  वाढवू शकता. ज्यात जास्त आणि कस्टमाइज आयडीव्ही प्रदान केला जातो. 
  • सुलभ खरेदी आणि रिन्यूअल प्रक्रिया - होंडा बाईक इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्यासाठी डिजिटची प्रक्रिया सोपी आणि त्रासरहित आहे. एकदा का तुम्ही स्वत:साठी योग्य पॉलिसी निवडली की, तुम्ही ॲड-ऑन ऑफर्स तपासू शकता आणि तुमची प्रीमियम रक्कम तपासू शकता. तुम्हाला नेमकी कोणती पॉलिसी  विकत घ्यायची आहे ते ठरल्यानंतर, अर्ज भरणे आणि प्रीमियम पेमेंट काही मिनिटांत ऑनलाइन पूर्ण केले जाऊ शकते.
  • विविध प्रकारचे ॲड-ऑनचे पर्याय  – डिजिट त्यांच्या ग्राहकांना विविध प्रकारचे ॲड-ऑन पर्याय प्रदान करते. खालच्या यादीत दिलेल्या या ॲड-ऑन कव्हर्सचा लाभ घेतल्याने तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमधून जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात :
    • a) शून्य डिप्रिसिएशन कव्हर.
    • b) रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर.
    • c) ब्रेकडाउन असिस्टन्स.
    • d) इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन कव्हर.
    • e) कंझ्युमेबल कव्हर.
  • कधीही प्रवेश - डिजिट त्यांच्या सेवा 24X7 ऑफर करते, ज्यामुळे तुम्हाल आवश्यक असेल तेव्हा क्लेम किंवा तक्रारी उपस्थित करण्यासाठी मदत मिळते. विशेषत: अपघात आणि इजा झालेल्या प्रकरणांमध्ये, ही मोठी मदत उपयुक्त ठरू शकते. आमची सेवा राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सेवांचा जास्तीत जास्त उपयोग करू शकता.
  • नो क्लेम बोनस बेनिफिट्स  – नो क्लेम बोनस हा प्रत्येक क्लेम नसलेल्या वर्षासाठी तुम्हाला दिले जाणारे बेनिफिट आहे. या बेनिफिटसह तुम्ही पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी सलग प्रत्येक वर्षासाठी भरलेल्या प्रीमियमवर 20% पासून 50% पर्यंत सूट घेऊ शकता. डिजिट इन्शुरन्सद्वारे दिले जाणारे हे बेनिफिट प्रत्येक पॉलिसी रिन्यूअलसाठी किंवा डिजिटच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही इतर इन्शुरन्स कंपन्यांकडून शिफ्ट करत असाल तरीही मिळू शकते.

डिजिटद्वारे दिले जाणारे बेनिफिट्स खूप फायदेशीर असू शकतात, विशेषत: कॉम्प्रिहेन्सिव्ह होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि आम्हाला ते समजते.

पण काळजी करू नका, आम्ही काही गुपिते उघड करणार आहोत.

तुमच्या होंडा टू-व्हीलर इन्शुरन्सवरील प्रीमियम कमी केला जाऊ शकतो का ? कसे ते शिका!

होय, तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसाठी प्रीमियम रक्कम कमी करण्यासाठी तुम्ही काही पद्धती वापरू शकता. होंडा बाईक इन्शुरन्स रिन्यूअल ऑनलाइन असो किंवा त्याची खरेदी, तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी आवश्यक असलेल्यापेक्षा जास्त पैसे देत नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही  खाली दिलेल्या या टिप्स तपासणे आवश्यक आहे:

  • इन्शुरन्स कंपनीकडून थेट इन्शुरन्स खरेदी करा - तुमची इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना कोणताही एजंट किंवा ब्रोकर टाळा. बहुतेक इन्शुरन्स कंपन्या साध्या प्रक्रियेचे पालन करून त्यांची पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय देतात. हे तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून थेट पॉलिसी खरेदी करण्यास आणि कोणतेही मध्यस्थ आणि त्यानंतरचे शुल्क टाळण्यास मदत करते.
  • अत्यंत आवश्यक असलेले ॲड-ऑन घ्या  – पॉलिसीचा अंतिम निर्णय घेताना,  तुम्हाला खरोखर कोणत्या ॲड-ऑन कव्हरची आवश्यकता आहे हे तपासा. प्रत्येक ॲड-ऑन कव्हर प्रीमियम रकमेत भर घालते आणि जोपर्यंत तुम्हाला खरोखर त्यांची गरज नाही तोपर्यंत आपण ते टाळण्याची काळजी घेतली पाहिजे.
  • नो-क्लेम बोनस बेनिफिट्स तपासा- पॉलिसीधारकांना एका वर्षात त्यांच्या पॉलिसीमध्ये कोणतेही क्लेम न केल्यास नो क्लेम बोनस बेनिफिट्स दिले जातात. पुढील वर्षात पॉलिसीच्या प्रीमियमवर सवलत म्हणून हा लाभ दिला जातो.
  • व्हॉलंटरी डीडक्टिबल्स निवडा -  तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीवर व्हॉलंटरी डीडकटिबल्स निवडू शकता ज्यामुळे तुमचे इन्शुरन्स कव्हरेज सुरू होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या क्लेम्सचा काही भाग निकाली काढणे आवश्यक आहे. जर आपण या डीडक्टिबल्सची निवड केली, तर परिणामी आपण पॉलिसीसाठी तुमच्या प्रीमियम पेमेंटवर बचत करू शकता.

आता पॉलिसी आणि प्रीमियम कमी करण्याची सखोल माहिती घेऊन तुम्ही तुमच्या होंडा टू-व्हीलरसाठी योग्य पॉलिसी निवडण्यासाठी हालचाल केली पाहिजे. काही अतिरिक्त तथ्ये देखील खाली दिली आहेत जेणेकरून तुम्हाला काही प्रश्नांसाह मदत केली जाऊ शकते.

भारतातील ऑनलाइन होंडा बाईक इन्शुरन्स पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

जर मी मला इन्शुरन्स देणारी कंपनी बदलली, तरीही मी नो क्लेम बोनस घेण्यास पात्र आहे का?

होय, तुम्ही तरीही तुमचा नो क्लेम बोनस घेऊ शकता आणि तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलत असल्यास तुमच्या प्रीमियमचे शुल्क कमी करू शकता.

टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीच्या रिन्यूअलसाठी काय आवश्यक आहे ?

टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीच्या रिन्यूअलसाठी काही कागदपत्रे आणि माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.

  • टू-व्हीलर नोंदणी क्रमांक.
  • टू-व्हीलर चेसिस नंबर.
  • वाहन खरेदीची तारीख आणि जागा.
  • नाव आणि पत्त्याच्या पुराव्यासह तुमचा केवायसी तपशील.
  • टू-व्हीलरचे मॉडेल आणि त्याच्या उत्पादनाची तारीख.

जर माझ्याकडे थर्ड पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स प्लॅन नसेल तर काय होऊ शकते ?

जर तुम्हाला थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स प्लॅनशिवाय टू-व्हीलर चालवताना अधिकाऱ्यांनी पकडले, तर तुम्हाला एकतर 2000 रुपये दंड (वारंवार गुन्ह्यासाठी 4000 रुपये) किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये या दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात.