होंडा ॲक्टिवा खरेदी करू इच्छित आहात ? होंडा अॅक्टिवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला कोणत्या मॉडेल प्रकारांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, ते कशामुळे फायद्याचे ठरतात आणि खरेदीपूर्वी कोणत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे याची सविस्तर माहिती येथे पाहा.
होंडा ॲक्टिवा हे होंडा (Honda) मोटर कंपनीच्या बाईक/स्कूटर क्षेत्रातील सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे, भारतीय टू -व्हिलरच्या बाजारात यांच्या गाड्यांची १४ % पेक्षा जास्त टक्के विक्री होते. खिशाला परवडणारी, स्टायलिश आणि उच्च तंत्रज्ञानाने घडवलेली, ॲक्टिवा सरासरी भारतीय ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करते. (1)
जर तुम्ही हे मॉडेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर, ॲक्टिवा इन्शुरन्स खरेदी करणे ही पुढची महत्त्वाची पायरी आहे. ॲक्टिवाचे प्रत्येक मॉडेल अजून BS-VI चे पालन करणारे नाही. तथापि, होंडा या स्पेसिफिकेशनसह आणखी मॉडेल लॉन्च करण्याचा विचार करत आहे.
आता, होंडा अॅक्टिवा जरी इंडस्ट्री-फर्स्ट फीचर्सने सुसज्ज असली तरी ती इतर टू- व्हिलरप्रमाणेच अपघात आणि इतर जोखमींपासून पूर्ण सुरक्षित नाही. मात्र अशा घटनांमध्येच टू - व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे महत्त्वाचे व फायद्याचे ठरते.
शिवाय, भारतीय रस्त्यांवरून चालणाऱ्या प्रत्येक दुचाकी(टू -व्हिलर) वाहनासाठी थर्ड पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी असणे कायद्याने बंधनकारक आहे. या धोरणाशिवाय, तुम्हाला मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ नुसार २००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. वारंवार केलेल्या गुन्ह्यासाठी ४००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
मात्र टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसींबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी, एक मिनिट थांबा!
होंडा अॅक्टिवाबद्दलच्या काही महत्वपूर्ण तथ्यांवर एक नजर टाका, अॅक्टिवा टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी आणि ज्या कारणांसाठी तुम्ही पॉलिसी घेऊ इच्छिता आणि त्यातून आपण कसे जास्त फायदे मिळवू शकता याविषयी सविस्तर माहिती मिळवा :