टाटा टिगोर इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

टाटा टिगोर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिनिव करा

टाटा टिगोर ही टाटा मोटर्सने मार्च 2017 मध्ये लाँच केलेली सबकॉम्पॅक्ट सेडान कार आहे. थर्ड रिअर व्हॉल्यूम असलेली ही फोर डोअर सेडान आधुनिक वैशिष्ट्ये आणि कमी प्राइजमुळे भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय झाली. परिणामी, ऑक्टोबर 2018 मध्ये कंपनीने या कारचे स्पोर्टी व्हर्जन लाँच केले.

या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन मार्केटमध्ये आणल्यामुळे या भारतीय निर्मात्याने सप्टेंबर 2021 मध्ये टिगोरच्या सुमारे 5,100 युनिट्सची विक्री केली.

ही कार अद्ययावत ड्रायव्हिंग सुरक्षा वैशिष्ट्याने सुसज्ज असली तरी इतर वाहनांप्रमाणेच ही कार जोखीम आणि डॅमेज होण्याची शक्यता आहे. जर आपण ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण टाटा टिगोर इन्शुरन्स प्लॅन घेण्याचा विचार केला पाहिजे. एक वैध इन्शुरन्स पॉलिसी अपघातामुळे उद्भवणाऱ्या आपल्या आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटीझना कव्हर करते.

आपल्या गरजा लक्षात घेऊन अनेक कंपन्या इन्शुरन्स उत्पादनांची रेंज देतात. अशीच एक कंपनी म्हणजे डिजिट.

खालील भागात डिजिटसारख्या नामांकित इन्शुरन्स कंपनीकडून टाटा टिगोरसाठी कार इन्शुरन्स घेण्याचे फायदे स्पष्ट केले आहेत.

टाटा टिगोर कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा टाटा टिगोर कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

टाटा टिगोरसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

वैयक्तिक अपघात इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

टाटा टिगोर इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावे?

आपल्या टाटा कारसाठी सर्वोत्तम इन्शुरन्स प्लॅन निवडण्यासाठी, आपण योग्य संशोधनानंतर वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या अनेक पॉलिसींची ऑनलाइन तुलना केली पाहिजे. हे करत असताना, आपण टाटा टिगोरसाठी डिजिटवरून इन्शुरन्सचा विचार करू शकता आणि आपले पर्याय स्ट्रीमलाइन करू शकता

1. एकाधिक इन्शुरन्स पर्याय

आपण डिजिट इन्शुरन्सची निवड केल्यास, आपण खालील पर्यायांमधून आपल्या आवडीची पॉलिसी निवडू शकता:

  • थर्ड पार्टी कार इन्शुरन्स: जेव्हा आपली टाटा कारला झालेल्या अपघातादरम्यान थर्ड पार्टी वाहन, व्यक्ती किंवा मालमत्तेचे डॅमेज करते तेव्हा हा बेसिक इन्शुरन्स फायदेशीर ठरतो. तसेच अशा अपघातांमुळे निर्माण होणाऱ्या खटल्यांच्या समस्यांकडेही लक्ष दिले जाते. अशा प्रकारे, आपण डिजिटवरून थर्ड-पार्टी टिगोर इन्शुरन्स पॉलिसी मिळवू शकता आणि आपली लायबिलिटी कमी करू शकता.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स: आपल्या टाटा कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्लॅनमध्ये थर्ड पार्टी डॅमेज कव्हर केले जात असले तरी ते स्वतःच्या कारच्या डॅमेजसाठी कव्हरेज देत नाही. या संदर्भात, आपण या प्रदात्याकडून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टाटा टिगोर इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकता आणि स्वत: च्या कार डॅमेजची दुरुस्ती करताना आपले पैसे वाचवू शकता.

2. सुलभ क्लेम प्रोसेस

डिजिट क्लेम प्रोसेस त्याच्या टेक्नॉलजी-ड्रिव्हन प्रक्रियेमुळे निर्बाध आणि त्रासमुक्त आहे. याचा अर्थ आपण आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या टाटा टिगोर इन्शुरन्स प्लॅनच्या अनुषंगाने ऑनलाइन क्लेम फाइल करू शकता. याव्यतिरिक्त, आपण आपल्या फोनच्या सेल्फ-इन्स्पेक्शन वैशिष्ट्यामुळे आपल्या कारचे डॅमेज शूट करू शकता आणि यामुळे क्लेमची अमाऊंट प्राप्त व्हायायला कमी टर्नअराउंड वेळ लागतो.

3. नेटवर्क गॅरेजची रेंज

संपूर्ण भारतात अनेक डिजिट नेटवर्क गॅरेज आहेत जिथून आपण आपल्या टाटा टिगोर दुरुस्तीवर कॅशलेस सुविधेचा फायदा उठवू शकता. दुरुस्तीच्या कॅशलेस पद्धतीनुसार, आपल्याला दुरुस्ती सेवांचा फायदा घेण्यासाठी काहीही देण्याची आवश्यकता नाही कारण इन्शुरन्स कंपनी आपल्यावतीने दुरुस्ती केंद्रास पैसे पे करेल.

4. अॅड-ऑन फायदे

डॅमेजपासून अतिरिक्त संरक्षणासाठी, आपण अतिरिक्त शुल्क भरून डिजिटच्या आपल्या टाटा टिगोर इन्शुरन्स प्लॅन व्यतिरिक्त काही अॅड-ऑन कव्हर विकत घेऊ शकता. काही अॅड-ऑन फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • कंझ्युमेबल कव्हर
  • झीरो डेप्रीसीएशन कव्हर
  • रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
  • रोडसाइड असिसटन्स
  • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर

 

अशा प्रकारे, आपल्या टाटा टिगोर इन्शुरन्स कॉस्टमध्ये नाममात्र वाढ करून, आपण वरीलपैकी कोणतीही अॅड-ऑन पॉलिसी समाविष्ट करू शकता.

5. सोपी ऑनलाइन खरेदी

डिजिटवरून टाटा टिगोर इन्शुरन्स रिनिवलचा पर्याय निवडून, आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन प्लॅन खरेदी करू शकता. या प्रक्रियेत, आपण फक्त दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करू शकता आणि काही मिनिटांत आपली खरेदी पूर्ण करू शकता.

6. बोनस आणि डिसकॉउंट्स

टाटा टिगोर इन्शुरन्स रिनिवल प्राइजवर डिजिट 50% पर्यंत नो क्लेम बोनस ऑफर करते. जर आपण एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ आपल्या पॉलिसी मुदतीत क्लेम्स केले नाहीत तरच आपण हे डिसकाऊंट मिळवू शकता आणि आपला पॉलिसी प्रीमियम कमी करू शकता.

7. आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन

टाटा टिगोर इन्शुरन्सची प्राइज आपल्या कारच्या इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूवर (आयडीव्ही) अवलंबून असते. अशा प्रकारे, आपण जास्तीत जास्त फायद्यासाठी आपल्या कारसाठी योग्य आयडीव्ही निवडावा. डिजिटसारखे इन्शुरर्स आपल्याला कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय हे मूल्य कस्टमाइज करण्याची परवानगी देतात.

8. लवचिक ग्राहक सपोर्ट

काही प्रश्न किंवा शंका असल्यास, आपण आपल्या इच्छेनुसार डिजिटच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकता. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही ते 24×7 उपलब्ध असतात. म्हणूनच, आपण त्याच्या उत्तरदायी ग्राहक सपोर्टसाठी आपल्या प्रश्नांच्या जलद निराकरणाची अपेक्षा करू शकता.

शिवाय, डिजिटची फायद्यांची यादी इथेच संपत नाही. जर आपण आपल्या टाटा टिगोर इन्शुरन्स प्लॅनवर कमी क्लेम्स करत असाल आणि कमी प्रीमियममध्ये खरेदी करण्याची अपेक्षा करत असाल तर त्याचे उच्च डीडक्टीबल प्लॅन आपल्यासाठी आदर्श ठरू शकते.

टाटा टिगोरसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

सबकॉम्पॅक्ट सेडानमध्ये जे काही उपलब्ध आहे, त्याचे आपल्याला संरक्षण करायला नको का? आम्हाला खात्री आहे की याचे उत्तर आपण होय म्हणून देणार! कार इन्शुरन्स आवश्यक आहे कारण आपल्या कारचे डॅमेज, अपघात, चोरी किंवा प्रवासी, ड्रायव्हर यांना इजा झाल्यास तो आपला एक्सपेन्स कव्हर करतो. 

  • आर्थिक लायबिलीटीझपासून बचाव करते: कारचे मेंटेनन्स करणे महागात पडते हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि जर आपल्याला अपघात, दंगल किंवा तोडफोड अशा काही दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागत असेल तर आपल्या कारचे डॅमेज होण्याची शक्यता आहे. तसेच जर आपण जास्त लोकवस्तीच्या शहरी भागात कार घेत असाल तर बंपर ते बंपर ट्रॅफिकमुळे कारवर स्क्रॅच आणि ठोके पडण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी इन्शुरन्स आपली कार रिस्टोअर करण्यासाठी आपले पैसे वाचवण्यासाठी मदत करू शकतो.
  • कायदेशीररित्या अनुपालीत: योग्य इन्शुरन्स शिवाय आपली टाटा टिगोर चालविल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. सप्टेंबर 2019 मध्ये मोटर व्हेइकल अॅक्ट मधील नवीन दुरुस्तीनुसार कार इन्शुरन्स शिवाय ड्राइव्ह करणे बेकायदेशीर आहे आणि त्याला मोठा दंड (2000-4000 रुपये) होऊ शकतो आणि 3 महिन्यांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो
  • थर्ड पार्टी लायबिलिटी: या प्रकारचा इन्शुरन्स जर आपण दुसऱ्या एखाद्याच्या कार किंवा मालमत्तेच्या डॅमेजसाठी / दुखापतीसाठी, अपघाताच्या दुर्दैवी घटनेत किंवा त्यासारख्या दुर्दैवी घटनेत जबाबदार असाल तर आपल्याला संरक्षण कव्हरेज प्रदान करतो. असे एक्सपेनसेस बहुधा अचानक आणि अनपेक्षित असतात आणि त्या वेळी आपण आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हाताळण्यास कदाचित तयार नसतो, अशा वेळीस हा इन्शुरन्स आपल्या कामी येतो आणि आपल्याला व आपल्या खिशाला चाट पडण्यापासून वाचवतो.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेजसह व्यापक कव्हरेज: हे आपल्या आवश्यकतेनुसार सुधारित केले जाऊ शकते; आपल्या टिगोरसाठी अतिरिक्त इन्शुरन्स संरक्षण म्हणून अशा इन्शुरन्सची निवड करणे देखील शहाणपणाचे मानले जाते. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर, नावाप्रमाणेच, आग, चोरी, नैसर्गिक / मानवनिर्मित आपत्ती, तोडफोड, निसर्ग / हवामान इ. सारख्या आपल्या नियंत्रणाबाहेरील घटकांमुळे होणारे सर्व डॅमेज व्यापकपणे कव्हर करते. एकाधिक उपलब्ध असलेल्या अॅड-ऑन सह खरेदी करा आणि 100% कव्हरेजचा आनंद घ्या. अशा प्रकारचे कव्हरेज म्हणजे आपला खरोखरचा मित्र आहे.

टाटा टिगोर बद्दल अधिक जाणून घ्या

टाटा मोटर्सने मार्च 2017 मध्ये भारतात लाँच केलेली टिगोर ही सबकॉम्पॅक्ट सेडान कार आहे. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, ही 'सेडान फॉर द स्टार्स' आहे. लूकमध्ये आलिशान, कामगिरीमध्ये शानदार आणि सध्याच्या जगातील असलेली ही कार स्टार्ससाठी नक्कीच आहे. टियागो सारख्या हॅचबॅकच्या तुलनेत जीचे आणि टाटा टिगोरचे आधारभूत गोष्टी आणि डिझाईन एकच आहे त्याच्या पेट्रोल इंजिन कारची प्राइज 5.75 लाख रुपये आणि डिझेल इंजिन कारची प्राइज 6.22 लाख रुपये आहे. टाटा मोटर्स या वर्षी खासगी खरेदीदारांसाठी टाटा टिगोर ईव्ही ची अधिक शक्तिशाली व्हर्जन सादर करणार आहे.

आपण टाटा टिगोर का खरेदी करावे?

टिगोर ही टाटाची स्टायलिश कॉम्पॅक्ट सेडान हायवे, हिल्स, सिटी आणि काही प्रमाणात ऑफ रोडिंग अशा सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी अतिशय योग्य आहे आणि याद्वारे ती स्वतः साठी एक वेगळी व्याख्या तयार करते. टिगोर तरुण खरेदीदारांसाठी आहे जे कारमध्ये 'ड्रायव्हिंगचा आनंद' शोधत आहेत.

स्लीक, क्रोम-लाइन्ड दरवाजांचे हँडल्स, स्टायलिज्ड आणि लक्षवेधी एलईडी टेल लॅम्प्स, सिग्नेचर लुकसाठी स्टायलिश इंटिग्रेटेड हाय-माउंटेड एलईडी स्टॉप लॅम्प आणि शार्क-फिन अँटेना सारख्या वैशिष्ट्यांसह ही कार आकर्षक आहे आणि लक्ष वेधून घेते. एक्सटीरियरचे डिझाईन स्टायलिश आहे आणि इंटिरिअर पण अगदी तसेच स्टायलिश आहे. टायटॅनियम कलर फॉक्स चामडयाचे सीट, प्रीमियम ब्लॅक आणि ग्रे थीम, पुरेशी युटिलिटी स्पेस असलेली टिगोर सुंदरतेने नटलेली आहे.

टाटा टिगोर इजिप्शियन ब्लू, रोमन सिल्व्हर, बेरी रेड, टायटॅनियम ग्रे सह इतर आणि एक्सई, एक्सएम, एक्सएमए, एक्सझेड, एक्सझेड+ आणि एक्सझेडए + या 6 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, यापैकी 4 मॅन्युअल आणि 2 ऑटोमॅटिक आहेत.

टिगोरच्या 2018 च्या सुधारित व्हर्जनमध्ये फ्रंट हेडलाइट्स आणि ग्रिलमध्ये बदल तसेच नवीन क्रोम, सीटसाठी नवीन रंग आणि अलॉय व्हील्स आहेत. तसेच अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कम्पॅटिबिलिटीसह नवीन 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.

टाटा टिगोरच्या व्हेरिएंट्सची प्राइजची यादी

टाटा टिगोर व्हेरियंट्स प्राइज (मुंबईमध्ये, शहरांमध्ये भिन्न असू शकते)
एक्सई ₹6.70 लाख
एक्सएम ₹7.39 लाख
एक्सझेड ₹7.86 लाख
एक्सएमए एएमटी ₹8.02 लाख
एक्सझेड प्लस ₹8.56 लाख
एक्सझेडए प्लस एएमटी ₹9.19 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

टाटा टिगोर इन्शुरन्स प्लॅन घेणे मॅनडेटरी आहे का?

मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार मोठा ट्रॅफिक दंड टाळण्यासाठी प्रत्येक ड्रायव्हरकडे किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे.

टाटा टिगोरसाठी टायर प्रोटेक्ट कव्हरअंतर्गत कोणत्या प्रकारचे टायर डॅमेज कव्हर केले जाते?

टायर कापणे, फुगणे किंवा फुटणे टायर प्रोटेक्ट कव्हरखाली समाविष्ट होते. अतिरिक्त एक्सपेनसेस साठी आपण आपल्या टाटा टिगोर इन्शुरन्स प्लॅन व्यतिरिक्त हा फायदा मिळवू शकता.