फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स
फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स प्राइज त्वरित तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

तायगुन इन्शुरन्स: फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिवल

जर्मन मोटर वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगन आपल्या मध्यम आकाराची एसयूव्ही तायगुन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. 5 सीटर युनिट भारतात 23 सप्टेंबर 2021 रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.

तायगुन एमक्यूबी-ए0-आयएन प्लॅटफॉर्मवर बनविली गेली आहे आणि आधुनिक वैशिष्ट्ये, प्रीमियम इंटिरियर आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी पॅक केलेली आहे. त्यामुळे फॉक्सवॅगनची ही नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांनी अपघात आणि इतर दुर्घटनांपासून आर्थिक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्सचा पर्याय निवडला पाहिजे.

तसेच मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार भारतीय रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक कारसाठी थर्ड पार्टी लायबिलिटी कार इन्शुरन्स पॉलिसी मॅनडेटरी आहे. या स्कीम मध्ये थर्ड पार्टीचे नुकसान कव्हर केले जाते. वैकल्पिकरित्या, आपण थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि आपल्या स्वत: च्या कारसाठी संरक्षण या दोन्हीसाठी आर्थिक कव्हरेज सुरक्षित करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स घेऊ शकता.

आपल्याला अनेक इन्शुरन्स प्रदाते सापडतील जे विनाअडथळा फोक्सवॅगन तायगुन इन्शुरन्स प्रदान करण्याचा क्लेम करतात. डिजिट हा असेच एक इन्शुरर आहे.

पुढील भागात आपल्याला तायगुनची काही वैशिष्ट्ये, त्याच्या व्हेरियंटचे प्राइजेस, कार इन्शुरन्सचे महत्त्व आणि डिजिटने ऑफर केलेले फायदे यांची माहिती होईल.

फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज पॉलिसीसाठी)
ऑक्टोबर-2021 29,639

**अस्वीकरण- फोक्सवॅगन तायगुन जीटी प्लस 1.5 टीएसआय डीएसजी पेट्रोल 1498.0 जीएसटी वगळून प्रीमियम कॅलक्युलेट केले जाते.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - ऑक्टोबर, एनसीबी - 0%, अॅड-ऑन नाही, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन ऑक्टोबर-2021 मध्ये केले जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचा डिटेल्स एंटर करून अंतिम प्रीमियम तपासा.

फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटचा फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स निवडण्याची कारणे?

कोणती कार खरेदी करायची हे निवडण्याबरोबरच कार इन्शुरन्स खरेदी करणे हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय आहे. तथापि, विश्वासार्ह आणि सुलभ इन्शुरर निवडल्याने बराच फरक पडतो. उदाहरणार्थ, डिजिट आपल्या वैविध्यपूर्ण ग्राहकांना सेवा देण्यासाठी खालील फायदे प्रदान करते.

  • डिजिटायज्ड क्लेम करायची प्रोसेस - डिजिटमुळे आपल्याला आपला क्लेम सेटल होण्याची वाट पाहावी लागणार नाही. इन्शुरन्स प्रदाता त्वरित क्लेम्स फाइल करण्यासाठी स्मार्टफोन-सक्षम सेल्फ इन्स्पेक्शन सिस्टम उपलब्ध करतो. आता, वैयक्तिक मूल्यांकनाचा त्रास दूर करण्यासाठी, आपल्याला तायगुन इन्शुरन्सवर आपल्या क्लेमला सपोर्ट करण्यासाठी फक्त फोटो पाठवावे लागतील.
  • उच्च क्लेम सेटलमेंट रेशिओ - एक जबाबदार इन्शुरन्स प्रदाता म्हणून, डिजिट कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त क्लेम सेटलमेंटची हमी देते. त्याच्या विश्वासार्हतेत भर घालण्यासाठी उच्च क्लेम सेटलमेंट रेशिओचा रेकॉर्ड आहे.
  • वैयक्तिकृत आयडीव्ही(IDV) अमाऊंट - इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू प्राप्त करण्यासाठी वाहनाच्या एक्स-शोरूम प्राइज मधून डेप्रीसीएशन डीडक्ट केला जातो. आता, आपण आपल्या फोक्सवॅगन टायगुन इन्शुरन्स कॉस्ट मध्ये किंचित वाढ करून आपली आयडीव्ही रक्कम कस्टमाइज करू शकता. हे आपल्याला कधीही भरून न येणारे डॅमेज, पूर्ण नुकसान किंवा चोरी सारख्या परिस्थितीत उच्च कॉम्पपेनसेशन मिळविण्यात मदत करेल.
  • अतिरिक्त कव्हरची विस्तृत रेंज - या फायद्यांव्यतिरिक्त, डिजिट आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर्सना 7 अतिरिक्त कव्हरच्या सुविधा उपलब्ध करते. त्यांपैकी काही खालील प्रमाणे आहेत -
  1. झीरो डेप्रीसीएशन कव्हर
  2. रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
  3. इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर
  4. ब्रेकडाउन असिसटन्स
  5. कंझ्युमेबल कव्हर आणि इतर

तथापि, आपण आपल्या प्रीमियममध्ये कमीतकमी वाढीविरूद्ध यापैकी कोणतेही कव्हर आपल्या पॉलिसीमध्ये जोडू शकता.

  • नेटवर्क गॅरेज भारतभर - डिजिटचे भारतभर 6000+ गॅरेजचे नेटवर्क आहे, आणि हे सगळे गॅरेजेस कॅशलेस दुरुस्तीची सुविधा देतात. म्हणून, आपण कोठेही असाल तरीही, आपल्याला आपल्या स्थानाच्या आसपास नेटवर्क गॅरेज सापडेल.
  • सोयीस्कर पिकअप, दुरुस्ती आणि ड्रॉप सेवा - असे होऊ शकते की आपली तायगुन ड्राइव्ह करण्याच्या योग्य स्थितीत नाही. अशा परिस्थितीत, आपण त्रास टाळण्यासाठी डिजिट नेटवर्क कार गॅरेजमधून डोरस्टेप पिकअप, दुरुस्ती आणि ड्रॉप सुविधेचा पर्याय निवडू शकता.
  • चोख कस्टमर केअर सेवा - फॉक्सवॅगन टायगन इन्शुरन्स रिनिवल किंवा खरेदी प्रोसेसबाबत आपल्याला काही प्रश्न असल्यास आपल्या सोयीनुसार डिजिटशी संपर्क साधा. डिजिटचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह्स 24X7 उपलब्ध असतात.

हे सर्व फायदे डिजिटच्या भारतातील व्यापक लोकप्रियतेचा पुरावा म्हणून काम करतात. तथापि, वाहन मालकांनी फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्सचे प्रीमियम कमी करण्यासाठी काही टिप्स देखील जाणून घेतल्या पाहिजेत.

लक्षात ठेवा, उच्च डीडक्टीबल्स आणि लहान क्लेम्स प्रीमियमची अमाऊंट लक्षणीयरीत्या कमी करतात. तथापि, कमी प्रीमियम विविध प्रकारच्या फायद्यांची हमी देत नाहीत. त्यामुळे ही प्रक्रिया सविस्तर समजून घेण्यासाठी डिजिटसारख्या विश्वसनीय इन्शुररशी संपर्क साधा.

फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

प्रत्येक भारतीय कार मालकाने कारचे डॅमेज होऊ शकते अशा दुर्दैवी परिस्थितीपासून तयार राहणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या आर्थिक रक्षणासाठी वैध कार इन्शुरन्स आवश्यक आहे. शिवाय, फोक्सवॅगन तायगुन इन्शुरन्सची प्राइज भरणे हा दंड आणि डॅमेज दुरुस्तीमुळे नुकसान सहन करण्यापेक्षा परवडणारा पर्याय आहे.

भारतातील कार इन्शुरन्स पॉलिसीची आवश्यकता दृढ करण्यासाठी खाली काही करणे दिली आहेत.

  • आर्थिक लायबिलिटीझ कव्हर करतात - जर आपली फोक्सवॅगन तायगुन अपघातात सापडली आणि खराब झाली तर आपण आपल्या सोयीनुसार रीएमबर्समेंट किंवा विनामूल्य दुरुस्तीचा पर्याय निवडू शकता. तथापि, आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असेल तरच आपण या फायद्यांसाठी पात्र आहात. शिवाय तायगुन बाजारात नवीन असल्याने दुरुस्ती आणि सुट्या भागांची कॉस्ट खूप जास्त आहे. यावरून कार इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व पटते.
  • थर्ड पार्टी शुल्कापासून संरक्षण - थर्ड पार्टी कार इन्शुरन्स कोणत्याही थर्ड पार्टी क्लेम्सपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते. हे व्यक्ती किंवा मालमत्ता दोन्हीसाठी असू शकते. डिजिटसारख्या नामांकित इन्शुरन्स प्रदात्या अपघातात सामील असलेल्या खटल्याच्या काही समस्या असल्यास त्यांचे व्यवस्थापनासाठी सुद्धा पॉलिसी देतात.
  • भरमसाठ दंड किंवा शिक्षेपासून बचाव - मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भारतातील प्रत्येक कार मालकाकडे थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर असणे आवश्यक आहे. त्यामुळे कार इन्शुरन्स पॉलिसीशिवाय वाहन ड्राइव्ह करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ₹ 2000 पर्यंत मोठा दंड भरावा लागणार आहे. आणि त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास आपल्याला ₹ 4000 पे करावे लागू शकतात. वाईट प्रकरणांमध्ये, आपले लायसन्स जप्त केला जाऊ शकतो किंवा आपल्याला 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसह अतिरिक्त कव्हर प्रदान करते - नावाप्रमाणेच, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी मध्ये आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील इतर घटकांमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या डॅमेजचा व्यापकपणे समावेश आहे.
  • नो क्लेम बोनस मिळतो- आपण प्रत्येक नॉन-क्लेम वर्षासाठी आपल्या फोक्सवॅगन तायगुन इन्शुरन्स रिनिवल प्राइजवर डिसकाऊंट मिळवू शकता. सलग पाच वर्षे क्लेम न केल्यास डिजिटसारख्या इन्शुरन्स कंपन्या प्रीमियमवर 50% पर्यंत सूट देतात.

या नियमित फायद्यांव्यतिरिक्त, डिजिटसारखे लोकप्रिय इन्शुरन्स प्रदाता अखंड अनुभव सुनिश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करतात. तसेच, जर आपण डिजिटवरून फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिनिवल केले तर आपण चोरी, आगीमुळे होणारे डॅमेज, अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि अश्याच बऱ्याच गोष्टींसाठी जास्तीत जास्त कव्हरेजची अपेक्षा करू शकता.

फोक्सवॅगन तायगुन बद्दल अधिक माहिती

नवीन तायगुन प्रगत टेक सोल्यूशन्ससह पॉवर-पॅक्ड आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह त्या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत.

तायगुनने आपल्याला काय ऑफर करते ते आपण पटकन पाहूया.

  • तायगुनमध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे ज्यात 3-सिलिंडर 1.0-लीटर टर्बो-चार्ज्ड आणि 4-सिलिंडर 1.5-लीटर टीएसआय युनिट आहे. हे इंजिन 115 बीएचपी पॉवर निर्माण करू शकते आणि 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिटसह जोडले गेले आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक इंजिन देण्यात आले आहे.
  • आपल्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी तायगुनने अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी 10 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टिम दिली आहे. यात व्हेंटिलेटेड पुढची सीट, डिजिटल डिस्प्ले, मागचे दिसणारा कॅमेरा, इलेक्ट्रिक सनरूफ, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि बरेच काही देण्यात आले आहे.
  • फोक्सवॅगनने आपल्या सर्व अलीकडील मॉडेल्सप्रमाणेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ईएससी, हिल-होल्ड कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज पॉइंट्स, रियर पार्क डिस्टन्स कंट्रोल सिस्टीम आदी जागतिक दर्जाचे सुरक्षा वैशिष्ट्ये बसवले आहेत.
  • फोक्सवॅगनने सिंगल स्लॅट क्रोम ग्रिल आणि चौकोनी आकाराचे एलईडी हेडलाइट्स आणि इंटिग्रेटेड हॉरिझोंटल एलईडी डीआरएल खुबीने बसवले आहेत. पुढच्या भागात, क्रोम ग्रिल आणि फॉग लाइट्ससह ड्युअल टोन बंपर मिळेल. खालच्या बाजूला चांदीची फौक्स प्लेट आहे.
  • तायगुनकडे त्याच्या क्लासमधील सर्वात विस्तारित व्हीलबेस आहे आणि सेंटर कंसोल, आर्मरेस्ट आणि डोर पॅडवर पुरेशी जागा देण्यात अली आहे. फर्म कुशन पुढच्या सीट मोठ्या आहेत आणि लॅटरल बोल्स्टरिंगला सपोर्ट करतात. रुंद प्रवेशामुळे मागील सीटवर सहजपणे बसता आणि उठता येते.

तायगुनची किंमत ₹ 10 लाख आणि टॉप-स्पेक व्हेरियंटची किंमत सुमारे ₹ 16 लाख (एक्स-शोरूम प्राइज) असेल.

तायगुनमध्ये ही लम्पसम अमाऊंट इन्वेस्ट करण्यापूर्वी, जास्तीत जास्त आर्थिक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कार इन्शुरन्स पॉलिसीचे पर्याय तपासा. आपली आर्थिक जबाबदारी कमी करण्यासाठी डिजिट किफायतशीर फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स उपलब्ध करून देते.

फोक्सवॅगन तायगुन - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
फोक्सवॅगन तायगुन 1.0 टीएसआय कम्फर्टलाइन ₹10.49 लाख
फोक्सवॅगन तायगुन 1.0 टीएसआय हायलाइन ₹12.79 लाख
फोक्सवॅगन तायगुन 1.0 टीएसआय हायलाइन एटी ₹14.09 लाख
फोक्सवॅगन तायगुन 1.0 टीएसआय टॉपलाइन ₹14.56 लाख
फोक्सवॅगन तायगुन 1.5 टीएसआय जीटी ₹14.99 लाख
फोक्सवॅगन तायगुन 1.0 टीएसआय टॉपलाइन एटी ₹15.90 लाख
फोक्सवॅगन तायगुन 1.5 टीएसआय जीटी प्लस ₹17.49 लाख

भारतातील फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तायगुन कार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत एक्सक्लूजन्स काय आहेत?

कार इन्शुरन्स प्लॅन खालील कव्हरेज देत नाही-

  • तायगुनचे वाढलेले वय आणि विअर व टीयर
  • इलेक्ट्रिकल बिघाड
  • दारू, अंमली पदार्थ व इतर मादक पदार्थांमुळे डॅमेज झाले
  • वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या ड्रायव्हरने केले डॅमेज
  • कॉन्सीक्वेनशियल नुकसान

 भारताबाहेर झालेले डॅमेज

मी एका वर्षात माझ्या फोक्सवॅगन तायगुन कार इन्शुरन्सवर किती क्लेम्स फाइल करू शकतो?

आपण वर्षभरात आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीवर हवे तितके क्लेम्स फाइल करू शकता. तथापि, नेहमी लक्षात ठेवा की कार इन्शुरन्स क्लेम्स नो क्लेम बोनस फायद्यावर परिणाम करतात. तसेच, वर्षभरात वारंवार क्लेम्स केल्यास पॉलिसी रिनिवलनंतर आपले प्रीमियम वाढू शकते