फोक्सवॅगन टिगुआन ही महागडी कार आहे. त्यासाठी इन्शुरन्स खरेदी करावा लागेल. अनपेक्षित अपघाती परिस्थितीत कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला मदतनीस ठरेल. खालील गिष्टींमध्ये इन्शुरन्स पॉलिसी पे करेल.
कायदेशीर अनुपालन पूर्ण करते: मोटर व्हेइकल अॅक्टनुसार, भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी असणे मॅनडेटरी आहे. जर आपण कार इन्शुरन्स खरेदी केला नाही तर आपल्याला रु.2000/- दंड भरावा लागेल आणि/ किंवा 3 महिन्यांसाठी तुरुंगात टाकले जाईल.
थर्ड-पार्टी कायदेशीर लायबिलिटी कव्हर करते: आपण आपली कार ड्राइव्ह करताना थर्ड-पार्टीला दुखापत करू शकता किंवा त्यांच्या मालमत्तेचे डॅमेज करू शकता. अशा परिस्थितीत जर आपल्याला लायेबल धरले गेले तर दुरुस्ती किंवा ट्रीटमेंटची कॉस्ट आपल्याला करावी लागेल. थर्ड पार्टी कार इन्शुरन्स घेणे उपयुक्त ठरेल कारण आपला इन्शुरर आपल्यावतीने या लायबिलिटीझची काळजी घेईल.
स्वतःचे डॅमेज झाल्यास त्याच्या दुरुस्तीला येणारी कॉस्ट पे करते: फोक्सवॅगन टिगुआनसाठी कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी किंवा आग इत्यादींमुळे उद्भवू शकणाऱ्या डॅमेजपासून वाचवेल. जर तुमची गाडी खराब झाली आणि दुरुस्तीची गरज भासली तर लागणारी कॉस्ट इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर केली जाईल. हे आपल्याला आपल्या बचतीचे संरक्षण करण्यास मदत करेल. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स नेहमीच सुचविला जातो कारण तो स्वत: चे नुकसान आणि थर्ड पार्टी लायबिलिटी देखील कव्हर करतो.
अॅड-ऑनसह कव्हरेज व्यापक करते: जर आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी असेल तरच आपण पॉलिसी कव्हरेज व्यापक करू शकता. वर नमूद केलेल्या घटनांमध्ये मूलभूत कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर आपले संरक्षण करते. त्या व्यतिरिक्त इतर नुकसानीसाठी, आपल्याला काही अतिरिक्त प्रीमियम भरून अॅड-ऑन कव्हरची आवश्यकता असेल. झिरो डेप्रिसिएशन कव्हर, टायर प्रोटेक्ट कव्हर, पॅसेंजर कव्हर, रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर, ब्रेकडाउन असिस्टन्स आणि कंझ्युमेबल कव्हर यांचा समावेश आहे.