भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये 2019 मध्ये लॉंच झालेली ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक ही पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ही दोन व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे आणि ही कार नाविन्यपूर्ण टेक्नोलॉजीज सह सुसज्ज आहे ज्यामुळे तुम्हाला सुपीरियर एक्सलेरेशन सह चित्तथरारक ड्रायव्हिंग अनुभव देते.
2020 मध्ये, कोना इलेक्ट्रिक कारला मिड-फेसलिफ्ट देण्यात आला आणि आता ती पुन्हा 2022 मध्ये भारतात आणली जाईल.
वैश्विक स्तरावर ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक या कारमध्ये 39.2 किवॅअ बॅटरी आणी 136 एचपीचे इंजिन आहे ज्यामुळे 304किमी रेंज मिळते आणि 64किवॅअ बॅटरी आणि 204 एचपी मोटर जी 483किमी रेंज देते. याउलट, भारतामधील व्हर्जन मध्ये लोअर-स्पेक मध्ये 39.2 किवॅअ बॅटरी आणि 136 एचपी इलेक्ट्रिक इंजिन आहे.
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक मध्ये 10.25 इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जे वॉइस कन्ट्रोल, रिमोट चार्जिंग, प्लग इन केलेली असताना कारला प्री-हीटा करण्यासाठी रिमोट क्लायमेट कन्ट्रोल साठी ब्लूलिंक कार टेकला सपोर्ट करते. यामध्ये तुम्हाला ब्लाइंड स्पॉट असिस्टंस, रिअर क्रॉस-ट्रॅफिक असिस्टंस, सेफ एक्झिट वॉर्निंग आणि ई-कॉल देखील आहे ज्यामुळे तुम्हाला अपघात झालेला असताना इमर्जन्सी सर्व्हिसेस बद्दल आपोआप सतर्क केले जाईल.
तरी, भारतामध्ये इलेक्ट्रिक कार ही संकल्पना नवीन असल्यामुळे अशी कार मेंटेन करणे महाग वाटू अहक्ते. त्यामुळे, ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे हा योग्य निर्णय ठरेल जेणेकरून तुम्ही रिपेअर आणि रिप्लेसमेंटचा उद्भवणारा खर्च टाळू शकता.
त्याचबरोबर, मोटर वेहिकल एक्ट 1988 अनुसार भारतामध्ये काइन्शुरन्स पॉलिसी अनिवार्य आहे.