जानेवारी 2022 मध्ये, ह्युंदाई भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टक्सन नावाची कॉम्पॅक्ट क्रॉसओवर SUV लाँच करेल.
संपूर्ण मॉडेलच्या फ्लुइडिक लाईन्स हिला क्लासी अपील देतात, तर ड्युअल प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी टेललाइट्स हिच्या नाविन्यपूर्ण शैलीत भर घालतात. नेव्हिगेशनसाठी 8-इंच स्क्रीन, ऍप्पलकारप्ले, अँड्रॉइड ऑटो, यूएसबी, एयुएक्स-इन, व्हॉईस असिस्टंस, 6 स्पीकर्स आणि बरेच काही यासारख्या अत्याधुनिक फिचर्ससह टक्सन लोड केली जाईल.
ह्युंदाई तेच 2.0-लिटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 2.0-लिटरचे डिझेल इंजिन 4थ्या जनरेशन प्रकारांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह इन्स्टॉल करेल.
शिवाय, व्हेरियंटला पूर्णपणे नवीन एक्सटेरिअर मिळेल, ज्यामध्ये इंटिग्रेटेड एलईडी डीआरएलसह ग्रिल, ब्रॉडर एअर डॅमसह बंपर, अँगुलर बॉडी क्लेडिंग, फ्लोटिंग रूफ डिझाइन, 19-इंच अलॉय व्हील आणि इतर फिचर्स आहेत. केबिनच्या आत, तुम्हाला सर्व-काळ्या अपहोल्स्ट्री, एसी व्हेंट्ससाठी टच कंट्रोल्स आणि बरेच काही मिळेल.
तुम्हाला 6 एअरबॅग्स, हिल असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM) सुरक्षेसाठी योग्य त्या संरक्षणाची पुष्टी करतील.
तरीही, असे प्रगत सुरक्षा फिचर्स असूनही, टक्सन अपघाती किंवा इतर कोणत्याही हानीपासून संपूर्ण संरक्षणाची हमी देत नाही. त्यामुळे, संभाव्य दुरुस्ती/रिप्लेसमेंट खर्च टाळण्यासाठी ह्युंदाई टक्सन कार इन्शुरन्स पॉलिसी घेणे हा एक योग्य पर्याय आहे.
याव्यतिरिक्त, 1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार, भारतात आपले वाहन कायदेशीररित्या चालविण्यासाठी कार इन्शुरन्स पॉलिसी सुरक्षित करणे अनिवार्य आहे.