ह्युंदाईने खूप कमी वेळातच मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.यासाठी ह्युंदाई वेरना मॉडेल मध्ये असे एडमिनिस्ट्रेशन डेव्हलप करण्यात आले ज्यामुळे कमी मेंटेनन्स कॉस्ट मध्ये उत्तम माईलेज मिळते. या कार मध्ये 1.5 लिटरचे चार-सिलेंडरचे 1497 सीसीचे पेट्रोल इंजिन आहे, ज्यामुळे 4500आरएमपी वर 144 एनएमचे टॉर्क आणि 6,300आरएमपी वर 113बीएचपीचे टॉर्क जनरेट होते. कारचे 1.0 लिटरचे टर्बो इंजिन सेवन-स्पीड डीटीसी ट्रांसमिशनची जोडलेले आहे.
कारच्या आतील कम्पोनंट्स ग्राहकांना कारकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. प्रीमिअम असे डूअल टोन बेज आणि फ्रंट/रिअर पॉवर विंडोज आणि रिअर एसी व्हेन्ट्स हे ह्युंदाई वेरनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएन्ट्स मध्ये स्टँडर्ड आहेत. तसेच, ही कार हिच्या डूअल फ्रंट एअर बॅग्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट आणि सेन्ट्रल लॉकिंग फीचर्स मुळे सर्वात सुरक्षित समजली जाते.या मॉडेल मध्ये फ्रंट सीट बेल्ट प्रीटेन्शनर्स, इम्पॅक्ट सेन्सिंग सह ऑटो डोअर अनलॉक, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्मोबिलायझर, आणि डूअल हॉर्न देखील आहे.
त्याचबरोबर, ह्युंदाईचे एक्सटीरिअर्स देखील तितकेच आकर्षक आहेत. कारचे वाईड क्रोम मेश ग्रील सह असलेले बम्पिंग आणि त्रिकोणी खाचेत बसवलेले गोल फॉगलॅम्प्स या मॉडेलला तिच्या मूल्य द्विगुणित करतात. हेडलॅम्प्सचे प्रकार प्रत्येक व्हेरीएंट प्रमाणे बदलतात. काहींना हॅलोजन हेडलॅम्प्स आहेत, तर काहींना प्रोजेक्टर हेडलॅम्प्स. या कारचे बेस रिम स्टीलच्या चाकांवर पळते, परंतु इतर व्हेरीएंट्सना राखाडी किंवा डायमंड-कट मिश्र धातूची चाकं आहेत.
तरी, ह्युंदाईने ऑफर केलेल्या या सर्व फीचर्स आणि फॅसिलिटीज असून सुद्धा एखादा पारंगत ड्रायव्हरला देखील ह्युंदाई वेरना चालवताना अपघातामुळे झालेल्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स कार सोबतच हतो-हात खरेदी करणे कधी ही मालकासाठी फायद्याचेच! तसेच, मोटर वेहिकल एक्ट 1988 प्रमाणे कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे बंधनकारक आहे.