ह्युंदाई ग्रँड आय10 निओस ही एक चालवायला अगदी सोपी अशी अर्बन हॅचबॅक ज्यामध्ये वर्ल्ड-क्लास फीचर्स आहेत आणि सोबतच यामध्ये आकर्षक लूक्स देखील आहेत. ही कार जुन्या ग्रँड आय10च्या ढाच्यावर आणखीन जास्त सोफेस्टीकेटेड पॅकेज मध्ये बनवली आहे. तसेच, ह्युंदाई पेट्रोल आणि डीझेल इंजिन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे आणी प्रत्येकामध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी ऑटो गिअर बॉक्स देखील आहेत.
ह्युंदाईमध्ये मोठी सिग्नेचर ग्रील, बूमरँग आकाराचे डीआरएल्स, एलईडी प्रोजेक्टर असलेले हेडलॅम्प्स आणि फॉग लॅम्प्स, 15 इंचाचे एलॉय व्हील्स, आणि स्पोर्टी लूकसाठी रूफरेल्स आहे. आता मॉडेलच्या आधारावर, तुम्ही डूअल-टोन ग्रे किंवा ब्लॅक कलरच्या इंटिरियर प्रमाणे निवड करू शकता.
कॅबिन मध्ये, 8 इंचाचे टचस्क्रीन इन्फोसिस्टम सह एक सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे जो एपल कार प्ले आणि एंड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतो.
या व्यतिरिक्त, वायरलेस चार्जर, यूएसबी पोर्ट, व्हॉईस रिकग्निशन, ब्लूटूथ कनेक्टीव्हिटी, रिअर एसी व्हेंट्स, 2 पावर आउटलेट्स, रिअर पार्किंग सेन्सर्स, कॅमेरा, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि इतर अनेक फीचर्स आहेत.
तुम्ही जर ही कार खरेदी केली असेल तर ह्युंदाई ग्रँड आय10 निओस कार इन्शुरन्स नक्की खरेदी करा जेणेकरून रिपेअर/रिप्लेसमेंट मुळे उद्भवणारे खर्च टाळता येतील.
तसेच, कार इन्शुरन्स पॉलिसी अनिवार्य आहे आणि कायदेशीर परिणाम आणि इतर जोखमींपासून तुम्हाला सुरक्षित ठेवते.