पल्सर विकसित करताना बजाजने कोणतीही कसर ठेवली नाही. त्यासाठी टोकियो रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि बाइक डिझायनर ग्लिन केर यांच्याबरोबर हातमिळवणी करण्यात आली होती.
बाजारात पल्सरचा प्रवेश होण्यापूर्वी भारतातील बाईक उत्पादनांचा भर इंधन-कार्यक्षमतेवर असे. त्यामुळे कमी क्षमतेच्या मोटार सायकल्सची चलती होती.
- 150cc आणि 180cc क्षमतेची मॉडेल्स परवडणाऱ्या किमतीत रुजू करून बजाज पल्सरने या बाजाराचा चेहरामोहराच बदलून टाकला. तेव्हापासून भारतातील दुचाकी ग्राहक उच्च शक्तिशाली बाइक खिशाला जड वाटणार नाही अशा किमतीत मिळण्याची अपेक्षा करू लागले.
- पल्सरच्या 200NS वगैरे नव्या मॉडेल्सना अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत. खास गोष्ट म्हणजे ती भारतातली सर्वात जास्त पुरस्कारप्राप्त बाईक आहे. एनडीटीव्हीच्या कार अँड बाइक अवॉर्ड्सचा बाईक ऑफ द इयर अवॉर्ड आणि इकॉनिमिक टाइम्स झिंगव्हील्सचा बाईक ऑफ द इयर पुरस्कारदेखील बजाज पल्सरला मिळाले आहेत.
- सरकारच्या प्रदूषण रोखण्याच्या धोरणाला अनुसरून बजाजने लवकरच BS-VI सुसंगत बाईकची श्रेणी आणण्यात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.
ही सर्व वैशिष्ट्ये पाहता बाजाज पल्सर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बाईकपैकी एक आहे यात काही नवल नाही. म्हणूनच फक्त डिसेंबर 2019 मध्येच बजाज पल्सरच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या 50,000 बाईक विकल्या गेल्या. (1)
पल्सरसारख्या मोठ्या बाईक अतिशय वेग धारण करू शकतात. त्यामुळेच चलवणाऱ्यासाठी तो एक थरारक अनुभव असतो.
पण वेगाची परिणीती दारुण अपघातात आणि त्यामुळे तुमचे आयुष्य आणि बाईक दोन्हींना धोका संभावण्यात होऊ शकते. इन्शुरन्समुळे अपघात तर टाळले जाऊ शकत नाहीत. पण ते झाल्यास तुमची आर्थिक जबाबदारी हलकी करण्याचे काम त्याने नक्कीच होते.
पण अशा प्रसंगी तुम्हाला पुरेसे संरक्षण मिळावे यासाठी तुम्ही तुमच्या बजाज पल्सरसाठी एखाद्या नामांकित इन्शुरन्सदात्याकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी डिजिट तुमच्या कसे कमी येऊ शकते हे बघा!