2019 मध्ये लॉंच केलेली, टाटा हॅरियर एक 5 सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे जी भारताच्या अग्रगण्य ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर टाटा मोटर्सने आपल्यासमोर आणली. 2018चा ऑटो एक्स्पो मध्ये जेव्हा ही कार ठेवण्यात आली तेव्हा तर या कारने प्रसिद्ध आणि विश्वस्त टाटा मोटर्सची गरिमा आणखीनच उंचावली. डिझाईन, परफॉरमन्स आणि बरेच काही, अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही हॅरियर खूपच लक्षवेधी सिद्ध झाली. लॉंच कॅम्पेनमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कार खऱ्याअर्थाने #सर्वतोपरी ठरली. हॅरियर टाटा बझार्ड स्पोर्ट सारखी देखील दिसते, यामुळेच या कारने प्रो-स्पोर्ट्स-स्टेटस देखील पटकावला कारण 2019च्या आयपीएल साठी ही कार त्यांची ऑफिशियल पार्टनर होती आणि बीसीसीआय सोबत जोडल्यानंतरचे या कारचे हे दुसरे वर्ष होते. बीसीसीआयच्या प्रत्येक मॅच मध्ये ही कार आपल्या ग्लॅमर आणि ट्रेंडी डिझाईन मध्ये झळकताना दिसत होती.
तुम्ही टाटा हॅरियर का खरेदी करायला हवी?
ही फाइव्ह डोअर कॉम्पॅक्ट एसयूव्ही अतिशय विचारांती बनवली गेली आहे, लांबच्या प्रवासासाठी आणि शहरामध्ये चालवण्यासाठी अगदी आरामदायक, सबकॉम्पॅक्ट टाटा नेक्सॉन आणि मिड-सेगमेंट टाटा हेक्सा यांच्या मधले हे मॉडेल आहे. भारतीय ग्राहकांसाठी हिची किंमत 13.02 - 16.87लाखपर्यंत आहे, या कारने टाटा मोटर्सचे भाग्यच बदलून टाकले. लोकप्रिय आणि प्रीमियम इंटिरियर्स आणि सुपर साईड कम्फर्टमुळे ही कार प्रभावशाली ठरते. 7 उबर रंगांमध्ये आणि लँड रोव्हर च्या लेजंडरी डी8 प्लॅटफॉर्मवरून प्रेरित ऑप्टिकल मॉड्युलर एफिशियंट ग्लोबल एडव्हांस्ड अर्कीटेक्चर- असलेली ही हॅरियर जणू एक पर्वणीच आहे.
कटिंग एज क्रायोटेक 2.0 लिटर डीझेल इंजिन असलेली ही कार, खडकाळ आणि उंच भूभागांमध्ये देखील अगदी अलगदपणे चालते, या कार मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), टेरेन रिस्पॉन्स मोड, क्रूज कन्ट्रोल आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. एआरएआय द्वारा प्रमाणित केल्याप्रमाणे टाटा हॅरियर डीझेल 17 किमी प्रति लिटर इतके मायलेज देते. रेन सेन्सिंग वायपर्स, लॅपटॉप ट्रे सह ग्लोव्हबॉक्स, विचारपूर्वक तयार केलेल्या 28 यूटिलिटी स्पेसेस, एडजस्टेबल स्टिरिंग व्हील, पीईपीएस, इलेक्ट्रॉनिकली चालणारे आउटर मीरर्स, रिअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, एचव्हीएसी सह एफएटीसी, स्टोरेज सह फ्रंट अर्मेस्ट ही सर्व या कारची लक्झुरियस फीचर्स आहेत जी तुम्हाला या सेगमेंटच्या इतर कोणत्याही कार मध्ये मिळणार नाहीत.
तर, ज्यांना कोणत्याही कम्फर्टशी तडजोड न करता चंकी, मस्क्युलर आणि पावरफुल बीस्ट चालवायला आवडते अशा सर्व वयोगटाच्या ग्राहकांना ही कार आकर्षित करते. शेवटी लँड रोव्हर सारखी कार कोणाला नाही आवडणार?