टाटा सफारी, आपल्याच देशातील ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर टाटा मोटर्सने 1998 मध्ये बनवलेली स्वदेशी कार आहे. ‘रील्क्लेम युअर लाईफ’, मेक युअर ओन रोड’ अशा टॅगलाईन असलेल्या जाहिरातींनी टाटा मोटर्सने भारतीय रस्त्यांवर प्रभुत्व स्थापित केले आणि रस्त्यावर टाटाच्या कार्सचे जणु वादळच उठले. यापासून शब्दशः प्रेरणा घेऊन टाटा ने त्यांच्या बीस्टचे इम्प्रूव्ह्ड व्हर्जन टाटा सफारी ‘स्टॉर्म’ या नावाने लॉंच केले.
मूळतः टाटा सफारी भारतीय बाजारामध्ये 1998 मध्ये लॉंच करण्यात आली. कालांतराने ग्राहकांच्या मागणीनुसार, टाटा मोटर्सने मूळ डिझाईनमध्ये अनेक बदल आणि सुधारणा केल्या, ज्यामुळे नवनवीन व्हेरियंट्सना पेव फुटला आणि तेव्हा जन्म झाला ‘टाटा सफारी डेकोर’ आणि ‘टाटा सफारी स्टॉर्म’चा. या मिड-साईज्ड एसयूव्हीला भरभरून यश मिळाले आणि प्रचंड लोकप्रिय झाली, अशा कारला अवॉर्ड नाही मिळाले तरच नवल, सफारी डेकोरला ओएंडएम साठी ओव्हरड्राईव्ह कॅम्पेन ऑफ द इअरचे अवॉर्ड मिळाले.
टाटा कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या.
तुम्ही टाटा सफारी का खरेदी करायला हवी?
याला असंख्य कारणे आहेत!! त्यातील काहींवर आपण इथे चर्चा करू! टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की सफारी स्टॉर्म (सफारी फॅमिलीची लेटेस्ट कार) ही त्यांनी ‘डिझाईन्ड टू डॉमिनेट, परफेक्टेड टू परफॉरमन्स’ या ब्रीद वाक्याला समोर ठेवून बनवली आहे आणि टाटा मोटर्सच्या तत्वांवर ठाम राहून या कारने तिचे वचन पाळले आणि इतिहास घडवला.
कारच्या ऐसपैस इंटिरियर, पर्याप्त हेडरूम, भव्य लेगरूम मुळे टाटा सफारी मध्ये लॉंग ड्राईव्ह म्हणजे जणु एक सुखद अनुभव. स्टायलिश इंटिरियर्स, बोल्ड आणि मजबूत बॉडी. टाटा सफरीच्या लेटेस्ट व्हेरियंटचे काही फीचर्स आहेत: 2.2एल व्हीएआरआयसीओआर 400चे best इन क्लास एडव्हान्स्ड इंजिन, सिक्स-स्पीड गिअर बॉक्स, 63 लिटर क्षमतेचा मोठा फ्युएल टँक, 14.1 प्रति लिटरचे मायलेज, ईएसओएफ, 200मिमी ग्राउंड क्लिअरन्स, नवीन आणि सुधारित मल्टी-फंक्शनल स्टिअरिंग व्हील, साईड-इम्पॅक्ट बार्स, ऑटोमॅटिक ओआरव्हीएम्स, थ्री-पोजिशन लंबर सपोर्ट मुळे तणाव-मुक्त ड्राईव्ह, उत्तम टर्निंग रेडियस, रूफ-माउंटेड रिअर एसी आणि इतर अनेक.
11.09 - 16.44 लाख (एक्स-शोरूम, दल्ली) किमतीची सफारी दावा करते की ही कोणत्याही भूभागावर अगदी सहज प्रभुत्व दाखवू शकते परंतु, जसे की या कारला खडकाळ आणि अवघड भूभागासाठीच डिझाईन केले गेले आहे, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की ही कार साहसी आणि वाऱ्याशी गप्पा मारण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक वरदानच ठरली आहे.
अपर-मिडल-क्लास सेगमेंटमधील फॅमिलीज लक्ष करून बनवण्यात आलेली ही कार तरुणांचीआणि इतरांचीही तितकीच लोकप्रिय ठरली आहे.