मारुती सुझुकी सेलेरियो इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिनिव करा

जपानी कंपनी सुझुकीने 2008 मध्ये मारुती सुझुकी सेलेरियो ही 5 दरवाजांची हॅचबॅक कार लाँच केली होती. या कारची दुसरी जनरेशन 2014 मध्ये स्टँडअलोन मॉडेल म्हणून भारतीय प्रवासी मार्केटमध्ये दाखल झाली. सध्या हे पेट्रोल आणि सीएनजी इंधन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय मार्केटमध्ये या मॉडेलची तिसरी जनरेशनही पाहायला मिळाली.

लाँचिंगच्या तारखेपासून, या मॉडेलमध्ये अनेक अपग्रेड केले गेले आहेत, ज्यामुळे दमदार कामगिरी आणि तडजोड न केलेली सुरक्षितता मिळते. यामुळे मारुतीने सेलेरियोसह अनेक मॉडेल्सच्या एकूण 57000 युनिट्सची विक्री केली.

जर आपण ही कार ड्राइव्ह करत असाल किंवा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्स घेण्याचा विचार केला पाहिजे. वैध कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये डॅमेजची दुरुस्ती करण्याची कॉस्ट समाविष्ट आहे जी अन्यथा आपल्या खिशाला चाट पाडू शकते.

आपल्या इन्शुरन्सच्या गरजा लक्षात घेऊन भारतातील अनेक कंपन्या आपल्या कार इन्शुरन्सवर आकर्षक डील्स आणि इतर सेवा फायदे देतात. अशीच एक इन्शुरन्स कंपनी म्हणजे डिजिट आहे.

खालील सेगमेंट डिजिटसारख्या प्रदात्यांकडून इन्शुरन्स मिळविण्याचे फायदे स्पष्ट करतो.

अधिक जाणून घेण्यासाठी वाचन सुरू ठेवा.

मारुती सेलेरियो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

आपण डिजिटचा मारुती सेलेरियो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

मारुती सुझुकी अर्टिगासाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड-पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या गाडीची चोरी

×

डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिटला का निवडावे?

आपल्या मारुती सुझुकी सेलेरियो कारसाठी सर्वोत्तम इन्शुरन्स निवडण्यासाठी, आपल्याला योग्य संशोधन करणे आणि ऑनलाइन विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना करणे आवश्यक आहे. या संदर्भात, आपण डिजिट इन्शुरन्सचा विचार करू शकता कारण ते खालीलप्रमाणे अनेक फायद्यांसह येते:

1. इन्शुरन्सचे अनेक पर्याय

जर आपण डिजिटवरून इन्शुरन्स पॉलिसी निवडत असाल तर आपण खालील प्रकारांमधून निवडू शकता:

  • थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी: ही भारतीय मोटार व्हेइकल अॅक्ट, 1989 द्वारे मॅनडेटरी केलेला मूलभूत इन्शुरन्स प्लॅन आहे. यात थर्ड पार्टी डॅमेज आणि खटल्यांचे प्रकरणांचा समावेश आहे. आपण हा प्लॅन डिजिटवरून मिळवू शकता आणि आपल्या मारुती कार आणि थर्ड पार्टी दरम्यान झालेल्या अपघातांमुळे उद्भवणारी जबाबदारी टाळू शकता.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी: चोरी, आग, नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्ती आणि इतर दुर्दैवी अपघातांमुळे आपल्या मारुती कारचे डॅमेज होऊ शकते. अशा परिस्थितीत, डिजिटकडून एक सर्वांगीण योग्य, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी आर्थिक मदत प्रदान करू शकते आणि आपले लायबिलिटी कमी करू शकते.

2. ॲड-ऑन फायदे

जर आपण मारुती सुझुकी सेलेरियोसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स निवडला असेल तर आपल्याकडे ॲड-ऑन कव्हर समाविष्ट करण्याचा आणि अतिरिक्त शुल्क पे करून विद्यमान पॉलिसीचे कव्हरेज वाढविण्याचा पर्याय आहे. झिरो डेप्रिसिएशन कव्हर, रोडसाइड असिस्टन्स, रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन आणि बरेच काही आपण समाविष्ट करू शकता. लक्षात घ्या की आपण आपल्या मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्स रिनिवल प्राइजमध्ये नाममात्र अमाऊंट पे करून या पॉलिसींचा समावेश करू शकता.

3. सोपी ऑनलाइन प्रक्रिया

मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्ससाठी स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या सोप्या अर्ज प्रक्रियेमुळे दस्तऐवज हार्ड कॉपी सबमिट करण्याची आवश्यकता नाही. यामुळे तुम्ही काही मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकता.

4. बोनस आणि डिसकाऊंट

मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्स रिनिवल दरम्यान, जर आपण आपल्या पॉलिसी टर्म मध्ये क्लेम-फ्री वर्ष राखण्यात यशस्वी असाल तर डिजिटसारख्या इन्शुरर्स पॉलिसी प्रीमियमवर डिसकाऊंट देतात. नो क्लेम बोनस म्हणून ओळखल्या जाणारे हे डिसकाऊंट्स आपल्या प्रीमियमच्या जास्तीत जास्त 50% पर्यंत असू शकतात.

5. भरपूर नेटवर्क गॅरेज

डिजिटचे भारतभर अनेक नेटवर्क कार गॅरेज आहेत जिथून आपण आपल्या मारुती कारसाठी व्यावसायिक दुरुस्ती सेवा मिळवू शकता. शिवाय, या गॅरेजमधून कॅशलेस सुविधेचा फायदा घेता येईल आणि दुरुस्ती केंद्रांना रोख रक्कम देणे टाळता येईल.

6. सुलभ क्लेम प्रोसेस

डिजिटच्या स्मार्टफोन-सक्षम सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रियेमुळे ग्राहकांना त्रासमुक्त क्लेम प्रोसेसची निवड करता येते. पारंपारिक प्रक्रियेच्या तुलनेत या प्रक्रियेस कमी वेळ लागतो जिथे तंत्रज्ञ डॅमेजसाठी आपल्या कारची तपासणी करतो. या प्रक्रियेत, आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे डॅमेज निवडू शकता आणि सहजपणे क्लेम्स फाइल करू शकता.

7. 24×7 ग्राहक सेवा

जर आपल्याला मारुती सुझुकी सेलेरियो इन्शुरन्स प्राइजबद्दल खात्री नसल्यास किंवा इतर कोणत्याही प्रश्नांना सामोरे जावे लागल्यास, आपण डिजिटच्या ग्राहक सपोर्टशी संपर्क साधू शकता आणि त्वरित समाधान मिळवू शकता. त्यांची उत्तरदायी ग्राहक सेवा राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24x7 तास उपलब्ध असते.

8. आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन

मारुती सुझुकी सेलेरियो इन्शुरन्सची प्राइज कारच्या इन्शुअर्ड डीक्लअर्ड व्हॅल्यूनुसार बदलते. कार चोरी किंवा न भरून येणारे डॅमेज झाल्यास आपल्याला मिळणाऱ्या रिटर्नच्या अमाऊंटवर निर्णय घेण्यापूर्वी इन्शुरर्स या मूल्याचे कॅलक्युलेशन करतात. ते कारचे डेप्रीसीएशन त्याच्या निर्मात्याच्या विक्री प्राइज मधून वजा करून या मूल्याचे मूल्यांकन करतात. तथापि, डिजिटसारख्या इन्शुरर्स आपल्याला हे मूल्य कस्टमाइज करण्याची आणि आपला रिटर्न जास्तीत जास्त करण्यास मदत करतात. अशा प्रकारे, सुझुकी सेलेरियो इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना, इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू एक विचार करणारा घटक आहे.

आता आपल्याला मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्स आणि डिजिटद्वारे देण्यात येणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती असल्याने आपण माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता. याव्यतिरिक्त, आपण व्हॉलंटरी डीडक्टीबल प्लॅनचा पर्याय निवडुन कमी प्रीमियम असलेली पॉलिसी निवडू शकता.

मारुती सुझुकी सेलेरियोसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

तुमची मारुती सेलेरियो जुनी असो वा नवीन, सर्व उत्तम कार्सना मोठ्या संरक्षणाची आवश्यकता असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मारुती सेलेरियोला कार इन्शुरन्स पॉलिसीद्वारे सुरक्षित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. कार इन्शुरन्सचे काही फायदे:

  • आर्थिक लायबिलिटीझ: कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स अंतर्गत ओन डॅमेज कव्हर आपल्याला आपल्या स्वत: च्या कारला झालेल्या डॅमेजमुळे झालेल्या आर्थिक लायबिलिटीझ साठी कव्हर करते. अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी किंवा तोडफोड, संप आणि दंगलींमुळे होणारे डॅमेज आणि नुकसानीपासून हे आपल्या कारचे संरक्षण करते.
  • कायदेशीररित्या अनुपालीत: कार इन्शुरन्स पॉलिसी असल्यास आपली कार भारतीय रस्त्यांवर ड्राइव्ह करणे कायदेशीर आहे याची खात्री होते. तसे न केल्यास आपल्याला रुपये 2,000 दंड होऊ शकतो आणि आपले लायसन्सही रद्द होऊ शकतो.
  • थर्ड पार्टी लायबिलिटी: चुका होतात. थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनाचे डॅमेज झाल्यास, आपली कार इन्शुरन्स पॉलिसी त्याद्वारे होणारे नुकसान कव्हर करेल.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर: कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच संपूर्ण कवच निवडणे, नेहमीच चांगले असते कारण ते केवळ थर्ड-पार्टीच्या डॅमेजसाठी कव्हर करत नाही जे मॅनडेटरी असते, तर अनपेक्षित परिस्थितीपासून आपले आणि आपल्या स्वत: च्या कारचे संरक्षण करते. याव्यतिरिक्त, आपल्याकडे कार इन्शुरन्स अॅड-ऑन आणि कव्हर सह आपली पॉलिसी कस्टमाइज करण्याचा पर्याय देखील आहे जसे की झीरो डेप्रीसीएशन कव्हर, ब्रेकडाउन असिसटन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर इत्यादी.

मारुती सुझुकी सेलेरियो बद्दल अधिक जाणून घ्या

मारुती सुझुकीने ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील काही बेस्ट कार मार्केट मध्ये आणल्या आहेत. मारुती सुझुकीची ही सेलेरियो कार कॉम्पॅक्ट आणि आरामदायी तर आहेच पण चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. वर्ल्ड ऑटो फोरम अवॉर्ड्स 2015 मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट इनोव्हेशन चा पुरस्कार देण्यात आला यात नवल नाही.

लांबच्या प्रवासासाठी ही कार पूर्णपणे विश्वासार्ह आहे आणि त्याची इंधन कार्यक्षमता 23.1 किमी प्रति लीटर आहे. मारुती सुझुकी सेलेरियोमध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन इंधन व्हेरियंट आहेत. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या स्टायलिश आणि क्लासी कारची किंमत 4.41 लाख रुपयांपासून सुरू होते

मारुती सुझुकी सेलेरियो तीन मॅन्युअल आणि दोन ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही कार महामार्गावर चालविण्यास सुरक्षित आहे आणि आपल्या दैनंदिन प्रवासात एक आदर्श साथीदार बनवते. 2014 साली लाँच झालेल्या या गाडीने तेव्हापासून चांगली कामगिरी केली आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो का खरेदी करावी?

मारुती सेलेरियोच्या तीन प्रकारांमध्ये एलएक्सआय, व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय चा समावेश आहे ज्यात एलएक्सआय (ओ), व्हीएक्सआय (ओ) आणि झेडएक्सआय (ओ) या प्रत्येक प्रकारासाठी वैकल्पिक आहेत. सेलेरियोच्या व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय मध्ये दोन ऑटोमॅटिक प्रकार आहेत. उत्तम नियंत्रणासाठी प्रत्येकात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, फोर्स लिमिटर, ड्रायव्हर एअरबॅग आणि फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर देण्यात आले आहे. ड्रायव्हरच्या एअरबॅगद्वारे सर्व व्हर्जनमध्ये सामान्य आहे परंतु ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये पॅसेंजर एअरबॅग देखील उपलब्ध आहे.

कारमध्ये जास्तीत जास्त 5 सदस्य सहज प्रवास करू शकतात. मारुती सेलेरियोची वैशिष्ट्ये बेस लेव्हलवरून लक्ष वेधून घेतात. या सेगमेंटमधील इतर कोणत्याही कारमध्ये एबीएस देण्यात आलेला नाही. एलएक्सआय मध्ये आपल्याला एयर कंडिशनिंग, इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टीअरिंग आणि ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर मिळते. व्हीएक्सआय सारख्या मॉडेल्ससाठी आपल्याला अतिरिक्त फ्रंट आणि रिअर पॉवर विंडो, रिअर व्ह्यू मिररच्या आत दिवस-रात्र, बाह्य रिअर व्ह्यू अॅडजस्टेबल मिरर आणि 60:40 स्प्लिटसह मागची सीट मिळते.

आपण झेडएक्सआय घेण्यासाठी आपले बजेट वाढवत असताना, आपल्याला सीडी, युएसबी आणि ऑएक्स-इन सह डबल डीआयएन ऑडिओ सिस्टीम, इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल बाहेरील रीअर-व्ह्यू मिरर, सेंट्रल लॉकिंग आणि बरेच काही मिळेल.

चेक: मारुती कार इन्शुरन्स बद्दल अधिक माहिती जाणून घ्या

मारुती सुझुकी सेलेरियो व्हेरिएंट्सची प्राइजची यादी

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटची अंदाजे प्राइज (नवी दिल्लीमध्ये, इतर शहरांमध्ये भिन्न असू शकते)
LXI ₹ 5.49 लाख
VXI ₹ 6.17 लाख
ZXI ₹ 6.50 लाख
VXI AMT ₹ 6.84 लाख
ZXI AMT ₹ 7.23 लाख
ZXI Plus ₹ 7.23 लाख
ZXI Plus AMT ₹ 7.78 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या मारुती सुझुकी सेलेरियो कार इन्शुरन्स पॉलिसीवर सर्व्हिस टॅक्स लागू आहे का?

होय, प्रचलित कायद्यानुसार मारुती कारच्या मोटर इन्शुरन्सवर सर्व्हिस टॅक्स लागू आहे.

मी मारुती सुझुकी सेलेरियो इन्शुरन्स आधीच्या मालकाच्या नावावर चालू ठेवू शकतो का?

नाही, आपण इन्शुरन्स स्वतःच्या नावावर ट्रान्सफर केला पाहिजे; अन्यथा, आपण त्याविरोधात क्लेम करू शकणार नाही.