मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिव करा

मारुती सुझुकी परवडणाऱ्या वाहनांच्या रेंजसाठी ओळखली जाते, ज्यात विविध सेडान आणि हॅचबॅक पर्यायांचा समावेश आहे. विटारा ब्रेझा ही भारतातील बजेट ओरिएंटेड मार्केटसाठी कंपनीच्या काही एसयूव्ही पैकी एक आहे.

1462 सीसी इंजिनने असणारी ही एसयूव्ही दिसायला अत्यंत स्टायलिश आहे आणि त्याच बरोबर रस्त्यावर प्रभावी परफॉर्मन्स ची खात्री देते. आपल्या अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्समुळे, विटारा ब्रेझाने 2018 टेक आणि ऑटो पुरस्कार (1) मध्ये 'एसयूव्ही / एमपीव्ही ऑफ द इयर' सह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यामुळे ही एसयूव्ही दर्जेदार वाहन आहे, दैनंदिन प्रवासासाठी योग्य आहे, यात शंका नाही.

तरीही, इतर कारप्रमाणेच, वाहनाचे अपघाती डॅमेज झाल्यानंतर त्वरित दुरुस्ती सुरू करण्यासाठी आपण सर्वोत्तम मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसीचा फायदा घेणे आवश्यक आहे. आपल्याला हव्या असलेल्या आर्थिक संरक्षणाच्या मर्यादेवर अवलंबून आपण थर्ड-पार्टी लायबिलिटी पॉलिसी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी निवडू शकता.

 थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी त्याचे नाव सार्थ करते. हे फक्त आपल्या कारशी संबंधित अपघातात डॅमेज झालेल्या थर्ड-पार्टीसाठी आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करते.

तथापि, आपण आपल्या स्वत: च्या कारच्या डॅमेजसाठी कोणत्याही आर्थिक मदतीचा क्लेम करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसी ची निवड करावी लागेल. या पॉलिसीअंतर्गत इन्शुरर्स थर्ड पार्टी लायबिलिटी गरजा पूर्ण करण्याबरोबरच स्वत:च्या डॅमेजचे कंपेनसेशन देतात.

या संदर्भात, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 अंतर्गत भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी मॅनडेटरी आहे. जर आपण या कायद्याचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास आपल्याला 2000 रुपये दंड भरावा लागू शकतो (पुनरावृत्ती केल्यास 4000 रुपये). त्यामुळे कार इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची की नाही हा प्रश्न नसून ती कोणत्या इन्शुरन्स कंपनीकडून खरेदी करायची हा प्रश्न आहे.

डिजिट आज भारतातील सर्वात प्रसिद्ध मोटार इन्शुरन्स प्रदात्यांपैकी एक आहे. त्याच्या पॉलिसी वैशिष्ट्ये आणि फायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी)
ऑगस्ट-2019 2,315
ऑगस्ट-2018 2,198
ऑगस्ट-2017 2,028

**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन मारुती सुझुकी विटारा ब्रेझा एलएक्सआय बीएसVI पेट्रोल 1462 साठी केले जाते. जीएसटी वगळण्यात आला आहे.

शहर - मुंबई, वाहन रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन, पॉलिसी ची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध आहे. प्रीमियमचे कॅलक्युलेशन ऑगस्ट-2020 मध्ये केले जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचा डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वतःच्या कारचे नुकसान/हानी

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे नुकसान/हानी

×

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे नुकसान/हानी

×

थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघात कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तीचे जखमी होणे/मृत्यू

×

तुमच्या कारची चोरी

×

तुमचा IDV कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ्ड अ‍ॅड -ऑन्ससह अतिरिक्त

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

कार इन्शुरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम किती वेगाने निकाली काढले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे ! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा.

विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिट निवडण्याची कारणे?

आपण मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कार इन्शुरन्सचे रिनिवल करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डिजिट हा असा प्रदाता आहे ज्याशी आपण जरूर संपर्क साधावा.

आम्ही काही सर्वात उपयुक्त असलेली वैशिष्ट्ये ऑफर करतो, जे पॉलिसीहोल्डर्ससाठी जीवन सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आमच्या काही लोकप्रिय सुविधांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • क्लेम सेटलमेंटचा प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड – डिजिट पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या क्लेमचे अर्ज मंजुर होईल की नाही याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आमची इन-हाऊस टीम आम्हाला मिळणाऱ्या बहुतेक क्लेम्सच्या विनंत्या फक्त काही वगळता सेटल करते. आम्ही निराधार बहाण्याने क्लेम्सचे खंडन करत नाही. त्याऐवजी, आमची टीम पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या कठीण काळात आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करते.
  • डिजिटायज्ड क्लेम प्रोसेस - प्रत्येक वेळी क्लेम फाइल करायला इन्शुररच्या कार्यालयात जाणे आपल्याला आवडत नाही का? बरोबर आहे, आम्हाला आपली व्यथा समजतो, म्हणूनच आम्ही क्लेम विनंती सबमिट करण्यासाठी डिजिटल मोड ऑफर करतो. पॉलिसीहोल्डर आपल्या घरी आरामात बसून स्मार्टफोनचा वापर करून क्लेम्स फाइल करू शकतात. शिवाय, आम्ही एक सेल्फ-इन्सपेक्शन प्रक्रिया प्रदान करतो, ज्याचा वापर करून आपण इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीची प्रतीक्षा न करता क्लेम फाइलिंग पूर्ण करू शकता. फक्त इन्शुअर्ड वाहनाचे काही फोटो क्लिक करा आणि डिजिटच्या स्मार्टफोन अॅप्लिकेशनचा वापर करून आम्हाला पाठवा. बस एवढेच! आम्ही सर्व माहितीचे पुनरावलोकन करू आणि कंपेनसेशन संदर्भात आपल्याशी संपर्क साधू.
  • आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन पर्याय - आयडीव्ही म्हणजे तुमचे इन्शुअर्ड वाहन चोरीला गेल्यास किंवा पूर्णतः खराब झाल्यास मिळणारे कंपेनसेशन असल्याने आपण नेहमीच ते जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. बहुतेक केसेसमध्ये इन्शुरर्स आपल्या कारचा आयडीव्ही ठरवतात, परंतु या बाबतीत डिजिट वेगळा आहे. मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करताना आम्ही आपल्याला आपल्या इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू वाढवण्याची परवानगी देतो. त्यामुळे अशा दुर्दैवी घटनेनंतर आपल्याला किती कंपेनसेशन मिळते हे पूर्णपणे आपल्या निर्णयावर अवलंबून असते.
  • भारतात 6000+ नेटवर्क गॅरेजेस- मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर्सना सेवा देण्यासाठी आमच्याकडे नेटवर्क गॅरेजची ग्रीड आहे. इन्शुअर्ड वाहनावर जलद कॅशलेस दुरुस्तीचा फायदा घेण्यासाठी आपण 1400 गॅरेजपैकी कोणत्याही गॅरेजमध्ये जाऊ शकता. त्यामुळे सध्या आपल्याकडे रोख रकमेची कमतरता भासल्यास खराब झालेले वाहन दुरुस्त केल्यानंतर रीएमबर्समेंटची वाट पाहावी लागणार नाही, याची काळजी डिजिट नेटवर्क गॅरेज घेइल. याव्यतिरिक्त, नेटवर्क सेवा केंद्रांची मोठी संख्या याचा अर्थ असा होतो की पॉलिसीहोल्डर देशात कोठेही असले तरीही अशा एका एखाद्या केंद्रापासून कधीही दूर नसतात.
  • डोरस्टेप कार पिक अप आणि ड्रॉप सुविधा - कॅशलेस दुरुस्ती देण्याबरोबरच नेटवर्क गॅरेज पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या घरबसल्या खराब झालेल्या कारची पिक-अप सुविधा देखील देतात. अशा वेळी गॅरेजचा कर्मचारी वाहन पीक-अप करून संबंधित सेवा केंद्रात घेऊन जाईल, डॅमेज दुरुस्त करेल आणि परत आपल्या घरी सोडेल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, आपल्या कारची दुरुस्ती सुरू असतानादेखील आपल्याला स्वत: गॅरेजमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.
  • अनेक अॅड-ऑन पर्याय - अॅड-ऑन स्वतंत्र इन्शुरन्स पॉलिसी नाहीत. त्याऐवजी, ते आमच्या विविध मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसीद्वारे प्रदान केलेले संरक्षण वाढवतात. आपल्या गरजेनुसार आपल्या इन्शुरन्स पॉलिसी कस्टमाइज करण्यासाठी डिजिट एक किंवा दोन नाही तर सात अत्यंत उपयुक्त अॅड-ऑन प्रदान करते. उदाहरणार्थ, इंजिन प्रोटेक्शन अॅड-ऑन इन्शुरन्सअर्ड वाहनाच्या इंजिनला इलेक्ट्रिकल आणि लिक्विड डॅमेजपासून संरक्षण प्रदान करते. हे कव्हरेज ठराविक पॉलिसीच्या कक्षेबाहेर आहे. इतर अॅड-ऑन पर्यायांमध्ये झीरो डेप्रीसीएशन कव्हर, रोड साइड असिसटन्स, पॅसेंजर कव्हर, कंझ्युमेबल कव्हर आणि बरेच काही समाविष्ट आहे. आपल्या ड्रायव्हिंग स्टाईलसाठी आपल्याला जे आवश्यक वाटेल ते निवडण्यास आपण मोकळे आहात.

24x7 Customer Service -

● 24×7 ग्राहक सेवा - ख्रिसमसच्या दिवशी किंवा प्रजासत्ताक दिनी आपल्याला अपघात होऊ शकतो. तसे असेल तर काळजी करू नका. डिजिटची ग्राहक सेवा टीम आपले कॉल घेण्यासाठी नेहमीच तयार आणि उपलब्ध असते. रात्रीचे तीन वाजले तरी गरजेच्या वेळी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स रिनिवल, खरेदी किंवा क्लेम्सबद्दल आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रश्न किंवा चिंतांचे निराकरण करण्यासाठी आमच्या टीमचे सदस्य तत्पर आहेत.

जर आपल्याला अजूनही भीती वाटत असेल तर डिजिटची इन्शुरन्स पॉलिसी घेऊन त्याचा प्रत्यय घेऊ शकता? आपल्याला त्याची अनेक वैशिष्ट्ये आणि फायदे त्वरीत लक्षात येतील, जे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आपल्याला आर्थिक मदत मिळविण्यात मदत करतील.

ड्रायव्हिंगचा आनंद घ्या पण सुरक्षित ड्राइव्ह करा!

मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

ही पॉवर पॅक्ड एसयूव्ही अशी मालमत्ता आहे ज्याचे आपल्याला संरक्षण करायचे आहे. कार इन्शुरन्स आपल्या नवीन कार आणि आपल्या खिशासाठी महत्वाचा आहे. कार इन्शुरन्स घेण्याचे हे फायदे आहेत:

  • आर्थिक लायबिलिटीझ: हे आपले तारणहार म्हणून कार्य करते आणि आपल्याकडून कोणत्याही थर्ड पार्टीला झालेल्या डॅमेजमुळे होणारे सर्व खर्च कव्हर करते. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्सच्या केस मध्ये , हे आपल्या स्वत: च्या कारचे डॅमेज आणि नुकसानीपासून संरक्षण करेल.
  • कायदेशीररित्या अनुपालन: योग्य इन्शुरन्सशिवाय आपला ब्रेझा चालविण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भारतात कार इन्शुरन्स शिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे आणि त्याला मोठा दंड (2000 रुपये पर्यंत) होऊ शकतो आणि यामुळे आपला ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड / जप्त करणे आणि / किंवा तुरुंगवास देखील होऊ शकतो.
  • थर्ड पार्टी लायबिलिटी: जर आपण अपघाताच्या दुर्दैवी घटनेत किंवा त्यासारख्या दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार असाल आणि दुसऱ्याच्या कार किंवा मालमत्तेचे डॅमेज/ इजा केल्यास या प्रकारचा इन्शुरन्स आपल्याला संरक्षण कव्हरेज प्रदान करतो. असे खर्च बहुधा अचानक आणि अनपेक्षित असतात आणि त्या वेळी आपण आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हाताळण्यास तयार नसतो, अशा वेळीस हा इन्शुरन्स कामी येतो आणि आपला आणि आपल्या खिसा रिकामा करण्यापासून वाचवतो.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर: हे आपल्या गरजेनुसार सुधारित केले जाऊ शकते; आपल्या ब्रेझासाठी अतिरिक्त इन्शुरन्स कव्हर म्हणून अशा इन्शुरन्सची निवड करणे देखील शहाणपणाचे मानले जाते. नावाप्रमाणेच, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरमध्ये आग, चोरी, नैसर्गिक / मानवनिर्मित आपत्ती, तोडफोड, निसर्ग / हवामानाची कृत्ये इत्यादी आपल्या नियंत्रणाबाहेरील घटकांमुळे होणारे सर्व नुकसान व्यापकपणे समाविष्ट आहे. याशिवाय पॉलिसी अंतर्गत काही कार इन्शुरन्स अॅड-ऑन्स निवडून कव्हरेज वाढवण्याचा पर्याय आहे. यापैकी काहींमध्ये ब्रेकडाउन असिस्टन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर आणि झिरो-डेप कव्हर चा समावेश असू शकतो.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा बद्दल अधिक जाणून घ्या

आपण जरा सतर्क रहा नाहीतर मारुती सुझुकी विटारा ब्रेझा आपल्याला पूर्ण भारावून टाकेल. ही बोल्ड, ग्लॅमरस, चमकदार आणि स्टायलिश कार स्टाईल-कॉन्शियस असलेल्या सर्वांसाठी आहे. मर्दानी बाह्य आणि कंटेम्पररी आतील भाग असलेल्या या कारमध्ये हे सर्व आहे.

ही सर्वात वेगवान कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून ओळखली जाते आणि 2017-18 साठी त्याच्या श्रेणीतील जवळजवळ प्रत्येक पुरस्कार जिंकला - इंडियन कार ऑफ द इयर 2017 पुरस्कारासह, एकाच वर्षात 28 पुरस्कार जिंकले.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा का खरेदी करावी?

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा ही क्रूझ कंट्रोलसह सहज ड्राइव्ह, ड्युअल टोन फ्लोटिंग रूफ, स्पोर्टी बोल्ड मस्क्युलर डिझाइन, फ्लॅटबेडसाठी फ्लिप फोल्डेड अनोखी सीट यासारख्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे; एसयूव्ही फ्रंट डिझाइन आणि डॅशिंग आतला भाग आपल्याला नक्कीच प्रभावित करेल. विटारा ब्रेझा एलडीआय, व्हीडीआय, झेडडीआय आणि झेडडीआय + या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. डीडीआयएस 200 इंजिन असलेली ही कार 24.3 किमी चे मायलेज देते.

या कारमध्ये ऑटो गिअर शिफ्ट टेक्नॉलॉजी आणि स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टिम सारखे अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. आपल्या सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल एअरबॅग, लॅम्प बझरसह सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड वॉर्निंग अलर्ट सारखे वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

विटारा ब्रेझा ही स्टाईल, आराम, सुरक्षा आणि कामगिरीचे अप्रतिम मिश्रण आहे. एसयूव्ही स्टँडर्डनुसार 24.3 किमी प्रति लीटरचा क्लेम असलेली विटारा ब्रेझा सर्वसामान्यांमध्ये विशेषत: तरुण खरेदीदारांमध्ये हिट आहे. ही कार रोजच्या ड्राइव्हसाठी आहे, फक्त वीकेंड गेटवेसाठी नाही. ब्रेझा एक कौटुंबिक कार आहे, आपल्या दैनंदिन प्रवासासाठी त्याचा वापर करा किंवा त्या बहुप्रतीक्षित कौटुंबिक रोड ट्रिपसाठी जा!

चेक: मारुती कार इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा - व्हेरियंट आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
एलडीआय 1248 सीसी, मॅन्युअल, डिझेल रु.7.67 लाख
व्हीडीआय 1248 सीसी, मॅन्युअल, डिझेल रु.8.19 लाख
व्हीडीआय एएमटी 1248 सीसी, ऑटोमॅटिक, डिझेल रु.8.69 लाख
झेडडीआय 1248 सीसी, मॅन्युअल, डिझेल रु.8.97 लाख
झेडडीआय एएमटी 1248 सीसी, ऑटोमॅटिक, डिझेल रु 9.47 लाख
झेडडीआय प्लस 1248 सीसी, मॅन्युअल, डिझेल रु 9.92 लाख
झेडडीआय प्लस ड्युअल टोन 1248 सीसी, मॅन्युअल, डिझेल रु.10.08 लाख
झेडडीआय प्लस एएमटी 1248 सीसी, ऑटोमॅटिक, डिझेल रु.10.42 लाख
झेडडीआय प्लस एएमटी ड्युअल टोन 1248 सीसी, ऑटोमॅटिक, डिझेल रु.10.64 लाख

मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझी मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स प्राइज कशी कमी करू शकतो?

डिजिटच्या इन्शुरन्स पॉलिसी वाजवी प्राइज मध्ये मिळतात. तथापि, जर आपल्याला प्रीमियम आणखी कमी करायचा असेल तर आपण दोन युक्त्या वापरू शकता. सर्वप्रथम, आपण पॉलिसीचा आयडीव्ही वाढविणे, त्याच्या कमीतकमी मूल्यावर ठेवणे टाळू शकता. पुढे, आपण उच्च व्हॉलंटरी डीडक्टीबल असलेले प्लॅन्स निवडू शकता, कारण ते स्वस्त असतात.

माझ्या मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसीवर मी जास्तीत जास्त एनसीबी(NCB) किती जमा करू शकतो?

डिजिट आपल्या पॉलिसीहोल्डर्सना पुढील क्लेम-फ्री वर्षांसह एनसीबी जमा करण्यास अनुमती देते. आपण या पॉलिसींमधून जास्तीत जास्त 50% पर्यंत एनसीबी जमा करू शकता.

मारुती विटारा ब्रेझा पॉलिसीच्या रोड साइड असिसटन्स अॅड-ऑनचे कार्य काय आहे?

रोड साइड असिसटन्स अॅड-ऑन मुळे जेव्हा आपली कार रस्त्याच्या मधोमध खराब होईल तेव्हा डिजिटच्या नेटवर्क गॅरेजमधून विविध सेवांचा क्लेम करण्याची परवानगी मिळेल. अशा वेळी गॅरेजमधील मेकॅनिक आपले वाहन सेवा केंद्रात पोहोचवतील. शिवाय, अशा सेवेचा फायदा घेणे आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम म्हणून धरले जात नाही.

माझ्या मारुती विटारा ब्रेझा इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर नो-क्लेम बोनसचा कसा परिणाम होईल?

एनसीबी तुमचा इन्शुरन्स प्रीमियम कमी करते. तथापि, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे थर्ड-पार्टी लायबिलिटी प्रीमियम रेट्सवर परिणाम न करता केवळ आपल्या प्रीमियमच्या स्वत: च्या डॅमेजचा भाग कमी करते.