मारुती सुझुकी परवडणाऱ्या वाहनांच्या रेंजसाठी ओळखली जाते, ज्यात विविध सेडान आणि हॅचबॅक पर्यायांचा समावेश आहे. विटारा ब्रेझा ही भारतातील बजेट ओरिएंटेड मार्केटसाठी कंपनीच्या काही एसयूव्ही पैकी एक आहे.
1462 सीसी इंजिनने असणारी ही एसयूव्ही दिसायला अत्यंत स्टायलिश आहे आणि त्याच बरोबर रस्त्यावर प्रभावी परफॉर्मन्स ची खात्री देते. आपल्या अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्समुळे, विटारा ब्रेझाने 2018 टेक आणि ऑटो पुरस्कार (1) मध्ये 'एसयूव्ही / एमपीव्ही ऑफ द इयर' सह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यामुळे ही एसयूव्ही दर्जेदार वाहन आहे, दैनंदिन प्रवासासाठी योग्य आहे, यात शंका नाही.
तरीही, इतर कारप्रमाणेच, वाहनाचे अपघाती डॅमेज झाल्यानंतर त्वरित दुरुस्ती सुरू करण्यासाठी आपण सर्वोत्तम मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसीचा फायदा घेणे आवश्यक आहे. आपल्याला हव्या असलेल्या आर्थिक संरक्षणाच्या मर्यादेवर अवलंबून आपण थर्ड-पार्टी लायबिलिटी पॉलिसी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी निवडू शकता.
थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी त्याचे नाव सार्थ करते. हे फक्त आपल्या कारशी संबंधित अपघातात डॅमेज झालेल्या थर्ड-पार्टीसाठी आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करते.
तथापि, आपण आपल्या स्वत: च्या कारच्या डॅमेजसाठी कोणत्याही आर्थिक मदतीचा क्लेम करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह मारुती विटारा ब्रेझा कार इन्शुरन्स पॉलिसी ची निवड करावी लागेल. या पॉलिसीअंतर्गत इन्शुरर्स थर्ड पार्टी लायबिलिटी गरजा पूर्ण करण्याबरोबरच स्वत:च्या डॅमेजचे कंपेनसेशन देतात.
या संदर्भात, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 अंतर्गत भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी मॅनडेटरी आहे. जर आपण या कायद्याचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास आपल्याला 2000 रुपये दंड भरावा लागू शकतो (पुनरावृत्ती केल्यास 4000 रुपये). त्यामुळे कार इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची की नाही हा प्रश्न नसून ती कोणत्या इन्शुरन्स कंपनीकडून खरेदी करायची हा प्रश्न आहे.
डिजिट आज भारतातील सर्वात प्रसिद्ध मोटार इन्शुरन्स प्रदात्यांपैकी एक आहे. त्याच्या पॉलिसी वैशिष्ट्ये आणि फायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.