फॅमिली कार म्हणून अगदी परिपूर्ण अशी ही कार. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत केलेल्या प्रवासाइतका आनंद इतर कोणत्याही प्रवासातून मिळणार नाही. लॉंच झाल्यापासून मारुती सुझुकी ईकोने लाखो ग्राहकांची मने जिंकली कारण हिची रचना असंख्य फंक्शनल नीड्स पुरविण्यासाठी केली गेली आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत किंवा बिझिनेसच्या निमित्ताने बाहेर जात असाल तर ईको नक्कीच तिच्या डिझाईन्स आणि परफॉरमन्समुळे तुमचे मन जिंकून घेईल.
तुम्ही मारुती सुझुकी ईको का खरेदी करावी?
ईको मध्ये तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग एक्पीरियंस मध्ये कम्फर्ट आणि स्टाईल दोन्हीचा संगम मिळतो.ईको ही एक फॅमिली कार आहे आणि तरुण आणि वृद्ध दोन्ही वयाच्या ग्राहकांसाठी एकसमान उपयुक्त ठरली हे.
हेडलॅम्प लेव्हलिंग, साईड इम्पॅक्ट बीम्स, सीट बेल्ट रिमाइंडर (ड्राईव्हर आणि शेजारील प्रवासी) आणि स्पीड अलर्ट सिस्टम; तुम्ही निश्चितच सुरक्षित रहाल, आणि तुमच्या सोयीसाठी, ईको मध्ये हीटर, स्लायडिंग ड्राईव्हर सीट, रिक्लायनिंग फ्रंट सीट्स आणि पुढच्या सीट्स साठी इंटीग्रेटेड हेड रेस्ट्स देखील दिलेले आहेत.
या कार मध्ये शक्तिशाली असे बाहेरचे आणि स्टायलिश असे आतील इंटीरिअर, मोल्डेड रूफ लायनिंग, रिअर कॅबिन लॅम्प, इंटीरिअरशी मिळतं जुळतं सीट ईकोला एक स्टायलिश लूक देते. आणि सोन्याहून पिवळं म्हणतात तसं या कारचं अफाट असं माईलेज देणारं इंजिन.
ईकोच्या सर्व प्रकारच्या कार्स मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे ज्यामुळे 6,000 आरपीएम वर 73 बीएचपी चे पावर आउटपुट आणि 101एनएमचे टॉर्क देखील देते. ईको पाच आणि साथ सीटर अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सात सीटर ही केवळ बेसिक प्रकारामध्ये उपलब्ध आहे आणि पाच सीटर चार प्रकारांमध्ये - बेसिक पाच सित्र, पाच सीटर एसी आणि हीटर सह, पाच सीटर हीटर आणि सीएनजी सह, पाच सीटर एसी, हीटर आणि सीएनजी सह, उपलब्ध आहे.
पहा: मारुती कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या