इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
Instant Policy, No Medical Check-ups

भारतीयांसाठी बाली टुरिस्ट व्हिसा

भारतीय नागरिकांसाठी डिटेल्ड बाली-इंडोनेशिया व्हिसा मार्गदर्शक

प्रवास ही एक उपचार चिकित्सा आहे जी केवळ मनालाच नाही तर आत्म्यालादेखील शांत करते. निसर्गप्रेमी आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांना इंडोनेशियन बेटावरील बाली त्याच्या निसर्गसौंदर्यामुळे आवडेल.

कामाचा ताण आणि रुटीन लाईफपासून दुर जाण्यासाठी बाली तरुणांमध्ये सुट्ट्यांसाठी आवडते डेस्टिनेशन बनले आहे. इंडोनेशियातील उर्वरित 17000 बेटांपैकी हे सर्वात तेजस्वी बेट आहे. जवळजवळ वर्षभर पर्यटकांच्या गर्दीमुळे, आपल्याला ट्रीपचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.

फिएस्टा! आणि तेही बालीत, सर्वात आनंददायक प्लॅन नक्कीच भाग असेल. आपल्या रमणीय समुद्रकिनाऱ्यांसाठी लोकप्रिय, आपण विविध वॉटर स्पोर्ट्स, पारंपारिक आर्ट गॅलरी आणि अन्नासह बरेच काही गोष्टींचा शोध घेऊ शकता. आणि येथे आपण आपल्या ट्रीपची तयारी न चुकता कशी करू शकता हे पाहूया.

भारतीयांसाठी बाली-इंडोनेशियाला व्हिसाची गरज आहे?

होय, इंडोनेशियाला भारतीय नागरिकांना 30 दिवसांसाठी व्हिसा ऑन अराइव्हल घेणे आवश्यक आहे. लोकल इमिग्रेशन ऑफिसकडून ही मुदत आणखी 30 दिवसांसाठी वाढवली जाऊ शकते. आपण आपल्या प्रवास उद्देशानुसार व्हिसाचा प्रकार निवडू शकता. सर्व व्हिसा मंजुरी केवळ इमिग्रेशन महासंचालनालयाद्वारे जारी केल्या जातात

जर तुमचा प्रवास कालावधी 30 दिवसांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला व्हिसाची आवश्यकता आहे. आपण आपल्या प्रवास उद्देशानुसार व्हिसाचा प्रकार निवडू शकता.

भारतीय नागरिकांसाठी बालीमध्ये व्हिसा ऑन अराइव्हल आहे का?

जर तुमचा प्रवास कालावधी 30 दिवसांचा असेल तर तुम्ही इंडोनेशियात प्रवेश करता तेव्हा व्हिसा ऑन अराइव्हलसाठी अर्ज करू शकता. तसेच 30 दिवसांसाठी ही मुदत वाढवता येऊ शकते. 2,680* (आरपी 500,000 / एसजीडी 50 / यूएसडी 35)

जर तुमचा प्रवास कालावधी 30 दिवसांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही इंडोनेशियात प्रवेश करता तेव्हा व्हिसा ऑन अराइव्हलसाठी अर्ज करू शकता.

*अस्वीकरण: किंमती परिवर्तनीय आहेत आणि सध्याच्या विनिमय दरानुसार बदलण्याच्या अधीन आहेत.

इंडोनेशियामधील व्हिसाचे प्रकार

व्हिसाचे प्रकार दिवसांची संख्या तपशील
टुरिस्ट 30-60 दिवस व्हिसा ऑन अरायव्हल आयडीआर 500,000 शुल्क, 30 दिवसांसाठी वाढविले जाऊ शकते.
सामाजिक/सांस्कृतिक/टुरिस्ट-बी 211 60 दिवसांसाठी वैध 30 दिवसांसाठी 3 वेळा वाढवता येऊ शकतो. इंडोनेशिया बाहेरील वाणिज्य दूतावास किंवा दूतावासाने जारी केलेले मल्टीपल एंट्री व्हिसा
मल्टीपल एंट्री व्हिसा मल्टीपल एंट्री व्हिसा इंडोनेशियाबाहेरील वाणिज्य दूतावास किंवा दूतावासाने जारी केलेले. 1 वर्षासाठी वैध

भारतीय नागरिकांसाठी बाली-इंडोनेशिया व्हिसा फी

व्हिसाचा प्रकार दिवसांची संख्या फिस
टुरिस्ट (व्हिसा ऑन अरायव्हल) 30-60 ● रु. 2,680 किंवा $35 ● मुक्काम वाढवण्यासाठी कोणत्याही भारतीय नागरिकाला इमिग्रेशन हॉलमध्ये रु. 4213 किंवा $61.5 पे करावे लागतील. ● एजंटच्या मदतीने मुदतवाढ लागू केल्यास, आपल्याला त्यांचे फी म्हणून रु. 1817 किंवा $26.50 पे करावे लागतील.
सामाजिक/सांस्कृतिक उद्दिष्टे 30-60 दिवस ● बी-211 व्हिसा ऑन अरायव्हल खरेदी करता येईल. ● वैयक्तिक प्रायोजकाची आवश्यकता आहे जी ट्रॅव्हल एजंट देखील असू शकतो. ●जास्तीत जास्त 4 वेळा वाढवता येईल. ● व्हिसा आणि प्रत्येक विस्तारासाठी किंमत रु. 4216 किंवा $61.5 आहे. ● एजंटच्या मदतीने मुदतवाढ लागू केल्यास आपल्याला त्यांचे फी म्हणून रु.1817 किंवा $26.50 द्यावे लागतील.
बिझनेस 30 दिवसांपेक्षा जास्त नाही रु. 2900 किंवा $42.30

बाली-इंडोनेशिया व्हिसासाठी आवश्यक दस्तऐवज

(जर तुम्ही 30 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रवास करत असाल तर)

बाली व्हिसासाठी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मूलभूत दस्तऐवज म्हणजे पासपोर्ट. आपला पासपोर्ट प्रवासाच्या तारखेनंतर 6 महिन्यांसाठी वैध आहे की नाही हे तपासा.

बाली-इंडोनेशिया व्हिसासाठी अर्ज कसा करावा?

टुरिस्ट म्हणून बालीला प्रवास केल्यास तुमचा मुक्काम बहुधा 30 दिवसांपेक्षा कमी असेल. जर तसे असेल तर तुम्हाला व्हिसा ऑन अराइव्हल मिळू शकतो. एअरपोर्टवर फक्त ज्या वस्तू दाखवाव्या लागतील त्या खालीलप्रमाणे असतील:

  • दोन रिकाम्या व्हिसा पृष्ठांसह पासपोर्ट कमीतकमी 6 महिन्यांसाठी वैध आहे.

  • पुढील आणि परतीच्या उड्डाणांचा पुरावा.

 

आपला मुक्काम 30 दिवसांपेक्षा जास्त असेल तेव्हा टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रोसेस:

  • प्रक्रियेसाठी ऑनलाइन भेट द्या आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करा.

  • भेटीचा उद्देश सांगणारे कव्हर लेटर तयार करा.

  • आपला पासपोर्ट तपासा कारण तो 6 महिन्यांसाठी वैध असावा आणि 2 रिक्त पृष्ठे असावीत.

  • आपले फोटो फॉर्मवर पेस्ट करा. हे फोटो फक्त 3 महिन्यांपेक्षा जुने नसावेत.

  • आपली कन्फर्म हवाई तिकिटे मिळवा आणि ती अॅप्लीकेशन फॉर्मसह संलग्न करा.

  • फाइलसोबत $10 किंवा $25 फी भरावे लागते.

  • बाली इंडोनेशियामध्ये आपल्या हॉटेल बुकिंगचा पुरावा दाखवा. बालीमध्ये प्रायोजक मिळण्याचे भाग्य लाभल्यास प्रायोजकाचे पत्र सादर करा. फाइल प्रोसेसिंगसाठी सुमारे 3-4 दिवस लागतील.

  • अर्जदाराकडे बँकेत पुरेसा फंड असावा. आपण बालीला असताना आपला मुक्काम आरामदायक असेल हे सिद्ध करण्यासाठी आहे.

  • सर्व अर्जदारांना एक फाइल ट्रॅकिंग नंबर मिळतो जो आपल्याला आपल्या व्हिसाची स्थिती जाणून घेण्यास मदत करेल.

  • सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपण आपला पासपोर्ट गोळा करू शकता. आणि सुट्टी आनंदात घालवू शकता.

बाली इंडोनेशिया टुरिस्ट व्हिसा प्रोसेस वेळ

30 दिवसांपेक्षा जास्त मुक्काम असेल तर टूरिस्ट व्हिसासाठी आवश्यक प्रक्रियेसाठी 2 ते 15 दिवस लागतील. बाली जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. भारतासह काही देशांना 30 दिवसांपेक्षा कमी मुक्काम असेल तर व्हिसा सवलतीची परवानगी आहे.

मी इंडोनेशियासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करावा का?

मौजमजा आणि आनंदासाठी लवकरच बालीला प्रवास करणार आहात? जर होय, तर आपण आपल्या प्रवासासाठी तयार होण्यापूर्वी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीसह स्वत: ला थोडी शांती मिळवा. हे मॅनडेटरी नाही परंतु आणीबाणीच्या परिस्थितीत हे असणे निश्चितच चांगली कल्पना असेल. बालीला भेट देणाऱ्या प्रत्येकाने ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करावा:

भारतीय नागरिकांसाठी बाली व्हिसा बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इंडोनेशियाला माझ्या व्हिसा ऑन अराइव्हलला विनाअडथळा मान्यता देण्यासाठी मला कोणते ती दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे?

इंडोनेशियासाठी व्हिसा ऑन अराइव्हलच्या सुलभ मंजुरीसाठी, आपण खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे-

  • कमीत कमी सहा महिन्यांचा वैधता कालावधी आणि दोन कोरी पृष्ठे असलेला भारतीय पासपोर्ट.
  • परतीच्या फ्लाइट तिकीट जे कन्फर्म आहे.

भारतीय व्हिसा ऑन अराइव्हल होल्डर्सना सागरी बंदरांद्वारे इंडोनेशियात प्रवेश दिला जातो का?

होय, इंडोनेशियासाठी व्हिसा ऑन अराइव्हल घेताना, आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय बंदराद्वारे देशात प्रवेश करू शकता. तसेच आवश्यक ती सर्व दस्तऐवज सोबत ठेवण्याची खात्री करा

मी इंडोनेशियासाठी माझा टुरिस्ट व्हिसा ऑन अरायव्हल चे इतर कोणत्याही परमिट किंवा व्हिसा प्रकारात रूपांतर करण्यास पात्र आहे का?

नाही, इंडोनेशियासाठी टूरिस्ट व्हिसा ऑन अराइव्हलचा वापर टूर आणि ट्रॅव्हलसाठी काटेकोरपणे केला पाहिजे. आपण हे इतर कोणत्याही परमिट किंवा व्हिसा प्रकारात रूपांतरित करू शकत नाही.

व्हिसा ऑन अराइव्हलची मुदत संपल्यानंतर जर मी इंडोनेशियात जास्त काळ राहिलो तर मला काय परिणाम भोगावे लागू शकतात?

आपण इंडोनेशियामध्ये ज्या कालावधीसाठी जास्त काळ रहाता त्याआधारे, परिणाम दररोज दंड, हद्दपार करणे किंवा काळ्या यादीत टाकणे असू शकतात. त्यामुळे व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी त्याचे रिनिवल करणे आवश्यक आहे.

इंडोनेशियाला जाताना मी माझा व्हिसा ऑन अराइव्हल कोठे मिळवू शकतो?

एकदा मान्यता मिळाल्यानंतर, आपण इंडोनेशियात पोहोचल्यानंतर प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे, सागरी बंदरे आणि पश्चिम कालिमंतानमधील एन्टिकोंग येथील अनुमत जमिनी सीमेवरून आपला व्हिसा ऑन अराइव्हल गोळा करू शकता.