इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
Instant Policy, No Medical Check-ups

भारतीय नागरिकांसाठी श्रीलंका टुरिस्ट व्हिसा

भारतीय नागरिकांसाठी श्रीलंका व्हिसा बद्दल सर्व माहिती

अगदी सहज तुम्ही श्रीलंका सारख्या देशाच्या प्रेमात पडाल. प्राणी आणि निसर्गप्रेमींसाठी तर हे ठिकाण जणु पृथ्वीवरील एक स्वर्गच आहे. श्रीलंकेतील बीच खूप सुंदर आहेत या जगप्रसिद्ध समजुतीपलीकडे देखील श्रीलंकामध्ये खूप काही सामावलेले आहे. वाइल्ड लाईफ सफारी, उंच डोंगर, असंख्य चहाचे मळे, जगातील सर्वात निसर्गरम्य ट्रेन राईड, आणि हाइकिंग ट्रेल्सची विविधता साहसी अनुभव घेणाऱ्या हौशी पर्यटक, हनीमून कपल किंवा अगदी एखाद्या कुटुंबाला हवापालट म्हणून जाण्यासाठी एक ठिकाण म्हणून देखील श्रीलंका यादीतील सगळ्यात पहिले नाव असेल. पुढे जाण्याआधी आणि तुमची ट्रीप प्लॅन करण्याआधी तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला लागणाऱ्या काही गोष्टींबद्दल थोडी माहिती करून घेऊया- एक वैध व्हिसा आणि एक ट्रॅव्हल इन्शुरन्स!

भारतामधून श्रीलंकेला जाताना व्हिसा लागतो का?

होय, भारतीयांना श्रीलंकेला जाताना व्हिसा लागतो.

भारतीय नागरिकांसाठी श्रीलंकेला पोहोचल्यावर व्हिसा ऑन अराइव्हल पुरेसा असतो का?

हो, श्रीलंकेला जाणाऱ्या भारतीयांना व्हिसा ऑन अराइव्हलची परवानगी आहे, पण तुम्ही याची खात्री बाळगायला हवी की श्रीलंका ETA आधीच घेतलेले आहे आणि तुमचा पासपोर्ट तुमच्या प्रवास सुरु करण्याच्या तारखेपासून पुढील तीन महीन्यांसाठी वैध आहे याची देखील खात्री करून घेणे आवश्यक आहे.

भारतीय नागरिकांसाठी श्रीलंका व्हिसा फी

श्रीलंकासाठीच्या टुरिस्ट व्हिसाची सर्वसाधारण कॉस्ट $20 आहे, ज्याअंतर्गत तुम्हाला देशात 30 दिवस राहण्याची आणि दोन वेळा प्रवेश करण्याची परवानगी मिळते. टुरिस्ट व्हिसामुळे तुम्हाला जास्तीत जास्त दोन वेळा श्रीलंकेमध्ये प्रवेश मिळू शकतो. एक बिझनेस व्हिसा ज्याअंतर्गत तुम्ही किती ही वेळा प्रवेश करू शकता, त्याची सर्वसाधारण कॉस्ट $30 आहे.

श्रीलंका ETA साठी अर्ज कसा करायचा?

श्रीलंकेला येणाऱ्या भारतीयांचा देशात येण्याचा हेतू पर्यटन, स्थलांतरण, बिझनेस यापैकी कोणता असेल तर देशात येण्यासाठी आणि तिथे फिरण्यासाठी त्यांच्याकडे ETA (इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथराइझेशन) असणे आवश्यक आहे. 

इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथराइझेशन

www.eta.gov.lk या संकेतस्थळावर किंवा श्रीलंकन मिशन अब्रॉड यावर ETA साठीच्या एका ऑनलाईन अर्जाची पूर्तता करून अर्जदार श्रीलंकेसाठी वैध इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथराइझेशन मिळवू शकतात. श्रीलंका ETA साठीचा ऑनलाईन अर्ज करणे अगदी सोपे आहे. श्रीलंकेकडून तुम्हाला ETA अप्रूव्हल मिळवण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

ETA प्रक्रिया

  • ऑफीशियल वेबसाइटवरून अर्ज भरा आणि अॅक्नॉलेजमेंट मिळवा.

  • अर्ज करताना तुम्ही दिलेल्या मेलआयडीवर ETA अप्रूव्हल मिळवा.

  • इमेलवर आलेल्या अप्रूव्हलची एक प्रिंटआउट काढा आणि विमानतळावरील इमिग्रेशन ऑफिसर्स कडे सबमिट करा.

  • ETA सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतरच्या 180 दिवसात वापरले गेले पाहिजे.

श्रीलंका टुरिस्ट व्हिसा प्रोसेसिंग टाईम

एकदा तुम्ही फॉर्म भरलात की तीन दिवसात तुम्हाला ETA मेल केले जाईल.

श्रीलंकेला जाताना मी ट्रॅव्हल इन्शुरन्स विकत घ्यावा का?

भारतामध्ये जेवढा मेडिकल एक्स्पेन्स आहे, या एका देशातही थोड्या फार फरकाने तितकाच एक्सपेन्स आहे, पण तरी परदेशात प्रवास करताना इन्शुरन्स कव्हर घेणे कधी ही समाजदारीचेच, नाही का? आणि तसे ही ट्रॅव्हल इन्शुरन्स खाली मेडिकल इमर्जन्सी व्यतिरिक्त इतर आणीबाणीच्या परीस्थितीसाठी लागणाऱ्या खर्चाचे कव्हर मिळते. त्यातील काही परिस्थिती म्हणजे फ्लाइट डीले, डीले इन चेक-इन लगेज, पैसे गहाळ होणे, पासपोर्ट हरवणे, साहसी खेळ खेळताना, चोरी, पर्सनल लायबिलिटी बॉन्डस, ई.

श्रीलंकाचे ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला खालील सर्व परिस्थितींमध्ये सुरक्षा प्रदान करेल.

भारतीय नागरिकांसाठी श्रीलंका व्हिसा बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

श्रीलंका भारतीयांना ऑन अराइव्हल व्हिसा देतो का?

होय, व्हिसा ऑन अराइव्हल उपलब्ध आहे. तुम्हाला तुमच्या ट्रीपच्या डीटेल्स आधी देऊन ठेवाव्या लागतील. तुमचा पासपोर्ट देखील तुमच्या प्रवासाला निघण्याच्या तारखेच्या नंतर तीन महीने वैध रहायला हवा.

श्रीलंकेला जाण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स गरजेचा आहे का?

नाही, पण तुम्ही श्रीलंकेला प्रवास करताना ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे समजदारीचे ठरेल.

कोणी अल्पवयीन मुलगा जर देशाला प्रवास करणार असेल तर स्वाक्षरी कोणी देणे अपेक्षित आहे?

अल्पवयीन मुलाच्या कायदेशीर पालकांना किंवा पालकांना ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. याव्यतिरिक्त पालकांनीच दस्तऐवजही साइन करावे.

व्हिसा प्रक्रियेसाठी साधरणपणे किती अवधी लागतो?

श्रीलंकन कायद्यानुसार तीन दिवसांच्या अवधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.

देशाला भेट द्यायला येण्याआधी मला फायनान्शियल डिटेल्स द्यावे लागतील का?

तुम्ही व्हिसा साठी अर्ज करताना मागील तीन महिन्यांचे तुमचे बँक स्टेटमेंट तुम्हाला सबमिट करावे लागते. अधिकारी त्यावरून तुमच्या फायनान्शियल स्टेटसचा अंदाज घेतील.